तिचं स्वप्न

रन्गराव's picture
रन्गराव in जनातलं, मनातलं
23 Oct 2010 - 10:43 am

सुझान बॉईल ह्या गायिकेचा हा मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षांसमोर गाण्याचा हा पहिलाच प्रसंग. रीयॅलटी शोमध्ये जिथं ग्लॅमर हा सर्वात मोठा भाग असतो तिथ ही खेडवळ दिसणारी स्त्री ऑडिशनसाठी आली तेंव्हा तिच हसू झाला. पण ज्याक्षणी तीने गायला सुरुवात केली तेंव्हा तो कुस्चितपणा कौतुकात बदलल. आपल्या स्वप्नांना कधी ही सोडू नये अशी प्रेरणा देनारी ही विडिओ क्लिप ( चित्र फीत अस लिहिनार होतो पण परा भाऊ.ची ईग्रचीशी नाळ तुटू नये म्हणून ही खट्पट्! ;) )

कलाशिफारस

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

23 Oct 2010 - 10:49 am | पिवळा डांबिस

आहो पण किलीप कुठाय?

रन्गराव's picture

23 Oct 2010 - 10:51 am | रन्गराव

लिंक येन्यास उशीर लागतो. म्हनून पहिल्या प्रतिक्रियेत टाकली आहे.

पिवळा डांबिस's picture

23 Oct 2010 - 11:03 am | पिवळा डांबिस

पाहिली, पाहिली!!!
मस्त, मस्त, फॅन्टॅस्टिक!!!
जबाब नही, सूपर्ब!!!!

थोडं अवांतर होईल कदाचित पण एक आठवण सांगतो.....
आम्ही इथे युनिव्हर्सिटीत शिकत असतांना एक गायनाचा जलसा झाला होता, त्याला गेलो होतो...
तिथे एक तैवानी गायक पुढे आला...
तो ऑपरा गाणार म्हणुन अनाउन्स केलं गेलं...
आता हा फाटक्या अंगाचा चिनी काय ऑपरा गाणार म्हणून सगळं सभाग्रूह माफक हसलं....
पण त्याने स्वर लावला मात्र....
त्याचा वादळासारखा तो खर्ज...
अजूनही आठवला की अंगावर काटा उभा राहतो माझ्या...
या सुझनच्या गाण्याने तीच आठवण करून दिली...

चित्रफितीबद्दल अनेक धन्यवाद!!!!

परिकथेतील राजकुमार's picture

23 Oct 2010 - 12:50 pm | परिकथेतील राजकुमार

क्लिप बघुन अंगावर काटाच उभा राहिला. डोळ्यातुन फक्त पाणी यायचे बाकी होते.

धन्यवाद रन्गराव.

स्पंदना's picture

25 Oct 2010 - 10:49 am | स्पंदना

अगदी हेच म्हणायच आहे.

बाकी सार्‍यांपेक्षा मला सायमन च्या डोळ्यातली चमक आवडली. आय लव्ह हीम.

प्राजु's picture

23 Oct 2010 - 7:10 pm | प्राजु

सुपर्ब!!! जस्ट सुपर्ब!!

सेरेपी's picture

23 Oct 2010 - 7:45 pm | सेरेपी

ही लहान मुलगी देखील पहा :-)

http://www.youtube.com/watch?v=xPITHzdUUDk

रन्गराव's picture

23 Oct 2010 - 10:22 pm | रन्गराव

गोड आहे :)

शिल्पा ब's picture

23 Oct 2010 - 10:56 pm | शिल्पा ब

छान...ती काय गाते ते काहीच समजले नाही पण आवाज छानच.

सदाची पहुणी's picture

24 Oct 2010 - 7:09 am | सदाची पहुणी

गाण कळल नाहि पण आवाज मात्र फर आवडला

इन्द्र्राज पवार's picture

24 Oct 2010 - 12:15 pm | इन्द्र्राज पवार

रन्गराव.....तुम्हाला माझ्याकडून एक फुल्ल मग नेसकॉफी !!!

superb, fantastic, incredible, amazing.....!!!!!!!| सर्व विशेषणे फिकी पाडली सुझानबाईंनी. "दिसते तसे नसे...." याचा अर्थ कुणीतरी सोदाहरण द्या असे सांगितले तर त्याला ही चित्रफित दाखवावी.

तेथील परीक्षक आणि ऑडियन्स तर मॅड झालाच....पण मी पागल झाल्यावर घरातील लोकांना एकत्र बोलावून हे सुझानचा परफॉर्मन्स दाखविल्यानंतर अभावितपणे सर्वांनी, जणू काय त्या थिएटरमध्येच असल्यासारखे, जोरदार टाळ्या वाजविल्या.

खूप खूप धन्यवाद हा आनंद दिल्याबद्दल !

इन्द्रा

पवार साहेब, तुमच्या शिफारसी खातीर एक मस्त कॉफी मारून आलो :)

हंस's picture

25 Oct 2010 - 4:42 am | हंस

अगदी असाच हा व्हिडीओ पहा- http://www.youtube.com/watch?v=nyxt-aFUhkY आणि http://www.youtube.com/watch?v=JAwOZvvGsRs&NR=1&feature=fvwp