२६/११ पासून धडा घेउन आपण करण्यासारखं काय आहे?

मराठे's picture
मराठे in काथ्याकूट
26 Nov 2010 - 9:48 pm
गाभा: 

(ह्या विषयी पूर्वी काही उहापोह झाल्या असल्यास क्षमस्व)

२६/११ आला की मेणबत्या लावणे, श्रद्धांजली वाहणे हे नैमित्तिक झालं की सगळे आपापल्या संस्कारांप्रमाणे 'झालं-गेलं गंगेला मिळालं' ह्या वृत्तीने आपापल्या कामाला लागतो. फार तर वाचकांच्या पत्रात किंवा आंतरजालावरून (चार भिंतीआड बसून) राग व्यक्त करतो व नेत्यांना शिव्या घालतो.
ही परीस्थिती पुन्हा निर्माण होउ नये म्हणून आपण कोणते "ठोस" उपाय उचलू शकतो?

१. सार्वजनिक ठिकाणी दक्ष राहणे. संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तूंची माहिती त्वरीत पोलिसांना देणे.
२. शाळांमधून्/कॉलेज/ऑफिस्/फॅक्टरीज मधून फायर-ड्रिल च्या सारखे दहशतवादी हल्ला झाल्यास काय करायचे याचे शिक्षण देणे व त्याचे ड्रिल वारंवार करणे... प्रथम पूर्वसूचना देउन आणि मग पूर्वसूचना न देता जेणेंकरून अशा परिस्थितीत गोंधळाची परिस्थिती निर्माण होउ नये.
३. शाळांमधून शारिरीक शिक्षण म्हणून फक्त कवायत (का ?) शिकवली जाते, त्या ऐवजी कराटे/ज्युडो सारखे स्वसंरक्षणाचे प्रकार शिकवावे.
४. दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स प्रत्येक शहरात असणे आवश्यक आहे.
५. रस्तावरून पोलिसांची गाड्या, रुग्णवाहिका किंवा आगीचे बंब जेव्हा सायरन वाजवत जातात तेव्हा रस्त्यावरिल वाहनांने त्यांना वाट देउ केली पाहिजे जेणेकरून त्यांना वाट काढणे सोपे जाईल. (असं होताना मुंबईत मला तरी कधी दिसलेलं नाही उलट रुग्णवहिकेला ओवर्टेक करून जाणारे महाभाग दिसतात)

वरिलपैकी काही उपायांची परिणामकता मोजता येउ शकेल असे आणखी उपाय शोधायला हवेत जेणेकरून आपण (आपण म्हणजे विभागाची नगरपालिका/ग्रामपंचायत इ.) प्रत्येक शहराचे/विभागाचे स्कोरकार्ड बनवता येतिल. ज्या शहरात / विभागात योग्य प्रगती दिसत नाही त्यांवर लक्ष केंद्रित करता येइल. जर मिडियाने ह्या स्कोर ठेवला व त्याला जर ग्लॅमराइज केलं तरी हरकत नाही, म्हणजे आपले शहर्/विभाग पहिला यावा यासाठी सगळे नागरीक प्रयत्न करतील. (ह्यात फक्त भ्रष्टाचार होउ नये.. आपल्या देशाला तोही एक शाप आहे, माणसं नियम पाळण्याऐवजी त्यातून पळवाटा शोधण्यात जास्त पटाईत असतात.) तरूणांमधे व शाळकरी मुलांमधे ह्याविषयी जर जागरूकता निर्माण झाली तरच काही वर्षांत परिस्थितीमधे थोडा फरक पडण्याची आशा आहे. ह्यासाठी हे उपाय प्रत्येकाने पाळले पाहिजेत. ह्यासाठी व्यक्तीगत शिस्त फार महत्वाची आहे. दुर्दैवाने भारतात एकूणच नियमांचे पालन होताना दिसत नाही. इतकंच काय कोणी नियमांचं काटेकोरपणे पालन करताना दिसलाच तर तो हास्यास्पद ठरतो. ही मानसिकता बदलणे अतिशय जरूरीचे आहे. नियम हे मोडण्यासाठी नसून पाळण्यासाठी असतात. त्यामुळे आपलाच फायदा आहे हे समजायला हवं.

असे आणखी काय ठोस उपाय आहेत?

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

26 Nov 2010 - 9:54 pm | अविनाशकुलकर्णी

मराठे साहेब माफ करा ..पण काहि तासातच २६ संपुन २७ तारीख सुरु होणार व हा विषय हि संपणार..
जो प्रयंत पाकडे येवुन इथे १०-१२ माणसांचे मुडदे पाडत नाहि तो पर्यंत राज्यकर्ते शांत बसुन खादाडी करणार...आता मेण बत्या पुढच्या २६ तारखेस व पुरत्याच पेटणार....

इंटरनेटस्नेही's picture

27 Nov 2010 - 12:04 am | इंटरनेटस्नेही

+१

टेन्शन काय को लेने का?
सही बोलताय सही बोलताय
भेजा क्यों सरकानेका?
सही बोलताय सही बोलताय

ईन्टरफेल's picture

26 Nov 2010 - 10:16 pm | ईन्टरफेल

साहेब आमि शेरात
राहातो आसे जर?

आमि म्ह्नलो
तर काय ?
आमि खेड्यात रहातो

.>>पण काहि तासातच २६ संपुन २७ तारीख सुरु होणार व हा विषय हि संपणार..
जो प्रयंत पाकडे येवुन इथे १०-१२ माणसांचे मुडदे पाडत नाहि तो पर्यंत राज्यकर्ते शांत बसुन खादाडी करणार...आता मेण बत्या

आस जर कुनी
म्हटल तर
काय ?

माग आंम्ही काय करायच ?

यकु's picture

26 Nov 2010 - 10:35 pm | यकु

२६/११ पासून धडा घेउन आपण करण्यासारखं काय आहे?

अतिरेकी , हल्लेखोर वगैरे आसपास दिसले तर जीवाची तमा बाळगू नये; गावठी का होईना शस्त्र जवळ बाळगावीत ( रिव्हॉल्व्हर वगैरेचं लायसन्स आम लोकांना मिळूच नये असे सध्या कायदे आहेत ) धडाधड त्यांना उडवायला सुरुवात करावी आणि मग पोलिस वगैरे लोकांना "इन्फॉर्म" करण्याच्या उद्योगाला लागावं.

हे न करता आलं तर मग शासन-पोलीसांच्या नावाने पुन्यांदा गळे काढावेत.

धमाल मुलगा's picture

26 Nov 2010 - 10:40 pm | धमाल मुलगा

बासच!
बाकी काही बोलायची गरजच नाय तिच्यायला! एकदम पर्फेक्ट!

इंटरनेटस्नेही's picture

27 Nov 2010 - 12:11 am | इंटरनेटस्नेही

त्या लोकांना इ़कडचे दिवसाला ५० या स्पीडने पडणारे राजकीय लेख वाचायला द्यावेत.. आपोआप मरतील ते!

रन्गराव's picture

26 Nov 2010 - 11:30 pm | रन्गराव

१ नंबर!

विकास's picture

27 Nov 2010 - 4:02 am | विकास

आपल्या भावना समजू शकलो तरी हे उत्तर म्हणून सहमत आहे असे म्हणता येत नाही....

अमेरिकेतील एक वास्तव असे आहे की ज्या काही घटना या सामान्य नागरीकांमुळे उघडकीस आल्या अथवा ज्या अतिरेकी कृती सामान्यांनी फोल पाडल्या ते कुठल्या शस्त्राने नव्हे तर जागृकतेने, स्वाभिमानाने आणि समयसुचकतेने जे काही त्या क्षणाला करणे योग्य आहे ते समजून केल्याने...

या संदर्भात बिरबलाची गोष्ट आठवते - बादशहा विचारतो सगळ्यात प्रभावी शस्त्र कुठले तर बिरबल म्हणतो की गरज असताना जे हातात असते ते...

सुनील's picture

26 Nov 2010 - 10:39 pm | सुनील

अमेरिकेत दुसरा ९/११ अद्याप झाला नाही याचे जितके श्रेय अमेरिकी प्रशासनाला जाते तितकेच श्रेय सामान्य अमेरिकन नागरीकालादेखिल जाते. किंबहुना ९/११ च्या हल्ल्यातील एक विमान आपले अपेक्षित ध्येय गाठू शकले नाही (पेंटॅगॉन) ह्याचे कारणदेखिल त्या दुर्दैवी विमानातील सामान्य प्रवासीच असावेत असे मानले जाते (अर्थात खरे-खोटे आता कधीच समजणार नाही).

विकास's picture

27 Nov 2010 - 3:58 am | विकास

अमेरिकेत दुसरा ९/११ अद्याप झाला नाही याचे जितके श्रेय अमेरिकी प्रशासनाला जाते तितकेच श्रेय सामान्य अमेरिकन नागरीकालादेखिल जाते.

सहमत

किंबहुना ९/११ च्या हल्ल्यातील एक विमान आपले अपेक्षित ध्येय गाठू शकले नाही (पेंटॅगॉन) ह्याचे कारणदेखिल त्या दुर्दैवी विमानातील सामान्य प्रवासीच असावेत असे मानले जाते (अर्थात खरे-खोटे आता कधीच समजणार नाही).

युनायटेड एअरलाईन्स चे विमान "युए - ९३" ह्याचे खरे लक्ष नक्की काय होते ते कधी कळलेले नाही पण व्हाईट हाऊस असावे असे समजण्यात येते कारण ते देखील लादेनचे एक लक्ष होते. पेंटॅगॉनवर विमान पाडण्यात अतिरेक्यांना यश आले, जरी त्यांना पेंटॅगॉन उध्वस्त करता आले नाही तरी. अतिरेक्यांचे इप्सित लक्ष साध्य न होण्याचे "खरे" कारण हे त्यातील प्रवासीच होते. त्यातील काही प्रवाशांचा आणि ९११ ह्या पोलीस यंत्रणेचा जो काही संवाद झाला तसेच ब्लॅकबॉक्स मधून जे काही शोधता आले त्यावरून तसेच मला वाटते काहींनी शेवटचा फोन घरी करत हे सांगितले त्यावरून नक्की झाले होते.

शिल्पा ब's picture

26 Nov 2010 - 10:55 pm | शिल्पा ब

आतापर्यंत संसदेवर हल्ला, १३ बॉम्बस्फोट अन बारीक सारीक काय काय झालेसे ऐकिवात आहे....त्यातच हे एक...उगाच धडा वगैरे घेऊन अशा गोष्टींना कशाला मोडता घाला...नाही का?

डॉ.प्रसाद दाढे's picture

26 Nov 2010 - 11:22 pm | डॉ.प्रसाद दाढे

माझे ह्याविषयीचे मत मी मागे मांडले होते त्याची पुनरावृत्ती करतो..

..माझ्या मते शिस्तीची सुरूवात शाळा व कॉलेजपासूनच होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत व कॉलेजात एन.सी.सी युनिट्स स्थापन केली पाहिजेत. व प्रत्येक विद्यार्थ्याला त्यात सहभागी केले पाहिजे. दुर्दैवाने आज जुन्या शाळा सोडल्या तर पुष्कळ शाळांमध्ये व इंजिनियरिंग- मेडिकल कॉलेजात एन.सी.सी नाही. स्काऊटपेक्षा एन.सी.सी मला महत्वाची वाटते कारण ती थेट भारतीय लष्कराच्याच अधिपत्याखाली येते. तिथे तुम्हांला कडक अनुशासन, फिजिकल फिटनेस, शस्त्र प्रशिक्षण (एअर गन नाही तर प्रॉपर फायर आर्म- लाईट मशीनगन, ३०३, एस.एल.आर इ) घ्यावे लागते. शिवाय कॅम्पच्या निमित्ताने सर्व जाती व स्तरांमधील मुलांमध्ये मिसळून राहण्याची सवय होते. आयुष्यात संघर्ष व तडजोड म्हणजे नक्की काय चीज आहे ह्याची चुणूकही मिळते. लीडरशिप शिकायला मिळते.
मी स्वत: एन.सी.सी बेस्ट कॅडेट असून अचूक फायरिंग करून बक्षिसही मिळविले आहे.
दुर्दैवाने सध्या एन.सी.सी मध्ये सैन्याने आऊटडेटेड ठरवलेली शस्त्र शिकवितात त्याऐवजी अत्याधुनिक शस्त्रही हाताळायला दिली पाहिजेत. मार्शल आर्टसचाही अंतर्भाव व्हायला हवा.
मुळात भारतात शासनाचे फारसे क्रीडा प्रोत्साहन नाही; त्यामुळे खिलाडूवृत्तीचाही अभावच आहे. नेमबाजीच्या निमित्ताने तरी मुलांनी व तरूणांनी आधुनिक शस्त्रे हाताळली पाहिजेत, नियमित सराव केला पाहिजे. पालकांनीही प्रोत्साहन दिले पाहिजे, पोलिसांनीही पुढाकार घेऊन शस्त्र-परवाना प्रक्रिया सुलभ केली पाहिजे.
एका पत्रकाराने मुंबईतील अतिरेक्यांचे २६/११ ला फोटो काढले होते, तेव्हां त्याची प्रतिक्रिया अशी होती की कॅमेर्‍याच्या ऐवजी माझ्या हातात बंदूक असती तर किती बरे झाले असते? अर्थात नुसते शस्त्र असून उपयोग नाही, त्याचा नियमित सराव पाहिजे व मुळातच लढाऊ वृत्तीही पाहिजे; समोरच्या माणसाला गोळी घालणे इतके सोपे नाही, त्यासाठी किलींग इन्स्टिक्टचीही जरूरत आहे. इतके पराकोटीचे राष्ट्रप्रेम हवे की दातओठ खाऊन समोरच्या गनिमाला भुईसपाट करता आले पाहिजे.
ह्या विषयावर लिहिण्यासारखे आणखीही बरेच आहे, रादर लिहिन तितके कमीच आहे.

पुढील धाग्यावर पूर्वी ह्याच विषयावर झालेली चर्चा वाचता येईल.

http://www.misalpav.com/node/10726

अप्पा जोगळेकर's picture

28 Nov 2010 - 6:11 pm | अप्पा जोगळेकर

एनसीसी मध्ये कुस्तीचे प्रशिक्षणसुद्धा देतात का ? मागे एकदा तुम्ही कुस्तीसंदर्भात काहीसे लिहिल्याचे आठवते.

मराठे's picture

26 Nov 2010 - 11:25 pm | मराठे

सामान्य लोकांना शस्त्र बाळगण्याचा परवाना देणे हा उपाय म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असं आहे. रागाच्या भरात असा विचार डोक्यात येणं स्वाभाविक आहे. पण जरा शांतपणे विचार केला तर यामागचे भयंकर परिणाम सहज कळतील. दहशतवाद्यांचा उद्देश जर जास्तीत जास्त जिवीतहानी करणे आहे तर आपले उद्दिष्ट जास्तीत जास्त जीव वाचवणे हे आहे. त्यासाठीच 'ड्रील' असावे असं मी सुचवलं. वर सुनिल म्हणाल्याप्रमाणे अमेरिकेत ९/११ नंतर पुन्हा असा हल्ला झालेला नाही. त्याच प्रमाणे मध्यंतरी टाईम्स-स्क्वेअर मधे ठेवलेला कार-बॉम्ब लोकांच्या दक्षतेमुळेच वेळेवर निकामी करून कित्येकांचे प्राण वाचवले. आपल्या सर्वांची उदासीनता आपल्या अल्प-सार्वजनीक स्मरणशक्तीला कारणीभूत आहे. दहशतवादी सामान्यांना टार्गेट करतात. त्यांच्याविरुद्ध सामान्यांनीच लढलं पाहिजे. जर आपण आपली कर्तव्य विसरत असू तर सरकारवर/नेत्यांवर आगपाखड करण्यात काही अर्थ नाही.
जाता जाता: आपल्या सारख्या सामान्य लोकांनीच इंग्रजाविरुद्ध लढून स्वातंत्र्य मिळवलं ह्यावर तुमचा विश्वास आहे का?

डॉ.प्रसाद दाढे's picture

27 Nov 2010 - 12:00 am | डॉ.प्रसाद दाढे

सध्या केवळ नगरसेवक, आमदार/खासदार मंत्र्यांना वा ज्यांना खंडणीच्या धमक्या येतात
अश्या धनाढ्यांनाच शस्त्रपरवाना दिला जातो ही वस्तूस्थिती आहे. पैकी पहिल्या कॅटॅगरीत
येणारे बहुतेक शंभर टक्के लोक स्वतःच नामचीन गुन्हेगार आहेत. एकेकाच्या नावावर खून, धमक्या,
इ इ भयंकर गुन्हे आहेत तरीही त्यांच्याकडे परवानाप्राप्त व अत्याधुनिक विदेशी बनावटीची शस्त्रे आहेत.
माझ्या मते कुठल्याही भारतीय नागरिकास, जो नियमित आयकर भरतो, जो सुशिक्षित व सुसंस्कृत
आहे, कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यात आरोपी वा संशयित नाही व जो शस्त्राचा योग्य त्या वेळीच वापर करू
शकतो अश्या माणसांस शस्त्रपरवाना द्यावा. अर्थातच त्याबरोबर शस्त्र चालविण्याचे, वागविण्याचे प्रशिक्षणही
सक्तीचे असावेच. (तसे ते आहेही)
अश्या खाजगी शस्त्रांचा नेहमी गैरवापरच होईल असा समज करून घेणे चुकीचे आहे. तसे म्हणाल तर
'गैरवापर' पोलीस वा संरक्षण दलातील सैनिकही करू शकतात व तसा अनेकदा झालाही आहे म्हणून
त्यांच्याकडून शस्त्रे उद्या कुणी काढून घेऊ म्हणेल तर ते हास्यास्पद होईल.
स्वरक्षण हा प्रत्येक भारतीयाला असणारा घटनासिद्ध हक्क आहे व त्यासाठी प्रसंगी शस्त्राचा वापर करणे
कायद्यालाही मान्य आहे.
हे मी रागाच्या भरात वगैरे लिहिले नसून पूर्ण विचारा अंतीच ह्या निष्कर्षास मी आलो आहे. निषेधाचे लखोटे
लिहून अन मेणबत्त्या पेटवून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहणे हे तृतीयपंथी राजकारण्यांचे धंदे आहेत. खरोखरीच
ह्यापुढे असे निरपराध नागरिकांचे शिरकाण होऊन द्यावयाचे नसेल तर प्रत्येक तरूणाने मार्शल आर्टस व
अग्निशस्त्र प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. गरज पडली तर ह्या देशाचा प्रत्येक तरूण सैनिकाच्या रूपात
आपल्यापुढे उभा ठाकू शकतो हे जेव्हा आपल्या शत्रूंना समजेल तेव्हा अश्या शोकसभा घेण्याचे प्रसंगच येणार नाहीत!

यकु's picture

27 Nov 2010 - 12:31 am | यकु

स्वरक्षण हा प्रत्येक भारतीयाला असणारा घटनासिद्ध हक्क आहे व त्यासाठी प्रसंगी शस्त्राचा वापर करणे
कायद्यालाही मान्य आहे.

कायद्याला ते मान्य होते. आता ते तेवढे सहज राहिलेले नाही. नंतर कायदे बदललेले आहेत. सत्राशे साठ ना हरकत परवाने आणि दाखले द्यावे लागतात.
हे पहा: http://www.gunowners.in/
हे लोक शस्त्र परवान्या बद्दल होईल तेवढी जागृती करत आहेत.

ज्यांच्याकडे शस्त्रे आहेत त्यांनाही नसता त्रास सहन करावा लागतो - निवडणुक आली - करा शस्त्रे जमा, आचारसंहिता लागू झाली - करा शस्त्रे जमा, वातावरण तापले - करा शस्त्रे जमा.

हे ही पहा.
परवाना मिळाला तरी पैसे खर्चून विकत घेतलेले शस्त्र सुस्थितीत असेलच अशी खात्री देता येत नाही.
ऑर्डनन्स फॅक्टरी वगळता दिल्ली/अंबाला भागातील एजन्सीज तर नंतर बोलू पण देत नाहीत.

डॉ.प्रसाद दाढे's picture

27 Nov 2010 - 8:12 am | डॉ.प्रसाद दाढे

सत्राशे साठ ना हरकत परवाने आणि दाखले द्यावे लागतात.

हाच तर बदल करायचा आहे..ज्यांना जीवे मारण्याची धमकी येते अश्यांनाच स्वरक्षणाची गरज असते
हा पोलिसांचा मोठा गैरसमज आहे. मुळात ब्रिटिशांनी खाजगी शस्त्रपरवाना देण्याची व्यवस्था इतकी जटील
व अवघड करून ठेवली हे साहाजिकच आहे. पण स्वातंत्र्यानंतर इतर अनेक पॉलिसिजसारखी
शस्त्र पॉलिसीही तीच ठेवणे वेडेपणाचे आहे. अर्थात ह्यात अनेक प्रकरचे आर्थिक हितसंबंधही
असतात हे खरे गुपित आहे. 'अमूक एक माणसास शस्त्र-परवाना देण्याची गरज आहे किंवा नाही'
हे पूर्णपणे सब्जेक्टिव्ह असल्याने ह्या व्यवहारांमध्ये किती लाखांची टेबलाखालून उलाढाल
चालते हे सामान्य माणसांस ठाऊक नसते.

ज्यांच्याकडे शस्त्रे आहेत त्यांनाही नसता त्रास सहन करावा लागतो - निवडणुक आली - करा शस्त्रे जमा, आचारसंहिता लागू झाली - करा शस्त्रे जमा, वातावरण तापले - करा शस्त्रे जमा.


हा नियम आता बदलला आहे. ज्यांनी स्वसंरक्षणार्थ शस्त्र घेतले आहे व ज्यांना गुन्हेगारी पार्श्वभूमी
नाही त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शस्त्र जमा करावे लागत नाही.

परवाना मिळाला तरी पैसे खर्चून विकत घेतलेले शस्त्र सुस्थितीत असेलच अशी खात्री देता येत नाही.
ऑर्डनन्स फॅक्टरी वगळता दिल्ली/अंबाला भागातील एजन्सीज तर नंतर बोलू पण देत नाहीत.

भारतात वापरल्या जाणार्‍या सरकारी वा खाजगी शस्त्रांचा दर्जा हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. अर्थात
आपले शस्त्र सुसज्ज स्थितीत ठेवणे हे धारकाचेच काम आहे. उत्कृष्ट नाही पण गेला बाजार साधारण दर्जाची
शस्त्रं सामान्य भारतीयांना व सशस्त्र दलांना उपलब्ध असतात; जेंव्हा की अत्याधुनिक (म्हणजे साहाजिकच
विदेशी..कारण भारतीय बनावटीची शस्त्रे अजून 'य' जनरेशन पिछाडीवर आहेत!) शस्त्रे ही सराईत गुन्हेगारांना,
संजय दत्तला, खासदारांना, आर्मीला व काही वेचक भाग्यवान पोलिसांनांच मिळतात्..बिचार्‍या पोलिसांना
आत्ता कुठे विदेशी शस्त्रे बघायला आणि कमरेला लावायला मिळत आहेत (वापरायला म्हणजेच सरावाला
संधी आणि गोळ्या मिळणार नाहीतच..त्यासाठी मुंबईवर आणखी एक हल्ला व्हायला लागेल!)
हा कोळसा उगाळावा तेव्हढा काळाच आहे.. जेव्हढे मी जास्त लिहिन तेव्हढा मला आणि वाचकांना
मनस्तापच होणार आहे!

यकु's picture

27 Nov 2010 - 5:39 pm | यकु

हा कोळसा उगाळावा तेव्हढा काळाच आहे..

लाखातलं बोललात!

चिरोटा's picture

27 Nov 2010 - 12:42 am | चिरोटा

असे आणखी काय ठोस उपाय आहेत?

वर उपाय सुचवलेले आहेतच पण मूळ कारण काय आहे? गुप्तचर संघटनांचे अपयश हे असल्या घटनांचे मूळ कारण आहे असे मला वाटते. शिवाय केंद्रिय गुप्तचर/राज्य गुप्तचर पातळींवर माहितीची पारदर्शकता नसणे हेही एक कारण आहे.
२६/११ बाबत गुप्तचर संघटना(रॉ/आय्.बी) आणि राज्य गुप्तचर विभाग कुठे कमी पडले/नंतर काय उपाय योजना झाली हे समोर येत नाही तो पर्यंत अशा घटना घडतच राहतील.ह्या संघटनांविषयी माहिती/उपाय मिडियामध्येही येत नाही आणि सरकारही ह्याबद्दल मौन बाळगून असते.अमेरिकेत ९/११ नंतर सी.आय्.एं,एफ्.बी.आय ने चुका झाल्याचे मान्य केले्. ह्या संघटनांचे माजी अधिकारी आपण कुठे चुकलो ते न लाजता मिडियाला सांगतात त्यावर पारदर्शकपणे चर्चाही होते.
लोकांनी जागरूक असणे वगैरे ठीक पण समजा आपण बस मधून प्रवास करत आहोत आणि अचानक AK47 घेवून ४ लोक आत घुसले तर आपण काय करु शकतो? काही नाही!!.आपणच नाही तर जगात कोणीही निशस्त्र नागरिक फार काही करु शकणार नाहीत्.तशी अपेक्षा करणेही चुकीचे वाटते.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Nov 2010 - 11:35 am | परिकथेतील राजकुमार

२६/११ पासून धडा घेउन आपण करण्यासारखं काय आहे?

ब्रिटिशांना परत बोलवावे.

सर परावर्ड कलिन्स

अवलिया's picture

27 Nov 2010 - 11:54 am | अवलिया

त्यापेक्षा मोंगलाना परत बोलवावे.

-- नानाबहादुर बाबर

परिकथेतील राजकुमार's picture

27 Nov 2010 - 11:56 am | परिकथेतील राजकुमार

त्यापेक्षा मोंगलाना परत बोलवावे.

ह्यास देखील हरकत नाही. पण मोंगल म्हणजे नक्की कोण अभिप्रेत आहे हे नानाबाबर स्पष्ट करतील काय ? म्हणजे कोणता राजा अथवा सुलतान ? का सरळ बाबर ?

यावर थत्तेचाचा मार्गदर्शन करतील

नितिन थत्ते's picture

27 Nov 2010 - 1:50 pm | नितिन थत्ते

>>त्यापेक्षा मोंगलाना परत बोलवावे.

मग नानबा काय वाईट?

सुधीर काळे's picture

27 Nov 2010 - 12:59 pm | सुधीर काळे

या विषयावरचा हा माझा धागा जरूर वाचा: http://www.misalpav.com/node/10726

स्पा's picture

27 Nov 2010 - 5:49 pm | स्पा

बाकी काही नाही तरी.. मेणबत्त्या बनवण्याच्या क्षेत्राला भरभराटीचे दिवस आलेले आहेत....

अजून एखादा हल्ला झाल्यास ....." reliance " या उद्योगात ३०० कोटी गुंतवणार असल्याचे "इकॉनॉमिक टाइम्स" ने म्हटलेले आहे...... ;)

अविनाश कदम's picture

30 Nov 2010 - 1:19 am | अविनाश कदम

२६/११ पासून धडा घेऊन आपण बरेच काही शिकायला व सुधारायला हवं होतं पण गेल्या दोन वर्षात काहीच शिकलो नाही. पोलीस खात्याची मसल पॉवर वाढवून उपयोग नाही, ”इन्टेलिजन्स“ पॉवर वाढायला हवी होती ते घडलेलं नाही. अजूनही आपल्याला दहा(??) दहशतवादी एवढा दारुगोळा, शस्त्रास्त्रे घेऊन शहरात कसे शिरू शकले हेच नीट कळलेलं नाही.
गुप्तचर व तपास यंत्रणा इतकी कमकुवत असतांना नुस्त्या कवायती व शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन करून काय उपयोग?

विकास's picture

30 Nov 2010 - 6:25 am | विकास

आत्ताच म.टा. मधे वाचल्याप्रमाणे ठाण्यामधे २ अतिरेक्यांना पकडले, त्यांचा २६/११ स्टाईलमधे मुंबई सेंट्रल स्थानकावर हल्ला करण्याचा डाव उधळून लावला आहे. तसेच काश्मीर मधील लष्करे तोयबाच्या म्होरक्याला अब्दुल रेहमानला मारण्यात पण "२१ राष्ट्रीय रायफल्स"च्या पथकास यश आले आहे.