गाभा:
आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये एक बातमी आहे
लिन्क http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6617954.cms
भान्डूपच्या एका मंडळाची गणपती मूर्ती ही जागेवरून हलायला तयारच नाही.
भांडूप येथील टेंभीपाडा गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातील
गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीबाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची जंगी तयारी केली होती. परंतु आश्चर्य म्हणजे जवळपास तीन-चार तास सुमारे ३०० कार्यकर्त्यांनी आणि २०-३० कंत्राटी कामगारांनी शर्थीचे प्रयत्न करूनही गणपतीबाप्पा जागेवरून अजिबात हलले नाहीत. कार्यकर्त्यांनी गणपती मंडपाबाहेर काढण्याचे अतोनात श्रम घेतले. परंतु २२ फूट उंचीच्या या बाप्पाला जागेवरून हलवणे त्यांना काही जमले नाही.
याच कार्यकर्त्यानी आणताना ही मूर्ती अगदी सहजपणे आणली होती.
प्रतिक्रिया
24 Sep 2010 - 12:36 pm | अवलिया
पुढच्या वर्षी हा "नवसाचा" गणपती म्हणुन प्रसिद्ध होणार.
24 Sep 2010 - 12:46 pm | यशोधरा
विजूभाऊ, आज ऑफिसात काम नाही वाटतं :)
धुरळा उडवण्याची पूर्वतयारी केली आहेत ती!
24 Sep 2010 - 12:52 pm | विजुभाऊ
कार्यकर्त्याना वाटतय की हे गणपतीबाप्पा रुसलेत
बहुतेक मुख्यमन्त्री जातील दर्शनाला. दूध पिणार्या गणपतीबाप्पानन्तर हा आणखी एक प्रकार
अवांतर : पुण्यात असा काही प्रकार झाला असता तर गणपतीला ठिय्या गणपती असे नाव ठेवले असते.
24 Sep 2010 - 12:52 pm | नावातकायआहे
भटापेक्षा तज्ञ आणि जॅक आणले असते तर विसर्जन वेळेत झाले असते.
24 Sep 2010 - 1:08 pm | गणपा
हेच का ते बाप्पा. बातमीतील वर्णना वरुन तरी हेच वाटले.

परवाच भांडुपचा राजा म्हणुन आलेल्या एका विरोपातुन साभार.
24 Sep 2010 - 1:10 pm | यशोधरा
कसला गोड दिसतोय बाप्पा! :) प्रसन्नवदन अगदी!
24 Sep 2010 - 1:11 pm | अवलिया
मस्त फटु !
गणपती बाप्पा मोरया !!
25 Sep 2010 - 10:00 am | पाषाणभेद
मुर्तीत खूपच वेगळेपण दिसते आहे. केवळ अशा वेगळेपणासाठीच गणपतीउत्सव असावा असे वाटते.
मुर्तीकार प्रशांत मयेकरांचे अभिनंदन.
24 Sep 2010 - 1:28 pm | pratik jadhav
फारच सुन्दर मुर्ती आहे.... गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...
24 Sep 2010 - 1:36 pm | मितभाषी
फारच सुन्दर मुर्ती आहे.... गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...
जय म्हसोबा, मावलाइ, साळकाइ, म्हाळकाइ, खोकल्याइ, मान्गीर्बाबा, येताळबाबा, पिरबाबा, मुन्जाबा....जय चास खुर्द.
24 Sep 2010 - 2:01 pm | परिकथेतील राजकुमार
साला दुसर्याचा धागा कसा हायजॅक करायचा ते आमच्या गणपाला विचारा.
24 Sep 2010 - 2:13 pm | गणपा
=)) =)) =))
हायला आम्ही काय केलं बॉ ;)
24 Sep 2010 - 2:12 pm | विजुभाऊ
या बाप्पाला पुढच्या वर्षी लौकर या म्हंटले तरी बाप्पा तिथेच आहे.
या मागेकाहीतरी गौडबंगाल असावे. कोणाचा हात आहे हे उघड व्हायचे आहे
24 Sep 2010 - 2:30 pm | सूड
चौरंगाखाली चुकून फेविकॉलची डबी राह्यलीय का ते तपासायला हवं या लोकांनी !!
24 Sep 2010 - 4:20 pm | नितिन थत्ते
आमच्यासूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार यामागे गणपती बाप्पाचाच हात आहे. यंदा कलमाडी साहेब राष्ट्रकुलात बीजी झाल्याने पुणे फेष्टिवलकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे बाप्पा रागावले आहेत. आणि बाप्पा चिकटून बसला आहे आणे चिकटवलेल्या टाइल मात्र पडत आहेत. :)
24 Sep 2010 - 2:59 pm | निखिल देशपांडे
छे!!!
आज काल लोकांना देवदेवतांच्या ईच्छा कळत नाही. देवदेवतांनी पुराणात वापरलेली दृष्टांताची पद्धतच चांगली होती. आहो आता या बाप्पाला एवढेच वाटतं असावे की भांडुपात त्यांचे एक मंदिर असावे. म्हणुनच त्या जागेवर बाप्पा स्थानपन्न झालेले आहेत. आम्हाला तर मनापासुन वाटते की भांडुपच्या राजाचे मंदीर झालेच पाहिजे (म्हणजे आमच्या पक्षश्रेष्टींच्या हयातीत एक तरी मंदिर झाल्याचे समाधान ;)). देव पावला म्हणायचे आणि देवाच्या दयेने मंदिर तेथे व्हायलाच हवे.
तुम्ही लोक मंदिर तेथे बनवणार असाल तर आमची हरकत नाहिए. तसाही भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. त्यामुळे प्रत्येक धर्माला आपाआपली श्रद्धास्थाने राखण्याचा पुर्ण हक्क आहेच. आमचा विरोध आहे तो सरकारी मालकीच्या जागेवर मंदिर बनविण्याबाबत. जर तुम्हाला त्या जागेवर मंदीर बनवायचे असेल तर तुम्हाला आमच्या मुस्लिम बांधवांसाठी तिथे एक मशिद बांधुन द्यावी लागेल. कारण काय अल्पसंख्यांक असले म्हणुन काय त्यांचा पण सरकारी मालमत्तेवर तेवढाच अधिकार आहे.
(वरील मते माझी नसुन या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांचा प्रतिकात्मक प्रतिक्रिया आहे. कुणीही माझ्या प्रतिसादा मुळे आपल्या "भावना" भडकु देउ नयेत)
अवांतर :- काही वर्षांपुर्वी भांडुपचे निवासी असलेल्या आमच्या एका मित्राने या घटनेवर प्रकाश टाकावा ही विनंती,
24 Sep 2010 - 3:11 pm | परिकथेतील राजकुमार
ह्या वाक्यावरुन काही दिवसांपुर्वी आमचे परममित्र श्री. पोलाईट धम्या ह्यांनी भडकलेल्या भावनेवर लिहिलेल्या कथेची आठवण झाली.
25 Sep 2010 - 1:21 pm | Nile
भरपुर प्रयत्न करुनसुद्धा ५० प्रतिसाद गोळा न झाल्याने सहानुभुती दर्शवतो.