फुलपाखरे

मधुशाला's picture
मधुशाला in कलादालन
30 Sep 2010 - 2:55 am

१)
From WEB

२)
From WEB

३)
From WEB

४)
From WEB

छायाचित्रण

प्रतिक्रिया

प्राजु's picture

30 Sep 2010 - 5:08 am | प्राजु

क्या बात है!!

मदनबाण's picture

30 Sep 2010 - 7:31 am | मदनबाण

सुंदर... :)

(पाखरु प्रेमी... ;) )

जिप्सी's picture

30 Sep 2010 - 9:50 am | जिप्सी

झकास आलेत फोटो ! अजून येउदेत !

अवांतर :- वॉटरमार्क कसे टाकले हे जर व्य.नि./ख.व. तून सांगाल काय?

मिसळभोक्ता's picture

30 Sep 2010 - 9:54 am | मिसळभोक्ता

मस्त वॉटरमार्क आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Sep 2010 - 10:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे सगळे पतंग आहे, फुलपाखरं नव्हेत. फुलपाखरं फक्त उडतानाच पंख उघडतात.

jaypal's picture

30 Sep 2010 - 4:21 pm | jaypal

तु चुकतेस
ती सगळी फुलपाखरच आहेत. पतंग नक्की नहीत.

गणपा's picture

30 Sep 2010 - 5:00 pm | गणपा

-(वजा) गुणिले -(वजा) = + (अधिक) या नियमा नुसार Wrong ला x (चुक) दिले तर ते बरोबर होईल ना रे भाबड्या.
विरझणनवाझांची प्रतिक्रिया आवडली.
फुलपाखरेही छान आहेत तेवढा वॉटरमार्क सोडुन.
(वॉटरमार्क ला ना नाही पण काही मर्यादा असाव्यात)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Sep 2010 - 5:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

फुलपाखरं बसल्यावर पंख एकत्र ठेवतात, पतंग पंख पसरून बसतात. हा संदर्भ पहा.
पतंग नक्की नाहीत असं असेल तर मला moth ला मराठी शब्द माहित नाही. पंख पसरलेले असल्यामुळे ही फुलपाखरं नक्की नाहीत.

परिकथेतील राजकुमार's picture

30 Sep 2010 - 4:26 pm | परिकथेतील राजकुमार

जे काय असेल ते छान मनमोहक आहे.

वॉटरमार्क जर बटबटीत आणि विरस करणारा वाटला.

मधुशाला's picture

30 Sep 2010 - 8:43 pm | मधुशाला

जिप्सी
नक्कीच सांगेन. त्यात काहीच अवघड नाहीये.

३.१४
तुमचे प्रतिसाद नेहेमीच मनोरंजक असतात. हसून हसून पुरेवाट झाली. याला पूर्वग्रहदूषित म्हणावं की घोडेछाप म्हणावं की आंधळे आणि हत्ती गोष्ट आठवावी हे ठरवू शकलो नाही. तुम्ही असा विचार केला का की ही छायाचित्रे काढताना मुद्दाम पंख उघडे असताना काढली असतील? आणखी एक, पहीले आणि दुसरे चित्र एकाच फुलपाखराचे आहे. तेव्हां त्याला काय म्हणाल? :) ही फुलपाखरेच आहेत. तुमचा अभ्यास कमी पडतोय. कारण बसलेले असताना पंख उघडे/मिटलेले असणे हा मॉथ आणि बटरफ्लाय यात फरक करणारा महत्वाचा मुद्दा नाही.

परिकथेतील राजकुमार
बरोबर आहे. मलाही बटबटीत वाटला. पण हा काढून परत छोटा वॉटरमार्क टाकायचा कंटाळा केला. पण काही जणांना बटबटीत वॉटरमार्कच आवडलेले दिसतात. तेव्हां माझे श्रम अगदीच वाया गेले नाहीत. :) (सकाळी फिरायला गेलं की काही जणांना सुर्योदय आवडतो तर काही जणांना रस्त्याकडेची दृश्ये आवडतात. ज्याचा त्याचा प्रश्न :) )

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Sep 2010 - 11:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मनोरंजक म्हटल्याबद्दल धन्यवाद. लहानपणी ऐकलेल्या गोष्टी आज इंटरनेटवर तुमच्यामुळे शोधल्या; त्याहीबद्दल धन्यवाद.
पहिल्या छायाचित्रातही पंख घट्ट मिटल्यासारखे दिसत नाहीत. हे पहा असे:

(कॅमेरा - कॅनन एस ३ आयएस Exposure: 1/640 sec, Aperture: 3.5, Focal Length: 67.4mm)
बाकी पूर्वग्रहदूषित, घोडेछाप वगैरे प्रकारच्या व्यक्तीगत ओकार्‍या काढणं अलिकडे कमी झालंय असं वाटत असतानाच ... बहुदा मधुशालेत अंमळ अतिच ...

मधुशाला's picture

1 Oct 2010 - 1:14 am | मधुशाला

संपादीत

मधुशाला's picture

1 Oct 2010 - 1:15 am | मधुशाला

संपादीत

जिप्सी's picture

1 Oct 2010 - 12:06 am | जिप्सी

आमच्या या विषयातल्या एका अभ्यासू मित्रानं आत्ताच हे फोटो बघून ही फुलपाखरचं असल्याचा दावा छातीठोकपणे केला,आणि त्यांची शायंटीफिक नावं पण सांगीतली.

अवांतर :- फुलपाखरे आणि पतंग यापैकी काही का असेना आम्हाला फोटो बरीक आवडले.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Oct 2010 - 12:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यांची शायंटीफिक नावं पण सांगीतली.

ही नावं इथे देता येतील काय?

"ही फुलपाखरंच आहेत (किंवा नाहीत)" या अधांतरी वाक्यांपेक्षा जास्त अर्थपूर्ण माहिती मिळेल.

सूड's picture

1 Oct 2010 - 9:04 pm | सूड

छान !!