चित्रविभाग

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in काथ्याकूट
6 Jun 2008 - 5:40 am
गाभा: 

मागे आम्ही मिपावर आलेली सुंदर सुंदर चित्रे आणि फोटो पाहून इथे मिपावर चित्रांसाठी स्वतंत्र विभाग (पाककृतीं प्रमाणेच) सुरू करावा काय यासाठी मिपाकरांच्या मनाचा कानोसा घेणारा एक पोल आयोजित केला होता.

http://www.misalpav.com/node/1814

त्या पोलचे निकाल खालीलप्रमाणे:

प्रश्न: मिपावर चित्रकलाविषयक स्वतंत्र विभाग सुरु करावा का?

एकूण रिस्पॉन्स = ३२

होय = ३० (९४%)

नको = १ (३%)

माहित नाही = १ (३%)

काही मिपाकरांनी त्या विभागात फोटोंचाही समावेश करावा असे लिहिले आहे आणि ते सयुक्तिकही आहे.

वरील मतदानावरून असे दिसते की चित्र-फोटोंसाठी मिपावर एक नवीन दालन सुरू करावे अशी मिपाकरांची इच्छा दिसते. हे निष्कर्ष आम्ही सर्वांपुढे ठेवीत आहोत.

आता संपादक-मंडळाची मर्जी!!

-डांबिस सर्व्हे ब्यूरो

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

6 Jun 2008 - 6:05 am | विसोबा खेचर

डांबिस सर्व्हे ब्यूरोने ठेवलेल्या निष्कर्षांचा अवश्य विचार केला जाईल असा विश्वास बाळगावा. मिपाच्या प्रेमाखातर डांबिस सर्व्हे ब्यूरो व्हॉलंटरीली जे काम करत आहे त्याची मिपाला जाणीव आहे! :)

तात्या.

पिवळा डांबिस's picture

6 Jun 2008 - 8:51 am | पिवळा डांबिस

आता आपल्याच्यानं होईल तेव्हढं करायचं!
काय!!
:)

किती छान फोटो चढवत आहेत मिपाकर...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

ध्रुव's picture

6 Jun 2008 - 11:10 am | ध्रुव

मिपावर छायाचित्रे व हातानी काढलेली चित्रे त्याच जोडिला प्रवास असा काहीतरी एकच मोठा विभाग काढता आला तर भारी होईल. म्हणजे प्रवासवर्णने, छायाचित्रे, रेखाटने यांना एकाच जागी संकलीतपणे बघता येईल. तसेच नव्या/जुन्या जागा, आठवणीच्या बाहेरची ठिकाणे व नव्नवी माहिती देता घेता येईल.
तात्या, निलकांत व सर्व तांत्रीक मदतगार... जरा मनावर घ्या ना!! :)
--
ध्रुव

लिखाळ's picture

6 Jun 2008 - 11:40 pm | लिखाळ

सहमत आहे.. असा विभाग उपयोगी ठरेल..
कऊल झालेला लक्षात आला नव्ह्ता.. त्यामुळे तेथे मत नोंदवायचे राहिले.
-- लिखाळ.

इनोबा म्हणे's picture

7 Jun 2008 - 12:02 am | इनोबा म्हणे

सहमत आहे.. असा विभाग उपयोगी ठरेल..
हेच म्हणतो...

डांबिस सर्व्हे ब्युरोचे आभार!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

ईश्वरी's picture

6 Jun 2008 - 11:41 am | ईश्वरी

>> मिपावर छायाचित्रे व हातानी काढलेली चित्रे त्याच जोडिला प्रवास असा काहीतरी एकच मोठा विभाग काढता आला तर भारी होईल. म्हणजे प्रवासवर्णने, छायाचित्रे, रेखाटने यांना एकाच जागी संकलीतपणे बघता येईल.
अगदी हेच म्हणते मी. तात्या कृपया हे मनावर घ्या. मिपा अजून छान होईल मग.
ईश्वरी

अथांग सागर's picture

7 Jun 2008 - 12:07 am | अथांग सागर

मी सुध्दा सहमत आहे...

--अथांग सागर

ध्रुव's picture

18 Jun 2008 - 11:55 am | ध्रुव

जरा मनावर घ्या ना!! :)
--
ध्रुव