डोंगरात उनाडताना नेहमीच ढगांची वेगवेगळी रूपं,आकार बघायला मिळतात्,असे अनेक फोटो माझ्या संग्रहात आहेत्,जर आपल्याला आवडतं असेल तर माझा संग्रह तुमच्यापुढं खुला करीनं.
आभाळातलं पाखरू (हरिहर)
मेघअश्व (प्रबळ्गड)
ढगांवरचे तरंग (राजगड)
??? (राजगड)
अग्निशलाका ((आमचा) विश्रामगड)
प्रतिक्रिया
9 Oct 2010 - 2:25 am | प्राजु
मस्त!!
11 Oct 2010 - 4:48 pm | गणेशा
आपल्या ठरल्या प्रमाणे तुमच्या मेघांवर माझे काही शब्द देतो .
उशीर झाल्यामुळे आणि पहिल्या रिप्लाय ला उत्तर देतो आहे , फोटो नंतर शब्द यावेत म्हणुन त्यामुळे ही शमस्व.
---
खरे तर मेघांच्या फोटो वर मस्त लिखान करावे असेच वाटत होते , आणि आपल्या फोटोतील वेगळेपण नेहमीच आवडते .. परंतु आकाशातील मेघ आणि मना-मनातील भावनांचे वेगवेगळे शब्दरुप देण्याचा मोह होत आहे.
लिखान तर करत राहुच . पण हा काही भावनावेध मेघांसाठी शब्दांमार्फत जोडत आहे....
-- >>
11 Oct 2010 - 4:58 pm | गणेशा
भरलेल्या आभाळात ढगांची गर्भरंगीत ओळ
विचारांच्या किणार्यावरती आज लाटांची टोळ
पेटलेला श्वास मनी, काळोखाची कोमल वेल
गहिवरल्या अधीर धारा ऐकुनी पर्णकल्लोळ
सळसळणार्या भावनांचा घट्ट ओला पाचोळा
क्षितीज वृक्षाखाली गंधाळलेली प्रकाशधुळ
बावरलेल्या वार्यावरती स्वप्नांची झुले रेघ
सांजफ़ुलांच्या ह्रदयी शुभ्रांकीत विजांचा लोळ
-- शब्दमेघ
11 Oct 2010 - 5:02 pm | गणेशा
भावनांचे गच्च तळे
नजरेची तप्त किरणे
वाफ़ाळलेले शुभ्र मन
वाहतात शब्दमेघ
रुनझुन पात्यावर
सजलेल्या फ़ुलांवर
दवबिंदू सांडूनी
विरघळतात शब्दमेघ
कातरवेळी एकांती
आठवांच्या पंगती
सुवर्णपंक्ती लेवूनी
सजतात शब्दमेघ
लाजलेल्या रात्री
चांदण्यांच्या आकाशी
रेशमी चादर
पांघरतात शब्दमेघ
घनदाट कुंतलात
काळ्याभोर नेत्रात
नक्षीदार ओठांमध्ये
तरंगीत शब्दमेघ
--- शब्दमेघ
11 Oct 2010 - 5:05 pm | गणेशा
सार्या उदास वाटा कापीत चाललो मी,
होऊन मेघ काळा शापीत चाललो मी
झाले उन्हाळे अनेक, ओसाड उदास राने
ओल्या अधीर धारा कुरवाळीत चाललो मी
श्रुंगार झडून गेला, गर्भगळीत निस्तेज वृक्ष
पानगळीत श्वास गुंतलेला शोधीत चाललो मी
झाले आप्त ही परके, उदास विराण घरटे
दाहक अंतरातला दूरावा तोडीत चाललो मी
पसरला गहिरा अंधार, झाकोळला आसमंत
दिशाहीन प्रवासात वाहवत चाललो मी
------ शब्दमेघ
11 Oct 2010 - 6:02 pm | जिप्सी
गणेशा ! अतिशय सुंदर शब्द ! फोटोना कवितेची जोड मिळाल्यावर अधिकच छान दिसतात. आपण आता हा खेळ चालू करुया ! इतरही कवि मि.पा.करांना या खेळात सामील व्हायचं आमंत्रण!
11 Oct 2010 - 6:04 pm | जिप्सी
गणेशा ! अतिशय सुंदर शब्द ! फोटोना कवितेची जोड मिळाल्यावर अधिकच छान दिसतात. आपण आता हा खेळ चालू करुया ! इतरही कवि मि.पा.करांना या खेळात सामील व्हायचं आमंत्रण!
9 Oct 2010 - 2:36 am | गोगलगाय
फारच छान! किति दिवसांनी खरे ढग दिसले..नाहीतरी आमची ढगाची व्याख्या फारच बदलत चालली आहे. आता क्लाउड कॉम्पूटींग ला मराठीत काय म्हणायचे? तुम्ही ढग स्पेशालिस्ट दिसतात म्हणून विचारतो..
9 Oct 2010 - 3:44 am | जिप्सी
क्लाउड कॉम्पूटींग = ढगाळ संगणन
9 Oct 2010 - 2:47 am | शिल्पा ब
मस्त फोटो...खुप आवडले.
9 Oct 2010 - 9:08 am | प्रचेतस
मायेची पखरण -शिवजन्मस्थानावर --
विखुरलेले पुंजके - भंडारदर्याहून
9 Oct 2010 - 9:17 am | नंदन
सगळेच फोटो क्लास! अजूनही येऊ द्या. ढगांच्या आकारांतल्या आकृत्या शोधण्याचा खेळ मस्तच.
खालच्या फोटोत मध्यभागी, उजवीकडे पाहणारं कुत्र्याचं पिल्लू दिसतं का ते पहा :)
[स्थळ - स्मोकी माऊंटन नॅशनल पार्क]
9 Oct 2010 - 9:21 am | मदनबाण
वा... :)
जिप्सी ढग टिपायला मला देखील आवडतात...
हल्ली लोकं किती वेळा आकाशाकडे पाहतात ते त्यांनाच ठावुक !!!
ढगांचे मस्त फोटो मलाही टिपायचे आहेत...(काही टिपले आहेत पण साध्या मोबाईलच्या कॅमेर्याने.)
तुझा खजाना (संग्रह) पाहायला आवडेल, तेव्हा असेच फोटो टिपत रहा आणि इथे पोस्टत रहा... ;)
11 Oct 2010 - 11:41 am | योगेश२४
सगळेच फोटो एकदम झक्कास :)
आवडला हा खेळ ढगांचा :)