खरडवहीच्या बैलाला....

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in काथ्याकूट
18 Oct 2010 - 5:19 pm
गाभा: 

मला बर्‍याच मिपासदस्यांना सकाळपासून खरड करायचा अथवा व्यनी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सतत Fatal error: Call to undefined function drupal_mail() in /home/misavcom/public_html/sites/all/modules/guestbook/guestbook.module on line 494 नावाचा मेसेज लिहुन येत आहे.

अजुन कोणाकोणाला हा त्रास सहन करावा लागत आहे का ?

प्रतिक्रिया

इन्द्र्राज पवार's picture

18 Oct 2010 - 5:26 pm | इन्द्र्राज पवार

इल्ला !!! मला तर सकाळपासून व्य.नि. + खरडी मिळाल्या आहेत; आणि मी त्यांना प्रतिसादही दिले आहेत. [त्यात डॉनरावांच्याही खरडी आहेत ~ अर्थात धमकीच्या...!!!!]. याचाच अर्थ असा की, आमच्या 'शांग्रीला' त सारं काही आलबेल आहे.... तुमच्या Twilight च्या बेलाच्या गणितात गडबड झालेली दिसत्ये.

इन्द्रा

परिकथेतील राजकुमार's picture

19 Oct 2010 - 11:12 am | परिकथेतील राजकुमार

आमची खव सुविधा बंद असल्याचा आणि आम्ही हा धागा काढल्यावर अंमळ बिज्जी झाल्याचा फायदा घेउन मिपावरील काही कंपुबाज प्रस्थापितांनी आमच्या नावानी इथे जो शिमगा घातला आहे त्याचे उत्तर त्यांना जनतेला द्यावेच लागेल ह्याची त्यांनी जाण ठेवावी.

दुर्लक्षीत पॅंथरच्याच सदस्यांना फक्त ह्या समस्येला सामोरे जावे लागले असल्याने हे सर्व तांत्रिक प्रॉब्लेम मुद्दाम घडवुन आणल्याचे स्पष्ट दिसतच आहे. ह्यासर्वाचा निषेध म्हणून आम्ही आज संध्याकाळी ६ वाजता ह्याच धाग्यावर श्री. डॉन्राव तसेच त्यांच्या राको अदितीबै तसेच आमच्या दूरध्वनीची दखल न घेणारे श्री. निदे ह्यांच्या पुतळ्याचे दहन करणार आहोत. तरी सर्व दुर्लक्षित बांधवानी लाखोंच्या संख्येने उपस्थीत राहून प्रस्थापिंताविरुद्धचा आपला आवाज दाखवुन द्यावा.

शनवार वाड्यावर मोर्चा का रे पर्‍या?

इदेशी असेल तर सांग, आपुन बी येवु की राव.

छोटा डॉन's picture

19 Oct 2010 - 11:20 am | छोटा डॉन

>>तरी सर्व दुर्लक्षित बांधवानी लाखोंच्या संख्येने उपस्थीत राहून प्रस्थापिंताविरुद्धचा आपला आवाज दाखवुन द्यावा.
बरं बरं, दखवा दाखवा ...
मात्र तो आवाज ५० डेसिबल्सपर्यंतच ठेवा अशी ताकिद देण्यात येत आहे ( थत्तेचाचा तो आवाज मोजतील, त्यांना अनुभव आहे, त्यांच्या शिफारसीनुसार पुढील कारवाई होईल ).

आणि हो, ते "आणीबाणी" चे विसरु नका बरं का ;)

- छोटा डॉन

गांधीवादी's picture

19 Oct 2010 - 11:25 am | गांधीवादी

>>मात्र तो आवाज ५० डेसिबल्सपर्यंतच ठेवा अशी ताकिद देण्यात येत आहे
जंगलातला वाघ/सिंह कधी डेसिबलचा विचार करून डरकाळी मारताना पाहिलाय का ?

परिकथेतील राजकुमार's picture

19 Oct 2010 - 11:26 am | परिकथेतील राजकुमार

च्यायला त्या थत्ते चाचांचा पार मिपावरचा ए.के. हंगल करुन टाकलाय तुम्ही लोकांनी !

आमचा आवाज ५० डेसीबलमध्ये मावायचा नाही हे तुम्ही लक्षात घ्यालच ! आणि आणिबाणी आणणार्‍यांचे पुढे काय झाले हा इतिहास तुम्हास ज्ञात असेलच. जनतेने त्यांना गप्प घरी बसवले.

@निळ्या
विदेशी परवडत नाही ! प्यासामधुन एक चपटी देण्याची व्यवस्था करण्यात येईल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Oct 2010 - 11:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि आणिबाणी आणणार्‍यांचे पुढे काय झाले हा इतिहास तुम्हास ज्ञात असेलच. जनतेने त्यांना गप्प घरी बसवले.

आणिबाणी लादली कोणी हा इतिहास तुम्ही मुद्दामच दुर्लक्षित करता आहात प.रा. राजवाडे! त्यांना घरी कोणी आणि का बसवलं हा इतिहासही शिळा नाही!

बाकी डान्राव आमचे नेते आहेत आणि नवीन सरकारनेच त्यांना मंत्री केले आहे. डान्राव आगे बढो, हम तुम्हारे साथ है।

परिकथेतील राजकुमार's picture

19 Oct 2010 - 11:42 am | परिकथेतील राजकुमार

आणिबाणी लादली कोणी हा इतिहास तुम्ही मुद्दामच दुर्लक्षित करता आहात प.रा. राजवाडे! त्यांना घरी कोणी आणि का बसवलं हा इतिहासही शिळा नाही!

लादणारे शेवटी तुमच्या सारखे प्रस्थापितच होते हे विसरुन कसे चालेल अवखळकरतै ?

बाकी डान्राव आमचे नेते आहेत आणि नवीन सरकारनेच त्यांना मंत्री केले आहे. डान्राव आगे बढो, हम तुम्हारे साथ है।

अहो नेते कराल पण नेत्याची बुद्धीमत्ता कुठुन आणाल ? आगे बढो आणि खड्डे पे पडो.

ब्रिटिश टिंग्या's picture

19 Oct 2010 - 11:46 am | ब्रिटिश टिंग्या

>>अहो नेते कराल पण नेत्याची बुद्धीमत्ता कुठुन आणाल

हॅ हॅ हॅ......नेतेपणासाठी लागणारी 'तैल'बुद्धी त्यांच्याकडे आहे हे विसरलात वाटते! :)

परिकथेतील राजकुमार's picture

19 Oct 2010 - 11:52 am | परिकथेतील राजकुमार

हॅ हॅ हॅ......नेतेपणासाठी लागणारी 'तैल'बुद्धी त्यांच्याकडे आहे हे विसरलात वाटते!

त्यांच्या डोईवरील तेल त्यांच्या मेंदूपर्यंत झिरपते ह्यावर आमचा विश्वास नाही !

ब्रिटिश टिंग्या's picture

19 Oct 2010 - 11:54 am | ब्रिटिश टिंग्या

>>त्यांच्या डोईवरील तेल त्यांच्या मेंदूपर्यंत झिरपते ह्यावर आमचा विश्वास नाही !

अन् त्यांना मेंदुवडा आहे ह्यावर आमचा विश्वास नाही ! :)

नितिन थत्ते's picture

19 Oct 2010 - 11:52 am | नितिन थत्ते

कोणत्याही सभेला कधीही बंदी/नियंत्रण घालू नये असे मत असल्याने, मोजलेल्या डेसिबलचा अहवाल + शिफारस योग्य त्याप्रकारेच देण्यात येईल.

अनेक दुर्लक्षित पुढे प्रस्थापित होऊन आणीबाणीची भाषा बोलतात हे "उदाहरणां"नी सिद्ध झालेच आहे.

असो. ज्यांना आवाजाचा त्रास होईल त्यांनी दहिसरला जावे.

इन्द्र्राज पवार's picture

19 Oct 2010 - 11:52 am | इन्द्र्राज पवार

".....तरी सर्व दुर्लक्षित बांधवानी लाखोंच्या संख्येने ...."

~~ असला आचार्य अत्रीय आकडा आणण्याची अवदसा अचानकच अवतरली आहे.

मुळात 'दहन' कार्यक्रम आटोपल्यानंतर उपस्थित असणार्‍या सो-कॉल्ड दुर्लक्षित बांधवांच्या अमृततुल्य टपरीवरील बिल होईल खच्चून पंधरा-वीस रूपये...! त्यामुळे 'लाखो' आकड्याचे प्रयोजन प.रां. नी कशासाठी योजिल्ये?

तरीदेखील वरील आवाहनातील 'अदितीबै' यांच्या पुतळ्याचे दहन ही बाब मनाला भावली. तिचे याच काय पण अन्य कुठल्याही कारणास्तव तसे होण्यास्/करण्यास माझा हार्दिक पाठिंबा आहे.

इन्द्रा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Oct 2010 - 11:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुतळा दहनामुळे आमच्या केसालाही धक्का लागणार नाही ही बाब श्री. चन्द्रराज गवार यांच्या निदर्शनास आणू इच्छिते. बाकी चालूदेत तुमचे पालथे धंदे, जळजळकुमार!

परिकथेतील राजकुमार's picture

19 Oct 2010 - 12:01 pm | परिकथेतील राजकुमार

आमच्या भव्य निषेध मोर्च्याच्या नुसत्या कल्पनेनेच प्रस्थापितांची पळापळ झाल्याचे स्पष्ट जाणवत आहे.

@ इंद्रदा
ट्रक / गाड्या भरुन माणसे येतील बघा !

गाड्यांचे दोन कोटी रुपये जमा झाले का ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Oct 2010 - 12:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जमा झाले आणि त्यातले ७०% पराकुमारांनी ३% व्याजावर लावून दोन टक्के गाड्या आधीच कमी केल्या आहेत.

छोटा डॉन's picture

19 Oct 2010 - 12:16 pm | छोटा डॉन

आम्हाला ह्या "लाखोंच्या" सभेचे खरोखर टेन्शन होते.
त्यात थत्तेचाचा ऐनवेळी व्यासपिठावर जाऊन बसले.

>>गाड्यांचे दोन कोटी रुपये जमा झाले का ?
मात्र आता नान्या आला आणि आमचे टेन्शन संपले, आता नुस्ती कागदोपत्री "लाखांची" गर्दी जमणार.
प्रत्येक्षात "१ माणुस १० जणांच्या नावे सह्या ठोकुन पैसे ढिले करणार" ह्याबाबत आमच्या मनात अजिबात किन्तु नाही.
नान्याला तशी सवयच आहे ;)
आता शेकडा जमला तरी पुष्कळ, व्यासपिठावरच्या नेत्यापेक्षा खालची जन्ता जास्त असावी हीच सदिच्छा !!! :)

- ( अनुभवी ) छोटा डॉन

मा. संस्थापक परा,

पुढील घोषणा कशा मोर्चासाठी वाटतात? :)

(१) प्रस्थापित मुर्दाबाद
दुर्लक्षित झिंदाबाद

(२) १-२-३-४
दुर्लक्षितांचा जयजयकार
५-६-७-८
दुर्लक्षितांशी आहे गाठ

(३)कंपूबाजी कंपूबाजी
गुंद, उद्दंड भारी पाजी

कुठल्याही द्वेषयुक्त क्रियेला आमचा भरघोस पाठिंबा बाय डिफॉल्ट असल्याने आम्ही +१ म्हणत आहोत.

परिकथेतील राजकुमार's picture

19 Oct 2010 - 12:07 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त रे निळ्या !

@नाना

हो ! आता झेंड्यांचे काय करायचे ?

अवलिया's picture

19 Oct 2010 - 12:10 pm | अवलिया

आपला भगवाच बरा...

अवलिया's picture

19 Oct 2010 - 12:10 pm | अवलिया

आपला भगवाच बरा...

परिकथेतील राजकुमार's picture

19 Oct 2010 - 12:12 pm | परिकथेतील राजकुमार

=)) =))

अबे रंगाचे नाही पैशाचे काय करायचे असे विचारत होतो. कुठुन आणायचे ? अनिवासी दुर्लक्षितांकडून मदत मागवावी काय?

पैशावर नाव नसते. जिथुन मिळतील तिथुन घ्यावे.

Nile's picture

19 Oct 2010 - 12:14 pm | Nile

पण रंग असतो ना राव! ;)

>> अनिवासी दुर्लक्षितांकडून मदत मागवावी काय? >>
म्हणजे? पैसे वगैरे भरावे लागतील क्का???? नको त्यापेक्षा संस्थेमधून बाहेर पडतो आम्ही . आता कुंपणच शेत खातय म्हटल्यावर .... आम्ही दीन दुर्लक्षितांनी कुठे बघायचं? :(

वावावा अजुन होळी पेटतीच आहे का येतो थोड्या वेळात उलटा तळहात तोंडावर ठेवुन बोंबा मारायला.
आग विझु देउ नकारे तो वर.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Oct 2010 - 1:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या लवकर हो 'कुकरी'कथेतील आयटीकुमार!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Oct 2010 - 5:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अधूनमधून मलाही अशा एरर्स यायच्या तेव्हाचं माझं निरिक्षण की प्रोफाईल एडीट केली तर असा मेसेज यायचा! खवच्या उघड्या असलेल्या टॅब्ज एकदा काहीही खरडी न लिहीता रेफ्रेश करून खरडी टाकल्यावर एरर्स येत नाहीत.

इन्द्र्राज पवार's picture

18 Oct 2010 - 5:31 pm | इन्द्र्राज पवार

~~ एकवेळ अरुण कोलटकराची "भिजकी वही" समजेल...पण ही बाई काय लिहित्ये काहीही समजत नाही...! प.रा. यांना वाटेल, 'च्यामारी ते इरर मेसेजेस परवडले, पण हा ठाणेकरी खुलासा नको...."

इन्द्रा

असुर's picture

18 Oct 2010 - 5:37 pm | असुर

ती हसून लोळणारी स्मायली कुठे गेली राव! आत्ता सगळ्यात जास्त उपयोग झाला असता ना! ;-)

--असुर

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Oct 2010 - 5:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

भलत्या वयात भलतं काही बघितलं नाही की असंच होतं इन्द्रा! या वयात भिजक्या वह्या पाह्यच्या का आणखी काही? तुमच्या भटिंड्यात पाऊस पडतो का नाही??

इन्द्र्राज पवार's picture

18 Oct 2010 - 5:53 pm | इन्द्र्राज पवार

".....या वयात भिजक्या वह्या पाह्यच्या का आणखी काही?..."

ये भी कुछ नही समझ्या !!

".....तुमच्या भटिंड्यात पाऊस पडतो का नाही??...."

उंहूं .... भटिंड्यात नाही...इकडे कोल्हापुरात आहे....वकिलाच्या 'त्या' प्रकरणाबाबतच्या नोटीशी आल्यात ढीगभर....आणि तसाच ढीगभर पाऊसदेखील कोसळत आहे कोल्हापुरात...पुण्याप्रमाणेच... डोक्यातदेखील गिज्ज झाल्ये ढीगभर....'भिजकी वही' च जणू सेकंड एडिशन !

इन्द्रा

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Oct 2010 - 5:58 pm | बिपिन कार्यकर्ते

".....या वयात भिजक्या वह्या पाह्यच्या का आणखी काही?..."

केसरी जीवन घेत चला. अगदीच काही नही तर ३०+ तरी. असो.

इन्द्र्राज पवार's picture

18 Oct 2010 - 7:09 pm | इन्द्र्राज पवार

"....केसरी जीवन घेत चला...."

~~ आता हे काय असतं? मला शनिवारवाडा परिसरातील गायकवाड वाड्यात असणारा 'केसरी' माहित आहे, पण 'केसरी-जीवन' हा कुठला द्वंद्व समास आहे आणि तो कुठे मिळतो वा त्याचा काय उपयोग करतात याचा अभ्यास नाही. त्यामुळे भिजकी वहीच्या संदर्भात ती मात्रा चालणार नाही असे वाटते.

"...अगदीच काही नही तर ३०+ तरी..."

~ हं, याची जाहिरात थोर बोलिवूडचे अभिनयसम्राट तुषार कपूर आणि त्याहुनी थोर्रर्र थोर्रर्र 'क' निर्माती एकताताई यांचे पिताजी करीत होते असे अंधुकसे आठवते.

इन्द्रा

हं, याची जाहिरात थोर बोलिवूडचे अभिनयसम्राट तुषार कपूर आणि त्याहुनी थोर्रर्र थोर्रर्र 'क' निर्माती एकताताई यांचे पिताजी करीत होते असे अंधुकसे आठवते.

ओ पवार, तुमची हार्डडिस्क कीती टीबीची आहे हो? का भरपुर एक्स्टर्नल एच डी पण मिळाल्यात तुम्हाला?

इन्द्र्राज पवार's picture

18 Oct 2010 - 11:44 pm | इन्द्र्राज पवार

अहो, तसं काही नाही ओ नाईल जी ! आम्ही आपलं त्या मोकाट सुटलेल्या बकरीसारखं दिसल त्या शेतातील, प्लॉटमधील चारा खात हिंडत असतो आणि तेच मग डोक्यात आपसुक बसतं, पुढे केव्हा केव्हा रंवथ करताना काही मेंदूच्या कप्पात आत जावून बसलेल्या गोष्टी आठवत राहातात, इतकंच !

आणि अजून इथं एकट्याच्या राहाण्याचा पत्ता नाही, अन् मग एक्स्टर्नल एच.डी. कुठून आणू ?

इन्द्रा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Oct 2010 - 6:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ये भी कुछ नही समझ्या !!

बाळा, या वयात मिपासारख्या सायटींवर वेळ घालवण्यापेक्षा काही बर्‍या पॉपकॉर्नी साईट्स पहात चल एवढंच बोलू इच्छिते!

पुष्करिणी's picture

18 Oct 2010 - 10:42 pm | पुष्करिणी

'ती' भानगड कोर्टकचेरीत गेली आणि भटिंडावाल्यांनी नोटीसा पण पाठवल्या ?.... नक्की काय केलस तू तिकडे?

पैसा's picture

18 Oct 2010 - 10:48 pm | पैसा

तो भटिंडात नाही. कोल्हापुरात आहे. एवढं उत्तर पुरेसं आहे ना! जानम समझा करो!

इन्द्र्राज पवार's picture

18 Oct 2010 - 10:58 pm | इन्द्र्राज पवार

काय नशीब !!! या तिघी खरं म्हणजे म्हणजे रॅमसे बंधूंच्या बहिणीच आहेत...एकापेक्षा एक टेरर...हॉरर !! तुम्ही तिघींनी आपापले पाय पुढे करा म्हणजे मी डोके ठेवतो त्यावर ! अगं बायांनो अजून मी लग्न करेना म्हणून इकडे आई आदळाआपट करीत आहे आणि दुसर्‍या बाजूला वकील 'त्या' घरबांधणीमुळे रक्त पीत आहेत....इथे भटिंडा आणि तिथली भानगड कुठून आली ????

इथे चिरमुरे फुटाणे खायाला खिशात पाच रुपये नाहीत....आणि भांगरा कुठला करतोय !!

इन्द्रा

रेवती's picture

18 Oct 2010 - 11:03 pm | रेवती

अर्रर्र! इंद्रावर पाशवी शक्तींनी हल्ला चढवला म्हणा कि!;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Oct 2010 - 11:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हो, आणि तू पण एक त्या पाशवी शक्तींना साथ द्यायला!!

"वैयक्तिक गप्पांसाठी दमड्या खर्चुन खरडवहीची सोय केलेली आहे" असं म्हणण्याची सोय सुद्धा उरली नाही सद्ध्या!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Oct 2010 - 11:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा हा हा हा ... कसा फसलास पाशवी शक्तींमुळे! ;-)

पुष्करिणी's picture

18 Oct 2010 - 11:51 pm | पुष्करिणी

आमच्या वैयक्तिक गप्पांत तुम्हांला का हो इतका इंटरेष्ट निळोबा

आणि वैयक्तिक काय , पवारसाहेबांच्या समोर इतका जटिल प्रश्न आहे तो सोडवतोय

पैसा's picture

18 Oct 2010 - 11:22 pm | पैसा

अदितीच्या नावात "पाय" आहेच की! ती एकटीच पुरे!

अनामिक's picture

18 Oct 2010 - 11:44 pm | अनामिक

पण ती रामसे बंधूंची भगिनी असल्याने तिचे पाय उलटे (म्हणजे ७/२२ नाही!) असण्याची शक्यता आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Oct 2010 - 9:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अनामिकचं खातं बंद करावं का नाही असा नवीन कौल लवकरच येईल.

पुष्करिणी's picture

18 Oct 2010 - 11:40 pm | पुष्करिणी

अरे वा,एकदम मुहूर्तावर घर बांधायला काढलस की भटिंडात ..अभिनंदन हं!
(होणार्‍या) सासर्‍यांना न सांगता असं काही केलं तर कोर्टाच्या नोटीसा येणारच ना..

पण आईलातरी सांगायला हवं होतं हं!

आणि चार - दोन रूपये कशाला हवेत..आख्खी बँक आहेकी खिशात आता

स्पंदना's picture

19 Oct 2010 - 9:01 am | स्पंदना

>>>>>अगं बायांनो अजून मी लग्न करेना म्हणून इकडे आई आदळाआपट करीत आहे >>>>>

माझ्या ना...मामेभावाच्या बायकोच्या/////मावस बहिणीची/////मुलगी..........

इन्द्र्राज पवार's picture

19 Oct 2010 - 10:36 am | इन्द्र्राज पवार

"....माझ्या ना...मामेभावाच्या बायकोच्या/////मावस बहिणीची/////मुलगी.........!!"

अगं अपर्णा.... आपल्या कोल्हापुरातील मुली या इथल्या तिघींना नको आहेत माझ्यासाठी ! फार दुष्ट आहेत.... मी असाच कायम जसलमेरच्या वाळवंटात राहुटी बांधून सरडे अन् साळींद्र पकडत बसावे असे या तिघींना वाटते.

इन्द्रा

इंद्राचा आयडी हॅक झाला बहुतेक. फक्त तीन ओळीत प्रतिसाद संपला?

--असुर

हॅ हॅ हॅ
इथे झाड धरण्यात कोण पटाईत आहे ते तुला सांगाव लागेल का रे असुरा ;)

विजुभाऊ's picture

19 Oct 2010 - 5:02 pm | विजुभाऊ

आपण झाड आहोत की माकड हे इन्द्राला ठरवावे लागेल बॉ

माझ्या मते इंद्रा झाड आहेत आणि त्यांला उलट्या 'पाया'च्या भुतान धरलय ;)

इन्द्र्राज पवार's picture

19 Oct 2010 - 5:31 pm | इन्द्र्राज पवार

सर्वश्री असुर, विजुभाऊ, गणपा....असे नाही ओ मंडळी....,

तशा त्या तिघी चांगल्याच आहेत....मायाळु आहेत....काळजी घेतात माझी....[म्हणजे त्यांना वाटत असते कायम....आहे एकटाच, करू दे बिचारा लग्न, मग कळेल पुस्तक आणि पासबुक यात महत्वाचे काय असते ते.... आणि लागू दे भाकर्‍या थापायला, बाजार करायला....यासाठी], त्यामुळे जरी तशा त्या रोहिणी-नीला खाणार्‍या, रक्तपिपासू असल्या तरी त्यांची नावे माझ्या रेशन कार्डावरून काढून टाकावित असे कधी मला वाटणार नाही.

राहता राहिला....सुलट्या की उलट्या पायांचा प्रश्न.....तर ते लग्नाच्या वेळी पाहून घेतो...त्यावेळी भावाने थोरल्या बहिणींचे पाय धुवायचे असतात, असा काही प्रकार असतो असे म्हणतात ना?

[आहेर, मानपान वगैरे त्यांना काही नको आहे असे त्यांनी यापूर्वीच कळविले आहे....बघा, किती मोठ्या मनाच्या आहेत...]

असुरबाबा,.....ओळी तीनपेक्षा झाल्या आहेत.

इन्द्रा

परिकथेतील राजकुमार's picture

19 Oct 2010 - 5:35 pm | परिकथेतील राजकुमार

दवणीय* प्रतिसाद.

(शब्दाचे क्रेडिट :- नंदनश्री)

आहेर, मानपान वगैरे त्यांना काही नको

मी चुकुन मानापमान वाचलं, म्हणणार होतो, हो हो अपमानाची जबाबदारी त्या तिघीच घेतील. ;-)

(पळा च्यामारी)

पैसा's picture

19 Oct 2010 - 6:42 pm | पैसा

याचा असा गैरफायदा घेता काय?

गैरफायदा घेणार्‍यांचा जाहीर णीसेद! णीसेदसभा दि. २० रोजी पणजी/पुणे/ठाणे/बेसिंगस्टोक या ठिकाणी होईल. :-)

मा. इन्द्रादा ('चंद्ररावजीपंतसाहेब' हे आलंच), मी सर्वश्री असुर की असुरबाबा हे ठरवा की आधी! एकाच प्रतिसादात नानाविध अवतार घेण्याइतकी ताकद अजून नाहीये माझ्यात. तुमचा प्रतिसाद सुरु होताच संपला म्हणून एक शंका वाटून गेली इतकंच. आपल्याकडे लोक कशावरुन दंगा घालतील काय नेम नाही! :-)

आणि कोण तो ज्याने तुमच्यावर हे आरोप केले, त्याला पाशवी शक्ती कधीच माफ करणार नाहीत. त्याचा कुकर आणि तवा लवकरच चोरीला जातो की नै बघा! ;-)

--असुर

पैसा's picture

19 Oct 2010 - 10:50 pm | पैसा

पाशवी शक्तीना तुमच्या आसुरी शक्तीचा पाठिंबा मिळालेला पहून धन्य धन्य वाटलं! णिसेद सभेला लाखोंच्या संख्येने गर्दी करा असे आवाहन सर्व पाशवी शक्तीना करण्यात येत आहे.

तरी सांगत होतो परा की जरा नीट वाग. उगाच नडु नकोस कुणाला =)) =))

असुर's picture

18 Oct 2010 - 5:34 pm | असुर

+१
हेही कारण असू शकते.
बाकी तुला तसाही खरडवहीचा ऑप्शन नाहिये आज, तर एकतर्फी खरडी टाकायला बरा दिवस आहे. :-)

--असुर

यशवंतकुलकर्णी's picture

18 Oct 2010 - 5:29 pm | यशवंतकुलकर्णी

हो!!
मलापण ही एरर आली. बिका आणि बिरूटे सरांना लिंक देताना. मला वाटले लिंकमध्ये एखादे अक्षर मागेपुढे झाले असेल. पण पुन्हा तेच.

प्राजु's picture

18 Oct 2010 - 7:12 pm | प्राजु

मलाही आली.. दोन वेळा.

प्रियाली's picture

18 Oct 2010 - 5:30 pm | प्रियाली

तुमच्या खरडवहीवर पेश्शल कार्यवाही झालेली आहे. ;) इतरांना नडणार्‍या सदस्यांना तांत्रिक कारणांनी नडवण्याचा संपादक मंडळाने नवा मार्ग शोधला आहे. ;)

(ह. घ्यावे)

या निमित्ताने संपादक मंडळातील काही जण सदस्यांना नडवावे या मताचे आहेत हे समजलं.

(अजिबात हलके घेऊ नये ;) )

प्रियाली's picture

18 Oct 2010 - 5:40 pm | प्रियाली

या चर्चेतून गळही टाकणार आहेत. पुढले मासे पकडायला. ;)

हा हा हा चालु द्या :)

(देवमासा) अवलिया

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Oct 2010 - 5:35 pm | बिपिन कार्यकर्ते

मधून मधून व्यनि करताना मिपा कोलमडतंय. :(

हम्म्म अधुन मधुन ट्राय करत जा :)

छोटा डॉन's picture

18 Oct 2010 - 6:33 pm | छोटा डॉन

>>मधून मधून व्यनि करताना मिपा कोलमडतंय.
व्यनीसंदर्भात केवळ "सहजरावां"च्या तक्रारीची दखल घेतली जाईल.
बाकीच्या वापरकर्त्यांचा चिल्लर वापर लक्षात घेता सदर निर्णय घेण्यात आला आहे.

तोवर बाकीच्यांनी उगाच "माझी फ्री-किक आजकाल झॅवीसारखी जात नाही"च्या सुरात व्यनीच्या तक्रारी करु नये.
आम्हाला आमचे काम करु द्यात ( म्हणजे नक्की काय ते विचारु नये, अपमान आणि इतर बरेच काही होईल )

- छोटा डॉन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Oct 2010 - 5:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला असा कोणताही अनुभव मिपावर वावरतांना येत नाही.

-दिलीप बिरुटे
[ कोलमडलेला ]

अवलिया's picture

18 Oct 2010 - 5:40 pm | अवलिया

त्यासाठी खरड व्यनी करावे लागतात. तुमचं आपलं "गुपचुप बैठे हो जरुर कोई बात है" असं असतं

नितिन थत्ते's picture

18 Oct 2010 - 5:41 pm | नितिन थत्ते

मला पण मधून मधून हा प्रॉब्लेम आज येत आहे. :(

पण मिपाविषयक तांत्रिक अडचणी धाग्यावर लिहू नयेत असा नियम असल्याने मी इथे तक्रार करत नाहीये. ;)

छोटा डॉन's picture

18 Oct 2010 - 5:47 pm | छोटा डॉन

>>मिपाविषयक तांत्रिक अडचणी धाग्यावर लिहू नयेत असा नियम असल्याने मी इथे तक्रार करत नाहीये
हां ऽऽऽ
थत्तेचाचा, बीग ब्रदर इज वॉचिंग हां !!

- छोटा डॉन

नितिन थत्ते's picture

18 Oct 2010 - 5:50 pm | नितिन थत्ते

हॅहॅहॅ.

म्हणून तर तक्रार केलीच नाही. :P

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Oct 2010 - 5:50 pm | बिपिन कार्यकर्ते

पण मिपाविषयक तांत्रिक अडचणी धाग्यावर लिहू नयेत असा नियम असल्याने मी इथे तक्रार करत नाहीये.

बघा, बघा, हे खरे चाचा. इतरांबद्दल किती कळवळा. किती कणव. किती दया. किती हे. किती ते. पाणावले.

;)

नितिन थत्ते's picture

18 Oct 2010 - 5:53 pm | नितिन थत्ते

अरेरे.

याने पुसा डोळे. :)

मितभाषी's picture

18 Oct 2010 - 5:42 pm | मितभाषी

मला यात वरती आन्ग्लभाषेत उल्लेख केलेल्या 'द्रुपालचा' हात दिसतोय. बहुधा तुमचा आयपी ड्रेस मिळाला असावा त्याला.

छोटा डॉन's picture

18 Oct 2010 - 5:44 pm | छोटा डॉन

ज्यांना ज्यांना असे एरर येताहेत त्यांना त्यांची पापं भोवत आहेत असे स्पष्ट सांगु इच्छितो.
पापाच्या प्रमाणानुसार देव शिक्षा करत आहे, ह्या हिशेबाने अदितीचे खातेच ब्लॉक व्हायला हवे, पण असो. ;)

आमचे मास्तर नेहमी म्हणायचे " डॉन्या, बाबा रे आपण जी पापं करतो ती आपल्या एक ना एक दिवस इथेच फेडावी लागतात", बहुतेक आज तो दिवस आला आहे.
माझा आजपासुन देवावर व मास्तरांवर विश्वास वाढला.

आलोच मी महादेवाला नारळ वाढवुन.
तोवर पराने माझ्या खरडवहीत "माझी चुक झाली" ही खरड १०० वेळा टाकावी असे सुचवतो.

- छोटा डॉन

अवलिया's picture

18 Oct 2010 - 5:46 pm | अवलिया

अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारा प्रतिसाद. निषेध.

प्रियाली's picture

18 Oct 2010 - 5:48 pm | प्रियाली

अशा विचारजंती निषेधांना आम्ही भीक घालत नाही. ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Oct 2010 - 5:48 pm | बिपिन कार्यकर्ते

आमचे मास्तर नेहमी म्हणायचे " डॉन्या, बाबा रे आपण जी पापं करतो ती आपल्या एक ना एक दिवस इथेच फेडावी लागतात", बहुतेक आज तो दिवस आला आहे.

आता डान्याए मास्तरच डान्याला बाबा म्हणत होते हे ऐकून पापं कोणाची जास्त तेच कळेना मला. असो. आपल्याला काय...

छोटा डॉन's picture

18 Oct 2010 - 5:58 pm | छोटा डॉन

ओ मालक*, जरा जपुन.
इथे प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवला जातो, उगाच पुन्हा मागाहुन तक्रार करु नका.

* मालक : इथे मालक हे संबोधन आहे, ह्याचा अर्थ असा नाही की बिपिनदा खरेच मालक आहेत. तसेच बाबाचेही आहे, पण मालक असलेले बिपिनदा हे सम्जुन घेण्याची शक्यता नाही, म्हणुनच ते कदाचित मालक आहेत ;)

- छोटा डॉन

स्पंदना's picture

19 Oct 2010 - 9:03 am | स्पंदना

हा हा हा !!!

फुटले हे ऐकुन.

छोटा डॉन's picture

18 Oct 2010 - 5:50 pm | छोटा डॉन

विज्ञान, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी ( ह्यावर खरे तर मला एक डिट्टेल लेख लिहायचा आहे / होता, पण असो ) ह्याविषयी घोर अज्ञान असणार्‍या उपरोक्त प्रतिसादाला "फाट्यावर" मारले आहे.
कळावे.

- छोटा डॉन

तुम्ही तरी उजेड पाडा तिकडे, नाय रजनीकांत फेल झाला यांच्या केस मध्ये, आता फक्त तुमचीच आशा आहे.

ज्यांचा पराक्रम थोर, शत्रू मारिला वारंवार|
त्यांसी दिसतो देव 'लवकर', असुर म्हणे||

पराजीरावांना पुखशु!!!!

--असुर

सुहास..'s picture

18 Oct 2010 - 5:51 pm | सुहास..

आलोच मी महादेवाला नारळ वाढवुन. >>>

एक शंका : हे महादेवाला नारळ कसे वाढतात ?

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Oct 2010 - 5:57 pm | बिपिन कार्यकर्ते

मेल्या ते वाढुन नाहीये... वाढवुन असे आहे. पाली अर्धमागधीचा अभ्यास कमी करून मराठी शिका जरा. ;)

छोटा डॉन's picture

18 Oct 2010 - 6:01 pm | छोटा डॉन

कशाला उगाच सुहाश्याला शिकवायच्या भानगडीत पडतात ?

सुहाश्याला शिकवणे म्हणजे उगाच त्याच्या डोक्याचा ताप वाढवणे
सुहाश्याला शिकवणे म्हणजे उगाच स्वतःच्या डोक्याचा ताप वाढवुन घेणे

( बाळ सुहास, आज एवढाच शब्द घोटुन ये, उद्या बाकीचे पाहु, कसें ? )

- छोटा डॉन

सुहाश्याला शिकवणे म्हणजे उगाच त्याच्या डोक्याचा ताप वाढवणे
सुहाश्याला शिकवणे म्हणजे उगाच स्वतःच्या डोक्याचा ताप वाढवुन घेणे >>>

हे हे हे ..चल तस तर तस !! पण माझा प्रश्न अनुत्तरीतच रहातो ना ?

वत्स डॉन !!

महादेवाला नारळ कसा काय वाढवितात .हे म्हणजे (नारळाच्या काथ्यासदृश दिसणारा)आपल्या (नारळाईतकाच मठ्ठ)डोक्यावरील महिरप वाढवण्यासारखं काही आहे का ?

सुहास..'s picture

18 Oct 2010 - 6:12 pm | सुहास..

मेल्या ते वाढुन नाहीये... वाढवुन असे आहे. पाली अर्धमागधीचा अभ्यास कमी करून मराठी शिका जरा >>>

शेपुट घातले आहे (मी नव्हे डॉन्यानी)

असो ...

नवीन लेख लिहावा वाटत आता ..अर्धमागधीचा ऊगम आणी एक फटाल ऐरर

विनायक प्रभू's picture

18 Oct 2010 - 6:55 pm | विनायक प्रभू

निट विचार केल्यास हा फरक कळायला फारशा अभ्यासाची गरज नाही.

सुहास..'s picture

18 Oct 2010 - 6:58 pm | सुहास..

मास्तरांनी केलेल्या विश्लेषणाशी असहमत आहे ..

प्रश्न फरकाचा नव्हताच मुळी , प्रश्न होता की

महादेवाला नारळ कसा काय वाढवितात .

मेघवेडा's picture

18 Oct 2010 - 6:00 pm | मेघवेडा

वाढवून आणि वाढून मधला फरक कळाला असता तर असा प्रश्न पडला नसता..

म्हनुन सांगित व्हतो शेट.. शालंत जा शालंत जा.. बगलात .. हिशेब चुकला ना..

:D

शुचि's picture

18 Oct 2010 - 5:56 pm | शुचि

"Fatal error: Call to undefined function drupal_mail() in /home/misavcom/public_html/sites/all/modules/guestbook/guestbook.module on line 494" हा मेसेज मला देखील येतोय दुर्लक्षीत पँथर चे संस्थापक काही कार्यवाही करतील काय? :P का ते स्वतःच गंडले आहेत?

हे कोण म्हणे?

दुर्लक्षीत पँथर चे संस्थापक काही कार्यवाही करतील काय >>>

अहो शुचीतै !!

त्यांनीच तर प्रकरणाला धागावाचा फोडली ना !!

मेम्बर
दुर्लक्षीत पँथर

सुहास तुम्ही कुठे दीन आहात तुम्ही कशाला दुर्लक्षीत पँथर चे सभासद झालात? माझं ठीक आहे. :( =))

तुम्ही कुठे दीन आहात तुम्ही कशाला दुर्लक्षीत पँथर चे सभासद झालात? माझं ठीक आहे >>>

अभ्यास , अभ्यास ,अभ्यास कमी पडतोय आपला शुचितै !!

आम्ही पर्‍याच्या कुठल्याही मिपाजामिक संघटनेत बाय डिफॉल्ट असतो

इंटरनेटस्नेही's picture

18 Oct 2010 - 6:07 pm | इंटरनेटस्नेही

अरेरे साक्षात खरडवही उचकपाचक मंडळाचे अध्यक्ष श्री. प. रा. राजवाडे यांना असा त्रास सहन कारवा लागत आहे हे पाहुन डोळे पाणावले.

निषेध! निषेध! निषेध!

बिका तुम्हाला मिळालेला एक रुमाल यांना पण द्या.

बाकी पर्‍याचा धागा हॅक कसा करावा ते या संपादकांना विचारा ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Oct 2010 - 6:13 pm | बिपिन कार्यकर्ते

बाकी पर्‍याचा धागा हॅक कसा करावा ते या संपादकांना विचारा

गप बे... मोठ्याने बोलू नको.

बाय द वे... पराला दसर्‍याच्या शुभेच्छा दिल्या की नाही? तो लै भारी शुभेच्छा देतो. ;)

मृत्युन्जय's picture

18 Oct 2010 - 6:14 pm | मृत्युन्जय

खवची सुविधा गेली म्हणजे आख्खा पराच हॅक झाल्यासारखा आहे.

पैसा's picture

18 Oct 2010 - 7:39 pm | पैसा

उर्फ इण्टरनेटप्रेमी, तुझ्या खवमधे काही लिहिलं तर fatal error मेसेज येतोय. पण मेवे, प्रभो, इंद्रा यांच्या खव नीट चालू आहेत. काही खास लोकाना प्रॉब्लेम आहे असं वाटतंय. ;)

इंटरनेटस्नेही's picture

18 Oct 2010 - 9:36 pm | इंटरनेटस्नेही

काही खास लोकाना प्रॉब्लेम आहे असं वाटतंय

ही ही ही ही ही हहे हेहे हे एहे हेह हॅ हॅ हॅ! (खास हे संबोध्न वाचुन जसं हसायला आलं तसं टंकलं आहे!)

(खास) इंट्या.

पैसा's picture

18 Oct 2010 - 10:29 pm | पैसा

आहेस बाबा! खासच ना मग?

नावातकायआहे's picture

18 Oct 2010 - 6:13 pm | नावातकायआहे

ख.व. सम्राट ध.मु. साहेब आजुन लॉगिन नाय झाले म्हनुन 'सिस्टिम' हे आसल फालतु दुखन काढतिया...

कोण किडे करतोय रे कोडात? डान्रावांना सांगा की कोड दुरुस करायला, ते नुसते कोडकडे पाहुन कोड कंपाईल करतात!!

रोजच्या गप्पा टप्पा मारायला मालकानी पैशे खर्चून रडवहीची सोय करून दिलेली आहे.

गणपा's picture

18 Oct 2010 - 6:24 pm | गणपा

कोण मालक ?

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Oct 2010 - 7:05 pm | llपुण्याचे पेशवेll

वा स्टाईल तर जमली. त्याखाली
-गणात्या

अशी सही करायची होतीस. पण नाही केलेस ते चांगले झाले. नाहीतर 'गणात्या' म्हणजे गणा + आत्या असे समजून गणा हा हा नसून ही आहे अशा गैरसमजातून काही जेष्ठ सभासदांनी 'मज्यंशी मयत्री कर्नर कं' अशा खरडी टाकल्या असत्या. असो. गणपा वाचलास रे.

मालकानी पैशे खर्चून रडवहीची सोय करून दिलेली आहे. >>

पण आम्ही तर ऐकले होते की खरडवही फक्त 'हाय हॅल्लो ' करण्यासाठी आहे ते ?

नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार, डान्रावांचा केस कोडात अडकल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

छोटा डॉन's picture

18 Oct 2010 - 6:28 pm | छोटा डॉन

ह्या अडचणी सोडवताना "Nile" ह्या सदस्याच्या खात्याचे किंचित नुकसान झाले आहे.
ते दुरुस्त करोस्तोवर सदर खाते पुढील घोषणेपर्यंत बंद राहिल.
गैरसोईकरता क्षमस्व !!!

- छोटा डॉन

बरं मग ते लिस्ट मधले दुसरे सुरु करता काय?

श्रावण मोडक's picture

18 Oct 2010 - 6:33 pm | श्रावण मोडक

या धाग्यावर अद्याप सहज आणि धमु यांचे प्रतिसाद नाहीत. म्हणजेच हा प्रश्न खरा नाही. पऱ्याने टाकलेला "दूसरा" आहे हा.

काय माहित त्यांचे प्रतिसाद पण ब्लॉक केले असतील. डान्याला काय अशक्य आहे सांगा??

श्रामो काका, व्यनी आणि खव अनुक्रमे सहजराव आणि धम्याला वचकुन असावेत.
आय बिशाद लागुन गेली आहे त्यांची या महानुभवांना नडण्याची. ;)

छोटा डॉन's picture

18 Oct 2010 - 6:46 pm | छोटा डॉन

काका ?

ही हिंमत ?
श्रामोकाका, तुम्हाला काका म्हटल्याबद्दल ह्या गणपावर काय अ‍ॅक्शन घेऊ ते नुस्ते सांगा, चांगला धडा शिकवु ह्याला.
काय म्हणता ?

- छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Oct 2010 - 6:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डान्राव, गणपाकडून तेल हिसकावून घ्या, म्हणजे तुमचीही सोय आणि त्याचा "धंदा"ही (तुमच्या केसांसारखाच!) बसेल.

तुम्ही मध्ये मध्ये काडी करु नका. आम्ही काका-पुतणे काय ते पाहुन घेउ ;)

श्रावण मोडक's picture

18 Oct 2010 - 7:08 pm | श्रावण मोडक

हलकट! निमित्त साधून घेतोस काय? बघून घेईन. पुढं मागं संधी मिळेलच. अजून दोनाचे चार व्हायचे आहेत तुझे. नीट होऊ द्यायचं आहे ना? ;)
आता हे सगळं ह घ्या हेही सांगावं लागणार आहे का?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Oct 2010 - 7:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"श्रावण मोडक यांचं खातं का गोठवलं" असा काठ्याकूट लिहीण्यास सुरूवात करत आहे!

काथ्याकुट शब्दाचा शोर्ट फॉर्म = काकू

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Oct 2010 - 11:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

थ्यांक्यू विभा*!

*विभा - विजुभाऊ

रेवती's picture

18 Oct 2010 - 11:09 pm | रेवती

हा हा हा! आधी दचकलेच!;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Oct 2010 - 11:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बरंय आता तुझं पाशवी नाव वेगळं लक्षात नाही ठेवावं लागणार!!

काय झालं मग शेवटी? निदे आहे की झोपला ?

संपादक मंडळाला धन्यवाद खरड पाठवली आहे :)

सद्दाम हुसैन's picture

18 Oct 2010 - 8:06 pm | सद्दाम हुसैन

उई उई उई हुई......

यशवंतकुलकर्णी's picture

18 Oct 2010 - 8:25 pm | यशवंतकुलकर्णी

काय राव! हॅट! लोकांना मूळ प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यावर चर्चा करण्यातच भारी इंट्रेस्ट असतो.
ती एररची भानगड अजून तशीच आहे.

इंटरनेटस्नेही's picture

18 Oct 2010 - 8:59 pm | इंटरनेटस्नेही

मला असा कोणताही एरर येत नाहीये!

ढिन चॅक! ढिन चॅक! ढिन चॅक!

पैसा's picture

18 Oct 2010 - 9:05 pm | पैसा

तुझ्या खवमधे काही लिहिता येत नाहिये मला.

चिंतामणी's picture

18 Oct 2010 - 11:26 pm | चिंतामणी

अजून एक XXXXधागा. :(

सुज्ञास अधिक सांगणे न लगे.

(वैधानीक इशारा- Xच्या संख्येचा आणि अपेक्षित शब्दातील अक्षरांची संख्या सारखीच असेल असे नाही) ;)

चिंतामणी's picture

18 Oct 2010 - 11:49 pm | चिंतामणी

मला बर्‍याच मिपासदस्यांना सकाळपासून खरड करायचा अथवा व्यनी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सतत Fatal error: Call to undefined function drupal_mail() in /home/misavcom/public_html/sites/all/modules/guestbook/guestbook.module on line 494 नावाचा मेसेज लिहुन येत आहे.

मिपाचा लाडका डायलॉगपापी लोकांना फटु दिसत नाही.

हा प्रकार तसाच असावा असे वाटते.

तज्ञांनी मार्गदर्शन करावे अशी पामराची माफक इच्छा आहे. :(

;)

जरी पाठवणार्‍याला फेटल एरर आली तरी व्यनि पोचतोय बरं का तेव्हा सांभाळून =))

इंटरनेटस्नेही's picture

19 Oct 2010 - 2:42 am | इंटरनेटस्नेही

१०० वा प्रतिसाद..! आमचे लाडके प रा यांच्या धाग्यवरील हा शतकी प्रतिसाद आमचाच आहे हा आम्ही आमचा बहुमान समजतो!

१०० प्रतिसाद होउन गेलेत आणि "आमचे लाडके प रा यांच्या धाग्यवरील हा शतकी प्रतिसाद आमचाच आहे हा आम्ही आमचा बहुमान समजतो" असे गौरवोद्गार (?) काढलेत म्हणुन प रा बसायला बोलवेल (कमीशन मिळाले तरी) अशी अपेक्षा ठेवु नका.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Oct 2010 - 9:32 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

परा जेवायला बोलावेल आणि वर जेवण कुठे आहे असं विचारेल!

विजुभाऊ's picture

19 Oct 2010 - 10:50 am | विजुभाऊ

परा जेवायला बोलावेल आणि वर जेवण कुठे आहे असं विचारेल!
परा च्या ( पुणे ३० च्या ) भाषेत जेवायला या . म्हणजे तुम्ही जेवण घेऊन आमच्या कडे या असा होत असावा

इंटरनेटस्नेही's picture

19 Oct 2010 - 5:35 pm | इंटरनेटस्नेही

आम्ही तर पुणे - ३० मध्ये वास्तव्यालाच होतो काही काळ...
आम्ही तिकडे अनुभवलेला पाहुणाचार http://www.misalpav.com/node/13771 इथे वाचता येईल. :)

बाय द वे.. पुणे ३० मधील सुगरन्स या हॉटेलातील मटणाची सर कशालाच येणार नाही!

(नॉनव्हेज प्रेमी) इंट्या.

माझा पण खव आणि मेसेज अडकतोय.