वैशाखाच्या भग्न दुपारी
वणवा भोळा ऐसा तळपे
मिरची जळजळ क्लिष्ट शहारी
पोहे खाऊन प्रचंड दडपे
सान्ताने मग क्लॉज टाकला
माझ्यावरती तुझीच माया
दिव्यझिम्मडी बहरून आली
शकुंतलेची काजळकाया
सकल धुराडे फ़िरती गगनी
तिचे विखारी लोचन झाळी
आकाशरेषा जुगनू जळती
गुडविलबाबा नयनी झोळी
चिर्कुटढक्कन दाढीवाला
प्रियानिळाली साडीवाला
टोकन धरती फ़िरती वरती
अजब पहाडी गाडीवाला
काय कुठूनी वरती येते
कालयंत्र ते अजब झपाटे
अय्या सोडा लवकर बैंया
गलोल सत्वर दैया दैया
रेलगाडी जीवन झुकझुक
आले ठेसन प्रदेश चम्बळ
अल्लड सान्ता निरीच्छ जनता
दुमदुम ऐके कडाड संबळ
जीवी बाबू अर्जुन नागा
अल्लुअल्लु डाबर अमला
निशानीरोबो दुर्दैवाचा
दशावतारी हासनकमला
मनामनातून प्रत्येकाच्या
थरथर लोभस कातिल बाणा
चराचरातील अगम्य कलकल
अस्तित्त्वाच्या तरल खुणा
आयुष्याच्या ठेसनजडिती
कर्तृत्त्वाचा दिव्यसपाट
पळे पळाली दिनही गेले
वाट पाहण्या शैशवफ़लाट
१३ ऑक्टोबर २०१०, पुणे
प्रतिक्रिया
13 Oct 2010 - 10:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
शरदिनीताई आल्या.
वेळ झाला तर कविता वाचेन (आणि वर आणखी वेळ मिळाला तर विडंबनही करेन).
13 Oct 2010 - 10:07 am | नितिन थत्ते
असेच म्हणतो.
पण नेहमीचे जडजंबाल शब्द आणि कल्पनावैचित्र्य (कविता मोठी असूनही ) कमी वाटले.
13 Oct 2010 - 10:07 am | मी_ओंकार
आत्ता एकदाच वाचली. त्यामुळे रुमाल टाकतो.
- ओंकार
13 Oct 2010 - 11:03 am | नगरीनिरंजन
तुम्ही येईपर्यंत डोळे पुसायला वापरू का तुमचा रुमाल?
13 Oct 2010 - 11:28 am | मी_ओंकार
विचारताय काय ? आता वापरलाच की. पण तो आमचेही डोळे पुसून ओला झालेला आहे. अर्थात ताई परत आल्या त्याचे आनंदाश्रू .
- ओंकार
13 Oct 2010 - 10:15 am | आंबोळी
पुनरागमनाच्या हार्दिक शुभेछा!
कविता उत्तम आहे. आवडली.
जय जालिंदर बाबा!!
13 Oct 2010 - 10:17 am | Nile
शरदिनीबाईंचा मास्तर झाल्यापासुन प्रतिभा लयाला गेली की काय असा प्रश्न पडला. ;-)
13 Oct 2010 - 11:19 pm | बेसनलाडू
कुणाचाही कधीही कसाही मास्तर झाला काय, प्रतिभा लयाला गेली काय किंवा बहरली काय, मारुती कांबळेचं काय झालं हा प्रश्न सुटत नाहीच ;)
(अवांतर)बेसनलाडू
कविता नेहमीप्रमाणेच रंजक आहे. कालयंत्र, निशानीरोबो विशेष आवडले.
(वाचक)बेसनलाडू
13 Oct 2010 - 10:21 am | केशवसुमार
वेळा वाचली .. समजली म्हणायची हिम्मत नाही होत..
९ कडवी.. ३६ ओळी..
शारदिनी शब्दांची मोळी
रोबोकांता रोबोकांता
तूच अडव ही सुसाट गोळी
14 Oct 2010 - 12:08 am | विश्वनाथ मेहेंदळे
अख्ख्या कवितेपेक्षा ह्या ओळी जास्त आवडल्या :-)
13 Oct 2010 - 10:27 am | मस्त कलंदर
कविता वाचली.. अंमळ जास्तच लांबलचक आणि नेहमीसारखे जडजव्याळ शब्द कमी असल्याने थोडी निराशा झाली. :(
13 Oct 2010 - 10:46 am | वेताळ
हे एकाद्या क्रमिक पुस्तकात बालकविता म्हणुन खपुन जाईल.
13 Oct 2010 - 12:30 pm | विसोबा खेचर
सहमत..
मस्त लयदार कविता..
शरू, खूप दिसांनी लिहिलंस, बरं वाटलं...:)
तात्या.
--
शुद्धकल्याण गावा तर करीमखासाहेब, हिराबाई, आणि भीमण्णांनी, हमीर गावा तर गजाननबुवा, यशवंतबुवा, आणि मधुबुवांनी!
13 Oct 2010 - 11:02 am | विजुभाऊ
अय्या सोडा लवकर बैंया
गलोल सत्वर दैया दैया
काळजाला भिडले डोळे पाणावले.
शरदिनी तै बरेच दिवसानी दर्शन दिले. लै बरे झाले.
बाय द वे तुम्ही इतकी दीर्घ रजा घेतली होती की इथे सगळ्याना वाटले "तुम्ही माहेरपणाची रजा घेतलीय म्हणून"
बाय द वे ;आता तब्येत कशी आहे ;)
13 Oct 2010 - 11:18 am | श्रावण मोडक
स्वागत.
13 Oct 2010 - 11:24 am | परिकथेतील राजकुमार
मज्जा नाय आला हो तै !
13 Oct 2010 - 11:29 am | सहज
पहील्या दोन कडव्यात
मिरची, दडपे पोहे, शकुंतलेची काजळकाया भाषा, खाद्य, वर्ण, देशविदेशचे उठून दिसणारी पात्रे जसे सान्ताक्लॉज व शकुंतला कवयित्री एन्थ्रोपॉलॉजीची अभ्यासक असल्याचा स्पष्ट पुरावा
तिसरे, चौथे कडवे -
सकल धुराडे फ़िरती गगनी...अजब पहाडी गाडीवाला...
शहरी दूषीत वातावरणाचा होणारा अगदी शद्ध हवेची खात्री मानली जाणारी पहाडी ठिकाणे अश्या भागातही होणारा विपरीत परिणाम अधोरेखीत करणारा, कवयित्रीचा एन्व्हायरन्मेंट अवेयरनेस दाखवणारा पुरावा.
पाच, सहा, सात कडवी
ही मुख्यत्वे आपण ज्या सकाळ पासुन रात्रिपर्यंत घड्याळाच्या काटानुसार राबणारी चाकरमानी - रेल्वेप्रवास म्हणजे मुंबईकर असे म्हणत असतानाच आले ठेसन प्रदेस म्हणजे भैय्या मंडळी मुंबईत्-महाराष्ट्रात येत असतात ह्या सामाजीक प्रश्नांना वाचा फोडली. तर अश्या दिनचर्येत अडकलेल्या आपल्या असहाय्यतेची जाणीव करुन देतानाच आपण बॉलीवूड, टिव्ही सिरियल मधे अडकलो होतोच पण दिवसेंदिवस नागार्जुन, अमला, रोबोफेम रजनी, यांचेही नखरे आता बघायचे दिवस आले आहेत. मराठी माणसांनी अन्य प्रांतीयांचे कौतुक अजुन किती दिवस सहन करायचे? महाराष्ट्राच्या राजकारणाची किती सखोल जाणीव कवयित्रीला आहे याचाच पुरावा. अर्थात दशावतारी म्हणजे अनेक भुमीका लिलया पार पाडणारा कमल हसन पण दुर्दैवी रोबो म्हणजे बहुदा रजनीकांतला कमलहसनच्या तुलनेत कमी लेखले असावे असे वाटते. अर्थात त्यावर खुलासा कवयित्रीकडून ऐकण्यास उत्सुक आहे.
शेवटची दोन कडवी-
आता हे सगळे आपल्यापुढे मांडून कवयित्री हेच सांगू इच्छिते आहे की हे असे सगळे जीवनचक्र चालू असतानाच - मनामनातून प्रत्येकाच्या
थरथर लोभस कातिल बाणा
जालावर सगळेजण त्यांच्या मनातील या दुष्टचक्राला भेदणार्या नव उन्मेष साहीत्यीक, वैचारीक विचारांना सर्वांसमोर आणत आहे. अगदी गाडी शेवटच्या स्टेशनला लागून फलाटावर उतरायच्या आत आपल्या हातून काहीतरी भरीव व्हावे याकरता प्रयत्नबद्ध जनता..
चराचरातील कंपनाला कवितेत आणायचे सामर्थ्य मी तरी अन्य कोणत्या लेखणीत पाहीले नाही.
काव्य - जीवनसाहीत्यातील एक समृद्ध मृगजळ
(प्रतिसाद लिखाळभावोजींना समर्पित)
13 Oct 2010 - 2:40 pm | शरदिनी
सहज्राओ, आपण खूपच छान प्रयत्न केला आहे.. आपले कौतुक करावे तितके थोडे आहे...
रजनी आणि कमलाहासन यांच्यात स्पर्धा लावू नका... दोघेही यूनिक आहेत
एक स्पष्टीकरण...
शैशवफलाट या शब्दाबद्दल सांगावेसे वाटते...
जलिंदरजी ( आमचे साहित्यगुरू) हा शब्द वापरतात... आयुष्य गाडीतून निघून जातान आम्ही शैशवाच्या फलाटावरच उरलो असे ते एकदा म्हणाले होते. तोच हा शैशवफलाट , गुरुजी मनाने कायम तरूणच राहिले आहेत...
हा शब्द त्यांना अर्पण...
13 Oct 2010 - 11:54 am | स्पंदना
या वेळी वाचायला जमली म्हणुन माझे अभिनंदन!!
सहज काकांनी केलेले रसग्रहण वाचायला जमल पण दोनचार केस गळले वाचुन होइ पर्यंत.
नमस्कार ओ शरदीनी तै!!
13 Oct 2010 - 12:25 pm | नावातकायआहे
वाचता आली पन लगिच जुलाब सुरु झाले..
आय्च्यान काय पचले नाही...
'ह्यांच्या' कविता 'ऑप्शनला' टाकाव्याच लागनार..
13 Oct 2010 - 11:06 pm | धमाल मुलगा
ही अवस्था?
मग शरदिनीताईंच्या इतर कविता वाचल्या तर काय आय.सी.यु.च?
14 Oct 2010 - 2:01 pm | नावातकायआहे
>>शरदिनीताईंच्या इतर कविता वाचल्या तर काय आय.सी.यु.च?
आयच्यान खरच काय कळाले नाय.
कधी आत्महत्येचा विचार (माझ्या नाय इतर कुनाच्या) मनात आलाच तर स्वता प.रा.भाउ, पुणे ३० कड
(मि.पा. सदस्यांना २ % डिस्काउंट, नो चिंता) जाइन आनि छापुन नेउन दिन..
स्वगतः कुनी सव्वा रुपया आन नारळ घेउन आल का? काय बी करा आन वाचा म्हनुन??
नाय झेपत बाल बुध्दीला त टाक कि ऑपशन्ला....
13 Oct 2010 - 1:10 pm | वाहीदा
डिंगच्याक !
शरदिनीताईंची कविता आली म्हणून कोणीतरी सांगीतले अन घटकेचाही उशीर न लावता मिपा उघडला
आले ठेसन प्रदेश चम्बळ
अल्लड सान्ता निरीच्छ जनता
दुमदुम ऐके कडाड संबळ
चंबळ खोर्यावर हे कडवे आधारित आहे की काय ? तिथे तर रेल्वे प्रवासी लुटले जातात . तिथे सांता अल्लड अन जनता निरीच्छ कशी ?? :-?
काय कुठूनी वरती येते
कालयंत्र ते अजब झपाटे
हे मात्र अगदी खरे ..
असो सगळ्या साऊथ हिरो हिरोईन्स ची नावे घेऊन झाली आमच्या मराठ मोळ्या नट नटींचे काय ?
मनामनातून प्रत्येकाच्या
थरथर लोभस कातिल बाणा
चराचरातील अगम्य कलकल
अस्तित्त्वाच्या तरल खुणा
हे कडवे आमच्या मदनबाणास अर्पण
अन हा शेर तुम्हास अर्पण ;-)
हजारो साल नर्गिस, अपनी बेनूरी पे रोती है,
बड़ी मुश्किल से होता है, चमन में दीदावर पैदा !
~ वाहीदा
13 Oct 2010 - 12:45 pm | गणपा
वेल्कमबॅक शरदिनी तै. :)
13 Oct 2010 - 1:15 pm | पुष्करिणी
>आयुष्याच्या ठेसनजडिती
>कर्तृत्त्वाचा दिव्यसपाट
>पळे पळाली दिनही गेले
>वाट पाहण्या शैशवफ़लाट
दिवसेंदिवस वाट पाहून, प्रयत्न करून अजूनही रोबो ह्या बालपटाची तिकिटं न मिळाल्यानं कवयित्रीला स्वतःचं आयुष्य कर्तृत्वहीन वाटायला लागलय, या शेवटच्या कडव्यातून तेच नैराश्य व्यतित होतय असं वाटतय.
13 Oct 2010 - 1:27 pm | मराठमोळा
वेलकम बॅक..
जीवी बाबू अर्जुन नागा
अल्लुअल्लु डाबर अमला
निशानीरोबो दुर्दैवाचा
दशावतारी हासनकमला
लैच साऊथ ईंडीयन झालं ब्वॉ. ;)
बाकी लोकांना तुमची कविता वाचायला जमते आहे हे त्यांचे सुदैव की तुमचे दुर्दैव? =))
(अवांतर : रजनीकांत शरदिनी ताईना घाबरत असावा. )
13 Oct 2010 - 3:22 pm | स्व
अप्रतिम शरदिनी तै.
आत्ताच गाडिवरुन हापिसात येउन वाचलं हे. त्यावर माझे हे हाल झाले बघा:-
गर्द रात्री गर्भ काळोखी कषायधूर अग्नीरथी
रथद्वैचक्री वायुभारित तप्ताग्नि घेउनी उरजनित्री ||
दृष्टी भिडता पडता नजरी
दृष्टी भिडता पडता न जरी ||
उग्रबकुलसुवास शीतमास लब्धदृश्य यौवनचाली प्राशंसिक
नयनमारिका सिंहकटिका गजगामिनी
जीवनरसभरित बाह्यसत्वरसदर्शन
कंठहार विराजे सप्तरंगी अनाहत शरीरी
मुक्तहास्य तृप्तकेशी दीर्घश्वासी तव अस्तित्वस्पर्ष
अग्निवर्षा पिंगलताठर स्वप्नविलासी मनभुवनी
क्षणीजाणीव अंतरी क्षणभंगुर हे दर्शनसौंदर्य
अंत्यसत्य जीवन्-मृत्यु अद्वैत ...
उग्रबकुलसुवास वासविहीन, शीतमास भयकाल...
यौवनचाली वार्धक्यारंभ भूर्जपत्रसम गतलालस सालस स्पर्ष
भूतजीवनी जीवनरस आभ्रमित कालांती काल-सत्य
सत्य-काल ध्वनीनिनाद मूकउत्तर रौद्रमुद्रा
वाणीकर्दम जितवादप्रकोप निरुपयोगी सद्यक्षणार्धा
अंत्य प्रवास शाश्वत प्रकाशमुक्ती गाभुळजीवना ||
अगदि खास आपल्या कवितेला हा प्र(ति)साद.
जय बाबा जालिंदर.
--स्व
14 Oct 2010 - 1:02 am | असुर
मायला, ही कविता है की संस्कृत टू मराठी डिक्षनरी??
हे डिक्षनरी म्हणजे यक्षनगरी म्हटल्यासारखं वाटतंय. बहुधा डिक्शनरी म्हणत असावेत. पण या पदार्थाशी कधी फारसा संबंध आला नसल्याने नीटशी कल्पना नै! तज्ञांनी खुलासा करावा.
स्वभौ, थोडासा अर्थसुद्धा समजावून सांगाल का? शब्दोच्चार आणि त्यांचे अर्थ असे सांगितलेत तर धन्यच होईन मी!(ह.घ्या.) :-)
मूळ कवितेबद्दल: शरदिनीतैंची कविता यावेळी सोपी वाटली. माझ्या लेव्हलला तीसुद्धा अवघडच है, पण पुराणकाळच्या काही कवितांपेक्षा कळणेबल होती!
--असुर
14 Oct 2010 - 1:29 am | शरदिनी
प्रयत्न आवडला..
लय शोधली....
सापडत नाही...
संस्कृतातली पूजा ऐकताना कसं वाटतं तसं वाटलं...
13 Oct 2010 - 3:28 pm | ऋषिकेश
काय हे! कमी कठीण शब्द.. वाचकांच्या प्रतिक्रीयांना चक्क प्रतिसाद! छ्या शरीदिनी तै (!) बदलल्या!
13 Oct 2010 - 5:14 pm | राजेश घासकडवी
मध्यमवयीन निवेदका(दिके)च्या बालपणाच्या आसक्तीची कविता वाटली. त्या सॅंटाक्लॉजचं प्रियाराधन आयुष्याच्या भर दुपारी केलं असावं. आयुष्याच्या गाडीत स्टेशनामागून स्टेशनं येतात, प्रवास चालू राहातो, त्या ठेसनांनी मढलेलं काही सपाट कर्तृत्व बनतं, इतकंच. पण बालपणीचं, सॅंटाक्लॉजवर विश्वास ठेवणारं, गलोल हाती घेणारं स्टेशन पुन्हा लागत नाही.
सांतावरच्या प्रेमाचा क्लॉज, सांताच्या सफरींचं कल्पनाविश्व चांगलं उभं राहिलं आहे. त्या आठवणींमुळे कालयंत्र असायला हवंसं वाटणं ठीकच. पण त्यानंतर कविता तुटक झाल्यासारखी वाटली. एकदम आयुष्याच्या गाडीवर येते. (रेलगाडी जीवन झुकझुक - हे म्हणायला अक्षरं ताणावीही लागतात - शरदिनींसाठी अतिक्वचित) स्वप्नातून ती जागी झाली का?
अस्तित्त्वाच्या तरल खुणा
मधील तरल शब्द थोडा खटकला. अगम्य कलकलीतून अस्तित्वाची जाणीव करून देण्याच्या प्रयत्नातला केविलवाणेपणा त्यामुळे जातो.
थोड्या प्रमाणात निराशा झाली. शब्द व लय नेमकी जमली नाही की काय असं वाटलं. पण लिहित्या झालात ते बरं वाटलं.
14 Oct 2010 - 12:52 am | शरदिनी
रा.घा,
आप्ले रसग्रहण आवडले...
थोड्या प्रमाणात निराशा झाली. शब्द व लय नेमकी जमली नाही की काय असं वाटलं. पण लिहित्या झालात ते बरं वाटलं.
त्तुमचे स्पष्ट निवेदन आवडते. लय कुठे कुठे सुटली आहे हे खरेच आहे...
यावेळपासून मी रसग्रहण करणार्या सर्वांना प्रतिसाद द्यायचं ठरवलं आहे...
मला वाटलं, शेवटी सान्ताला लागलेली शकुंतलेशी मीलनाची आस आणि भक्ताला भवसागर पार करून मोक्ष मिळवायची इच्छा हे सगळं सेमच अस्लं काहीतरी सांगताय...
अध्यात्म मला फार्फार आवद्ते....
एकदा ही लाईन पकडली की कुणाच्या अध्यात्नामध्यात, मज्जा येते...
13 Oct 2010 - 5:41 pm | पाषाणभेद
शरदिनी तैंचे स्वागत.
कविता नेहमीप्रमाणे मनाचा गोंधळ उडवून गेली. एक नविनच शैली निर्माण करणारी कविता.
13 Oct 2010 - 7:00 pm | मुक्तसुनीत
शरदिनीच्या पुनरागमें
एकेक ओळ जुळावया
का लागता मज येतसे
नकळे मळमळावया ;-)
- मु.क्त. मर्ढेश्वर
13 Oct 2010 - 7:25 pm | अनिल हटेला
:-)
येल्कम ब्याक !!!
13 Oct 2010 - 11:28 pm | धनंजय
शोभत नाही.
तरी -
यमक-अप्सरा शरदिनि आता
आगमनपुनरा गृहितस्वागता
13 Oct 2010 - 11:41 pm | सुनील
शरदिनीतैंची कविता आणि सहजरावांचे रसग्रहण आवडले!!
असेच येउद्यात...
13 Oct 2010 - 11:52 pm | शेखर
काय कुठूनी वरती येते
कालयंत्र ते अजब झपाटे
ह्या ओळी परा ने काढलेल्या नवीन धंद्यामुळे वरती आलेले धागे यांच्या बद्दल असाव्यात असे वाटते.
14 Oct 2010 - 12:51 am | बिपिन कार्यकर्ते
ऑलमोस्ट शरदिनी, बट नॉट कंप्लीट, आय से!!!!