हा आहे सोनटक्का. ह्याचे मुळ आल्यासारखे असते. एक रोपटे किंवा मुळ लावले तरी ह्याच्या बाजुला त्याची पिल्ले भराभर तयार होतात. मोहक सुगंधाने सोनटक्का स्वतःकडे आकर्षीत करुन घेतो. बाजारात पानात बाधुंन ह्याची फुले विकायला येतात पण बरेचदा ही अर्धवट उमललेलीच दिसतात. सोनटक्क्यामधे पिवळा रंगही असतो. पिवळ्या रंगाचे फुल आकाराने थोडे छोटे असते.
हा आहे डेलीया माझ्या बागेतील नविनच पाहूणा. आमच्या जवळच्याच नर्सरीतुन घेतला. ह्यामध्ये मला पिवळा किरमिजी रंगही दिसला. पण हा जास्त आवडला म्हणून हा घेतला.
हा माझ्याकडील गावठी गुलाब. लहानपणापासुन ह्याचे अॅट्र्याक्शन होते. कारण ह्याचा मंद सुगंध आणि झाड मोठ झाल की अगदी चांदण्या लागल्यासारख बहरत हे. माझ्याकडे सध्या छोट आहे तरी रोज ४-५ फुले लागतात. ह्याचा गुलकंदही करतात.
हा गुलाब लोणावळ्याच्या नर्सरीत सापडला. ह्याच्या मनमोहक रुपावर भाळले आणि त्याला घरी घेउन आले. आता ह्याला १ वर्ष पुर्ण झाल असेल.
हा सुद्धा लोणावळ्याच्याच नर्सरीतला मिनिचर गुलाब. खर तर ह्याला झुबक्याने लागतात फुल. पण फुलांचे छोटे रुप पाहुन ह्याला सावली मिळावी म्हणून डबलच्या तगरीने हिच्यावर आपली छाया पसरवली. त्यामुळे हल्ली असे १-२ लागतात.
प्रतिक्रिया
8 Sep 2010 - 5:38 pm | वेताळ
मला देखिल परगावी गेले कि नर्सरी शोधायची सवय आहे.सोनटक्का मी काढुन टाकला आहे. नवीन म्हणजे मी ह्या पावसाळ्यात हैद्राबादी सीताफळाची झाडे लावली आहेत.
8 Sep 2010 - 8:58 pm | विलासराव
मलाही लहानपणापासुन ह्याचे अॅट्र्याक्शन होते. कारण ह्याचा मंद सुगंध
8 Sep 2010 - 9:09 pm | प्रियाली
केशरी गुलाब खूप आवडला. गुलाबांचे प्रेम मलाही आहे. माझ्याकडे लालसर केशरी गुलाब आहेत. ते झुपक्याने येतात. मी या वर्षी हायब्रीड केशरी गुलाब खूप शोधला पण मिळाला नाही.
माझ्याकडे जांभळ्या गुलाबांची दोन झाडे आहेत. त्यावर जरा विशेष जीव आहे. सोबत लाल, पिवळे, गुलाबी रंगांचे गुलाब आहेत.
ते रंग बदलणार्या गुलाबांच्या रोपाचे मालक कुठे आहेत? माझ्याकडचे गुलाब पूर्ण फुलल्यावर त्यांचे रंग फिके पडतात तर त्यांच्याकडचे गुलाब फुलताना पांढरे, पिवळे आणि पूर्ण फुलल्यावर गुलाबी होतात. :(
माझ्याकडल्या या फिक्कट गुलाबी गुलाबाचे नाव आहे एलिझाबेथ :)
13 Sep 2010 - 12:31 pm | जागु
प्रियाली जांभळ्या गुलाबाचा फोटो टाक ना.
8 Sep 2010 - 9:18 pm | प्राजु
बाग आवडली. :)
आमच्या बागेत सध्यातरी एक पिवळा गुलाब, पिवळी शेवंती, टोमॅटो, पाम चे झाड आणि १-२ इन्डोअर प्लांट्स आहेत.. :)
9 Sep 2010 - 5:00 am | priya_d
जागु
मला कोणताही फोटो दिसत नाहीये. काय कारण असावे? असे ब-याचदा होते. कोणी सांगु शकेल का?
प्रिया
9 Sep 2010 - 5:46 am | पिवळा डांबिस
सोनटक्क्याचा फोटो आवडला! माझ्याकडे पिवळ्या सोनटक्क्याचे कंद पुरलेले आहेत. पण सोनटक्क्याला पाणी खूप लागतं आणि आमच्याकडे फारसा पाऊस पडत नाही त्यामुळे ते फोफावत नाहीत. मला सोनटक्क्याच्या फुलाना येणार तो मंद सुगंध अतिशय आवडतो!!! छान!!
गुलाबांमध्ये तो केशरी गुलाबाचा फोटो आवडला! माझ्याकडे अशी जात आहे पण तिच्यात लालसर शेड जास्त आहे पिवळ्यापेक्षा!!! तुमच्याकडली व्हरायटी जास्त सुंदर दिसते आहे!!
अशीच तुमची बाग आम्हाला वारंवार दिसू द्या!
हॅपी गार्डनिंग!!
बाकी तुमच्या बागेतली फुलं दाखवून मन प्रसन्न केलंत त्याबद्दल हा माझ्याकडच्या एका गुलाबाचा पहाटे दव पडून गेल्यानंतर सकाळच्या उन्हात काढलेला फोटो खास तुमच्यासाठी!!
आनंदाच्या परतफेडीचा हा छोटासा प्रयत्न!!!:)
सस्नेह,
पिडां
10 Sep 2010 - 4:41 am | शुचि
अ-प्र-ति-म!!!!
9 Sep 2010 - 8:30 am | धनंजय
माझ्या हाताने लावलेला गुलाब अजून कधी एक वर्षभरसुद्धा जगलेला नाही :-(
माझ्या फ्लॅटमधील कुंड्यांमध्ये सध्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे निवडुंग, काही हळदीची रोपे, आणि एक "रबरा"चे झाड.
रानटी गुलाबांचा गुलकंद मी केलेला आहे. तुमच्याकडे देशी गुलाब आहे, हेवा वाटतो.
9 Sep 2010 - 8:55 am | चतुरंग
तुमची फुले आवडली. नगरला आमच्या जुन्या वाड्यात गच्चीवर अनेक फुलझाडे होती अबोली, मोगरा, निशिगंध, कर्दळ अशी. शिवाय २० एक प्रकारचे गुलाब होते. पिवळा, लाल, केशरी, निळसर, काळपट गर्द लाल, दोन शेड्सचे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे तीन महिने घरात गुलाब महोत्सव चालायचा.
दर ४- ६ दिवसाला एकेका खोलीतून फुलदाण्या सजलेल्या असायच्या. एकेक झाड ४ ते ६ फुटांपर्यंत वाढलेले होते. शेणखत घालणे, पाने काढणे, माती उकरुन मोकळी करणे, छाटणी करणे, क्वचित औषध मारणे अशी सगळी कामे मी करीत असे. गेले ते दिवस आता फक्त आठवणींचे गुलाब उरलेत!
असो. त्या दिवसांची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद! :)
(गुलाबांच्या आठवणीत हरवलेला)गुलरंग
9 Sep 2010 - 12:38 pm | दिपक
छान आहेत फुले..
10 Sep 2010 - 1:05 am | चित्रा
सोनटक्का खूप दिवसांनी पाहिला. थोड्याश्या पावसानंतरच या फुलाला पहावे.
10 Sep 2010 - 4:42 am | शुचि
मस्त जागुताई. मला तो शेवटचा गुलाब खूप आवडला.
10 Sep 2010 - 4:49 am | गणपा
मस्तच. सोनटक्का किती तरी दिवसांनी पाहिला.
मी लहान असताना आमच्या घरी बाल्कनीत छोटेखानी बाग होती. वेगवेगळी २५-३० तरी झाड होती.
13 Sep 2010 - 12:37 pm | जागु
वेताळ, विलासराव, प्रियाली, प्राजु, प्रिया, डांबिस, शुचि, धनंजय, चतुरंग, चित्रा, गणपा सगळ्यांना खुप खुप धन्यवाद.