Tasty yummy Snacks 1 : Instant Onion Rava Dosa

Pearl's picture
Pearl in पाककृती
1 Dec 2010 - 1:58 pm

साहित्यः बारीक रवा २ चमचे, तांदळाची पिठी २ भांडी, जिरे, मीठ, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर

क्रुति: एका वाटीत बारीक रवा घेऊन त्यात थोडे पाणी घालून तो १५/२० मिनिटे भिजू द्यावा. त्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये तांदूळाची पिठी घेऊन त्यात हा रवा, थोडे जिरे, हिरव्या मिरच्यांचे पातळ काप/तूकडे, कोथिंबीर, पाणी, चवीपुरते मीठ घालून नीट ढवळा. दोस्याचे पीठ तयार.
आता या पिठाचे छान दोसे घाला. लगेच त्यावर वरून कांदा पसरा. मस्त जाळीदार Onion Rava Dosa तयार. त्यावर लोणी घालून तो हिरव्या चटणी बरोबर किंवा (शेंगदाणा चटणी + दही) बरोबर वाढा.

प्रतिक्रिया

फोटो पाहिजेच...

आणि काय हे.. शिर्षक इंग्रजीमधून आणि पाककृती मराठीमधून.. दोन्ही मराठी केलं तर चांगल होईल..

- पिंगू

चविष्ट स्वादिष्ट नाष्टा १: झटपट कान्दा रवा दोसा
आता खुष का :)

(आधीच लिहिलेल्या लेखाचे नाव बदलता येत नसल्याने ही २/३ पदार्थांची सेरीज उर्फ मालिका आंग्ल भाषेतील नावानेच लिहिण्यात येईल, याची नोंद घ्यावी :))

फोटो upload करण्यास येथे access नाही. पेन्ड्राइव्ह disabled आहे. घरी नेट नाही. विकेन्ड ला (महत्वाच्या कामांसाठी सुद्धा) नेट ला जायला वेळ नाही.
असे हे फोटोचे कोडे सोडवा. उत्तर सांगा. त्यानुसार फोटो चढवला जाईल :-)

नको नको..फोटो नको.

जीभ खवळते फोटो बघून.

रेसिपी वाचून सुरुवात झालीच आहे.

णिशेद. :-)

हा.. हा..

जीभ खवळते हे मात्र नक्की खरे आहे. विशेषतः श्री. गणपा यांच्या पाकक्रुतींचे फोटो पाहून.
I just love the he decorates the dish and the presentation.

फोटो बघून जीव आणि जीभ जाळून घेण्यात एक मजा असते.. ती हिरावून घेऊ नका..

- खादाड पिंगू

चिंतामणी's picture

4 Dec 2010 - 2:05 pm | चिंतामणी

फोटु टाकला असता तर अजून छान छान वाटले असते.

एक सुचना. रवा ताकात भिजवा. डोसा/उत्तपा हलका होतो आणि चवसुद्धा छान लागते.

प्रयोग करून बघा.