"जागेश्वर" भटकंती भाग १

jaypal's picture
jaypal in कलादालन
2 Oct 2010 - 9:43 pm

उत्तरेत दिवस लवकर उगवतो. भल्या पहाटे ४ वाजता आम्ही सगळ्यांनी नैनिताल सोडल आणि कौसानी/ अलमोडा च्या दिशेने प्रवास सुरु केला. हवेत प्रचंड गारठा आणि भुरभुरता पाउस होता. सधाराण २५/३० मिनटे सगळे जागे होतो आणि मग एक एक करत (चालक वगळता ;) ) सगळेच जण गाढ झोपलो. जाग आली तेंव्हा सकाळचे ९.१५ वाजले होते. प्रदेश कुठला ते माहीत नाही पण नैनिताल सोडतान जे वातावरण होत त्याच्या आगदी उलट माहोल होता. स्वच्छ उन निरभ्र आकाश. अजुन काय हव ?

१.
1

२.
2

३.
3

४.
4

५.
5

मजल दर मजल करत फोटो काढत साधरण ४.३०/५ वाजता कौसानीच्या हाटेलात आम्ही प्रवेश केला. मीत्र आणि त्याच्या सौ. हाटेल चेक ईन चे सोपास्कार आटपत होते तो पर्यंत त्या हाटेलाच्या बागेतील काही फुले टिपली....खास तुमच्या साठी. सप्रेम भेट स्विकरावी ही विनंती.
६.
6

७.
7

८.
8

९.
9

१०.
10

हेच वरच १०नं च फुल जरा वेगळ्या कोनातुन आणि अजुन क्लोजाप मधे
११.
11

एकदाचे चेक ईन करुन आम्ही रुमच्या बाल्कनीत आलो आणि फक्त बघतच राहिलो आ वासुन. संपुर्ण दिवसभर प्रवासात मला वेध आणि वेड लागले होते ते या हिमाच्छादित शिखरांचे पण ढागाळ वातावरणाने पुन्हा एकदा विरजण टाकल. ढागांच्या मधे हिमालयाच्या त्या शुभ्र रांगा विलिन झाल्या होत्या. ढग नसते तर निळ्या पार्श्वभुमीवर हिमालयाच्या शुभ्र रांगा स्पष्ट पणे टिपता आल्या असत्या.
१२.
12

१३.
13

१४.
14a

१५. नशिब नशिब म्हणतात ते हेच का? बघा ना थोड्याच वेळात बाकी सगळ आकाश स्वच्छ झालं............... तेवढ हिमालय रांगा सोडुन.

14

१६.नशिबाला दोष देत होतो तेवढ्यात माझ्यावर वरुणदेवाने कृपा केली. तपस्येला फळ मिळाल. ईथल वातावरण कायमच अतीप्रचंड लहरी असत हे पुन्हा एकदा प्रकर्शान जाणवल. फोटो काढताना खरोखर मी हरवुन गेलो होतो. माझी समाधी लागली होती.

15

१७.
16.
या सगळ्यात वेळ कसा गेला ते कळलच नाही. बघता बघता सुर्यास्त झाला होता आणि रात्रीच्या जेवणा सोबत आमच्या गप्पा होत्या त्या दुस-या दिवशीच्या सुर्योदयच्या.
क्रमशः
कॅमेरा निकॉन डि९०
लेन्स निकॉन १८/५५ , ७०/३०० व निकॉन १०५ प्राईम लेन्स

छायाचित्रण

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

2 Oct 2010 - 9:54 pm | मदनबाण

अ प्र ति म ! ! ! :)
अशी भटकंती मला करायाला मिळो च्यामारी...

श्रावण मोडक's picture

2 Oct 2010 - 10:03 pm | श्रावण मोडक

चांगली प्रकाशचित्रे. सातवे आणि नववे कमाल आहे. पंधराव्या छायाचित्रातील पर्वतकड्यावरची रंगांची खेळी अजून स्पष्ट करता येईल का?
अपवाद - २ आणि १३. ही तू टिपलेली छायाचित्रे वाटत नाहीत. कारण, मला जितके मर्यादित कळते त्यानुसार, या दोन्हीमध्ये काहीही गवसत नाहीये. पहिल्यात झाडांची उंची टिपण्याचा मोह झाला, की आकाश टिपण्याचा मोह झाला? त्यातून समोरच्या दृष्याची खोली गमावली गेली. तशीच गोष्ट १३ व्या प्रकाशचित्रात. तिथं डावीकडं कोपऱ्यात झाड पकडलं गेलं, पण मग बऱ्यापैकी गवसत आलेली आकाशाची व्याप्ती गमावली गेली.
हा प्रतिसाद अगदीच समीक्षकी झाला ना? स्वतः काही टिपता येत नाही, टिपलेल्याची समीक्षा मात्र जोराची, असं झालंय!

अप्रतिम...जयपालभौ,
नेहमीच्या गोंगाटातुन वेगळ्या जगाची सफर तुमच्या छायाचित्रण कौशल्यातुन घडवल्याबद्दल आपला अतिशय आभारी...
छायाचित्रण अतिशय मस्त झालेय..पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

पिंगू's picture

3 Oct 2010 - 9:08 am | पिंगू

जयपाल भाउ, नेहमीप्रमाणे क्लास छायाचित्रण केलं आहे...

अवांतरः फटुग्राफीचा क्लास लावायचा म्हंतुया.... तुमी घ्याल ना..

- (हौशी छायाचित्रप्रेमी) पिंगू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Oct 2010 - 10:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जब्रा छायाचित्रे........!

-दिलीप बिरुटे

स्पंदना's picture

5 Oct 2010 - 10:19 am | स्पंदना

कुल!

ब्रिटिश टिंग्या's picture

5 Oct 2010 - 12:38 pm | ब्रिटिश टिंग्या

फोटो क्रमांक १४ मस्त आहे

प्रभो's picture

5 Oct 2010 - 12:44 pm | प्रभो

क ह र!!!!

विलासराव's picture

5 Oct 2010 - 2:30 pm | विलासराव

आहेत. पुढच्या भागाची वाट पहात आहे.

दत्ता काळे's picture

5 Oct 2010 - 2:36 pm | दत्ता काळे

अप्रतिम.

गणपा's picture

5 Oct 2010 - 2:40 pm | गणपा

मस्त रे चित्रपाला.

पाचवा, फुलांचे मॅक्रोज आणि चौदापासून पुढे आवडले.