http://www.alexa.com हे web-stats संपादित करणारे एक अग्रणी संकेतस्थळं आहे. मिपा बद्दल ह्या संकेतस्थळाचं म्हणनं पुढील प्रमाणे आहे.
"There are 178,791 sites with a better three-month global Alexa traffic rank than Misalpav.com. Its visitors view an average of 5.2 unique pages per day. The site's content places it in the “समाज” category. This site has a relatively good traffic rank in the cities of Pune (#1,613) and Toronto (#7,189). Visitors to Misalpav.com spend roughly eight minutes per visit to the site and 60 seconds per pageview. "
आणि मिपाला भेट देणार्यांची संख्या तुम्हाला "Traffic Stats" ह्या सदराखाली मिळती.
गेल्या तीन महिन्याती निकाल:
१. गेल्या महिन्यात लोकप्रियता २०% रोडावली
२. गेल्या ३ महिन्यात लोकप्रियता ३३% रोडावली.
ह्याची कारण काय असू शकतील?
अवांतरः जगातील सर्व "Search and Media" ह्या क्षेत्रातील लोक ह्या अॅलेक्सावरील माहीतीचा उपयोग करतात. त्यामुळे वरील माहीत शंकास्पद आहे अस वाटण्याच काही एक कारण नाही.
मिपाही कदाचित अलेक्साचा उपयोग करत असेल आणि अजून पर्यंत केला नसेल तर लवकरच सुरु करावा.
प्रतिक्रिया
27 Nov 2010 - 10:38 pm | रन्गराव
http://www.alexa.com/siteinfo/misalpav.com#
27 Nov 2010 - 11:23 pm | आमोद शिंदे
वा! रंगरावांचा शोधनिबंध आवडला.
The top queries from search engines driving relatively more/less traffic to misalpav.com in the current month than the previous month. Updated monthly.
ह्या यादीमधे 'ढुंगण' हा शब्द पहिल्या क्रमाकांवर पाहून अंमळ डोळे पाणावले.
27 Nov 2010 - 11:50 pm | रन्गराव
काय राव नवीनच शोध लावला की? मी कधी म्हंटल की माझा शोध आहे म्हणून? ती एक मान्यताप्राप्त साईट आहे, त्यांनी हा दिलेला डाटा आहे.
आणि ट्राफिक कमी झालेलं पाहून बरे डोळे पाणावले नाहीत तुमचे?
28 Nov 2010 - 9:26 am | आत्मशून्य
गूगलने (आणी इतर search providers ने ) त्यान्च्याकडे मिपा वरचे हे पेज 'कॅच' करून ठेवले आहे. जर मिपा वाल्यानी योग्य प्रकारे SEO केले तर हे घडनार नाही.
28 Nov 2010 - 10:22 am | रन्गराव
title, meta, head हे सगळे महत्वाचे टॅग SEO वाया घालवले आहेत ते सुद्धा अगदी मुखपृष्ठावर. इतर पानांच तर अजून अवघड आहे. टॅग क्लॉउड ही परिणामकारक रित्या वापरलेले नाहीत :(
28 Nov 2010 - 11:09 am | अवलिया
"रोचक धागा"
हा धागा राहिला तर आश्चर्य वाटणार नाही..
28 Nov 2010 - 9:09 pm | रन्गराव
>>हा धागा राहिला तर आश्चर्य वाटणार नाही..
एखादा शब्द विसरलात का साहेब?
28 Nov 2010 - 2:53 pm | स्वानन्द
तसंही माझ्या माहितीनुसार तात्यांनी हे संकेतस्थळ व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून चालू केलेले नाही. त्यामुळे या अहवालाकडे ते किती सिरीयसली पाहतील याबद्दल शंकाच आहे.
( हा आता इतर मराठी संकेतस्थळांच्या लोकप्रियतेबरोबर पडताळुन पाहता येईल.) :)
28 Nov 2010 - 9:07 pm | रन्गराव
>>तसंही माझ्या माहितीनुसार तात्यांनी हे संकेतस्थळ व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून चालू केलेले नाही. त्यामुळे या अहवालाकडे ते किती सिरीयसली पाहतील याबद्दल शंकाच आहे.
जर असं असेल तर जास्त सिरियसली लक्ष द्यायला पाहिजे. कारण जर लोकांना इथ आणून मराठीतून लेखन करायला एक प्लॅट्फोर्म देणे आणि ते इतरांपर्यंत पोहचवणं हा उद्देश असेल तर लोकांनी इथ येणं गरजेच आहे.
29 Nov 2010 - 9:06 am | सूर्य
या धाग्यावर, मिपावर SEO कसे केले पाहीजे याची चर्चा व्हावी. रंगराव व इतर माहीती तज्ञांकडुन अपेक्षा आहे.
- सूर्य.
29 Nov 2010 - 12:13 pm | विजुभाऊ
गेल्या महिन्यात लोकप्रियता २०% रोडावली
गेल्या ३ महिन्यात लोकप्रियता ३३% रोडावली.
टक्केवारीला काहिही अर्थ नसतो
समजा पूर्वी एखाद्या ठिकाणी फक्त दहाच जण भेट देत असतील आणि दोन कमी झाले तर ती घट २० टक्के म्हणतात
पण एखाद्या संस्थळाला १००००० लोक भेट देत असतील आणि २०००० लोक कमी झाले तरिही ती घट २० टक्के म्हणायची
पण दहा सदस्यांचे संकेत स्थळ आणि १००००० लोकांचे स्थळ याला एकाच मोजपट्टीने मोजण्ञात काय हाशील आहे तेच कळत नाही
हे म्हणजे सचिन ने १०० चेंडूत ८० रन्स केल्या त्याचा स्ट्राईक रेट ८० %
नेहरा ने ४ चेंडूत सहा रन्स केल्या त्याचा स्ट्राईक रेट १५० %
याचा अर्थ नेहरा सचिनपेक्षा ग्रेट असे म्हणण्यासारखे आहे.
29 Nov 2010 - 12:38 pm | रन्गराव
इथ आकडेमोड कशी केली जाते ह्याच थोड्क्यात स्पष्टीकरन दिलं आहे ते वाचा.
http://www.alexa.com/help/traffic-learn-more
29 Nov 2010 - 12:15 pm | आदिजोशी
असे रिपोर्ट आम्ही फाट्यावर मारतो. बा***तिज्यायला ज्याला यायचं तो येईल ज्याला जायचं तो जाईल. आम्ही मोफत कोल्हापुरी चप्पल वाटप केंद्र उघडलंच आहे. इच्छुकांनी सोयीचा लाभ घ्यावा.
29 Nov 2010 - 5:06 pm | आत्मशून्य
पण त्यामूळेच अमोद भाउना त्यांचे डोळे पाणावले असे म्हणावे लागते त्याचे काय ?
29 Nov 2010 - 12:16 pm | बिपिन कार्यकर्ते
Statistics are like a bikini. What they reveal is suggestive, but what they conceal is vital.
सौ. Aaron Levenstein
29 Nov 2010 - 12:47 pm | रन्गराव
चांगली क्वोट आहे. पण इथ बिकनीच्या आत काय आणि बाहेर काय ह्याच स्पष्टीकरन दिलं तर बर होईल. नाही तर "casella, berger" च स्टॅट्स पुस्तक उघडूनच बसलोय इथ, अशा डझनावारी क्वोट्स टाकता येतील.
जर मुद्याच बोलायच झाल तर Aaron Levenstein जे बोलतात ते जरी खर असलं तरी पूर्ण बुरख्यातली (किंवा अंधारात उभी असलेली) कन्या बघून काहीच कळनार नाही. त्यापेक्षा Statistics च्या डोळ्यांनी बघितली तर तीच बिकनीत, लख्ख प्रकशात दिसते, आणि थोडीफार कल्पना येते. म्हणून ते वापरतात .
Statistics may be defined as "a body of methods for making wise decisions in the face of uncertainty."
3 Dec 2010 - 3:53 pm | चिंतामणी
गेल्या तीन महिन्याती निकाल:
१. गेल्या महिन्यात लोकप्रियता २०% रोडावली
२. गेल्या ३ महिन्यात लोकप्रियता ३३% रोडावली.
ह्याची कारण काय असू शकतील?
सध्या मिपावर अभिरुचीहीन पोस्टस खूप दिसत आहेत. त्यामुळेसुध्दा ही अवस्था आली असणार.
हे नमुने बघा.
एक धाग्यावरची प्रतिक्रीया=
बाकी XXबाई म्हणजे कडक माल आहेत एकदम.
दुस-या जेष्ठ सभासदाची त्यावरील प्रतिक्रीया=
बाकी XXबाई म्हणजे कडक माल आहेत एकदम.
ममा XX पण काहि कमी नाहित.
XX हे मी दुरुस्ती केली आहे. कोणाचेही नाव तेथे वाचणे मला योग्य वाटले नाही. मुळात ह्याप्रकारचे लिखाण होत असेल तर दर्जा राह्णार आहे का? (सुदैवाने संपादक मंडळाने दखल घेउन त्या पोस्ट उडवल्या)
आजचा नवा धागा "शीला की जवानी ... "
बाकी काही बोलायला नको याबद्दल.
हे असे होउ नये असे वाटत असेल संवेदनशील आणि जागरूक सभासदांनी असल्या प्रकाराचा निषेध केला पाहीजे.
संपादक मंडळानेसुध्दा नुसते Delet करून थांबु नये. सदर सभासदांना योग्य ती जाणीव करून द्यावी असे माझे मत आहे.
3 Dec 2010 - 6:31 pm | अवलिया
सहमत आहे.
3 Dec 2010 - 6:35 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत. इथे शब्दच तोकडे पडतील असे वाटत आहे.
निषेधाचे प्रकार देखील इथे सुचवले गेले असते तर सदर लेखकाच्या खवत जाउन तसे निषेध नोंदवणे सोपे गेले असते. तसेच आमच्या सारख्या काही असंवेदनशील आणि झोपाळु सदस्यांनी काय करावे हे देखील इथे सुचवलेले नाही.
शब्दाशब्दाशी सहमत. पुढे जाउन असे म्हणतो की एकास एक ह्या न्यायाने एक आत आलेल्या सदस्याच्या बदल्यात एक असा मिपाची लोकप्रियता घटवणारे धागे काढणारा सदस्य बाहेर काढला जावा.
3 Dec 2010 - 9:57 pm | रन्गराव
चिंतामणी, आपण लिहलेले मुद्दे थोड्याफार प्रमाणात बरोबर आहेत. पण असे नियम एक तर्फी बनवनं आणि त्यांना लागू करन जर चालू झालं तर लहान मुलांच्या शाळेतील कारभारा सारखा होईल. आणि मॉरल पोलिसिंग कधीही वाईटच नाही का? कारण नियम बनवणार्यांनी ते स्वतः आधी पाळले पाहिजेत. इथे येणारे बहुतेक सर्व लोक मॅच्युअर असतात. कधी कधी खोड्साळपणा होतो, नाही अस नाही. पण प्रत्येक वेळी तो जाणूनबुजून होतो असं मात्र नाही. आणि समजा कोणी जाणुनबुजून अस करत असेल तर वाचकही सुज्ञ असतात. ते असा दुष्टपणा करणार्यांना वाळीतत टाकतील.
मतभेद हे होतच असतात. ह्याचा अर्थ असा नाही की आपल्याला न आवडणारी गोष्ट उडवून लावायची.
कदाचित वर सुचवलेले उपायच कारणीभुत असतील अधोगतीला.
4 Dec 2010 - 1:01 am | चिंतामणी
चिंतामणी, आपण लिहलेले मुद्दे थोड्याफार प्रमाणात बरोबर आहेत. पण असे नियम एक तर्फी बनवनं आणि त्यांना लागू करन जर चालू झालं तर लहान मुलांच्या शाळेतील कारभारा सारखा होईल. आणि मॉरल पोलिसिंग कधीही वाईटच नाही का? कारण नियम बनवणार्यांनी ते स्वतः आधी पाळले पाहिजेत. इथे येणारे बहुतेक सर्व लोक मॅच्युअर असतात. कधी कधी खोड्साळपणा होतो, नाही अस नाही. पण प्रत्येक वेळी तो जाणूनबुजून होतो असं मात्र नाही. आणि समजा कोणी जाणुनबुजून अस करत असेल तर वाचकही सुज्ञ असतात. ते असा दुष्टपणा करणार्यांना वाळीतत टाकतील.
भौ. तुम्ही समंजसपणाणे भुमीका मांडत आहात.
मी सुध्दा तेच करीत आहे. मी येथे १ वर्ष ४७ आठवडे सभासद आहे. पण हा निषेधाचा पवीत्रा प्रथमच घ्यायला कारण संमधीत सभासदांनी दोन स्रीयांचा उल्लेख ज्याप्रकारे केला (एक तरुण आहे आणि दुसरे आजोबा आहेत) ते कुठल्याही सुसंस्कारीत माणसाला क्लेश देणारेच होते.
राग मानु नका. एक उदाहरण देतो. तुमची मुलगी/बहीण प्रसिध्दीला आली. आणि अश्या घटनेने कोणी असे उद्गार काढले तर आपणास कसे वाटेल?? त्या पुढची गोष्ट म्हणजे दुसरे जेष्ठ सभासद म्हणतात की "ती काय तिची ममा त्याहुन कडक आहे". हे उद्गार तुम्ही तुमच्या संदर्भात लावुन बघा आणि पुन्हा उत्तर द्या.
मी नियम बनवा असे म्हणले नाही. पण असे वागणा-यांना जाणिव नक्कीच करून द्यायला पाहीजे.
4 Dec 2010 - 8:58 am | अप्पा जोगळेकर
तुमची मुलगी/बहीण प्रसिध्दीला आली. आणि अश्या घटनेने कोणी असे उद्गार काढले तर आपणास कसे वाटेल?? त्या पुढची गोष्ट म्हणजे दुसरे जेष्ठ सभासद म्हणतात की "ती काय तिची ममा त्याहुन कडक आहे". हे उद्गार तुम्ही तुमच्या संदर्भात लावुन बघा आणि पुन्हा उत्तर द्या.
ज्या हिरॉईन्स किंवा तरुण महिला सेलिब्रिटी प्रसिद्धीला येतात त्यांच्या कुटुंबियांना अशा गोष्टींची सवय होत असते. कडक, हॉट, फटाका आणि तत्सम शब्द आपल्या संदर्भात वापरले जावेत अशी त्या सेलिब्रिटींची स्वतःचीच इच्छा असते.
याउलट आपली ओळख आपल्या ओरिजिनल प्रोफाईलद्वारेच व्हावी असे ज्यांना खरोखरच वाटते त्यांच्याबाबत हे घडत नाही. उदा. - सानिया मिर्झाच्या बाबतीत तुमच्या मते आक्षेपार्ह असणारे (आणि जे माझ्यासारख्यांना आनंद देतात) असेव असंख्य उल्लेख मी ऐकले, वाचले आहेत. पण सायना नेहवालच्या बाबत असे घडताना कधीच पाहिले नाही. शेवटी कोण किती सिन्सिअर आहे यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत.
4 Dec 2010 - 9:16 am | रन्गराव
एक बोंब झाली. दोघांचीही मते पटली मला. आयला खर तर अस उत्तर राजकारणी देतात ;). पण काय करणार, वाचून गोंधळ झाला इतकं मात्र खरं. असो मतभेद आहेत आणि त्यावर समंजसपणे चर्चा करताय हे बाकी आवडल. :) चर्चा चालू द्या
4 Dec 2010 - 8:46 am | अप्पा जोगळेकर
(सुदैवाने संपादक मंडळाने दखल घेउन त्या पोस्ट उडवल्या)
या संस्थळाचे माजी संचालकसुद्धा या पद्धतीचे, अभिरुचीचे, पातळीचे प्रतिसाद देत होते. त्यांच्या पोस्टस कधी उडवल्याचे पाहिले नाही. याशिवाय अनेकदा काही थोर पुरुषांचा एकेरी उल्लेख केला जात असतो. त्याही पोस्टस उडवल्याचे कधी पाहिले नाही.
बाकी XXबाई म्हणजे कडक माल आहेत एकदम.
सानिया मिर्झा, कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा इ. इ.इ. सेलिब्रिटींचा ज्या पद्धतीने सर्वत्र उल्लेख होत असतो तसाच उल्लेख शुक्रेबाईंच्या बाबत मी केला आहे. वर्तमानपत्रांमध्येसुद्धा असाच उल्लेख असतो. हल्लीच्या काळात तरी असे उल्लेख त्या त्या सेलिब्रिटींना गौरवार्ह वाटतात अपमानास्पद नव्हे.
ममा XX पण काहि कमी नाहित.
काहीच संदर्भ लागला नाही. व्यनिवरुन कळवावे.
सध्या मिपावर अभिरुचीहीन पोस्टस खूप दिसत आहेत. त्यामुळेसुध्दा ही अवस्था आली असणार.
कोणत्याही प्रॉडक्ट मध्ये डिफेक्टस, बग्स येउ नयेत ही जबाबदारी डेव्हलपरची असते. युजरची नाही.
4 Dec 2010 - 9:42 am | स्पा
.
3 Dec 2010 - 10:36 pm | मितभाषी
आमचे परममित्र श्री चोता दोन ह्यांचे या विषयावर मत ऐकायला आवडेल. (गाढवाची गोष्ट सोडुन).