धार्मिक स्थळं आणि.........

५० फक्त's picture
५० फक्त in काथ्याकूट
10 Dec 2010 - 10:23 am
गाभा: 

अगदी मुद्दामच शीर्षकात टिंब टिंब टिंब केलं आहे. माझ्या कडुन या विषयावर काहीही गंभीर लिखाणाची अपेक्षा करु नका, धर्म या बाबतीत मी खुप मोठा ढ आहे.

मला लिहियाचं आहे, विविध धार्मिक स्थळं, ती असेनात का विविध धर्माची, तिथल्या खाण्याबद्दल. मग ते अन्नछत्रातलं असो नाही तर एच्छिक देणगी नाही तर सक्तीची वर्गणी देउन मिळालेलं असेल. ब-याचदा हे जाणवते की सत्यनारायणाचा शिरा हा नेहमीच्या शि-यापेक्षा जास्त वेगळा लागतो. घरी मधुमेह असण्यानं चमचाभर साखर खायला घाबरणारी माणसं देवळांत ३-३ वाट्या प्रसाद काही न वाटता खातात आणि जास्ती गोळ्या न घेता पचवतात सुद्धा.

तर मला चर्चा करायची आहे ती याबद्दलच, आपले अनुभव, आपली मते, आपले विचार आणि महत्वाचे म्हणजे कुठे काय छान मिळते ते पण. मी सुरुवात करतो आहे,

१. अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर अन्नछत्र - छान जेवण, महाराष्ट्रियन पण कर्नाटकी जेवणाची छाप असलेलं. इथे ताटात अजिबात टाकता येत नाही, हा सगळ्यांत चांगला नियम.
२. गोंदवलेकर मठ, गोंदवले, सातारा - जेवणाची चव साधारणच, म्हणजे अगदीच घरगुती पण व्यसथा अतिशय छान, आटोपशीर.
३. जत जवळ गुड्डापूर येथे धान्नम्मा देवीचं मंदिर आहे - इथे फक्त गव्हाची खिर , भात व शेंगाची आमटी एवढेच असते, आणि ते ही फक्त ताटांत - वाटी,चमचा असली नसती नाटकं नाहीत. खास कर्नाटकी खिरीसाठी जरुर जा.
४. सज्जनगढ - फक्त भात,आमटी, भाजी व गव्हाची खिर, एकदा या जेवणासाठी पुणे ते सज्जनगड हा प्रवास २ तासांत केला आहे.

ही यादी पुढे नेण्याची जबाबदारी आता तुमची..

धन्यवाद

हर्षद.

प्रतिक्रिया

सज्जनगढ - फक्त भात,आमटी, भाजी व गव्हाची खिर

अहाहा...............

त्या जेवणाची चव अजून जिभेवर रेंगाळते आहे......

नन्दादीप's picture

10 Dec 2010 - 10:35 am | नन्दादीप

पावस..रत्नागिरी...ईथे प्रसाद म्हणून खिचडी मिळते..अप्रतिम..

जरूर आस्वाद घ्या एकदा.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Dec 2010 - 3:06 am | निनाद मुक्काम प...

साबुदाण्याची (मला जाम आवडते म्हणून )

स्पा's picture

10 Dec 2010 - 10:48 am | स्पा

पावस..रत्नागिरी...ईथे प्रसाद म्हणून खिचडी मिळते..अप्रतिम.

नंदादीप साहेब...
कोकम सरबत कसा विसरलात तिकडचं?
ते तर हवंच.....

खुप अवघड वाटते.तरी देखिल विचार करायला हरकत नाही.

रेवती's picture

11 Dec 2010 - 2:03 am | रेवती

यात 'फुकट' ते काय?
माणून चविच्या प्रेमाने परत परत जातो त्याला असं म्हणू नका.

स्पा's picture

10 Dec 2010 - 11:00 am | स्पा

फक्त फुकट मिळते म्हणुन इतक्या लांब जेवायला जाणे

वेताळ साहेब तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय....

प्रश्न फुकट मिळतंय म्हणून जाण्याचा नाहीये....

सज्जनगडावर जरी खाण्याची फुकट सोय असली तरी लोक स्वतःहून आपापल्या ऐपतीप्रमाणे "महाराजांच्या" चरणी काहीना काही ठेवतातच.
तसंच " पावस" ला सुद्धा .....

स्वानन्द's picture

10 Dec 2010 - 11:24 am | स्वानन्द

अरे ते स्वतःबद्दल सांगताहेत. इतरांबद्दल बोलत नाही आहेत. :)

ओह अच्छा! मी उपप्रतिसाद देवून टाकला.
बरं वेताळसाहेब तुम्ही तुमच्याबद्दल म्हणताहात हे लक्षात आलं.

मी बालपणी आमच्या सावतामाळी मंदीरात लाप्शी खाल्ली होती. आजची ती चव माझ्या जिभेवर लोळते आहे. मी काहीही खाल्ले तरी मला लाप्शी खाल्ल्याचा भास होतो . धन्य आहेत संत सावतामाळी ! सलाम !!

-(संत प्रेमी) टारझन वारकरी अफ्रिकेत

शेगाव येथे गजानन महाराजांच्या मठात देखील महाप्रसाद म्हणून मिळणारे गरमागरम भाकरी,भाजी, भात आणि लाडू अप्रतीमच.

मिसळभोक्ता's picture

10 Dec 2010 - 2:42 pm | मिसळभोक्ता

वांग्याची मस्त तिखट भाजी, आणि ज्वारीची भाकरी. बुंदीचा लाडू मात्र टुकार.

गण गण गणात बोते.

sagarparadkar's picture

10 Dec 2010 - 11:31 am | sagarparadkar

>> ब-याचदा हे जाणवते की सत्यनारायणाचा शिरा हा नेहमीच्या शि-यापेक्षा जास्त वेगळा लागतो. ..<<

सज्जनगड आणि गोंदवल्याचा प्रसाद खरोखरच साधासुधा पण अत्यंत अप्रतिम चवीचा असतो असं मी अनुभवलं आहे. पण असं का वाटतं हे काही सांगता येत नाही. काही परिचितांनी असं सुचवलं की आम्ही मोटरसायकलवरून पुण्याहून तेथे गेलो होतो, व दमल्यामुळे तेथील साध्या प्रसादाची (जेवणाची) चव सुद्धा फारच चांगली वाटली असेल. शक्य आहे. पण तशी कायमची आठवणीत राहील अशी चव अजून कोठल्या ठिकाणची लक्षात राहिलेली नाही, घरी पण किती प्रयत्न केला तरी तशा चवीचं जेवण बनवता आलं नाही.

माझी आई तशी फार उत्तम, जगावेगळा स्वयंपाक करते अशातला भाग नाही, पण एक गोष्ट अम्हा सर्वांना कायम प्रकर्षाने जाणवत आली आहे ती अशी की घरी एखादे धार्मिक कार्यं असेल त्या दिवशी तिच्या हातून नकळतच अप्रतिम स्वयंपाक बनत असतो. ह्याच्यामागे काय 'लॉजिक' असणार कोणास ठाऊक ...

देवासमोरचे नैवेद्याचे दूधही असेच वेगळे आणि छान लागते. छोट्या वाटीला साखरेचे किती प्रमाण असते ते पाहून आम्ही भावंडांनी तसेच मोठ्या प्रमाणात (म्हणजे कपभर) करून बघितले पण ती चव काही आली नाही. शिवाय उदबत्तीचा मस्त वास असतो नैवेद्याच्या दुधाला.
आमच्याकडच्या लघुरुद्राला सकाळी उपास असतो तेंव्हा ठरलेले केटरर सगळा उपासाचा स्वयंपाक करतात. एकदाच फक्त मला खिचडी करण्याची वेळ आली तेंव्हा ती सगळ्यांना आवडली. पुन्हा पुन्हा करून बघितली पण तेंव्हासारखी काही जमली नाही. माझा या कश्यावर विश्वास नव्हता पण त्यावेळी आईने कान धरून समजावले आणि नव्या पिढीच्या नास्तिकपणाचा उद्धार केला.;)

कवितानागेश's picture

10 Dec 2010 - 11:33 am | कवितानागेश

जगन्नाथपुरीला प्रसादाचा चिरोटा असतो, मस्त असतो.
मी तिथे गेले नाही, पण जगन्नाथानी अत्तापर्यन्त बर्‍याचजणांच्या हाती हा प्रसाद माझ्यासाठी पाठवला आहे!

(आळशी)

नन्दादीप's picture

10 Dec 2010 - 12:20 pm | नन्दादीप

पण तस बघितल तर सर्वच देवस्थानी मिळ्णारा प्रसाद हा चवीला उत्तम असतो...

सुधिर बेल्हे's picture

10 Dec 2010 - 12:20 pm | सुधिर बेल्हे

अन्नच्या चवदर्पना मध्ये दोन गोश्ति महत्वच्या आहेत.१-आजुबजुचे वतवरन २-वध्नर्यचि मनस्थिति/त्यविच्र्चार.जेवनरा आनि वधनर ह्यन्च्यमध्ये आपुलकि/प्रेम आसेल तर अन्न मधुर लगते.

नन्दादीप's picture

10 Dec 2010 - 12:31 pm | नन्दादीप

सुधिर साहेब, जरा दमान्...एका दमात एवढ सगळ लिहीलत वाटत...

प्रगति आहे...१ दिवसात एवढ सर्व लिहीलत्....शिफ्ट आणि "A" चा वापर वाढवा....जमेल हळू हळू..

सूड's picture

10 Dec 2010 - 1:27 pm | सूड

त्र्यंबकला कधी गेलात तर कुशावर्ताकडे जाताना कुरुंभटी भटजींच्या घरामागे एक खानावळ आहे. तिथे कांदा-लसूण विरहीत उत्तम जेवण मिळते. पण मला आठवते ती त्यांच्याकडची ताकाची कढी !! अप्रतिम !!
मला आठवतं, मी पाच-सहा वाट्या कढी प्यायलो होतो. आणखीही चालली असती पण आवरतं घेतलं. ;)

मिसळभोक्ता's picture

10 Dec 2010 - 2:43 pm | मिसळभोक्ता

हरिहरेश्वराच्या मंदिरात नव्हे, पण पुजार्‍याकडे मस्त सोलकढी करतात.

मिसळभोक्ता's picture

10 Dec 2010 - 2:46 pm | मिसळभोक्ता

माझ्या कडुन या विषयावर काहीही गंभीर लिखाणाची अपेक्षा करु नका, धर्म या बाबतीत मी खुप मोठा ढ आहे.

अगदी चूक !

उलट धर्म, ह्याविषयाचे अंतरंग आपल्याला गवसले आहे.

हिंदू देवळांत जो प्रसाद मिळतो, तेच हिंदू धर्माचे अंतरंग आहे. (चर्च मध्ये रेड वाईन मिळते. धर्मांतराचे एक कारण.)

मेघवेडा's picture

10 Dec 2010 - 2:48 pm | मेघवेडा

अरे वा सगळं पब्लिक पेटलंय जनु! फिरायचा मूड दिसतो भरपूर. कुठे काय छान मिळतं च्या चौकशा.. वा वा वा!

वर नन्दादीप/स्पा यांना अनुमोदन. पावसला प्रसादात मिळणारी खिचडी म्हणजे केवळ अप्रतिम. असाच खिचडीचा प्रसाद परशुरामलाही मिळतो. मात्र चवीच्या बाबतीत पावसची खिचडीच श्रेष्ठ! परशुरामला खिचडीचा प्रसाद चुकलाच (माझा चुकला होता गेल्या वेळेला) तर देवळातून बाहेर आल्यावर जोश्यांची दोन हाटेलं आहेत समोरासमोर. पैकी एकाकडे गुरगुटीत भात खावा नि समोरच्यांकडे सोलकढी प्यावी! काम फिट्ट! अजूनही चव रेंगाळते आहे जीभेवर!

५० फक्त's picture

10 Dec 2010 - 4:00 pm | ५० फक्त

आपण सगळे देवळांत फक्त देवाला न जाता जेवायला पण जाता हे पाहुन अतिशय बरे वाटले. सर्वांचे अतिशय आभार. माझ्याकडुन या यादीत आणखी भर घालतो आहे, हीच काय ती माझी देवभक्ती.

तुळजापुरला मंदिराच्या बाहेर, त्या मंदिराच्या ब्राम्हण पुजा-यांच्या घरी पुरणपोळी चे जेवण अतिशय उत्तम मिळते. (नाव हवे असल्यास नंतर सांगतो.) नीरा नरसिंगपुरच्या देवळाच्या पुजा-यांच्या घरी सुद्धा खुप छान जेवण असते.

सोलापुरला ग्रामदॅवत सिद्धेश्वराच्या देवळांत हल्ली अन्नछ्त्र सुरु केले आहे, एकदाच जेवलो होतो, चब साधीच होती पण खुप छान आहे. तसेच सोलापुरला कोंतम चॉकातुन टिळक चॉकाकडे येताना उजव्या बाजुला एक मशिद आहे, तिच्या बाहेर गरमागरम जिलेबी मिळतात,आम्ही दरवर्षी गणपती आणायला जाताना खुप खायचो तिथं जिलेबी.

सारसबागेतल्या गणपतीला खोब-याच्या वड्या प्रसाद मिळतात, अतिशय सुंदर. तशाच वड्या होत्या मालवणला जय गणेश मंदिरात खालेल्या. आणि गणपती म्हण्ल्यावर आमच्या दातेंचा गणपती कसा विसरेन, दर संकष्टी चतुर्थीला आरती झाल्यावर मिळणारे मोदक ही आनंदाची परमावधी असे. सोलापुरातली देवळं आणि खाणं या विषयी वेगळं लिहिनंच आता.

कर्नाटकात मंत्रालय या ठिकाणी सुद्धा मठांत जेवण खुप छान असते,( हा मठ कुणाचा हे माझ्यासारख्या माठाच्या लक्षात राहिल कसे, आठवते ति फक्त तिथली खिर)

येउ द्या अजुन चांगली चांगली ठिकाणे, म्हणजे तिथं जायचा विषय मी काढ्ला की घरात सगळ्यांना वाटेल, चला पोरगं सुधारलं.

हर्षद.

धमाल मुलगा's picture

10 Dec 2010 - 9:23 pm | धमाल मुलगा

अगदी अगदी सायबा :)

>>तुळजापुरला मंदिराच्या बाहेर, त्या मंदिराच्या ब्राम्हण पुजा-यांच्या घरी पुरणपोळी चे जेवण अतिशय उत्तम मिळते. (नाव हवे असल्यास नंतर सांगतो.)
एकदम झक्कास! आमचे कुळाचार करणार्‍या गुरुजींकडच्यांना आता कुणाला काय आवडतं वगैरेही चांगलं ठाऊक असल्यानं बरोब्बर त्या त्या पानाशी तो तो पदार्थ येतो आणि 'पैसे घेतलेत म्हणून वाढलं एकदाचं' असा प्रकार नाही. आग्रहानं वाढणार!

>>नीरा नरसिंगपुरच्या देवळाच्या पुजा-यांच्या घरी सुद्धा खुप छान जेवण असते.
हा अनुभव एकदाच घ्यायचा योग आला. आमच्या आत्तेभावंडांच्या मुंजी तिथे झाल्यावर जे जेवण होतं (मुंज+प्रसादाचं असं मिळून एकच) खूपच छान.

वाडीलासुध्दा पुजार्‍यांच्या घरी जी जेवणाची/प्रसादाची सोय करतात, मला फार म्हणजे फारच आवडते. :)

अवांतरःअरे काय चाल्लंय काय? सगळे एकदम पोटोबा खवळल्यासारखे एकेक आठवणी काढताहेत कालपासून. :)

चिंतामणी's picture

10 Dec 2010 - 11:21 pm | चिंतामणी

कर्नाटकात मंत्रालय या ठिकाणी सुद्धा मठांत जेवण खुप छान असते,( हा मठ कुणाचा हे माझ्यासारख्या माठाच्या लक्षात राहिल कसे, आठवते ति फक्त तिथली खिर)

"राघवेंद्र स्वामीं"चा मठ आहे.

sagarparadkar's picture

10 Dec 2010 - 5:25 pm | sagarparadkar

मंत्रालय चा मठ बहुतेक राघवेन्द्र स्वामींचा मठ असावा.

मी चौथीत असताना, १९७९ मधे आमच्या नू.म.वि. ची सहल सोलापूरला गेली होती. शि.प्र. मंडळीच्याच शाळेत राहायला होतो. त्या रात्री मस्त भात, डाळीचं पिठलं आणि त्यावर लोणकढी तूप, जोडीला दाण्याची चटणी असं साधंच पण अप्रतीम जेवण होतं. ती चव सुद्धा अजून विसरता येत नाही.

५० फक्त's picture

10 Dec 2010 - 5:34 pm | ५० फक्त

राघवेंद्र स्वामी, करेक्टच. सोलापुरला पण त्यांचा एक मठ आहे. धन्यवाद सारंगजी.

हर्षद.

अतिशय उपयोगी धागा ! नोंद करुन ठेवली आहे.

रांजणगाव गणपती येथील जेवण ही मला खुप आवडते ..
चतुर्थी ला जावुन खायचो .. मस्त एकदम ..

चिंतामणी's picture

10 Dec 2010 - 11:25 pm | चिंतामणी

सगळ्यांकडुन एक महाप्रासाद विसरला गेला असावा.

थिरुपतीचा प्रसादाचा लाडु.

तिथे प्रसादात मिळणार भात. ( Lemon rice)

अहो चिंतामणीसाहेब तेच लिहायला आले होते.
दोन वर्षापूर्वीच तिरूपतीला लाडूंसाठी अर्धा तास वाट पहावी लागली आणि प्रसाद म्हणून आपण भातालाही काही वाईट म्हणत नाही. अतिमसालेदार मात्र होता कि प्रसादाचा टाकायचा नाही म्हणून संपवला.
पण आता बालाजीचे दर्शन घ्यायला मी तिरुपती सोडून कुठेही जाईन इतकी गर्दी.

शहराजाद's picture

11 Dec 2010 - 1:53 am | शहराजाद

अमॄतसरच्या सुवर्णमंदिरात रहाण्याची- खाण्याची व्यवस्था विनामूल्य असते. दाल (उडदाची)- चावल असे साधेच पण पोटभरीचे गरम गरम जेवण मिळते. दाल हॉटेलातल्याप्रमाणे मसालेदार नाही . सौम्य पण चवदार. वाढणे इ सर्व सेवेसाठी येऊन राहिलेले भाविक करतात. प्रसाद म्हणजे गव्हाचा खमंग हलवा. अति स्वादिष्ट. साधारण आपल्या शिर्‍यासारखा, पण जास्त बारीक पोत, तुपाने थबथबलेल आणि केळी- बेदाणे इ नाहीत. काही लोक घरून करून आणतात. ज्यांना ते शक्य नसते त्यांच्यासाठी तिथेच बनवलेला ताजा ताजा हलवा उपलब्ध असतो. हा प्रसाद भक्तांकडून देण्याची गोष्ट असल्यामुळे तो मात्र फुकट नसतो. पण किंमत, सर्वांना परवडेल इतकी मामुली असते. दिवसभर दमल्यावर, पोटात आग पेटली असताना त्या हलव्याचा वास इतका अस्वस्थ करत असतो की दर्शन घेऊन, प्रसाद दाखवून मग खाईपर्यंत जीव जातो की काय असे वाटते.

आंबेजोगाईला एकदा गुरुजींच्या घरी शिधा देवून दर्शनाला गेलो आणि येइपर्यंत साधा पण चविष्ट गरम गरम स्वयंपाक तयार होता. भूक लागल्याने दोन घास जास्त गेले. तसेच आमच्या कोकणातल्या देवीला लग्नानंतर गेलो होतो तेंव्हा संध्याकाळची एकच असलेली बस गेली आणि गुरुजींच्या घरीच रहावे लागले. तिथे साधी उसळ आणि तांदळाची धिरडी असे मस्त जेवण होते. छान जेवण झाल्यावर गुरुजींनी त्यांचे घर लहान होते म्हणून तात्पुरते बंद केलेल्या पडवीतच झोपायची व्यवस्था केली आणि म्हनाले कि निवांत झोपा....... एवढ्यातच आडोसा करून घेतलाय..... रात्री आजकाल वाघ फिरतो म्हणून. मी रात्रभर जागीच होते. वाघाच्या एका हिसक्यानं तुटेल असा आडोसा होता.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Dec 2010 - 3:32 am | निनाद मुक्काम प...

लंडन मध्ये सौथ हॉल ह्या ठिकाणी गुरुद्वारा आहे (कळस भव्य व सोन्याचा आहे .) येथे त्यांचा १२ महिने लंगर असतो .म्हणजे गद्दीवर (सर्वधर्मियांना प्रवेश डोक्यावर रुमाल हवा ) मग सुग्रास साधे पण चविष्ट असे पंजाबी जेवण संध्याकाळी मिळते (हवे तेवढे ) (राणी व चाल्स व त्यांची पत्नी कमिला सुध्ध येथे दर्शनाला येतात .(म्हणजे वर्षातून एकदा )
कितीतरी वेळा सुरवातीला घरची आठवण आली कि स्वामीनारायण व इस्कॉन चे मंदिर लांब होते .मग गुरुद्वारा येथे आल्यावर थोड्यावेळ गुरुवाणी एकूण (शब्द कळले नाही तरी ते शांतता देऊन जातात ) मग चविष्ट रूचकर जेवण (येथील स्वयंसेवक सर्व वयोगटातील अनिवासी भारतीयांची २ री अथवा ३रि पिढी करते .गुरूच्या दरबारात विनम्र भाव व फक्त मातृ भाषेत बोलणे (मला १० वर्षाच्या एका मुलासोबत मस्त गट्टी जमली होती .)ते पाहून आपले अमेरिका व युके येथे नुकतेच गेलेले व काही वर्षच झालेले अर्ध्या हळकुंडाने पिवळे लोक पाहून खरच वाईट वाटते .

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Dec 2010 - 3:35 am | निनाद मुक्काम प...

माहूरला आमचे वंशपरंपरागत गुरुजी देव ह्यांच्याकडे गडावरून पूजा सांगून झाली कि रुचकर असा पुरणपोळीचा नैवद्य असतो .