कोलाज.... पुन:प्रयत्न..

चिगो's picture
चिगो in कलादालन
31 Oct 2010 - 11:11 pm

हातात कॅमेरा घेतल्यावर काही ना काही टिपल्या जातंच.. त्यातल्या त्यात डिजीटल कॅमेरा, म्हणजे तर "क्लिकक्लिकाट"च..

एवढ्यात भरपूर भटकंती झाली. त्यावेळी टिपलेली ही काही दृष्ये...

हे मसुरीत उमललेले फुल...

ट्रेकींगला गेलो असतांना समोर हे दिसलं, आणि भरुन पावलो...

हा चीनचा भाग (तिबेट), अरुणाचलमधील सैन्याच्या पोस्टमधून दिसलेला...

अंदमानच्या जंगलातील प्रकाशाचा खेळ...

स्वतःचे नाव सार्थक करणारे मेघालय...

निसर्गाचे "अ‍ॅब्स्ट्रॅक्ट" चित्र...

ही छायाचित्रे आवडली तर आणखी काही डकवावी म्हणतो... मिपाकरांनो, प्रयत्न गोड मानून घ्यावा, ही विनंती !!

छायाचित्रण

प्रतिक्रिया

चिगो's picture

31 Oct 2010 - 11:13 pm | चिगो

जमलं एकदाचं... ह्हूश्श...

पैसा's picture

31 Oct 2010 - 11:20 pm | पैसा

आणखीही द्या..

शिल्पा ब's picture

1 Nov 2010 - 12:10 am | शिल्पा ब

छान आहेत.

स्वानन्द's picture

1 Nov 2010 - 8:12 am | स्वानन्द

आणखी येऊ द्या.

तुम्ही इतक्या ठिकाणी फिरला आहात तर, मग एकेका परीसरावर एकेक धागा टाका. म्हणजे एकसंधता येईल आणि शिवाय त्याबरोबर तिथले अनुभव पण कधन केलेत तर आणखी बहार येईल :)

स्वानन्द's picture

1 Nov 2010 - 8:13 am | स्वानन्द

अरे हो ... एक विचारायचं राहिलंच... यात कोलाज कुठे आहे?

परिकथेतील राजकुमार's picture

1 Nov 2010 - 12:17 pm | परिकथेतील राजकुमार

एक विचारायचं राहिलंच... यात कोलाज कुठे आहे?

हेच अगदी मनात आले.

बाकी फोटु मस्तच ! त्यातल्या त्यात रेनबो वाला फोटु आवडला.
(वाह एक इंग्रजी शब्द आला बॉ प्रतिक्रीयेत)

चिगो's picture

1 Nov 2010 - 1:31 pm | चिगो

वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो एकत्र करुन टाकलेत म्हणून "कोलाज" असं नाव दिलंय.. चुभुद्याघ्या..

मधु बन's picture

1 Nov 2010 - 12:02 pm | मधु बन

खुपच छान फोटो आहेत !!!!!!!

भारी! दुसरा, तिसरा आणि मेघालय हे ३ फोटो खूप भारी आहेत!

धमाल मुलगा's picture

1 Nov 2010 - 3:36 pm | धमाल मुलगा

दादानू, लै दिवसांनी बोर्डावर तुपलं नाव दिसलं बा. :)
आता फोटूसोबत काही झकाऽऽस लेखही टाका देवा.

अवांतरः 'मेघालय' एकदम अप्रतिम! आणि तिबेट, डोंगरातलं इंद्रधनु....सुंदरच!!!