सहज म्हणून एकदा एक पोस्ट लिहिली आणि मोठी लांबडी यादी झाली. म्हणजे कोकणच्या भाषेत बारीक घोण निघेल म्हणून बिळातली शेपटी धरायला जावी आणि चार हात लांबडं जनावर निघावं तसं झालं. इथे त्याविषयी लिहितोय.
...
मरणं ही फार म्हणजे फारच कंपल्सरी चीज आहे..प्रत्येकाला बाकी काही जमलं नाही तरी किमान एकदा मेलंच पाहिजे..
मरणाची बातमी सर्व संबंधित पार्ट्यांना कळवणं आणि उत्साहाने पुढची सर्व सोय करणं हा तर काही जणांचा छंद..
मेलेल्या लोकांचे आकडे देताना महिलांचा आकडा वेगळा सांगतातच.. (मृतांत १८ महिलांचा 'समावेश' आहे..)
तीन अतिरेकी ठार..दोन सैनिक शहीद..
एकाच छोट्या वाक्यात आपल्या सैनिकांचा आदर आणि अतिरेक्यांविषयी तिरस्कार..
'मरणं' या एक गोष्टीसाठी मराठीत आपण किती शब्द करून ठेवलेत??
काही सहानुभूतीवाले..काही मेल्याचाच आनंद दाखवणारे..तिरस्काराने भरलेले..(मरणानंतरही..)..
वाटतात त्यापेक्षा जास्त शब्द आहेत.. खूप जास्त..
यात काही लोकल (म्हणजे स्थानिक!!..मुंबईच्या लोकलचा मरणाशी घनिष्ठ संबंध असला तरी तो विषय इथे नाही.) संदर्भ असलेले शब्दही मी घेतले आहेत. (उदा. पुण्यात : ओंकारेश्वरावर जाणे..)
१) मेला
२) गेला
३) वारला
४) ठार
५) देवाज्ञा
६) कैलासवासी
७) गचकला
८) ग्रंथ आटोपला
९) चचला
१०) उडाला
११) संपला
१२) खपला
१३) टपकला
१४) ढगात गेला.
१५) स्वर्गवासी झाला
१६) वीरगती प्राप्त झाली
१७) धारातीर्थी पडला
१८) देह ठेवला
१९) खर्ची पडला.
२०) निजधामास गेला
२१) निवर्तला
२२) सोनं झालं
२३) डाव बास (कुठेतरी ऐकलंय..पण Citation needed हां..!!)
२४) म्युन्सिपाल्टीचा पास मिळाला
२५) सद्गती
२६) अमर झाला
२७) कै. झाला
२८) काळ आला
२९) आटोपला /ली
३०) उत्थान
३१) उत्तमगति
३२) कालग्रस्त
३३) काळझोंप
३४) काळनिद्रा
३५) देवगत किंवा देवगति
३६)देह ठेवणे
आता नंबर टाकून थकवा आला.. नुसतेच टाकतो शब्द..
समाधी घेणे
वध
खून
पैगंबरवासी
ख्रिस्तवासी
बुद्धवासी
पंचतत्वात विलीन
मोक्ष पावला
डोळे मिटले
स्वर्गारोहण
दम तोडला,
मान टाकली,
गोव-या स्मशानात जाणे (मला वाटते हा अजून जिवंत असलेल्या "वेटिंग लिस्ट" लोकांसाठी वापरतात..)
भोईवाड्याला पोचणे
सरणावर ठेवणे
नाकाला सूत लावणे
निष्प्राण होणे
गेम होणे
पाताळात धाडणे
कंठस्नान घालणे
खांदा देणे
राम म्हणणे
बॅटरी संपणे
फोटो लागणे
निजधामास जाणे
कूंकू पुसणे
बांगडी फुटणे
मसणात जाणे
सोने होणे
चंदन होणे
शटडाउन करणे (!!!!)
लॉग ऑफ होणे
exit घेणे
अखेरचा निरोप घेणे
दिवस भरणे
प्राणपक्षी उडून जाणे
गार पडणे
ढोल वाजणे
बॅण्ड वाजणे
मसाला संपणे
प्राणज्योत विझणे
उताणा पडणे
डोळे फिरणे
नाडी बंद
विकेट पडणे
दम तुटणे
घाला घालणे
हाय खाणे (याविषयी मला शंका आहे बरीच..)
मातीत मिळणे
नामशेष होणे
देवाघरी जाणे
कामी येणे
हाराकिरी
पेन्शन बंद पडणे
खाते बंद होणे
जाणे
संपणे
न उरणे
उरकणे (उरकला..!!)
मार्गस्थ होणे
निजधामास जाणे
आकाशातील तारा होणे
पडदा पडणे
भैरवी होणे
निरोप घेणे
देह सोडणे
देह टाकणे
देह ठेवणे
समाधी घेणे
मूठमाती देणे
शाई संपणे,
नेटवर्क तुटणे ! (हे काहीतरी नवीन!)
वरचा कॉल येणे
यमाचे दूत येणे
यमपाश आवळणे
रंभा उर्वशी सोबत मजा करायला जाणे.
हाकेला ओ देण्या पलीकडे जाणे !
चिरशांती मिळणे
थडग्यात जाणे,
कलेवर होणे
पार्थिव होणे
मढे पडणे
सेंड ऑफ होणे
बरेचसे विचित्र काही बाही शब्द:
६नंबर चा फ़ॊर्म भरणे.
ओंकारेश्वरावर जाणे
आहे का कोणाकडे याखेरीज शब्द..
????
प्रतिक्रिया
16 Nov 2010 - 11:33 am | भारी समर्थ
काय लांबड हाय राव.... हटके कंपायलेशन...
महापरिनिर्वाण दिन की काय असतो. त्याचाही अर्थ हाच का?
भारी समर्थ
16 Nov 2010 - 11:36 am | भारी समर्थ
कोणाला ठरवून मारला तर त्याचा 'काटा काढणे' होतो.
भारी समर्थ
16 Nov 2010 - 11:46 am | मधु बन
अनंतात विलिन होणे
कार्यभाग आटपणे
वैकुंठवासी
16 Nov 2010 - 11:54 am | आंबोळी
काही काही डबल झालेत...
"कंदील लागणे" असा शब्द्प्रयोग मिपावर (आम्ही ) प्रचलीत (केला) आहे.
16 Nov 2010 - 11:59 am | गवि
काही ठिकाणी झालेत खरे डबल.
कंदिल लागणे.नव्या शब्दाबद्दल धन्स.
पण त्यामागे काय आयडिया आहे?
16 Nov 2010 - 4:09 pm | धमाल मुलगा
हे घ्या मुळ..
कंदील लागणे - १
कंदील लागणे - २
(आंबोळ्या, माझे रेफरलचे पैशे पाठवून दे रे paypal च्या खात्यावर. ;) )
16 Nov 2010 - 12:09 pm | नगरीनिरंजन
यमसदनी जाणे/पाठवणे
होत्याचे नव्हते होणे
डोळे पांढरे करणे
(बायकोचे) कपाळ पांढरे होणे
बांगडी फुटणे (पाहा: पानिपताची बखर)
खुर्दा होणे
16 Nov 2010 - 12:11 pm | गवि
इथेच डबल होणार बहुतेक शब्दसंख्या..
16 Nov 2010 - 12:13 pm | अवलिया
कंपुस सामोरे जाणे
16 Nov 2010 - 12:14 pm | परिकथेतील राजकुमार
तुमच्या लेखनाचा उत्साह आणि वेग बघुन खरच हेवा वाटतो.
16 Nov 2010 - 12:15 pm | अवलिया
३१ मार्चच्या आत ३००+ टारगेट आहे
16 Nov 2010 - 12:25 pm | गवि
:-)
३०० पोस्टे की ३०० शब्द?
बरे.. समजले..खरंय..
फार होताहेत एका दिवशी पोस्टे..
सॉरी..
16 Nov 2010 - 12:26 pm | अवलिया
सोरी बिरि कशाला? चालु द्या तुमचे मस्त !!
16 Nov 2010 - 12:24 pm | गवि
"लेखनाचा उत्साह आणि वेग""
हे माझ्याविषयी नसावे..
पण असलेच तर..
सध्या नवीन लिहायला ब्याड पॅच आहे.
कॉमेंटबद्दल धन्स.
16 Nov 2010 - 12:28 pm | Nile
परा आणि नाना ह्या प्रस्थापितांचे असे प्रतिसाद पाहुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली.
(नवखा प्रस्थापित)
16 Nov 2010 - 12:30 pm | अवलिया
बर मग?
16 Nov 2010 - 12:50 pm | परिकथेतील राजकुमार
16 Nov 2010 - 12:57 pm | Nile
तुमच्या कडुन अशाच प्रतिसादाची खात्री होती, ती पुर्ण झालेली पाहुन आनंद झाला.
16 Nov 2010 - 1:51 pm | कवितानागेश
गतप्राण झाला.
देवाघरी गेला.
'तिकिट' काढले.
हिन्दी (मला अजिबात न आवडणारा)
भगवानको 'प्यारे' हुए!
(...आम्ही काय आवडत नाही का देवाला?!)
'अमक्या'कडे गेला! ( रेफेरन्स टू: आधी गचकलेला 'अमका'!)
16 Nov 2010 - 1:57 pm | सुहास..
१) चपला भेटणे. पंख लाभणे.(मिपावरील सुप्रसिध्द !!)
२) शेवटची वंदना घेणे.
३) (स्वर्गात) ठेका धरायला जाणे.
४) पुढच्या योनीत जाणे.(कॉलेजात लई फेमस होता. काय रे पुढच्या योनीत जायची लई घाई झाली का फेम !)
वरिल यादीत " (वरच) तिकीट मिळणे " हा कॉमनली वापरला जाणारा शब्द कसा नाही ?
16 Nov 2010 - 1:59 pm | गवि
चपला भेटणे. पंख लाभणे.(मिपावरील सुप्रसिध्द !!)
मि पा म्हणजे नवनव्या शब्दांची खाणच आहे की..
16 Nov 2010 - 3:55 pm | kamalakant samant
काही आठवलेले शब्द.कदाचित पुन्हा आलेले असतील तरी क्षमस्व.
सौभाग्य गमाविणे,ग॑गा भागिरथी हणे,विधुर होणे,विधवा होणे,कुडी त्यागणे,आत्महत्या,शेवटचा श्वास घेणे,
देहावसान्,काळ येणे,काळाने झडप घालणे,देवाला प्रिय होणे,देहा॑त,कायमचा आडवा करणे, छत्र हरपणे,
ऐहिक कार्य स॑पविणे, मरण येणे, जड देहाचा त्याग करणे, देवज्ञा, शिरछेद, फाशी,कालवश्,दिव॑गत इत्यदि.
16 Nov 2010 - 4:01 pm | बिपिन कार्यकर्ते
अग्ग्ग्ग्ग्ग!!!! काय पण शब्दसंपदा!!!!! व्वा!!
16 Nov 2010 - 4:13 pm | धमाल मुलगा
१.इथला व्हिसा संपणे.
>>गोव-या स्मशानात जाणे (मला वाटते हा अजून जिवंत असलेल्या "वेटिंग लिस्ट" लोकांसाठी वापरतात..)
२.ह्याचं दुसरं व्हर्जन : लाकडं पुढे जाणे. (वापरः एखादा गाडीवर जोरात गेला की, 'ह्याची लाकडं पुढं गेलेली दिसतायत.) शब्दसौजन्यः परीकथेतील राजकुमार.
३.खेळ खलास होणे.
16 Nov 2010 - 4:30 pm | गवि
धमु..आवडलं..झकास शब्द..
:-)
16 Nov 2010 - 4:48 pm | चिगो
>>गोव-या स्मशानात जाणे (मला वाटते हा अजून जिवंत असलेल्या "वेटिंग लिस्ट" लोकांसाठी वापरतात..)
<<
असाच "समाधीत पाय लटकणे"
"व्हॅलिडीटी संपणे"
16 Nov 2010 - 4:51 pm | गवि
"व्हॅलिडीटी संपणे"
:-)
16 Nov 2010 - 5:50 pm | गणेशा
मजा आली वाचुन ..
येव्हडे शब्द वापरात असतील असे वाटले ही नव्हते ..
16 Nov 2010 - 7:03 pm | तिमा
वर लिहिलेले सर्व शब्द हे एकदाच मरण्याच्या क्रियेला आहेत. पण रोज मरणार्यांसाठी केवळ एकच शब्द आहे.
'मध्यमवर्ग' (आणि तो सुध्दा भारतातला)
16 Nov 2010 - 9:33 pm | स्वानन्द
आई शप्पथ... कहर आहे..
शाई संपणे, डाव बास, मसाला संपणे हे म्हणजे तर.. हैटच आहेत!
16 Nov 2010 - 11:21 pm | जानम
शान्त झाले (पहिले खुप बन्ङ होते :०)
16 Nov 2010 - 11:54 pm | रेवती
हिंदीमध्ये 'खटिया खडी होना' म्हणतात तसे काहीसे खाट उभी होणे वगैरे मराठीत म्हणतात काय हे माहित नाही.
बाकी ही जी शब्दसंपदा आहे ती जिवंत माणसांनी वापरण्यासाठी!;)
गेलेल्यांसाठी सगळे शब्द सारखेच!
17 Nov 2010 - 10:42 am | गवि
गेलेल्यांसाठी सगळे शब्द सारखेच!
वाक्य छान..
17 Nov 2010 - 12:47 am | अविनाश कदम
वा ! किती समृद्ध मराठी भाषा. मरणे याला येवढे शब्द दुसर््या कुठल्या भाषेत असतील काय याची शंका आहे.
याचा अर्थ मराठी भाषा लवकर मरणार नाही. चांगलीच जिवंत राहील.
17 Nov 2010 - 10:41 am | गवि
याचा अर्थ मराठी भाषा लवकर मरणार नाही. चांगलीच जिवंत राहील.
टिप्पणी आवडली..
17 Nov 2010 - 1:16 am | मेघवेडा
जबरदस्त!
__/\__
17 Nov 2010 - 2:23 am | सुनील
पैगंबरवासी
ख्रिस्तवासी
बुद्धवासी
हे वरील शब्द हिंदूंमध्ये प्रचलीत असलेल्या कैलासवासी / वैकुंठवासी ह्या शब्दांना (अन्यधर्मियांसाठी) समानार्थी म्हणून घडवले गेले असले तरी, तसे निरर्थक वाटतात.
कारण, कैलास वा वैकुंठ ही स्थानांची नावे असून, हिंदू व्यक्ती मृत्यूनंतर तिथे वास्तव्यास जाते, असे मानले जाते. परंतु, पैगंबर, ख्रिस्त वा बुद्ध ही व्यक्तींची नावे असल्यामुळे, सदर धर्मातील व्यक्ती मृत्यूनंतर "तिथे" जाते, म्हणजे नेमके कुठे जाते ते कळ्त नाही!! शिवाय ह्या धर्मात पुनर्जन्म मानत नाहीत, हे वेगळेच!!
बाकी, ही सुचीची कल्पना छान!
17 Nov 2010 - 5:44 am | गांधीवादी
चावी संपणे. (म्हणजे चावीची घड्याळे, खेळणी असतात ना, तसे)
17 Nov 2010 - 10:24 am | विजुभाऊ
आणखी एक शब्द हल्लीच्या युगातला घ्या " त्याचा आयडी डिलीट झाला "
समानार्थी शब्द " त्याचा आयडी उडाला "
अवांतरः एखदयाचा गेम वाजला तर " आयडी उडवला " असे म्हणता येईल का ? ;)
17 Nov 2010 - 10:40 am | गवि
आय डी डीलीट झाला..
वा. एकदम कंटेंपररी शब्द काढलात..
17 Nov 2010 - 3:38 pm | llपुण्याचे पेशवेll
मी तर
"ऑफ होणे" , "डिलीट होणे" असे वाक्प्रचारही ऐकले आहेत बोली भाषेत.
राम बोलो होणे
17 Nov 2010 - 3:43 pm | पिंगू
बरेच शब्द झाले मरणासाठी.. आता कुणी जन्मासाठी तरी नविन शब्दांचा धागा काढा की...
- पिंगू
17 Nov 2010 - 4:13 pm | गवि
आयडिया सर जी.
म्हणजे
ट्यांहां करणे.
उद्भवणे
अवतार घेणे
संभव
वगैरे.
17 Nov 2010 - 4:30 pm | धमाल मुलगा
जन्माची चाहूल लागली असताना : जीवात जीव येणे.
डबलसीट असणे (वाक्यात उपयोगः येडायस का? तुझी बायको सध्या डबलसीट आहे ना? ट्रेकला कशाला नेतोस तीला?)
पुढचं व्हर्जन रिलीज होणे.
17 Nov 2010 - 8:19 pm | मराठे
प्रेम वाढीस लागणे!
17 Nov 2010 - 8:24 pm | प्रभो
>>प्रेम वाढीस लागणे!
=)) =)) =))
17 Nov 2010 - 9:07 pm | धमाल मुलगा
अग्गायायायायाया.......
18 Nov 2010 - 7:02 am | नगरीनिरंजन
>>प्रेम वाढीस लागणे
:-) भारी.
आमच्या नगरकडे गणपती बसणे असा ही वाक्प्रचार आहे.
17 Nov 2010 - 8:10 pm | मेघवेडा
उत्तरपूजा झाली..
विसर्जन झालं.
वड्यांचं पीठ मळायला घेतलं. (याचा कॉपीराईट आमच्या ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या वतीने मिपाकर श्री. प्रभो यांच्याकडे सुरक्षित आहे.) ;)
17 Nov 2010 - 8:33 pm | प्रभो
बल्ब फुटला / ट्युब विझली.
17 Nov 2010 - 8:40 pm | मेघवेडा
च्यायला.. हे मी "भिंत खचली, चूल विझली" च्या चालीत वाचलं! वास्तविक हेही वेगवेगळे वापरता येऊ शकतात!
17 Nov 2010 - 8:46 pm | सूड
>>वड्यांचं पीठ मळायला घेतलं.
आणखी एक.....होर जवळ करणं/ होरेत जाणं (संदर्भः तुंबाडचे खोत)
17 Nov 2010 - 10:13 pm | गवि
all of these सही...जबरदस्त...!!
Thanks..
23 Nov 2010 - 5:20 pm | बद्दु
१.राम नाम सत्य होणे
२. शेवटची घरघर लागणे
व इतर काही शब्द वाक्प्रचार म्हणुन सुद्धा वापरल्या जातात. क।ही सत्य सांगण्यासाठी तर काही सांकेतिक अर्थाने..
असो.
17 Feb 2011 - 1:39 pm | वपाडाव
आमच्याकडे (मित्रमंडळ) ह्यालाच टेलिकास्ट होणे असेही म्हणतात.
आणी माझे काका याला सुखी होणे म्हणतात.
17 Feb 2011 - 2:15 pm | हरिप्रिया_
पुण्यात : ओंकारेश्वरावर जाणे.. तस साताऱ्यात माहुलीला जाणे म्हणतात.
(अशी अनेक गावात वेगवेगळी नाव असतील...)
खरच खूप मोठी यादी झाली...
17 Feb 2011 - 2:22 pm | टारझन
" लग्न करणे " ते दिसत नाही कुठे ?
17 Feb 2011 - 2:44 pm | वपाडाव
माणगये भौ !!!!
17 Feb 2011 - 2:49 pm | स्पा
" लग्न करणे " ते दिसत नाही कुठे ?
तुम्हाला " लग्ण करणे " ते दिसत णाही कुठे ?" असं म्हणायचं आहे का? ;)
17 Mar 2016 - 7:08 pm | गामा पैलवान
पालखी निघणे.
हे रत्न पुलंच्या अंतू बर्वा मधलं बरंका.
-गा.पै.
17 Mar 2016 - 7:20 pm | आदूबाळ
खपटी होणे
फोटोत जाणे
ढगात जाणे
ऑफ होणे (का कोण जाणे, हा शब्दप्रयोग फक्त मुंबईत ऐकला आहे.)
चचणे
17 Mar 2016 - 8:02 pm | नूतन सावंत
मराठीच्या समृद्धीचा अजून काय पुरावा हवा.एका क्रियेला इतके समानार्थी शब्द माझेही दोन पैसे.
निधन झाले.सरणावर जाणे.गोवर्या मसणात जाणे.लाकडे स्मशानात जाणे.
17 Mar 2016 - 8:28 pm | कपिलमुनी
अजुन एक शब्द
17 Mar 2016 - 8:47 pm | प्रसाद गोडबोले
विकेट पडणे
सत्कार करणे ( खुन करणे ह्या अर्थाने )
मढं बसवणं
ब्रह्मलीन होणे
11 Aug 2023 - 7:22 am | चौकस२१२
सत्कार करणे ( खुन करणे ह्या अर्थाने )
सरकारनामा ( दिलीप प्रभावळकर + यशवंत दत्त ) यात याचाच मस्त वापर केला आहे लेखकाने
17 Mar 2016 - 8:51 pm | DEADPOOL
आमच्यात 'गमला' असेही म्हणतात.
17 Mar 2016 - 10:34 pm | अभ्या..
मम आत्मा गमला हा.
17 Mar 2016 - 10:30 pm | बोका-ए-आझम
बादलीला लाथ मारणे
यमाबरोबर सेल्फी काढणे
आॅफ एअर होणे
व्हाऊचर संपणे
17 Mar 2016 - 10:39 pm | अभ्या..
जंगमाचा पाय लागला.
मीठात बसवला
(दोन्ही विरशैव जातीतल्या अंत्यसंस्काराच्या प्रथा आहेत)
8 Aug 2023 - 5:59 pm | राजेंद्र मेहेंदळे
वाखुसा. डिक्शनरीच सापडली की हो!!
9 Aug 2023 - 9:56 pm | Bhakti
हे वाचून मी हसून हसून वारले :)...मग आठवले की "तुम्ही दिलेले सत्तर रूपये वारले"हाय काय काय लिहिलंय ;) :)
10 Aug 2023 - 6:50 am | कर्नलतपस्वी
लहानपणी कोणी ब्रह्मलिन झाले की देवगड ला गेले म्हणायचे.
10 Aug 2023 - 9:17 am | सर टोबी
म्हणजे हाता पायातली शक्ती जाणे. इंग्रजीत ज्याला feeling divastated म्हणतात ते.
10 Aug 2023 - 11:37 am | Trump
प्राणज्योत मालवणे असा अजुन एक शब्द प्रयोग.
---
देवआज्ञा झाली
देवाने बोलावले
देवाघरी बोलावले
चितेवर पोचला
असेही काही शब्दप्रयोग आहेत.
हाय खाणे = आत्महत्या करणे.
10 Aug 2023 - 12:50 pm | विजुभाऊ
हाय खाणे म्हणजे धास्ती घेणे दहशत घेणे
तो वाक्प्रचार हाय खाऊन मेला असा आहे.
म्हणजे घाबरून मेला.
हाय खाणे म्हणजे मरणे मव्हे