.....ओठांवर अ़क्षरशः वाट्टेल त्या शिव्या येतायत.
काल काही तातडीच्या कामासाठी कोल्हापुर oneday trip मारावी लागली.६-३० शिवनेरी...पोचल्या पोच्ल्या कामे उरकायची घाई..धावपळ. आपल्या लोकांचा ढिसाळ कारभार्...अर्धवट राहिलेली कामं.फुकट,व्यर्थ ठरलेली दगदग .परत ९ च्या आत घरात्!चं tension! अक्षरशः काव आला होता! त्यात परतीच्या प्रवासात "मिळेल ती" बस घेण्याच्या नादात पांढर्या जांभळ्या बसमध्ये बसले. खबडक खबडक घोडोबा करीत ८.३० -८.४५ वाजता बस पुणे मुक्कामी पोचती झाली.
काय त्या ड्रायव्हरला कोण चावलं होतं देव जाणे काल! निव्वां........त चालु होतं. इथे थांब्..तिथे थांब. हात दाखवा बस थांबवा सारखं!
..... वास्तव्य बि.वाडीत असल्यामुळे बालाजीनगर ला उतरले. रिक्षा स्टँडवर जाउन विचारले.
दादा,रिक्षा आहे का?
मग्रूर आवाज" कुटं जायचय"
बिबवेवाडी.
त्याने पच्कन थुंकत नकारार्थी मान हलवली.
माझी परत आर्जवं, अहो चला ना. .. हवे तर ठरवून घ्या पैसे.. रीटर्न भाडे घ्या.
(actually मी चालुन जाउ शकलेही असते...पण आमचं माहेरपण नडलं... हेssssss सामान बरोबर)
जाउ दे म्हणुन मागच्या दादांना विचारले....त्यानेही पहिल्याच्या री मध्ये री ओढली.
तिथुन कशी बशी थोडे अंतर चालुन आले दुसरे रिक्षावाले फोनवर बोलत होते. मी विचारले असता त्याने असा थांबा ओ जरा असा हात केला...त्याच ते बोलण होइपर्यंत मी आशेवर उभी की हा नेइल कदाचित.
जवळ्च जायचय हे कळल्यावर त्याचेही तेच उत्तर्...मग जाम सटकलं डोकं....आवाज चढला....थोड्क्यात बाचाबाची झाली (अजुन थोड वेळ गेला असता तर शब्दशः 'बा'चा 'बा'ची झाली असती).पण एक दुसरे काका मध्ये पडले आणि सोहळा आवरता घेतला.
हे नेहमीच घडतं. हे रिक्षावाले वेळ पहात नाहीत्,सोय पहात नाहीत्. माणुसपण पहात नाहित. आजारी,म्हातारे असोत नाहितर भर दुपारी उन्हातन्हात तान्हं बाळ घेउन जाणारी बाई असो. यांना काहीही फरक पडत नाही.मीटर प्रमाणे जे पैसे होतात ते द्यायला, कधी कधी extra द्याय्ला सुद्धा तयार अस्तात लोक. पण नाही.
आणि minimum tarrif ठरलेलं असताना अशी अडवणूक करायची गरज नसते. अर्धा किलोमीटर जरी गेलंतरी त्यांचे ते minimum tarrif आपण देतो. मग मला कळत नाही की हे असे का करतात. त्यांचे नुकसान तर काहिहि होत नसते.
कँपातून तर रिक्षा तयारच नसतात याय्ला ..return देऊ असे सांगुनही नन्नाचा पाढा॑ असतो.
काही अपवाद रिक्षावाले असतातही..मी काही समस्त रिक्षावाळ्यांचा उध्धार करत नाही आहे. बर्याचदा अतिशय प्रामाणिक पणाचे अनुभावही हे लोक देऊन जातात. पण हाही प्रकार आहेच ना!
यासाठी आप्ल्याला काहीही करता येत नाही याचा इतका संताप येतो ना!
कसे react व्हावे अशा लोकांशी? काही कायदा आहे का कि ज्याने हे लोक बांधील होतिल प्रवाशांची ने-आण करायला?
काय केलं म्हणजे वठणीवर येतिल?
पुण्यातले माजोरी , xyz..... xyz...रिक्षावाले..!
गाभा:
प्रतिक्रिया
22 Sep 2010 - 12:07 pm | अवलिया
पुण्यातले माजोरी... द्वीरुक्ती ;)
पाच का दस ... बाल्कनी फुकाट... पाच का दस ... बाल्कनी फुकाट...
सेंग गरम ... पॉपकार्न.... एय.. सेंग गरम ... पॉपकार्न..
मजा येणार हे नक्की !
22 Sep 2010 - 1:13 pm | चिंतामणी
यात थोडी दुरूस्ती.
माजोरी रिक्षावाले ही द्वीरुक्ती
रिक्षावाले म्हणजे माजोरी असलाच पाहीजे. (सन्माननीय अपवाद वगळता) मग तो कुठल्याही गावातील असु देत.
जाता जाता पुणेकरांचा उल्लेख माजोरी म्हणून केल्याबद्दल निषेध.
(पॉपकॉर्नचे पुडे आले आहेत. फांदीवर बसलो आता)
22 Sep 2010 - 3:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>रिक्षावाले म्हणजे माजोरी असलाच पाहीजे. (सन्माननीय अपवाद वगळता) मग तो कुठल्याही गावातील असु देत.
सहमत आहे. ट्राफीक पोलिसांनी रिक्षालावाल्यांना दंडाची पावती देत असलेले दृष्य दिसले की मला खूप आनंद होतो. [हा आनंद मनातल्या मनात असतो] रिक्षावाल्यांच्या रिक्षा जप्त करुन आरटीओ कार्यालयात नेल्यावर आणि त्यांना दंड भरायला लावल्यावरचा आनंद क्या कहने. अशावेळी बिचार्यांचे कसे होईल, हातावरचे पोट असते, वगैरे अशा भावनांना मी नम्रपणे ठोकर मारतो.
-दिलीप बिरुटे
22 Sep 2010 - 4:04 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
पुढल्या वेळी असे काही संस्मरणिय दृस्टीपथास पडले तर तर तुमचा आनंद द्विगुणित झाला असे समजा.माझ्या वतीने एखादी टाळी वाजवलीत तरी चालेल.
22 Sep 2010 - 11:09 pm | पारुबाई
पुणेकरांचा उल्लेख माजोरी म्हणून करु नका हो प्लिज.
बंगलोर चे रिक्षावाले तर यांना देखील मागे टाकतील.
आत्ता पण त्या विचाराने माझ्या डोक्यातील शीर ताडताड उडायला लागली आहे.
22 Sep 2010 - 1:52 pm | विजुभाऊ
आम्ही पुण्याबाहेरचेच.
पुण्याला नाही पण पुणेकरांबद्दल बरेच ग्रह बाळगून आहोत.
पण पुण्याला नावे ठेवायची नाहीत अशी एक फॅशन निघालीय म्हणे.
पुणेरी पाट्या ऐवजी ठाणेरी पाट्यांवर सम्शोधन करायचा विचार करतोय
23 Sep 2010 - 4:59 am | पाषाणभेद
पुण्याबाहेरचे? कालपरवा तर तेथे फ्लॅट भाड्याने घेतल्याच्या गप्पा मारत होता तुम्ही विजूभौ!
24 Sep 2010 - 7:26 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
ऐका हो ऐका....
आज पुणेमुक्कामी, छावणी भागात खरेदीसाठी गेले असता,
परत येताना पहिलाच रिक्षेवाला बि.वाडीला यायला तयार झाला हो!..........
बहुदा मिसळ्पाव वर चाललेली खलबते कानावर पडलेली दिसतात....
म्हणून समस्त मिपाकरांचे आणि पुणेकर रिक्षावाल्यांचे जाहिर आभार!......
24 Sep 2010 - 7:28 pm | अवलिया
अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!!
खरे तर ही बातमी वेगळा धागा करुनच सांगायला हवी तुम्ही!!
=))
24 Sep 2010 - 11:57 pm | मृत्युन्जय
सकाळा कडे पण पाठवुन द्या वाचकांच्या पत्रव्यवहारात. लोक अंबळ हळवे होतील हे वाचुन
25 Sep 2010 - 12:03 am | चिंतामणी
पण मुक्तपीठ पुरवणीसाठी.
Pl note मुक्तपीठ पुरवणीसाठी
22 Sep 2010 - 12:15 pm | मृत्युन्जय
२००+ प्रतिसाद. जागा राखीव. १० का बीस १० का बीस (सामना सुरु होण्याआधीच ब्लॅकचे दर वाढतात ना तसेच.)
22 Sep 2010 - 9:48 pm | पैसा
द्यायचे किती ते बोला. पुढे इं स्नेही, नाना आणि पु पे ने जागा धरून ठेवल्या आहेत!
22 Sep 2010 - 10:00 pm | मृत्युन्जय
१० का पचास, १० का पचास १० का पचास १० का पचास १० का पचास १० का पचास
मर्यादित जागा शिल्लक, फर्स्ट कम फर्स्ट सीट बेसिस.
22 Sep 2010 - 12:18 pm | कानडाऊ योगेशु
रिक्षावाल्यांचा हा मस्तवालपणा सर्वत्र सारखाच आहे.
बेंगलोरमध्येही असे अनुभव येतात.
मलाही त्यांची प्रचंड चीड येते.
पण ह्या रिक्षावाल्यांचा एक चांगला गुण म्हणजे तुम्ही एखादा पत्ता हुडकत असाल आणि एखाद्या रिक्षावाल्याला विचारले अमुक अमुक ठिकाण कुठे आहे तर आतापर्यंत तरी मला त्यांनी व्यवस्थित मदत केली आहे.(फक्त पत्ता सांगायला त्या ठिकाणी पोहचवायला नव्हे.)
22 Sep 2010 - 12:23 pm | अविनाशकुलकर्णी
काय बोलणार...परत ६ सिटर चालु करावि म्हणुन दादांना साकडे घातले पाहिजे...
बहुतेक आपणास xyz च्या ऎवजी yz म्हणाचे असेल असे वाटते..
22 Sep 2010 - 12:22 pm | गुंडोपंत
न्युयार्क, लंडन, सिंगापोर, ब्यांककॉक आणि प्यारिस येथील रिक्षावाल्यांच्या अनुभवा विषयीही वाचायला आवडेल.
22 Sep 2010 - 12:26 pm | अवलिया
तिथे टॅक्स्या असतात असे ऐकले आहे. अनुभव नाही.
22 Sep 2010 - 2:33 pm | तिमा
वॉशिंग्टन डी. सी. ला सायकल रिक्शात बसलो होतो. स्मिथसोनियन म्युझियम मधून बाहेर पडल्यावर चार पाच सायकलरिक्शावाले आणि एक वालीपण उभे(भी) होते. त्यातल्या एका ब्लॅकच्या रिक्शात मी , माझी मुलगी व बायको असे 'वाटीत पुरण' अशा अवस्थेत बसलो. पैसे आधीच ठरवले होते. त्या सदगृहस्थाने आमच्या तिघांचे धूड चढाच्या रस्त्यावर लीलया ओढत आम्हाला जेफरसन मेमोरियल, लिंकन मेमोरियल अशी जवळची सर्व ठिकाणे दाखवली आणि ती सुध्दा रनिंग कॉमेंट्री सकट.
एक उत्तम अनुभव!!!
22 Sep 2010 - 2:46 pm | विनायक प्रभू
चला नानाची सोय झाली
22 Sep 2010 - 6:05 pm | चिंतामणी
एक जन बी आपुन परदेशवारी केली हे सांगायची संधी सोडत नाही.
22 Sep 2010 - 9:19 pm | तिमा
परदेशवारी ही आता कौतुकाची उरलेलीच नाही. तिकडचे अनुभव विचारले म्हणून लिहिले.
आम्ही अनुभवांचे प्रदर्शन भरवत नाही.
23 Sep 2010 - 7:34 am | गुंडोपंत
रिक्षा ब्लॅकने? बापरे हा प्रकार इकडे म्हणजे भारतात आलाततर वांदेच आहेत मग!
आम्हाला तिकिटांचाच ब्लॅक माहिती आहे. शोलेच्या वेळी कसला मोठा होता तो... आमचा अनुराधा थेटर वालाच त्यात सामील असे आम्हाला सौंशय होता. असो.
चमत्कारिक असणार तुमची परिस्थिती. किती पैसे दिले नक्की? त्यापेक्षा पोलिसाला बोलवायचे...
मी आजवर असे ऐकले नव्हते...
"वॉशिंग्टन डी. सी. ला सायकल रिक्शात बसलो होतो. "
वॉशिंग्टन... शिवाय सायकल रिक्षा?
काहीच समजत नाहीये मला. तुम्ही कलकत्त्या विषयी म्हणत आहात का?
जरा उलगडून सांगता का हा लोच्या?
22 Sep 2010 - 7:15 pm | प्रदीप
तुम्ही विचारलेल्या सगळ्या शहरांच्या विमानतळावरून मी ट्रांझिट केलेले आहे, पण तिथे कुठे टॅक्सीज्स दिसल्या नाहीत (कदाचित माझ्या जेट लॅगमुळे मला दिसल्या नसाव्यात). नाही म्हणायला हाँगकाँगच्या एयरपोर्टवर काही लोक एका छोट्या, आपल्या इथे गोल्फ कोर्सवर वापरतात तसल्या गाड्यांतून इथेतिथे फिरत होते, म्हटले मूर्खच दिसताहेत इथले लोक, आम्ही हे असले कार्ट्स फक्त गोल्फकोर्सेसवरच वापरतो, ते इथे विमानतळांवर आणणे शोभून दिसते का कुणाला? मी नाक मुरडले आणि त्या तसल्या गाडीवर बसलेल्या बुवाने 'काय' असे मला भुंवया उंचावत विचारले? मी म्हटले 'यू पीपल्स आर स्टूपिड, धिस इज नॉट अ रोड, नो?' आपल्याला काही हे कळलेच नाही असे तो दाखवत निघून गेला. तर ते जाऊ दे, काय सांगत होतो-- परदेशांतील टॅक्सीज. मी उत्तर कोरियात पाहिलेल्या टॅक्सीज छान होत्या. प्रशस्त मोठ्ट्।या टॅक्सीज! पुढपासून मागपर्यंत एक पंगत जेवावयास सहज बसू शकेल, असा विचार माझ्या मनात तेव्हा आला. पण क्यूबातील टॅक्सीजना तोड नाही हो!! तेथे टॅक्सीज स्थानिकांसाठी फुकट आहेत, हे समजल्यावर मी तेथील एका व्यक्तिशी दोस्ती केली व तिच्यासमवेत सगळीकडे फुकटात फिर फिर फिरलो!! त्यातून ते टॅक्सीवाले प्रत्येक गिर्हाईकास (फुकट अर्थात) क्यूबन सिगार देत होते. पहिली घेतली आणी झुरका घेतल्यावर इतका ठसका लागला, टॅक्सी ड्रायव्हरने रस्त्यातच थांबवून त्याच्याकडील टिश्यूने (त्यावर 'चे' चा फोटो होता) माझे डोळे व नाक पुसले. ते सगळे होईंस्तोवर मागे सारा ट्रॅफिक तसाच खोळंबून राहिला होता. नंतर मात्र संवय झाली, पुढील अनेक टॅक्सी प्रवासात मस्त क्यूबन सिगार आणी स्थानिक दारू....फुकटात.
22 Sep 2010 - 7:39 pm | श्रावण मोडक
हाहाहाहा... क्यूबाचा अनुभव मात्र याहीपेक्षा सविस्तर लिहिण्याजोगा आहे. लिहा. वाट पाहतोय.
22 Sep 2010 - 10:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
यू टू ब्रुटुस?
23 Sep 2010 - 7:38 am | गुंडोपंत
अनुभव जबरा आहे. आवडला. टॅक्सीत सिगार आणि दारू म्हणजे खल्लास!
एक ३०-४० वर्षे आधी कळले असते तर जाऊन तरी आलो असतो कॉ. डांगेंच्या बरोबर.
आता काय उपयोग?
असो, यावर तर एक लेख यायला हवा.
फिडेल क्यास्ट्रोच्या देशा विषयी 'अमेरिका जे सांगेल तेच' जगाला माहिती आहे. तुमच्या कडून पण काही येऊ द्या, एखादा झकास लेख वगैरे?
22 Sep 2010 - 12:33 pm | सुहास..
झो प ये ते य ना आ ज का ल व्य व स्थि त !!!
22 Sep 2010 - 1:15 pm | मृत्युन्जय
पुण्यातले रिक्षावाले जस्से पच्चकन थुंकतात तसे मी पच्चकन हसलो अशी स्मायली आहे इथे असे समजुन घ्या.
22 Sep 2010 - 1:50 pm | विश्वनाथ मेहेंदळे
साहेब, संवेदनशील लिखाण बंद केलेच आहे तर आता असे असंवेदनशील शेरे पण बंद करा.
मिपाकरांकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा ठेवणे चूकच आहे का हो? की एकदा मदत मागून मग अनेक दिवस असे टोमणे ऐकत बसावे.
22 Sep 2010 - 2:23 pm | सुहास..
मिपाकरांकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा ठेवणे चूकच आहे का हो? की एकदा मदत मागून मग अनेक दिवस असे टोमणे ऐकत बसावे.
>>>
गप्राव !! (सौजन्य : धमाल मुलगा)
जरा मस्करी केली की आम्हालाबी टोला का ?
22 Sep 2010 - 2:25 pm | अवलिया
जरा मस्करी केली की आम्हालाबी टोला का ?
श्री सुहास यांना सुचना - सध्या मस्करीवर बंदी असुन एक एक लिटर एरंडेल पिऊन लेख, प्रतिसाद लिहिणे आवश्यक असल्याची नोंद घ्यावी.
22 Sep 2010 - 2:50 pm | llपुण्याचे पेशवेll
हा हा हा...
हा नाना आणि सुहाशा आजकाल फार एरंडेल पियाला लागला आहे.
23 Sep 2010 - 12:10 am | विश्वनाथ मेहेंदळे
>>गप्राव !! (सौजन्य : धमाल मुलगा)
गप्राव चा अर्थ माहित नाही. त्यामुळे तो काहीतरी चांगला आहे असे गृहीत धरतो.
>>जरा मस्करी केली की आम्हालाबी टोला का ?
माफ करा, अनेक जणांचा राग तुमच्यावर निघाला. लोकांनी यापेक्षा गंभीर विषयाची पण तर उडवायची संधी नाही सोडली.
जाता जाता अवलिया यांना फुकटचा सल्ला (आम्ही न मागता पण सल्ले देतो).
तुम्ही घ्याच एकदा एरंडेल. एकदा शुद्धीकरण होऊनच जाऊ दे. हघ्याहेवेसांनल
22 Sep 2010 - 12:58 pm | नावातकायआहे
गाय छाप , चुनापुडी , सुपारी आनि पार
22 Sep 2010 - 1:07 pm | गणपा
गल्ली चुकली गं.
'राज'दरबादात ने तुझ साकडं.
:)
22 Sep 2010 - 1:18 pm | श्रावण मोडक
घरी कश्या गेलात शेवटी? :)
22 Sep 2010 - 1:26 pm | Pain
स्वारगेट, पुणे स्टेशन इ. ठिकाणी रिक्षा स्टँडजवळ बूथ बांधले होते. रिक्षा रांगेत असायच्या, स्थानकातून प्रवासी बाहेर आला की बूथपाशी जाउन जिथे जायचय तो पत्ता/ भाग सांगत असे, अंदाजे भाडे आणि रिक्षाचा नंबर हे लिहून ठेवले जात असे आणि हे पाहायला १ पोलीसही तिथे असे. भाडे नाकरणे वगैरे शक्यच नसे.
इतकी चांगली योजना असल्याने ती थोड्याच दिवसात बंद पडली.
मी रिक्षाने कधीच प्रवास करत नाही. फक्त बाईक, ती नसेल तर बस आणि चालणे.
22 Sep 2010 - 1:28 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
आधी फिरलेलं डोकं....जर्रा पुढे जाउन एकाला विचारले.अहे का रिक्षा? तो म्हणाला कुठे जायचय? मी सांगितले बिब्वेवाडी कोंढवा रोड. बसा म्हटल्यावर मे बसले. थोडे पुढे गेल्यावर त्याला रस्ता सांगायला चालु केला इथे वळा...तिकडुन घ्या.
आणि मला थांबायचे होते तिथेच थांबले.आणि मीटर प्रमाणे पैसे काढुन ठेवले.
तो वैतागुन म्हणाला कि तुम्हाला कोंढवा रोड ला जाय्चे होते ना.
अहो एक काम आठवलं... urgent होत ओ. sorry हं!
म्हणुन मी गेटमध्ये चालु लागले!
22 Sep 2010 - 1:29 pm | Pain
शाबास.
22 Sep 2010 - 1:44 pm | जिन्क्स
तो रिक्षावाला आता मिपा वर लेख टाकेल... ' पुण्यातले (बहुतेक कोल्हपूरवासी) माजोरी,abc...abc...प्रवासी '
22 Sep 2010 - 1:56 pm | स्वानन्द
हा हा... अगदी अगदी :)
22 Sep 2010 - 11:03 pm | चिगो
मस्त लावली त्याची तुम्ही... वाट हो.. आवडलं हे आपल्याला..
22 Sep 2010 - 1:52 pm | Nile
पुण्यातले रिक्षावाले तसेच आहेत.
पुढे? ;-)
बाकी क्वोल्हापुरात वडाप अजुन सुरु आहेत का हो? धमाल यायची त्यात बसायला.
22 Sep 2010 - 2:08 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
वडाप....
एक ट्रॅक्स .... तिच्या ड्रायव्हर शेजारच्या जागेवर ४ माणसं.ड्रायव्हर शेजारचा बसलेला गियर असा दोन गुड्घ्यांमध्ये घेउन बसलेला.बाकी ३ असे पुढे -मागे "अॅडजस्ट" झालेले.
मध्ल्या जागेत कमीत कमी ५ ते साडेपाच (एखाद्या पोट्ट्याला चिंबवले जातं)
आणि मागे ३+३ ...मध्ल्या रिकाम्या जागेत भाजिच्या बुट्ट्या,पिशव्या.बाहेर लोंबकळत २ जणं...
हे अजुनही चालु आहे.
पण इतके असुन ते मधले केर्ली (गाव) चा ष्टॉप दे रं बाबा असं एखादी आजी म्हणाली तर तो नाही म्हणत नाही.
बस गं म्हातारे...म्हणून तिचे ओझे उतरून देण्यापर्यंत केले जाते.
22 Sep 2010 - 2:52 pm | llपुण्याचे पेशवेll
वा वा वा. कोल्लापुरचे वडापवाले अंबळ सज्जन दिसतात. त्यांना सांगा पुण्यात येऊन रिक्षा चालवायला. :)
22 Sep 2010 - 2:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पेशवे, पुणे कराराला स्मरून सांगा मला, हे वडाप काय असतं?
22 Sep 2010 - 2:59 pm | llपुण्याचे पेशवेll
ऐला तुला वडापवाले माहीत नाहीत? इथे विचार सगळी माहीती मिळेल. :)
22 Sep 2010 - 3:06 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुणे कराराचा अवमान करणार्या पेशव्यांचा निषेध!
22 Sep 2010 - 4:20 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
वडाप....
एक ट्रॅक्स .... तिच्या ड्रायव्हर शेजारच्या जागेवर ४ माणसं.ड्रायव्हर शेजारचा बसलेला गियर असा दोन गुड्घ्यांमध्ये घेउन बसलेला.बाकी ३ असे पुढे -मागे "अॅडजस्ट" झालेले.
मध्ल्या जागेत कमीत कमी ५ ते साडेपाच (एखाद्या पोट्ट्याला चिंबवले जातं)
आणि मागे ३+३ ...मध्ल्या रिकाम्या जागेत भाजिच्या बुट्ट्या,पिशव्या.बाहेर लोंबकळत २ जणं...अश्या प्रकारच्या मानवी खासगी वाहतूक संस्थेला 'वडाप' असे म्हणतात. हे ग्रामिण भागात फुल्ल चालते.
त्याचा मूळ शब्द ओढत नेणे...वरुन ओढाप्...आणि होता होता अपभ्रंश जाहला तयाचा 'वडाप' अशी व्युत्पत्ती व्याख्या असावी असा कयास आहे.
22 Sep 2010 - 5:46 pm | अप्पा जोगळेकर
अजंठा सातमाळ रांगेत भटकताना वरचेवर प्रवासासाठी जीपड्या वापराव्या लागतात तिथेही हाच अनुभव येतो. वडाप छाप.
22 Sep 2010 - 3:34 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
स्वारगेट- कात्रज रस्त्यावर , इथल्या रिक्षेवाल्यां बरोबर चालव्तील तर फेफरं येउन फ्या होउन पड्तील.
ते तिथेच बरे आहेत. :)
22 Sep 2010 - 3:38 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
स्वारगेट- कात्रज रस्त्यावर , इथल्या रिक्षेवाल्यां बरोबर चालव्तील तर फेफरं येउन फ्या होउन पड्तील.
ते तिथेच बरे आहेत. :)
शिवाय्....पुण्यातली हवा सज्जन्पणाला मानवत नाही असे ऐकिवात आहे.
22 Sep 2010 - 3:53 pm | मनीषा
.पुण्यातली हवा सज्जन्पणाला मानवत नाही असे ऐकिवात आहे.
का हो ? अंमळ रागात दिसता...
पुणेरी लोकांना रावण पिठले आवडले नाही काय ?
22 Sep 2010 - 5:52 pm | शेखर
रावण पिठले खाल्यामुळेच चिडचिड वाढली असेल.
22 Sep 2010 - 1:55 pm | वेताळ
पण आपला दिसत नाही, असे कोणतरी विचारवंताने लिहुन ठेवले आहे.
22 Sep 2010 - 1:56 pm | विजुभाऊ
मुम्बैत असे अनुभव कमी येतात.
रीक्षावाले पत्ता सांगितला तर नुसते घुमवत बसत नाहीत.
पुण्यातील रीक्षावाले बहुतेक पुण्यातलेच आहेत.
मुम्बैत बहुतेक रीक्षावाले परप्रान्तीय आहेत.
( खावा आता जोरदार दणके विजुभाऊ.... )
22 Sep 2010 - 2:00 pm | पुष्करिणी
सांगू का घरमालकाला ?
22 Sep 2010 - 2:56 pm | यशोधरा
सांग, सांग. नेक काम को देरी कायको?
22 Sep 2010 - 3:12 pm | धमाल मुलगा
नेक काम को देरी कायको?
भाऊंनी बदलली बायको!
-धमाल मुलगा,
न्युज एडिटर, पोलिस टाईम्स.
22 Sep 2010 - 3:12 pm | स्वानन्द
>>( खावा आता जोरदार दणके विजुभाऊ.... )
ते तुम्हाला इथले रिक्षावाले देतीलच :) तेव्हा मेलेल्याला आणखी मारण्यात काय मजा
23 Sep 2010 - 10:40 am | pratik jadhav
मुम्बई मधले काही रिक्शा वाले पण असेच आहेत... सन्ध्याकाळ च्या वेळी तर यायला तयारच नसतात...रोजच्या नकार घण्टे मुळे कण्टाळुन आता ओफिस मधुन बस स्टॉप पर्यत रोज पायीच जातो...त्यातुन आमचे ऑफिस पण टेकडी वर आहे...(पवई ला डोन्गर पो़ख्ररुन केलेले)... मजा एकच की यामुळे आमचा रोज एक छोटा ट्रेक होतो .... :)
22 Sep 2010 - 2:01 pm | कालिन्दि मुधोळ्कर
बंगलोर मधले रिक्षावाले जगात सगळ्यात आडमुठे आहेत. तेव्हा शांत व्हा.
22 Sep 2010 - 2:04 pm | अवलिया
बंगलोरचे पाणी माणसाला आडमुठा बनवते असा आमचा अनुभव आहे.
22 Sep 2010 - 2:09 pm | यशोधरा
बंगलोरात वरिजिनल मुळा मुठा नसल्याने असेल! :)
22 Sep 2010 - 2:12 pm | अवलिया
वरिजिनल मुळा मुठा जलप्राशनाने आडमुठेपणा कमी होतो का ?
22 Sep 2010 - 2:47 pm | यशोधरा
नाही :) वरिजिनल मुळा मुठा जलप्राशनाने, आडमुठेपणावर काय उपाय करायचे ते बरोब्बर कळते! :D
22 Sep 2010 - 2:48 pm | अवलिया
तरीही पुणेरी रिक्षावाल्यांवर उपाय सापडला नाही.. आश्चर्यच आहे.
22 Sep 2010 - 2:51 pm | यशोधरा
वरिजिनल मुळा मुठावाल्यांची तक्रार नसतेच रिक्षावाल्यांबद्दल! :)
22 Sep 2010 - 2:53 pm | अवलिया
नक्की का ? की पुणेरी रिक्षावाल्यांना संभाळुन घेतले जात आहे?
22 Sep 2010 - 3:16 pm | यशोधरा
हॅ हॅ हॅ..
23 Sep 2010 - 4:29 am | शुचि
बरं झालं शेवटी हसलीस ते नाहीतर नाना वूड हॅव गॉट लास्ट वर्ड व्हिच ही वॉज डाईंग फॉर.
23 Sep 2010 - 4:08 pm | यशोधरा
आणि आता तर चान्सच नै! नै का? ;)
22 Sep 2010 - 2:13 pm | ब्रिटिश टिंग्या
बंगलोरी माणुस डोक्याला एरंडेल तेल लावता लावता तेच प्यायला कधी सुरुवात करतो हे त्यालाच समजत नाही! :)
22 Sep 2010 - 2:15 pm | अवलिया
भरीस भर समोरच्याने पण प्यावे असा (त्याच्यामते) प्रेमळ आग्रह करतो.
23 Sep 2010 - 10:14 am | विजुभाऊ
बंगलोरचे पाणी माणसाला आडमुठा बनवते असा आमचा अनुभव आहे.
डान्याल्ला विचारायला पायजे
( पुण्यात मुळा मुठा. बंगलोरी अडमुठा )
22 Sep 2010 - 2:41 pm | इंटरनेटस्नेही
प्रतिसादासाठी जागा आरक्षित.
22 Sep 2010 - 2:42 pm | अवलिया
सहमती किंवा असहमतीसाठी जागा आरक्षित
22 Sep 2010 - 3:00 pm | llपुण्याचे पेशवेll
+१ / -१ साठी जागा आरक्षित.
22 Sep 2010 - 3:26 pm | गणपा
इथे पण आरक्षण पाहुन डोळे पाणावले .
22 Sep 2010 - 2:51 pm | कुंदन
महान आहात नाना आपण.
22 Sep 2010 - 3:05 pm | नितिन थत्ते
अरे नुसता शो काय बघता?
आज ८.०० वाजेपर्यंत किती प्रतिसाद येनार यावर बेट घेनार का कोणी?
माझी बेट १०० रु. ८ वाजायच्या आत १५० क्रॉस होतात.
22 Sep 2010 - 3:13 pm | धमाल मुलगा
द्या ते शंभर रुपये मला. :)
22 Sep 2010 - 3:15 pm | यशोधरा
मी घेतले ते. भेळ आणायचीये, झालंच तर पॉपकॉर्न.
तुला कशाला पायजेत? उगंच उडवशील हिकडं तिकडं!
22 Sep 2010 - 10:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
येवढी फील्डींग लावून पण हरलासच ना!!
22 Sep 2010 - 3:12 pm | ब्रिटिश टिंग्या
तुम्ही रिक्षावाल्यांना सांगितलं होतं का की तुम्ही कोल्हापुरहुन येत आहात ते?
22 Sep 2010 - 3:41 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
...का बॉ ? अस का विचारलत?
22 Sep 2010 - 4:11 pm | ब्रिटिश टिंग्या
नाही, कदाचित तो रिक्षावाला मिपाकर असायचा :)
22 Sep 2010 - 3:22 pm | सविता
०२०२७४९२८२८
०२०२६०५१४१४
०२०२६१२३५२०
रिक्षावाल्यांबद्दल कुठलीही तक्रार करण्यासाठी ह्या नंबर वर फोन करा...
जास्त भाडे आकारणे, जवळ्चे भाडे नाकारणे किंवा इअतर कुठल्याही.....
22 Sep 2010 - 3:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
थँक्स अ लॉट! याची फार गरज होती मला!
22 Sep 2010 - 3:29 pm | धमाल मुलगा
असु द्या. लिहुन ठेवा हं नंबर.
उपयोग मात्र शून्य!
22 Sep 2010 - 3:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
उपयोग का म्हणे शून्य?
22 Sep 2010 - 3:43 pm | धमाल मुलगा
अनुभव हिच खात्री. ह्याउप्पर काय सांगू?
22 Sep 2010 - 3:45 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
धन्यवाद.......
++१
खरच मनापासुन धन्य्वाद!
22 Sep 2010 - 4:18 pm | सन्जोप राव
माझ्याकडे असलेला मोबाईल क्रमांक ९८२३९९७७८९
22 Sep 2010 - 3:25 pm | निखिल देशपांडे
मस्त अनुभव कथन
असे अनुभव येतच असतात पण आजकाल अशा अनुभवांना आपल्या प्रांतिय, गावकीचे राजकारणाचे विचार जोडून उगाचच पुणेकरांना टारगेट करायची पद्धत निघाली आहे. या अनुभव कथनाच्या शीर्षकातच रिक्षावाल्यांचा केलेला उल्लेख हा नक्कीच निंदनीय आहे. या साठी या धाग्याचा प्रती श्री आढाव यांना पाठवाव्यात अशी आम्ही जाहिर विनंती करतो. त्यानंतर रिक्षावाल्यांनी आंदोलन केले तर त्याची पुर्ण जवाबदारी जाई यांचीच आहे असे मी आज नमुद करतो.
आपल्या प्रत्येक धाग्याला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावेत यासाठी लोकांची केविलवाणी धडपड पाहुन कोणतेही आश्चर्य वाटत नाही. अरे शंभर प्रतिसाद हवेत तर आम्ही एकच प्रतिसाद एका मिनिटातच १०० वेळा टाकुन धाग्याची शंभरी गाठुन देउ ना.
त्याच बरोबर प्रत्येक धाग्यावर प्रतिसादरुपी टिका करण्याची फॅशन सुद्धा आजकाल फारच बोकाळलेली आहे असे दिसते,
जोक्स अपार्ट
जाई ताई या प्रश्न युनिवर्सल आहे. मुंबईत हा प्रॉब्लेम नाही येत असे म्हणणार्या विजुभाउंनी मला एअरपोर्ट वरुन पार्ल्या साठी जास्तिचे पैसे न देता ऑटो मिळवुन दाखवावी. आम्ही त्यांचा जाहिर सत्कार घडवून आणु.
बाकी कुणी आजवर या लिंक वर तक्रार नोंदवली आहे का???
22 Sep 2010 - 3:38 pm | धमाल मुलगा
श्री.देशपांडे ह्यांना एक नम्र विनंती
गेल्या वर्षी मुंबईतील रिक्षा, त्यांचे मिटर्स आणि वाहतुक ह्यासंदर्भात श्री.देशपांडे ह्यांनी केलेले बहुमोल संशोधन त्यांच्या जागृत सामाजिक जाणीवेला स्मरुन सामान्य नागरिकांसमोर मांडावे अशी मी त्यांना विनंती करतो. ह्या संशोधनाच्या निमित्ताने त्यांना आलेल्या निरनिराळ्या अनुभवसंपन्नतेचे भांडार त्यांनी इथे द्यावे असेही मी सुचवतो.
लवकरच श्री.निखील देशपांडे ह्यांची सखोल संशोधनातुन जन्म घेतलेली 'रिक्षा, एक समृध्द अडगळ' ही महाकादंबरी प्रकाशित होत आहे, तरी इच्छुकांनी (चुकुन भाविकांनी लिहिणार होतो.) प्रकाशनपुर्व सवलतीसाठी नोंदणी करावी.
नोंदणीसाठी श्री.बिपीन कार्यकर्ते (प्रकाशक्,वाळवंट पब्लिकेशन हाऊस) ह्यांच्याशी संपर्क करावा.
22 Sep 2010 - 3:51 pm | मृत्युन्जय
'पुणेरी रिक्षा, एक समृध्द अडगळ' असे शीर्षक दिल्याशिवाय कादंबरी हिट्ट जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. वाटल्यास "माजोरडे पुणेरी रिक्षावाले आणि कोल्हापुरी प्रवासी" असा उपसंहार जोडुन द्यावा. प्रस्तावना जाईतै लिहुन देतील (या प्रकारामुळे उपसंहाराला प्रस्तावना असा एक नाविन्यपुर्ण पायघडा पण पडेल).
22 Sep 2010 - 3:40 pm | श्रावण मोडक
संपादकीय म्हणजे काय, असा प्रश्न ज्यांना पडला आहे, त्यांनी हा प्रतिसाद वाचावा! ;)
आणि त्यावर 'वाचकाचे पत्र'ही बोनस! ;)
22 Sep 2010 - 3:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
22 Sep 2010 - 4:05 pm | चेतन
या लेखाला मग मिपा संपादकीय म्हणावे काय आणि मिपाला अग्रलेखांचा बादशाह... ;)
आणि मोडकांना संजय राउत ;)
22 Sep 2010 - 4:06 pm | श्रावण मोडक
लेखाला काय म्हणायचे ते म्हणा, हा देशपांडे आण्णांचा प्रतिसाद म्हणजे 'संपादकीय' आहे. त्यापुढे सर्वाधिकार वाचकाच्या हाती!!!
22 Sep 2010 - 4:14 pm | चेतन
हा प्रतिसाद देशपांडे आण्णांचा आहे म्हणजे नक्किच 'संपादकीय' आहे. त्यापुढे कोणतेहि अधिकार वाचकाच्या हाती नाहित ;)
22 Sep 2010 - 4:18 pm | श्रावण मोडक
हेssssssss, कळलं तुला. :) तेंव्हा संपादकीयाविषयी (किंवा अग्रलेखाविषयी) कधीही काहीही प्रश्न करायचे नसतात. तुझ्या धाग्याचा समारोप इथेच झाला पहा!
23 Sep 2010 - 10:22 am | विजुभाऊ
मुंबईत हा प्रॉब्लेम नाही येत असे म्हणणार्या विजुभाउंनी मला एअरपोर्ट वरुन पार्ल्या साठी जास्तिचे पैसे न देता ऑटो मिळवुन दाखवावी. आम्ही त्यांचा जाहिर सत्कार घडवून आणु.
मी सत्काराला तयार आहे. एअर पोर्ट पासून चालत जाण्याच्या अंतरावर माझे घर आहे तरीदेखील माझ्या सुदैवाने मला आत्तापर्यन्त एअरपोर्टवरून घरी जायला रीक्षा अजिबात मिळाली नाही असे कधीच झालेले नाही. रात्री अपरात्री कधितरी एअरपोर्टवरचा एखादा रिक्षावाला दुप्पट पैसे मागतो. पण येतात हे महत्वाचे
22 Sep 2010 - 3:51 pm | यशोधरा
शेवटी काय, जाणकारांपुढे वाचली गीता, आणि कालचाच गोंधळ बरा की हो होता! :D
22 Sep 2010 - 3:55 pm | कुंदन
वास्तविक त्या बस ड्रायव्हरलाच सांगायला हवे होते तुम्ही बस बि. वाडी मार्गे घ्यायला , मग अगदी घराजवळ उतरता आले असते.
22 Sep 2010 - 4:36 pm | तिमा
मुंबईचा अनुभव ऐका.
वर सांगितल्याप्रमाणे एअरपोर्ट ते पार्ला, पार्ला स्टेशन ते आसपास कुठेही, अंधेरी स्टेशन (ईस्ट वा वेस्ट) ते जवळपास कुठेही, अजिबात येणार नाहीत. ठाणे स्टेशनलाही तीच स्थिती!
मात्र सायनहून अंधेरी वा पार्ले सांगा, लगेच तयार, पण हायवेने इतक्या जोरात चालवेल की गंतव्य स्थानापर्यंत प्राण कंठाशी येणे म्हणजे काय याचा याचि देही अनुभव घ्याल.
22 Sep 2010 - 4:39 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
आहे की नाही?...!
22 Sep 2010 - 5:33 pm | इंटरनेटस्नेही
जाई मॅडम,
पुणे असो वा मुंबई वा कोल्हापुर, माणसाच्या जाणीवा त्याच्या इन्कम नुसार बदलतात. रिक्षावाले हे तुलनेने आर्थिक बाबतीत निम्न दर्जातील असल्याने त्यांची भाषा आणि वागणे देखील सर्वसाधारणपणे तसेच असते. हा खरेतर देशपातळी वरील प्रश्न असुन यासाठी सर्व रिक्षा, टॅक्सी चालक-मालकांचे मनपरिवर्तन कार्यशाळांद्वारे होणे गरजेचे आहे.
मला देखील कोल्हापुर मध्ये असाच अनुभव आला आहे. रेल्वे स्थानक ते महालक्ष्मी मंदिर ते एस टी स्थानक या साधारण ४-५ किमी प्रवासाकरता आधी रुपये ७० सांगितले आणी प्रवास पुर्ण झाल्यावर रुपये २०० मागत होता. शेवटी पोलिसांचे नाव काढल्यावर रु १२५ मध्ये त्याने माझी सुटका केली. मला रुपये २०० फार काही जास्त नाहीत, पण तरी देखील फसवले गेल्या बद्दल वाईट हे वाटतेच.
असो.
जमेल तसे या विषयावर अजुन लिहिन.
22 Sep 2010 - 6:23 pm | पैसा
हे आता कोल्हापुरी लोकाना नावं ठेवायला लागलेत!!!
22 Sep 2010 - 7:01 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
....जाउ द्या ओ......
ज्याला जसा अनुभव येतो तो तसा समज करुन घेतो....
तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे का? चार आंधळ्या मित्रांची आणि हत्तीची?
तसे आहे....!
22 Sep 2010 - 7:04 pm | इंटरनेटस्नेही
बापरे! जाई मॅडम रागवु नका. मी केवळ सत्यघटना सांगितली!
(समजुतदार)
22 Sep 2010 - 10:50 pm | शेखर
जाऊ द्या हो... बरेच जण पुणेकरांना, काही जण ठाणेकरांना त्याच प्रमाणे काही जण कोल्हापुरकरांना नावे ठेवतात..
22 Sep 2010 - 5:37 pm | इंटरनेटस्नेही
आमचा एक पुणेरी विक्षिप्तपणाचा अनुभव http://www.misalpav.com/node/13771 येथे वाचता येईल.
22 Sep 2010 - 6:18 pm | चिंतामणी
"खालच्या प्रतिक्रीयांकडे दुर्लक्ष करावे" अशी टिप टाकायला विसरलात का???????
22 Sep 2010 - 5:42 pm | अप्पा जोगळेकर
अहो शेवटी पुण्याचेच ते रिक्षावाले. जसे तिथले लोक असणार तसेच तिथले रिक्षावाले असणार.
अवांतर -
ऐरणीच्या भूमिकेत असताना घाव सोसायचे आणि घणाच्या भूमिकेत असताना घाव घालायचे असं आमचे एक दोस्त सांगतात.
22 Sep 2010 - 6:31 pm | पैसा
आमच्या गोव्यात किनई, रिक्षा टॅक्सींसारख्या एकाच जागेवर ( स्टँडवर) उभ्या असतात. तुमच्यासारख्या फिरत नाहीत काही! रेट किती माहित आहे? २ किमी ला ४०/- रु. मीटर कसा चालतो ते आम्ही आजपर्यंत काय बघितलंच नाही. १० किमी जायचं तर काढा २००/- रु. घुमवणार मात्र नाहीत! परवडतं तर बघा!
22 Sep 2010 - 7:47 pm | मृत्युन्जय
नीट चौकशी करा नक्की पुणेकर असतील. पुण्याचे सगळे लोक हे असलेच हो. सगळीकडे जाउन वातावरण बिघडवुन टाकतात पार
22 Sep 2010 - 8:56 pm | पैसा
हा गोव्याचा पुणं करायचा डाव आहे!
22 Sep 2010 - 8:51 pm | इंटरनेटस्नेही
अगदीच नाईलाज झाल्याशिवाय मी रिक्षाने कधीही प्रवास करतच नाही. बेस्ट बस, पश्चिम रेल्वे, माझी कार किंवा बाईक, नाहीतर चालत जाणे पसंद करतो.
(स्वावलंबी)
22 Sep 2010 - 9:22 pm | शिल्पा ब
तुमच्याकडे कार, बाईक आहे, पश्चिम रेल्वे रुटवर राहता आणि २०० रु . भाडे (४-५ किमी साठी) जास्त वाटत नाही हे वाचून आनंद झाला...
लहान वयात बरीच प्रगती आहे म्हणायची...
22 Sep 2010 - 8:59 pm | इंटरनेटस्नेही
धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड
प्रतिसादाचे शतक पुर्ण झाल्याबद्दल माननीय मिसळपाव भगिनी जाई यांचे अभिनंदन!
<येथे एक सत्तर फुटी बॅनर समजावा!>
धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड धत्तड धत्तड धत्त्ड
22 Sep 2010 - 9:15 pm | ईन्टरफेल
>>मी चालुन जाउ शकलेही असते...पण आमचं माहेरपण नडलं... हेssssss सामान बरोबर <<
आव एवढ सामान नका?
बरोबर घेऊ
लय त्रास व्हातो
आपन म्हनता माझ घर पाई चालन्या इतक जवळ आहे
मग.......तुमि पाई चालु शकत नाही तो काय?पुने xyz करांचा दोश आहे का ?
आमाला न समझलेले xyz
23 Sep 2010 - 4:50 am | हुप्प्या
आई आजारी होती. हॉस्पिटल तसे जवळ होते पण आजारी माणसाला कसे चालवायचे म्हणून रिक्षा शोधायला लागायची. त्यावेळेस जे दादापुता करायला लागले आणि रिक्षावाले इतके हलकटपणाने वागत होते की सगळ्या रिक्षावाल्याना चाबकाने फोडून काढावे असे वाटायचे. काय वाट्टेल ते पैसे मागणे, गिर्हाईक नाकारायला वाट्टेल त्या सबबी सांगणे. सगळे प्रकार पाहिले. एक आठवडा हा माज सहन करावा लागला.
हा उर्मटपणा इतका सर्रास आढळतो की रिक्षावाल्यांना लायसन मिळवताना उर्मटपणातील प्रावीण्य सिद्ध करावे लागते का अशी शंका यावी!
असो. ह्या जमातीविषयी मला काडीचीही सहानुभूती वाटत नाही.
23 Sep 2010 - 7:45 am | जाई अस्सल कोल्हापुरी
अगदी असाच अनुभाव मला माझ्या सासर्यांच्या आजारपणात आलेला आहे. आणि मग जो संताप मनात बसला आहे ना घर करुन्.....तो जात नाही.
23 Sep 2010 - 4:24 pm | Dhananjay Borgaonkar
वा वा वा!!!सुंदर लेख. आजकाल स्वतःच्या लेखाचा टी.आर्.पी. वाढवायचा असेल तर एक अतिशय सोपा आणि उत्तम उपाय. पुण्यातील दुकानदार, रस्ते, बस, री़क्षा यावर एक लेख लिहायचा. आपोआपच लेखाचा, लेखकाची/चा टी.आर्.पी वाढतो. छान हो छान.
कोल्हापुर म्हणजे अगदी जणु कॅलिफोर्नियाच. सगळ आल बेल्.अगदी १० फुटावर जायच असेल तरीसुद्धा री़क्षेवाले मागे लागतात माझ्याच रीक्षेत बसा म्हणुन.आणि ति़कडचे रीक्षेवाले पान्,तंबाखु, बिडी आदीच सेवन म्हणजे..छे छे..काहीतरीच काय. आणि पैसे मीटर प्रमाणे? पैसे किती घेणार विचारल तर चिडतात. सगळे तिकडचे री़क्षेवाले समाजसेवा नाही का करत.पैसे कसे घेतील?
आणि बर सगळ्यांना असे अनुभव पुण्यातच येतात. बाकी सगळीकडे हे जिथ जातील तिकड याना अगदी जणु डोक्यावरच घेतात.
चालुदे पोऱकट पणा..
23 Sep 2010 - 6:05 pm | इंटरनेटस्नेही
बोला, पुणेकरांचा विजय असो! (संदर्भ: आठवला असेलच!) ;)
23 Sep 2010 - 11:14 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
अनुभव महत्वाचा... स्थान हे केवळ नाममात्र उल्लेखले गेले आहे. कोल्हापुरात किन्वा इतरही कुठे असे अनुभव येउ शकतात.
पण इथे आजुबाजुच्या बर्याच लोकांना similar अनुभव आलेला आहे. आणि खरच तो त्रास दायक होता.
त्यामागचा thought काय हे जाणुन घ्यायची इच्छा होती.आणि अर्थात पुढच्या वेळी असे घड्ल्यास काय करायचे यासाठी धागा टाकला होता.
हे टी.आर्.पी वगैरे वाढवायची असते .....ती कोणत्या प्रकारचे लेख टाकल्यावर वाढते.. हे मोलाचं ज्ञान आपल्या कडुनच मिळालं.
पुढल्या वेळी लक्षात ठेउ! :)
24 Sep 2010 - 7:11 am | इंटरनेटस्नेही
>>>>>>हे टी.आर्.पी वगैरे वाढवायची असते .....ती कोणत्या प्रकारचे लेख टाकल्यावर वाढते.. हे मोलाचं ज्ञान आपल्या कडुनच मिळालं.<<<<<<<
बरोबर आहे, जाई ताई, तुमच्या भावना समजु शकतो.
इकडचे काही लोक असे आहेत ज्यांना पुणे आणि पुणेकरांविषयी काहीही लिहिले की ते टीआरपी वाढवण्यासाठी लिहलंय असं वाटतं... मी सुद्धा मागे असाच एक लेख लिहिला होता. पण माझ्या वरती सुद्धा हेच 'अॅलिगेशन' करण्यात आलं. काय बोलणार अशावेळेस.. निमुट सहन करावं लागतं. :(
(कधीकाळी किंचित दुखावला गेलेला, पण आता सावरलेला)