साने गुरुजी समग्र पुस्तक संच.

कलंत्री's picture
कलंत्री in जनातलं, मनातलं
21 Jan 2011 - 11:26 pm

१९५० च्या सुमारास घडलेली ही खरी घटना आहे.

साने गुरुजीच्या पुस्तकांनी महाराष्ट्राची तरुण पीढी भारावलेली होती. त्यातच एका १८/१९ वयाच्या युवकाचा समावेश होता. दुर्दवाने त्या युवकाला असाध्य अश्या आजाराने गाठलेले होते. मरण्यापूर्वी साने गुरुजींना भेटावे असे त्याला वाटत होते. त्याच्या पालकांनी साने गुरुजींना तसे कळविळे आणि भेटता येईल का असे विचारले. पत्राची वाट पाहत असतांना प्रत्यक्ष साने गुरुजीच त्यांना भेटायला त्याच्या गावी आले. ( नाशकातील ही सत्य घटना आहे.).

माझ्या माहितीप्रमाणे मुंबईच्या एका उडुपीच्या हॉटेलचे उद्घाटन सानेगुरुजींच्या हस्ते झाले होते.

सानेगुरुजींचा असा प्रचंड जनसंपर्क होत असायचा. माझ्या मते महाराष्ट्रावर साने गुरुजी आणि गाडगे बाबा याचा बराच प्रभाव होता.

अशा सानेगुरुजींना बरीच विचारप्रर्वतक पुस्तकांचे लिखाण केले अश्या १२५०० पानांचे समग्र सानेगुरुजी ४६ पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन आणि वितरण १ फेब्रु ला पुण्यात वरदा प्रकाशनातर्फे होत आहे.

सानेगुरुजींचे आगळे आणि वेगळे वैशिष्ट्य आज मला असे समजले कि साने गुरुंजीच्या गाण्यांनी अनेक सेवादलाच्या आणि सघां च्या कार्यक्रमात गायली जात असत. ( बलसागर भारत होवो, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे इत्यादी इत्यादी).

स्थिरचित्रशुभेच्छा

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

22 Jan 2011 - 10:25 am | मृत्युन्जय

सरल साधी ओघवती भाषा, कुठलेही अवडंबर न माजवता तरल भावनांचे प्रकटीकरण, लिखाणामागची तळमळ, लेखनातला सच्चेपणा, कमालीची संवेदनशीलता ही मला वाटते साने गुरुजींच्या लेखनाची बलस्थाने होती. श्यामची आई खरे म्हणजे किती सहज पुस्तक पण कितीतरी वेळा मनावर प्रचंड मोठा प्रभाव सोडुन जाते, भावूक करते.

साने गुरुजींनी ७० हुन आधिक पुस्तके लिहिली आणि त्यात काय नाही आहे? श्यामची आई तर आहेच. कविता आहेत, निबंध आहेत, कथा आहेत, कादंबर्‍या आहेत, स्फुट लेख आहेत. पण तरीही आपल्यापैकी फार थोड्या जणांनी (मी धरुन) श्यामची आई व्यतिरिक्त अजुन काही वाचले असेल. खुप लहानपणी मी गोड गोष्टी आणि सुंदर पत्रे वाचल्याचे आठवते. ती पुस्तके मिळणार असतील तर मी अजुनही, या वयातही ती घ्यायला तयार आहे. वरदा प्रकाशनाने समग्र साने गुरुजी प्रकाशित करुन खरेच एक खुप चांगली गोष्ट केली आहे. त्यांचे अभिनंदन

नरेशकुमार's picture

22 Jan 2011 - 11:48 am | नरेशकुमार

आपल्या उस्फुर्त प्रतिक्रिये वरुन,

माझ्या मते महाराष्ट्रावर साने गुरुजी आणि गाडगे बाबा याचा बराच प्रभाव होता.

'होता' असे म्हणन्याऐवजी अजुनही 'आहे' असेच म्हनावे लागेल (आणि राहीलही हि खात्री पटते)

आत्मशून्य's picture

22 Jan 2011 - 12:55 pm | आत्मशून्य

खुप लहानपणी मी गोड गोष्टी आणि सुंदर पत्रे वाचल्याचे आठवते. ती पुस्तके मिळणार असतील तर मी अजुनही, या वयातही ती घ्यायला तयार आहे.

लहानपणी मी सूध्द जबर्दस्त पंखा होतो आहे गोड गोष्टीचां . पूण्यात साहीत्यपाराजवळ जे पूस्तकप्रदर्शन आहे तेथे मी ही पूस्तके पाहीली आहेत. फूलाचा प्रयोग, शेवटी नदी सागरालाच मीळेल, सोहराब व रूस्तूम या व इतर अनेक कथा माझ्या फार आवडत्या होत्या.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Jan 2011 - 7:14 pm | निनाद मुक्काम प...

खरय (हि पुस्तके मला मुंजीत मिळाली होती .आज काल इंग्रजी माध्यमातील मुलाना हरी पुत्तर द्यायचा .) परवडला नाही तरी

जसा भाव तसा देव हे त्यांच्या एका गोष्टीतील वाक्य माझ्या हदयात कोरले आहे .
त्यावरच एक मराठी म्हण म्हजे मनी नाही भाव आणि देवा मला पाव
व अश्या आशयाचे मराठी गण देव देव्हार्यात नाही .

वेताळ's picture

22 Jan 2011 - 1:06 pm | वेताळ

पण खरेखुरे गांधीवादी कलंत्रीकाका परत मिपावर लिहायला लागले ही खुप आनंददायी घटना आहे.

साने गुरुजींसारखा तळमळ असलेला मनुष्य परत होणार नाही.

त्यांना मनापासुन अभिवादन.

गुंडोपंत's picture

24 Jan 2011 - 8:36 am | गुंडोपंत

आजिबात नको यांची पुस्तके.
आक्खी एक पीढी या गुरुजींच्या लेखनाने भावनिक गुळमट आणि मेणचट होऊन 'बसली'.
नकोच ती गुर्जींची पुस्तकं!