काही दिवसां पूर्वी एका " अ " बँकेच्या पैसे देणाऱ्या स्वयं चलित यंत्रातून मी रु १००० काढले पण त्या उदार यंत्रा ने मला रु १००० ऐवजी ५००० मात्र दिले आणि माझ्या खात्यातून रु १००० वजा केले.
मी गडबडलो व जात्याच पापभिरू (?) असल्याने मी त्या ठिकाणच्या सहाय्यकाला शोधण्याचा प्रयत्न केला . पण तो मिळाला नाही . तसे ते यंत्रा वाशी ला स्टेशन च्या एका कोपर्यात आणि दुर्लक्षित जागी असल्याने वर्दळ कमीच होती पण नेमकी त्या वेळी इतर काही बँकेची यंत्र बंद झाल्याने त्या यंत्रा ला शोधात अनेक मंडळी तेथे आली. मी अनेक लाकाना खोटे सांगून तिथून फुटवले. की करावे आह्या प्रयत्नात तिथल्या शक्य तितक्या नं वर फोन करून बँकेला कळवणे चा प्रयत्न केला पण त्यात अपयश आले . कंटाळून मी शेवटी रिक्षा थांबवली आणि रिक्षावाल्यास वाशी पोलिस स्टेशन ला नेण्यास सांगितले.
पोलिसांनी सर्व प्रकार ऐकून घेतला व मला घेऊन त्या ठिकाणी परत आले व मला त्यांच्या समक्ष पुन्हा पैसे काढून तीच गोष्ट पुन्हा होते का याची खात्री करून घेतली . त्या वेळी मात्र तेथील गार्ड उपस्थित होता त्या च्या कडून मनेजर चा नं घेऊन झाला प्रकार त्याच्या कानावर मी स्वतः घातला . त्यावर त्या ने माझ्याच फोनवरून त्या पोलिसाला गार्ड कडून ते यंत्र बंद ठेवण्याच्या सूचना देल्या. पोलिसाने मला परत पोलीस स्टेशन वर नेले व माझे २००० रु माल देऊन वरील ८००० रु स्वतः कडे ठवले आणि तसे त्या संबधित मनेजर ला कळवले.
मी केलेल्या कृतीचे काही लोकांनी समर्थन केले आणि काही लोकांनी मला वेड्यात काढले . पण दुर्दैव म्हणजे त्या बँकेने नंतर परत कधी हि फोन करून माझे आभार मानले नाहीत.
यावरुन मी आता पुन्हा अशा वेळी बँकांना मदत कराविकी नाही अश्या विचारात आहे.
प्रतिक्रिया
7 Jan 2011 - 1:18 pm | घाशीराम कोतवाल १.२
चिप्लुनकर कसे हो साधे भोले तुमी ?
मना सांगा १०००० मिलाले मज्जा कराची ना
आता कशाला रलता
7 Jan 2011 - 1:21 pm | अवलिया
छ्या ! ४००% रिटर्न एका दिवसात मिळण्याची मोठी संधी वाया घालवलीत.
इथे लोक वर्षाला ४०% मिळाले तरी खुष होतात...
7 Jan 2011 - 1:26 pm | यकु
नेकी कर कुएं मे डाल .. ;-)
7 Jan 2011 - 1:31 pm | भडकमकर मास्तर
बँकेचं नाव टाळलंय तुम्ही सांगायचं...
7 Jan 2011 - 1:36 pm | चिप्लुन्कर
ओरिएन्तल बँक ऑफ कॉमस
वाशी स्टेशन वर जी हॉटेलांची रांग दिसते त्याच्या कोपर्यात आहे एक मशीन
7 Jan 2011 - 2:12 pm | ५० फक्त
माहितीबद्दल अतिशय धन्यवाद.
१. ही स्कीम अजुन चालु आहे काय ?
२. ही स्कीम दुस-या बँकेच्या कार्डला पण लागु आहे काय?
३. सध्या पोलिस या एटिएम वर लक्ष ठेवुन आहेत काय, आतुन जास्त पॅसे घेउन आला की धर आणि कर वसुल ?
४. पोलिसांनी पॅसे बँकेला परत केले काय ?
५. ''मी अनेक लाकाना खोटे सांगून तिथून फुटवले.'' या मागचा विचार / उद्देश कळला नाही, आपण त्याच बँकेत कामाला आहात काय ?
६. तुम्ही रिक्षा करुन पोलिस स्टेशनला जाउन परत येईपर्यंत इतर ब-याच जणांनी पॅसे काढले असतील ना ''पण नेमकी त्या वेळी इतर काही बँकेची यंत्र बंद झाल्याने '' - त्यांचे काय, जर त्यांना असे जास्त पॅसे मिळाले असतील तर बँक त्यांचे अकाऊंट ट्रेस बॅक करुन त्यांच्या कडुन पॅसे बसुल करेल ,तसेच तुमच्या बाबतीत देखिल होउ शकते, तेंव्हा सावध रहा. कारण पोलिसांनी तुमच्या कडुन पॅसे घेतल्यावर तुम्हाला काही पोचपावती दिलि आहे काय, कसले पॅसे,कुणाकडुन,कशाचे, कधी नाही ना, मग?
किंवा फोनवर झालेल्या संभाषणांचे ''पुरावे कसे करावे'' याच्या प्रशिक्षणासाठी मा.श्री.दिग्विजय सिंग यांना संपर्क करा.
अवांतर - शरदिनी तॅ, पुरावे कसे करावे यावर एक कविता कराल काय, एक नम्र विनंती.
हर्षद.
7 Jan 2011 - 2:40 pm | चिप्लुन्कर
१) नाही.
२) मी पण दुसर्या बँकेचे कार्ड वापरले होते.
३) माहित नाही.
४) होय परत केले. इमानदारीने
५) नाही माझा मामा आणि भाऊ बँकेत कामाला आहेत मामा इंडिअन ओवेर्सेअस बँक मनेजर आणि भाऊ एक्सिस बँक मध्ये असीस स्टंट मनेजर.
६) बँकेन इतर लोकांना कामाला लाऊन पैसे वसूल केले अशी माहिते मिळाली
.
आणि महत्वाचे पोलीस काही प्रमाणात इमानदार असतात स्वतः चा अनुभव लक्षात घेऊन . काही गाडीवर असताना सिग्नल तोडल्यावर २० रु पण घेतात आणि काही पोलीस फुकट पण सोडतात
7 Jan 2011 - 2:20 pm | गवि
माझ्या विषयाशी संबंधित आहे म्हणून सांगतो.
ते पैसे तुम्ही परत केले नसतेत तरी ही चूक बँकेच्या लक्षात आलीच असती आणि मग त्यांनी तुमच्या अकाउंटला ८००० ची रिकव्हरी मारली असती / निगेटिव्ह बॅलन्स केला असता.
एटीएममधे नोटा भरण्यासाठी चार कॅसेट्स असतात त्यात नॉर्मली दोन कॅसेट्समधे एक डिनॉमिनेशन (उदा सर्व १०० च्या नोटा) आणि दुसर्यात अजून एक डिनॉमिनेशन (उदा. सर्व १००० च्या नोटा) भरल्या जातात. एटीएमला सर्व्हरकडून फक्त मेसेज जातो कॅसेट नं. १ मधून तीन नोटा आणि कॅसेट २ मधून एक नोट उचला.
आता.. नोटा लोड करणार्याने डुलक्या घेत जर १०० साठी कॉन्फिगर केलेल्या कॅसेटमधे १००० च्या नोटा भरल्या आणि हजारच्या कॅसेटमधे १००.. तर हे असले ब्लंडर होते.
अर्थात हजार ऐवजी ५००० हे बुचकळ्यात टाकणारे आहे.
५०० * १ आणि १०० *५
१०० * ५ आणि ५० * १०
१००० * १
अशा कोणत्याही कॉम्बिनेशनचे उलट केले तरी १००० ऐवजी ३००० किंवा १२५० अशा चुकाच होऊ शकतात.
फक्त एक कॉम्बिनेशन आहे. ५०० आणि ५० चे.
आल्गोरिथम प्रमाणे तुम्हाला ५०० ची १ आणि ५० च्या दहा नोटा = १००० द्या असा आदेश आल्यावर एटीएमने
५० ची एक आणि ५०० च्या १० दिल्या असतील तर मग ५०५० रुपये तुम्हाला मिळाले असते. ५००० नव्हे.
एटीएम मधली बरीच फ्रॉडे शोधली म्हणून याची उत्सुकता वाटली.
तुम्ही नेमक्या किती डिनॉमिनेशनच्या किती नोटा आल्या हे सांगितलेत तर काय घोळ होता ते नेमकं शोधता येईल. अर्थात सर्वांना यात रस असेलच असं नाही..
असो.. बँकेने नक्कीच अगदी आवर्जून आभार मानायला हवे होते, पण ओबीसी सारख्या सर्कारी बँकेला काय पडलीय कस्टमर रिलेशनची चिंता आणि कुठून आलीय कर्टसी ?
खाजगी ब्यांकांविषयी बोलावे तरी आनंदच आहे.
7 Jan 2011 - 2:47 pm | गणेशा
धन्यवाद !
मला कसा व्यवाहार चालतो मशीनचा हे माहित नव्हते ..
पण नोटा कोणत्या आल्या असतील हा विचार मी ही केला होता.
--
7 Jan 2011 - 2:46 pm | चिप्लुन्कर
१००० रु द्या असे मी मशीन मध्ये टाईप केले. १००*१० = १००० च्या ऐवजी ५००*१०=५००० असे एकदा मला आणि असेच जेन्वा पोलिसाला दाखवले तेंवा झाले.माचीन मद्धे फक्त ५०० रस च्याच नोटा होत्या ५० ,१०० आणि १०० नवत्या हे मागाहून कळले
7 Jan 2011 - 2:55 pm | गवि
बरोबर आता उलगडा झाला.
१०० आणि ५०० अशा दोन्ही कॅसेट्समधे त्या लोड करणार्याने ५०० च लोड केले. त्याला त्या दिवशी १०० चा स्टॉक मिळाला नसणार.
पण असे करण्यापूर्वी आपण कोणत्या कॅसेटमधे भरत आहोत आणि ती सिस्टीममधे किती रुपयांची म्हणून रेकग्नाईझ होतेय हे पाहणे राहिलेले दिसते.
ह्म्म.
7 Jan 2011 - 3:36 pm | रम्या
एटीम मशिन मध्ये १०० आणि ५०० रु. च्या आकारातील फरकही ओळखण्याइतकी व्यवस्था नसावी याचे आश्चर्य वाटते.
असो, माहीती बद्द्ल धन्यु
7 Jan 2011 - 7:27 pm | अप्पा जोगळेकर
१०० आणि ५०० अशा दोन्ही कॅसेट्समधे त्या लोड करणार्याने ५०० च लोड केले. त्याला त्या दिवशी १०० चा स्टॉक मिळाला नसणार.
एटीएम या पद्धतीने चालते हे वाचून डोक्याला शॉट बसलाय. जर का ५०० ऐवजी १०० च्याच नोटा लोड केल्या असत्या तर ५००*२ = १००० ऐवजी १००*२ = २०० च रुपये मिळतील. तुम्ही ज्या अधिकारवाणीने बोलत आहात त्यावरुन या कार्यप्रणाली वर विश्वास ठेवणे भाग आहे.
पण मला एक सांगा की कोणत्याही कॅसेटमधून कितीही नोटा जरी आल्या तरी त्या कन्सॉलिडेट झाल्यावर त्या मोजून त्या प्रोग्रॅमने कॅलक्युलेट केलेल्या आकड्याशी मॅच करुन बघत असणारच ना. मग तिथेच ही चूक व्हॅलिडेट व्हायला पाहिजे.
- गोंधळलेला
7 Jan 2011 - 7:37 pm | गवि
Appa,
I am on mobile. When on PC, will reply in detail..soon.
Gavi.
9 Jan 2011 - 1:58 pm | गवि
पण मला एक सांगा की कोणत्याही कॅसेटमधून कितीही नोटा जरी आल्या तरी त्या कन्सॉलिडेट झाल्यावर त्या मोजून त्या प्रोग्रॅमने कॅलक्युलेट केलेल्या आकड्याशी मॅच करुन बघत असणारच ना. मग तिथेच ही चूक व्हॅलिडेट व्हायला पाहिजे.
>>>>
कन्सॉलिडेट म्हणजे रिकन्साईल असं तुम्हाला म्हणायचं असावं. हो.. अन्यत्र एका प्रतिक्रियेत मी रिकन्साईल करताना ही चूक बँकेला लक्षात येणारच आणि ते रिकव्हरी काढणारच असं म्हटलंच आहे.
पण रिकन्सिलेशन नंतर होतं. कॅश भरणारा इसम ठराविक फ्रीक्वेन्सीने(डेली, आठवड्यात दोनदा इ इ) अपेक्षित रक्कम (स्विचनुसार) आणि प्रत्यक्ष (फिजिकल कॅश इन एटीएम) साईटवर कंपेअर करतो आणि एक्सेस अथवा शॉर्टेज रिपोर्ट करतो.
इतरत्र म्हटल्याप्रमाणे ओव्हरॉल एक्सेस मिळालेली रक्कम एकूण शॉर्टेजपेक्षा जास्तच असते..पण तो वेगळा विषय.
बाकी एटीएमच्या प्रत्येक ट्रांझॅक्शनच्या वेळी नोटा अशाच पद्धतीने उचलल्या जातात. कॅसेट्स वेळोवेळी सर्व्हर साईडने कॉन्फिगर करुन त्यातल्या करन्सीचे टायटल बदलावे लागते (उदा. नोटा आरबीआय कडून हव्या त्या डिनॉमिनेशनच्या मिळाल्याच नाहीत तर..किंवा त्या एटीएमचा डिस्पेन्स पॅटर्न पाहून ५०० ऐवजी हजार ठेवावे असे वाटले तर्..इ इ).
तस्मात एटीएमला लोकल इन्टेलिजन्स फार नसतो.
कॅसेटचे लेबल (सर्व्हर साईडने सेट केलेले) "५००" असेल आणि १* ५०० + ५ *१०० अशी आज्ञा सर्वरने दिली तर तर एटीएम त्या "५००" मार्क केलेल्या कॅसेटेतून "वरुन" आलेल्या आदेशाप्रमाणे एक पत्ती उचलणार. मग त्यात कागद का भरलेले असेनात. कागद फार जाड किंवा चुरमुरी असतील तर गोळा होऊन अडकून बसतील, पण एटीएमला ती खरेच ५००ची नोट आहे का हे प्रत्येक वेळी चेक करायला लावण्याची यंत्रणा फिजिबल नाही, आवश्यकही वाटत नाही. ते डंब टर्मिनलच आहे.
ता.क. आता कॅश तपासून डिपॉझिट करून घेणारी (नोट बाय नोट स्कॅन) अशी मशीन्स येत आहेत. त्यात नोट रेकग्निशन आहे. पण ते डिपॉझिटला. भारतासारख्या देशात इतके ट्रांझॅक्शन लोड आहे आणि नोट्स पर ट्रांझॅक्शन इतक्या जास्त आहेत की प्रत्येक नोट ओळखून बाहेर टाकायची म्हटले तर दिवसाला वीसेकच लोकांना एटीएम वापरायला मिळेल आणि प्रत्येकाला अर्धा तास वेटिंग पडेल.. असो.. :) पण शंका अगदी रास्त आहे.
7 Jan 2011 - 2:56 pm | गणपा
>>ते पैसे तुम्ही परत केले नसतेत तरी ही चूक बँकेच्या लक्षात आलीच असती आणि मग त्यांनी तुमच्या अकाउंटला ८००० ची रिकव्हरी मारली असती / निगेटिव्ह बॅलन्स केला असता.
ओ चिप्लुन्कर जरा बँकेत जाउन खात्री करा नही तर तुम्ही ८००० परत देउनही परत तुम्हालाच ८०००चा चुना लागायचा.
7 Jan 2011 - 3:03 pm | गवि
तत्क्षणी नव्हे पण रिकन्सिलेशनच्या वेळी एटीएमच्या आत जर्नलवर नोंद सापडतेच. प्लस बॅलन्स करणार्याला इलेक्ट्रॉनिक नोंदींनुसार अपेक्षित रकमेपेक्षा कमी फिजिकल कॅश उरलेली दिसते. (शॉर्टेज..) तेव्हा बँक रिकव्हर करते. ते करण्याचा बँकेला हक्क आहे.
7 Jan 2011 - 2:41 pm | मृत्युन्जय
प्रकाटाआ
7 Jan 2011 - 2:49 pm | चिप्लुन्कर
आणि एक नवी गोष्ट कळली ती मंजे या बँकेने पैसे फीड करायला एका तिसर्याच एजेनसि ला काम दिलेले आहे.
7 Jan 2011 - 2:52 pm | गवि
ते सर्वत्रच आहे. इंडस्ट्री स्टँडर्ड... त्याचे काही एवढे नाही.
बँकेला हा कॅश मॅनेजमेंटचा उद्योग आउटसोर्स करणेच बरे पडते.
7 Jan 2011 - 2:52 pm | Nile
गगनविहारींशी असहमत.
टेक्निकली हे कसे होते माहित नाही, पण अस्मादिकांना रु. १८०० चा फायदा याच प्रकारे झालेला आहे. २०० रु काढले पण २००० निघाले मात्र नोंद २००चीच झाली. स्टेट बॅंक ऑफ इंडिया, मद्रास. तिथले मॅनेजर पांडुरंग नावाचे सद्गृहस्थ होते, त्यांना मी झालेला प्रकार सांगितला, म्हणलं मी हे पैसे द्यायला तयार आहे पण ते माझ्या खात्यातुनच बँकेने वळवुन घेतले तर देईन. इतर कुणाच्या हातात देण्यापेक्षा माझ्याकडेच काय वाईट? २ वर्षात तरी बँकेला झालेली चुक लक्षात आली नाही... असो.
7 Jan 2011 - 2:58 pm | गवि
तेच तर ना..
मला प्रथम वाटलं तशा प्रकारची ही केस दिसत नाही असंच म्हणालो आणि इतर कोणत्या प्रकारातली आहे ते शोधण्यासाठी अधिक प्रश्न इचारले.. :) एटीमच्या चुकांचे अनंत प्रकार आहेत...
7 Jan 2011 - 3:00 pm | Nile
ओक्के. पण एक प्रश्न मला आहे, बँक हे पैसे नक्की कुठल्या बुडित खात्यात टाकते?
मला शंका आहे की अमुक एका मशिनमध्ये चुक झाली असे बँकेला कळाले असावे. म्हणजे नक्की पैसे कुठे गेले ह्याचा पत्ता लागणं कठिण आहे.
7 Jan 2011 - 3:07 pm | गवि
तुमच्या केसमधे तुमच्या आधीच्या ट्रांझॅक्शनचे जर्नल तपासले असता आढळून येईल की त्या व्यक्तीला कमी रक्कम आली होती किंवा आलीच नव्हती. तो कंटाळून निघून गेला.
ही रक्कम काहीवेळा डिस्पेन्सरच्या आत अडकून राहते आणि नेक्स्ट कस्टमरला मिळते.
जो फटका बसला तो त्याला बसला असणार.
बँक अनेक मार्ग अवलंबूनही रिकव्हर न होऊ शकलेली रक्कम रिस्क प्रोव्हिजनच्या खात्यात दाखवते.
7 Jan 2011 - 3:10 pm | Nile
माझ्या बाबतीत ही चुक झाली नसावी असे वाटते. कारण त्यावेळी १०००च्या नोटा नव्हत्या. १०० आणि ५००. मला ३*५०० आणि ५*१०० अश्या मिळाल्या.
असो, धन्यवाद. :)
(हे सांगितल्यानंतर अनेक मित्र घाबरुन स्टेटबँकेचे खाते सतत तपासत होते हे आठवले ;-) )
7 Jan 2011 - 3:18 pm | गवि
इंटरेस्टिंग..
बादवे, या बाबतीत डिनॉमिनेशनची चूक आहे असं मी म्हणतच नाहीये. ही हार्डवेअरची एरर असावी असं वाटतं.
कोणत्याही डिनॉमिनेशनमधे रक्कम असली तरी आधीच्या व्यक्तीची किती रक्कम (पार्शल किंवा पूर्ण) अडकून पडली होती ते पाहणे आता शक्य नाही आणि पाहिल्याशिवाय नुसताच एक तर्क राहणार. काय काय होऊ शकते ते सांगत होतो.
7 Jan 2011 - 3:08 pm | गणपा
माझ्या मते जशी बुडीत कर्जासाठी सोय असते तशीच असल्या केस मध्ये पण काही तरी सोय असावी.
गवि प्रकाश टाकतीलच.
7 Jan 2011 - 3:21 pm | गवि
रिस्कची प्रोविजन असते पण बर्याचशा बँकांत कस्टमरने न नेलेली / क्लेम केलेली (एक्सेस सापडलेली) टोटल कॅश ही अशा शॉर्टेजेसपेक्षा खूप पटीने जास्त असते.. त्यामुळे बॅंकेला खिशातून जात काही नाही उलट अधिकची रक्कम पडून राहते.
7 Jan 2011 - 3:10 pm | स्पा
वेगळ्या विषयावरची चर्चा
वाचतोय.....
7 Jan 2011 - 3:29 pm | नन्दादीप
जल्ला किति भोले हो तुमी..
फटाफट काडून घेयाचे नाय का पैशे.....दुसरी बँक तुम्चे पैशे कशी काय कापतील...
मस्त पैशे काडायचे दाबून, दुसर्या दिवसापासून "णिल" करायच ना अकावूंट..नवीन अकावूंट खोलायचा ना.
जल्ला तुमान्ला सगल सांगावा लागत....
7 Jan 2011 - 4:29 pm | आत्मशून्य
.
7 Jan 2011 - 3:34 pm | स्पा
असेच म्हन्तो
-धंदादीप
7 Jan 2011 - 3:35 pm | अविनाशकुलकर्णी
२जी च्या राजा माननिय कलमाडी साहेबांना ला सांगीतली पाहिजे तुमचि कहाणी....
-----------------------------------------------------------------------------------------
पण दुर्दैव म्हणजे त्या बँकेने नंतर परत कधी हि फोन करून माझे आभार मानले नाहीत.
नेकि कर कुवेमे डाल
7 Jan 2011 - 3:39 pm | परिकथेतील राजकुमार
अतिप्रसंगातुन वाचवलेली प्रत्येक हिरवणी हिरोशी लग्न करत नाही.
7 Jan 2011 - 3:42 pm | गणपा
=)) =)) =))
7 Jan 2011 - 5:12 pm | विश्वनाथ मेहेंदळे
हीहीही !!!
8 Jan 2011 - 11:48 am | युयुत्सु
हा हा हा!
7 Jan 2011 - 3:42 pm | स्पा
अतिप्रसंगातुन वाचवलेली प्रत्येक हिरवणी हिरोशी लग्न करत नाही.
हॅ हॅ हॅ
- ए टी एम कथेतील क्याशकुमार
7 Jan 2011 - 5:21 pm | जिवाणू
वेगळ्या विषयावरची चर्चा
छान माहिती मिळतेय.
7 Jan 2011 - 6:10 pm | इन्द्र्राज पवार
१. श्री.चिपळूणकर यानी वर काही प्रश्नांना दिलेल्या उत्तरातील "क्रमांक ४" चे उत्तर वाचून खरोखरी समाधान वाटले. आशादायक चित्र आहे, पोलिस खात्याचे.
२. श्री.गगनविहारी यानी एटीएम कार्यप्रणालीची पुरविलेली माहिती प्रथमच कळाली. धन्यवाद.
आता इतके त्यानी सांगितले आहेच तर ते हे सांगतील का? ~ अशा ज्या तांत्रिक चुका होत राहतात [भले त्या इंटर्नल्/रेग्युलर स्टाफ मेंबरकडून होवो, वा आऊटसोर्सिंग पार्टीकडून...] त्याचे दायित्व कुणाकडे जाते? दुसर्या शब्दात समजा काहीतरी वरच्या पातळीवर अशा प्रकरणाबद्दल चौकशी झाली तर संबंधित बॅन्क मॅनेजरला जाब विचारणे वा त्या टेबलच्या अधिकारी/क्लार्कवर दंडात्मक कारवाई होते का?
इन्द्रा
7 Jan 2011 - 6:22 pm | गवि
आउटसोर्स्ड पार्टीच्या बिलातून कापून घेतले जातात.असे स्वत:च्या स्टाफच्या पगारातून मोठ्या रकमा कापणे अवघड असते म्हणून आउटसोर्सिंगला प्रेफ़रन्स.दायित्व बँकेकडे अर्थात.मागचे सर्व त्यांनी बघावे.
Yes. स्टाफ मेंबर,आऊटसोर्सिंग पार्टी मेंबर, त्या टेबलच्या अधिकारी/क्लार्कवर दंडात्मक कारवाई होते
7 Jan 2011 - 6:35 pm | चाणक्य
पैसे घेऊन गप घरी आला असता तर रात्री झोप लागली असती का? (नाही जात्याच पापभीरू असल्यामुळे विचारलं. ह.घ्या. )
7 Jan 2011 - 7:00 pm | टारझन
जबरदस्त ज्ञानवर्धक धागा आणि प्रतिसाद. सुरेख .
-बेस२४
7 Jan 2011 - 7:29 pm | अप्पा जोगळेकर
पोलिसाने मला परत पोलीस स्टेशन वर नेले व माझे २००० रु माल देऊन वरील ८००० रु स्वतः कडे ठवले आणि तसे त्या संबधित मनेजर ला कळवले.
तुम्ही स्वतःच का नाही सांगितंलं की मी बँकेत काउन पैसे भरीन म्हणून. त्याच्या हातात कशाला द्यायचे ? मुळात तुम्ही पोलिसाला बोलवले हीच मोठी चूक केली.
7 Jan 2011 - 7:44 pm | रेवती
चिपळूणकर,
तुम्ही केले ते चांगले केलेत.
नशीब हे कि तुमचे पैसे मशीनच्या आत अडकून बसले नाहीत.
7 Jan 2011 - 7:53 pm | विलासराव
याउलट आहे.
एटीएम मधुन १०००० काढायचे होते.
पैसे आलेच नाहीत. उलट अकाउंटमधुन १०००० वजा झाले.
दिवाळीमुळे २ दिवस बँक बंद.
उधार घेउन गावी गेलो. परत आल्यावर बँकेत गेलो.
ते म्हणाले २१ दिवसाने तुमच्या अकाउंटमधे जमा होतील.
7 Jan 2011 - 8:10 pm | गणपा
हा अनुभव मी दुबईत दोन वेळा घेतला आहे. पैसे कट व्हायचे पण हाती काही यायच नाही.
अश्यावेळी बँकेत ताबडतोब फोन करुन कळवावे. (जी रिकामी रिसिट येते ती फेकु नये.)
7 Jan 2011 - 9:20 pm | देवदत्त
अरे वा.. तुम्ही केले ते योग्यच वाटते. :)
आणि हे वाचून वाटते, मी दोन वर्षांपूर्वी नोटापुराणात लिहिलेले खरंच होत आहे तर ;)
"त्यामुळे एटीएम मशीनमधून एखादी नोट जास्त मिळाल्याचे (५०० किंवा १००० हं, कारण आजकाल ह्याच नोटा जास्त मिळतात एटीएम मधून) स्वप्नही आपण पाहू शकतो."
पण एक प्रश्न आहे.
"स्वयं चलित यंत्रातून मी रु १००० काढले पण त्या उदार यंत्रा ने मला रु १००० ऐवजी ५००० मात्र दिले आणि माझ्या खात्यातून रु १००० वजा केले."
असे तुम्ही म्हणताय तर मग
"पोलिसाने मला परत पोलीस स्टेशन वर नेले व माझे २००० रु माल देऊन वरील ८००० रु स्वतः कडे ठवले आणि तसे त्या संबधित मनेजर ला कळवले." कसे काय?
तुम्ही १००० रु काढलेत की २००० रू? :)
7 Jan 2011 - 9:47 pm | गणपा
दत्तोबा त्यांनी आधी १००० काढले, मग पोलिसाला दाखवायला परत १००० काढले अस लिहिलय. :)
7 Jan 2011 - 11:56 pm | देवदत्त
ओह...हो समजले आता :)
7 Jan 2011 - 9:40 pm | ऋषिकेश
अरे वा! नवी माहिती दिणारी मस्त चर्चा..
गवि,
या व्यवसायातले तुमचे अनुभव येऊद्यात की!
8 Jan 2011 - 1:03 am | प्राजु
बरीच माहिती मिळाली. चांगली चर्चा आहे.