इडली-माझी आवडती..

जासुश's picture
जासुश in पाककृती
4 Oct 2010 - 3:15 pm

इडली ची कृती निवेदिता तैं प्रमाणेच..
पुढे सांबार साठी गुगला..
किंवा मी दिलेली रेसिपी वापरा..कृपया ही रेसिपी शास्त्र शुद्ध नाही व ह्या बद्दल कमेन्टा मारत बसू नका. चव छान लागेल..ह्या सांबरची पण.. :)
२ वाटी तूर डाळ धुवून त्यात पाणी व हळद व एक चमचा तेल घाला. व कुकरला शिट्या लावा . डाळ शीजली की घोटून घ्या.

तेल गरम करून त्यात मोहोरी जिरे लसूण,चिरलेला कांदा,कढीपत्ता,लाल सुकी मिरची,चिरलेला �¤
�ोमॅटो घाला व शिजवा. मग त्यात घोटलेली डाळ घाला. चिंचेचा कोळ, गुळ व मीठ घाला. व सांबार मसाला घालून उकळी येऊ द्या. मग त्यात चिरलेली कोथिंबीर घाला.
[आवडीनुसार वांगी,शेवगाची शेन्ग घालू शकता.]

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

4 Oct 2010 - 3:18 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त.
फोटु तर एकदम लालच आह लपलप ;)

साला काल आपण इडल्या केल्या तर त्या येवढ्या चिकट झाल्या होत्या की शेवटी शेवटी मला तो कुरडईचा चिक वाटायला लागला होता :(

साला काल आपण इडल्या केल्या तर त्या येवढ्या चिकट झाल्या होत्या की शेवटी शेवटी मला तो कुरडईचा चिक वाटायला लागला होता

काल आपला पण दिवस बेक्कार हुता. तुझ्या ईडल्या चिकट का होईना झाल्या तरी माझ्या पीठाने अशी मान टाकली की ज्याच नाव ते. मग म्हटल ईडली नाही तर नाही निदान उत्तपे तरी करु.. तर ते बेणं तव्याला अशी मिठी मारुन बसल की निघायच नावच घेईना.

संध्याकाळी कामवाली खाऊ का गीळू अश्या नजरेने ईडली भांड आणि तवा खरवडुन खरवडुन धुत होती.

मेघवेडा's picture

4 Oct 2010 - 3:22 pm | मेघवेडा

अहाहा! काय फोटो आहे! पर्‍यासारखंच म्हणतो, "लालच आहा लपलप!"

जासुश's picture

4 Oct 2010 - 3:23 pm | जासुश

इडलीचे पीठ थोडे रवाळ ठेवावे. मग इडली चिकट नाही होणार. आणि छान मौ इडली होते.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Oct 2010 - 3:25 pm | परिकथेतील राजकुमार

आयत्या पिठावर रांगोळ्या होत्या हो ;) तयार पिठ आणले होते.

मस्त कलंदर's picture

4 Oct 2010 - 3:44 pm | मस्त कलंदर

तयार पीठ इडली करण्या आधी अर्धातास फ्रीजमधून बाहेर काढून ठेवत जा. तेवढा वेळ होऊन गेला की मग पीठात चवीपुरते मीठ, आवडत असल्यास जिरे घाल. आता मला निवेदितातैंची पाकृ नक्की कशी होती हे आठवत नाही म्हणूनः इडलीपात्राला तेलाचा हलका हात लावल्यानंतर त्यात इडलीचे पीठ डावाने घाल. पण ते घालताना इडल्यांना फुगण्यासाठी वाव मिळेल अशा बेताने घाल, नाहीतर त्या एकमेकींना भेटायला जातील. कुकरमध्ये लावणार असशील तर शिटी न लावता मध्यम आंचेवर १५ मिनिटे ठेव. मस्त वाफाळत्या गरमागरम इडल्या बनतात.
जाता जाता, अशा इडल्यांची चव कशी असते ते मोडक आणि बिकांना विचार. :)

परिकथेतील राजकुमार's picture

4 Oct 2010 - 3:59 pm | परिकथेतील राजकुमार

दारिद्र्य रेषेखालील माणुस असल्याने घरी फ्रिज नाही ;) बाकी तेलाचा हात लावणे, मिठ घालणे हे सर्व प्रकार करुन देखील इडल्या चिकटच झाल्या. (मधल्या काळात 'काय आंबट आहे पिठ' असा शेरा मारुन आमच्या मातोश्रींनी त्यात दोन चमचे घातलेल्या साखरेचा हा परिणाम असावा काय?)

जासुश's picture

4 Oct 2010 - 4:05 pm | जासुश

इडली च्या एवजी डोस्याचे पीठ नाही ना आणत.. ;)

मस्त कलंदर's picture

4 Oct 2010 - 4:14 pm | मस्त कलंदर

मी साखर कधीच घालून पाहिली नाही.. त्यामुळे त्याबद्दल काही बोलू शकत नाही..
आणि हो रे, इडली आणि डोसा दोन्हीसाठी एकच पीठ असते. डोशासाठी ते थोडे पातळ करून घ्यावे लागते... तेव्हा जासुशतै-भौ जे कुणी असाल ते.. आमच्या पर्‍याची थट्टा करताना तुमचा कीबोर्ड तुटला कसा नाही??? (ह घ्या हो..)

परिकथेतील राजकुमार's picture

4 Oct 2010 - 4:18 pm | परिकथेतील राजकुमार

आणि हो रे, इडली आणि डोसा दोन्हीसाठी एकच पीठ असते.

दोन आयडींच्या मागे एकच माणुस असतो तसे ;)

हे माहिती आहे ग मला. पण च्यायला कुठे काय हुकले ते कळलेच नाही. इडल्या म्हणजे एक विनोदच झाला पार काल :(

@गणपाभौ

साला तुमच्याकडे कामवाली तरी आहे. आमच्या मातोश्रींनी संपुर्ण इडलीपात्र मलाच घासायला लावले :(

विजुभाऊ's picture

5 Oct 2010 - 1:11 pm | विजुभाऊ

हे माहिती आहे ग मला. पण च्यायला कुठे काय हुकले ते कळलेच नाही. इडल्या म्हणजे एक विनोदच झाला पार काल
अरेच्चा.. तू लेका संधीचा फायदा घेऊन आमचे येथे इकोफ्रेन्डली घरगुती फेवीकॉल विकत मिळेल असा बोर्ड लावायचा ना कॅफेवर.
अच्च पुणेकर असूनही आंत्रप्रेन्यूअर्शिप अंगी बाळगत नाहीस बघ

परिकथेतील राजकुमार's picture

5 Oct 2010 - 2:10 pm | परिकथेतील राजकुमार

अरेच्चा.. तू लेका संधीचा फायदा घेऊन आमचे येथे इकोफ्रेन्डली घरगुती फेवीकॉल विकत मिळेल असा बोर्ड लावायचा ना कॅफेवर.

बोर्ड लावला असता हो विजुभौ पण तुमच्यासारखे फार कमी लोक ओळखीचे आहेत :( म्हणावा तसा खप झाला नसता.

राजेश घासकडवी's picture

5 Oct 2010 - 2:59 pm | राजेश घासकडवी

येथे आमसुले, परकर व इकोफ्रेंडली फेविकॉल मिळेल.

असा लाव. जरा वैविध्य ठेवावं माणसाने. :)

जासुश's picture

4 Oct 2010 - 3:29 pm | जासुश

घरीच तयार करत जा पीठ..

चक्शु's picture

4 Oct 2010 - 3:44 pm | चक्शु

मी पन असाच करते साम्बार...... सोपा आनी टेस्टी......

डोसा बनवायचे पीठ पातळ असते हे अगदी बरोबर...पण मी एकदा इडली साठी म्हणून पीठ तयार केले होते..व ताई ला ते घट्ट वाटले आणि तिने मस्त एक ग्लास पाणी ओतले..मग काय इडल्या एकदम बासूनच राहिल्या पात्रात..त्यानंतर उतप्पे करायला घेतले पहिला सोडून बाकी सर्व छान झाले..म्हणून मी प्रया भोऊना विचारले..डोस्याचे पीठ तर नवते...ना..???

काय छान आहे हो इडलि

आज मी इडल्याच बनवून आणल्या होत्या हापिसात. फोटो मस्तय! :)

विनायक प्रभू's picture

4 Oct 2010 - 4:37 pm | विनायक प्रभू

शास्त्र असते इडलीचे पिठ.
अंमळ पेशन्स चे काम.
घाई करुन चालत नाही.
केली तर सगळा चिकटाच होतो.

रश्मि दाते's picture

4 Oct 2010 - 4:55 pm | रश्मि दाते

मस्त आहे फोटो.आम्ही ही असाच करतो सांबार फक्त भाज्या जास्त घालतो.भेंडी,कोहळा इत्यादी

@प.रा नाही हो साखर आणि चिकट इडली चा काही संबघ नाही
@प्.रा + गणपा अहो त्या इडलीपात्रात ३० मि पाणी भरुन थेवा वापरुन झाल्यावर म्हणजे धुवायला/घासायला सोपे जाते

भांडेवालि च्या सुट्यामुळे त्रस्त

गुंडोपंत's picture

4 Oct 2010 - 4:57 pm | गुंडोपंत

याला तर आम्ही आंबट गोड वरण म्हणतो. हे नेहमीच होते आमच्या कडे!
इडल्या पाहून भूकच लागली बरं का! मस्त मौ दिस्तायेत...

जासुश's picture

5 Oct 2010 - 10:05 am | जासुश

ह्यात मी चार भेंडिसुद्धा खप्वलि होती..

विसोबा खेचर's picture

5 Oct 2010 - 11:20 am | विसोबा खेचर

क्या केहेने..!

तात्या.

--
मिथुनदा अंमळ चिंताग्रस्त वाटताहेत, पण मुनमुन मात्र सुखाने विसावली आहे त्यांच्यावर! :)