गाभा:
हि॑दू विवाह कायद्याप्रमाणे आपण लग्नसमार॑भ म॑गलकार्यालयात पार पडल्यावर सरकारी कार्यालयातही नो॑द करतो.. विवाह-विच्छेद होताना॑च ही नो॑द रद्द होते..
वाहन परवान्याचे जसे दर प॑धरा-वीस वर्षा॑नी नूतनीकरण करावे लागते व ते॑व्हा चालक वाहन चालविण्यास सक्षम आहे याची खातरजमा करून मग परवाना दिला जातो तसेच विवाह प्रमाणपत्राचेसुद्धा दर दहा वर्षा॑नी नूतनीकरण असावे का..?? मिपाबा॑धवा॑ची काय मते आहेत?
प्रतिक्रिया
11 May 2008 - 7:07 pm | देवदत्त
अहो,
मग जन्म प्रमाणपत्राचेही नूतनीकरण करावे का असाही विचार मनात आला. ;)
जसे निवृत्ती वेतन घेणार्यांना दरवर्षी हयात असल्याचा दाखला द्यावा लागतो.
तुमच्या चर्चा प्रस्तावावर सध्या नेमके नाही सांगू शकत. जमल्यास नक्की लिहीन.
11 May 2008 - 7:16 pm | प्रभाकर पेठकर
वाहन परवान्याचे जसे दर प॑धरा-वीस वर्षा॑नी नूतनीकरण करावे लागते व ते॑व्हा चालक वाहन चालविण्यास सक्षम आहे याची खातरजमा करून मग परवाना दिला जातो तसेच विवाह प्रमाणपत्राचेसुद्धा दर दहा वर्षा॑नी नूतनीकरण असावे का..??
विवाह प्रमाणपत्राच्या नुतनीकरणाचे प्रयोजन कळले नाही. वाहन चालकाच्या सक्षमते प्रमाणेच संसार चालकांच्या (पती-पत्नी) सक्षमतेची तपासणी करावी काय? त्या साठी काय निकष असावेत असे तुम्हाला वाटते? काहीही निकष जरी ठरविले आणि त्या निकषांनुसार पती किंवा पत्नी अक्षम ठरविले तर त्यांचे लग्न मोडले आहे असे सरकारने घोषित करावे काय? त्या कुटुंबाच्या संतती बाबत काय निर्णय घ्यावा? त्यांचे मानसिक आणि भाव विश्व जे अशा निर्णयाने उध्वस्त होईल त्याची जबाबदारी कोणी घ्यावी? जिथे एकटा नवरा (खूपशा उदाहरणात) किंवा एकटी पत्नी (नगण्य उदाहरणात) अर्थार्जन करीत असेल तिथे विवाह प्रमाणपत्र नुतनीकरण न झाल्याने विभक्त होण्याची वेळ आली तर दुसर्याच्या आर्थिक गरजांची सोय कोण पाहणार? सरकार? असे झाल्यावर दुसर्या सक्षम जोडीदाराचा शोध पुन्हा नव्याने घ्यावा का? की त्यांना सक्षमतेची एखादी सरकार मान्य कसोटी पार करावी लागेल? जर असेल तर, नवीन कसोटी उत्तीर्ण झाल्यावर परत त्याच दोघांना (पुर्वाश्रमीचे पती-पत्नी) संसार सुरू करावा लागेल की नवीन दुसरा सक्षम जोडीदार शोधायची मुभा असेल? नेमक्या नुतनीकरणाच्या वेळी विवाह प्रमाणपत्र हरवले तर काय उपाय योजता येईल? एक विवाह अस्तित्वात असताना दुसरीकडे संबंध ठेवणार्या जोडीदाराला 'डबल सक्षमतेचे' प्रमाणपत्र मिळू शकेल काय? नुतनीकरणाच्या नियोजित वेळे आधीच मुलांना आपल्या आई-वडीलांना अक्षम ठरविण्याचा अधिकार असेल काय? त्या विरुद्ध आई-वडीलांना कोर्टात धाव घेता येईल का? जर निकाल मुलांविरूद्ध गेला तर मुलांना १५ वर्षाकरता अक्षम ठरवून त्यांच्या विवाह संबंधावर बंदी आणता येईल का? वयाच्या ७०-८० व्या वर्षी अलझेमर, पार्किंन्सन, दमा, पक्षाघात, विस्मृती वगैरे रुग्णांसारख्या परावलंबी जीवांनाही विवाह प्रमाणपत्राच्या नुतनीकरणाचे फायदे/तोटे मिळू शकतील का? अशा उतारवयात एका जोडीदाराचा मृत्यू झाल्यास उरलेल्या जोडीदारास नवीन जोडीदार शोधताना (गरज पडल्यास) सक्षमतेच्या त्याच चाचण्यांना सामोरे जावे लागेल का? की नैसर्गिकरित्या शरीरात होणार्या बदलांनुसार 'काही' अटी शिथिल करता येतील? तरूण वयातील विवाह प्रमाण पत्राचा कालावधी १५ वर्षे (वाहन परवान्याप्रमाणे) ठेवला तर ७०-८० वर्षानंतर उर्वरीत आयुष्य १५ वर्षांचे असेलच असे खात्रीलायकरित्या सांगता येणार नाही, त्यांना 'लाईफ लाँग' परवाना द्यावा का?
ह्या सर्व प्रश्नांवर साधक बाधक चर्चा झाली तर काही निर्णय घेता येईल असे वाटते.
13 May 2008 - 8:42 am | पिवळा डांबिस
आयला, प्रभाकर भाऊ! काय हाणलाय हो तुम्ही!!
अगदी सेंचुरीच ठोकलीत की!!
तीन ओळींव्या विषयप्रस्तावनेला चारपट (१२ ओळींचा) प्रतिसाद!!
दाढेसाहेब, भोगा आता आपल्या कर्माची फळं आणि द्या प्रत्युत्तर!!
आम्ही पेठकरकाकांच्या विचारांशी तसे सहमत आहोंत.
पण आमची म्हणुन एक शंका!!!!:)
दाढेसाहेब, तुम्ही वाहन परवान्याचा दाखला दिलांत म्हणून विचारतो हो, रागावू नका!!
लग्न-"परवान्या"च्या रिन्युअल प्रमाणे "मॉडेल" बदलायची ही मुभा आहे का हो?
म्हणजे जसं ५-६ वर्षांनी आपण गाडीचं मॉडेल बदलतो त्याप्रमाणे!!
नाही म्हणजे "सेक्रेटरी -> वाईफ -> स्क्रॅप" असा काही पॅटर्न रूढ करता येईल का हो?
बघा, जरा विचार करून सांगा गरीबाला!!
द्येव तुमचं भलं करो, तिच्यायला!!!:))
13 May 2008 - 6:24 pm | राजे (not verified)
लग्न-"परवान्या"च्या रिन्युअल प्रमाणे "मॉडेल" बदलायची ही मुभा आहे का हो?
म्हणजे जसं ५-६ वर्षांनी आपण गाडीचं मॉडेल बदलतो त्याप्रमाणे!!
नाही म्हणजे "सेक्रेटरी -> वाईफ -> स्क्रॅप" असा काही पॅटर्न रूढ करता येईल का हो?
बघा, जरा विचार करून सांगा गरीबाला!!
=)) :D :)) 8}
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
11 May 2008 - 7:30 pm | रामदास
मॅरेज सर्टीफिकेट नोंदणीपत्र आहे .वाहन चालवण्याचे परवानापत्र आहे.
तसं पाहिलं तर लग्नाचे नूतनीकरण रोजच्या रोज करावे लागते.
माझी एक मैत्रीण म्हणायची लग्न होउन त्याचं रिवायवल रोज झालच पाहीजे.(नाहीतर मुलं झाल्यावर उरलेली चाळीस वर्ष एक रानडुक्कर बेडरुम मध्ये कोण पाळेल?)
वाक्याचा दुसरा भाग अवांतर आहे.
पण शर्मिला-संजीवकुमारचा गृहप्रवेश पाहिला आणि नूतनीकरणाची आवश्यकता पटली.
11 May 2008 - 7:31 pm | विजुभाऊ
खातरजमा करून मग परवाना दिला जातो तसेच विवाह प्रमाणपत्राचेसुद्धा दर दहा वर्षा॑नी नूतनीकरण असावे का..?? नुतनीकरण करण्यास काही कारणास्तव विलम्ब लागला तर वाहन विमा जसा त्या कालावधीसाठी ग्राह्य धरला जात नाही. तसे त्या परिस्थितीत विवाहाचे स्टेटस काय असेल. त्या अवधीत झालेली अपत्ये कोणाची असतील की ती देशाची संपत्ती असतील.
तसेच काही जणाना दोन तीन परवाने ठेवावे लागतील. तसे झाल्यास मराठी भाषेत काय नवीन परवाना का असा नवा वाक्प्रचार अस्तित्वात येइल.
11 May 2008 - 9:00 pm | मन
त्ये लोक घरी दारी जावुन आमच्या वानी गरिबास्नि थेट तुम्चं नोंदनी पत्र का परवाना म्हंतेत ते मागत न्हाइ सुटनार का?
आनि नाय मिळाली चिरी मिरी तर सीधा लगीन कॅन्सेल व्हायचा धोका की राव....
(येकाद्याच्या गाडीचे कागुद पत्र न्हाइ गावले पोलिसास्नी ,तर त्ये थेट गाडी उचलुन घेउन जात्यात
ठेसनात आनि मंग म्हंतेत की "कोर्टात येउन आपला मुद्दे माल योग्य ते कागद पत्र दाखवुन घेउन जाणे.(आणि न सापडल्यास ठणाणा करीत बसणे) " आता काय माज्या जोडिदारास्नी बी ह्ये लोक घेउन जानार की काय राव?
बास का आता?:-) :-)
अरे कशाला उगाच शासकिय भानगडी वाढवुन ठेवताय सगळे?
सध्याच्या नियमांचे तरी व्यवस्थित काटेकोर पणे पालन करतयं का कुणी(काही सन्माननीय अपवाद सोडुन.)
जमतय का ते कुणाला?
अशा नियमांची/परवान्यांची गरज ती काय?
नसेल ही गोष्ट तर काही अडेल का?
ईतर महत्वाचे मुद्दे संपलेत का?
अजुन धड १००% द्वि-भार्या प्रतिबंधक कायदा लागु करता येत नाहिये (समाजातील सर्वांना, जे की आवश्यक आहे.)
आणि ह्या स्थितीत हे परवान्याचं का करायचं?
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
11 May 2008 - 10:10 pm | केशवराव
' वाहन चालक वाहन चालविण्यास सक्षम आहे कि नाही ते तपासुन मग परवाना दिला जातो'
ईथे काय तपासणार ?
12 May 2008 - 10:33 am | डॉ.प्रसाद दाढे
पेठकरकाका॑च्या प्रश्ना॑च्या सरबत्तीने आडवा झालोय..
पुष्कळदा लग्नाअगोदर मुलाला आपल्याला आवडलेली मुलगी 'लाखा॑त एक' देखणी, गुणी आहे असे वाटत असते. लग्न झाल्यावर काही महिन्यातच लाखा॑चे हजारा॑त रूपा॑तर होते.. हळूहळू शेकड्यात, मग दहा॑जणा॑त आपली बायको बरी आहे असे तो म्हणू लागतो.. आणि वर्षभरा॑तच शून्याचा शोध लागतो. वर्ष॑ उलटल्यावर गणितातल्या स॑ख्यारेषेप्रमाणॅ उलटी गिनती सुरू होते.. आणि थोड्या॑च कालावधीत आपली बायको लाखा॑त एक मूर्ख आणि बावळट आहे ह्या निकषा॑स तो येऊन ठेपतो..:) (इती चि॑.वि.जोशी)
नवर्याच्या मनमानीस क॑टाळलेल्या माझ्या एका मैत्रीणीने वैतागून मला सर्टिफिकेट नूतनीकरण का असू नये असा सवाल केला. (तिचे म्हणणे असे की नूतनीकरणाच्या भीतीने तरी 'हे असले हुकूमशहा' नवरे नीट वागतील.. :) मला ग॑मत वाटली व मिपाबा॑धवा॑च्या प्रतिक्रियाही मी मना॑त इमॅजिन केल्या..अजून भगिनीवर्गाकडून काही प्रतिसाद आलेला नाही..त्या॑चे काय मत आहे?
12 May 2008 - 10:45 am | भडकमकर मास्तर
आपल्या प्रश्नाचे प्रयोजन सविस्तर सांगितल्याबद्दल धन्यवाद... आधी नीट अर्थबोध झाला नव्हता
हे इन्ट्रेष्टिन्ग आहे...पण आत्ता नक्की काय बोलावे ते सुचत नाहीये...
12 May 2008 - 8:15 pm | प्रभाकर पेठकर
तिचे म्हणणे असे की नूतनीकरणाच्या भीतीने तरी 'हे असले हुकूमशहा' नवरे नीट वागतील..
आणि जे चांगले वागत आहेत ते कायम 'दहशती' खाली वावरतील. असो.
नवरा/बायको हुकूमशहा वाटत असेल तर त्यांना घटस्फोट देऊन, कायद्यानुसार, नवीन 'मनजोगता' जोडीदार शोधण्याची मुभा सर्वांनाच आहे. त्यासाठी अजून एक नविन कायदा कशासाठी?
12 May 2008 - 11:14 pm | देवदत्त
पेठकरकाका॑च्या प्रश्ना॑च्या सरबत्तीने आडवा झालोय..
=))
आता मलाही काही सुचत नाही आहे. :|
जाऊ द्या हो. कशाला उगाच आपणच आपले वैताग वाढवून घ्यायचे ;)
12 May 2008 - 10:50 am | डॉ.प्रसाद दाढे
हे इन्ट्रेष्टिन्ग आहे...पण आत्ता नक्की काय बोलावे ते सुचत नाहीये...
अरे माझेही तेच झाले तिचा सवाल ऐकून.. मीही दचकलोच :)
12 May 2008 - 2:21 pm | अन्जलि
विशय अनि त्यावर्च्या प्रतिक्रिया वाचुन मजा वात्लि. मझ्या लग्नाला २६ वर्शे झालि अजुन कधि हा विचार मनात अला नवह्ता. आता करावा का? येत्या २४ ला लग्नाचा वाध्दिवस आहे नुत्निकरनाचि पधत सन्गित्लि तर नुत्निकरन करुन घ्यावे म्हन्ते कसे....
13 May 2008 - 8:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विशय अनि त्यावर्च्या प्रतिक्रिया वाचुन मजा वात्लि. मझ्या लग्नाला टींब टींब वर्शे झालि अजुन कधि हा विचार मनात अला नवह्ता. आता करावा का? येत्या टींब टींब ला लग्नाचा वाध्दिवस आहे नुत्निकरनाचि पधत सन्गित्लि तर नुत्निकरन करुन घ्यावे मनतो कसे.... :)
13 May 2008 - 12:24 pm | अन्जलि
काय चिदव्ताय राव हे कहि बरे नहि अशा प्रतिक्रियामुले कधि कहि लिहावेसे वात्नार नहि मरथि लिहिता न येने ह कहि मोथा गुन्हा नाहि
13 May 2008 - 12:31 pm | कुंदन
प्रयत्न करीन रहा , यश मिळेल....
13 May 2008 - 2:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>काय चिदव्ताय राव हे कहि बरे नहि अशा प्रतिक्रियामुले कधि कहि लिहावेसे वात्नार नहि मरथि लिहिता न येने ह कहि मोथा गुन्हा नाहि
या पुढे आम्ही आपणास चिडवणार नाही.
आपण म्हणताय ते खरं आहे, कधी कधी अशा प्रतिक्रियेमुळे नवीन सदस्य मित्रांना काही लिहूच नये असे वाटू शकते. मराठी लिहिता न येणे हा मोठा गुन्हा नाहीच. लेखकाच्या भावना महत्त्वाच्या आहेत. आमच्या प्रतिसादामुळे आपणास जो त्रास झाला त्याबद्दल दिलगीर आहे.
15 May 2008 - 5:20 am | रविराज
नक्की जमेल लिहायला. यात एवढ काही अवघड नाहीये. आणि शुद्धलेखन नाही जमल तरी चालतयं , तुम्हाला काय लिहायच आहे ते समजतं. प्रतिक्रिया देणे थांबवू नका.
जरा ऐकदा खालील दुवा वाचा, प्रत्येक अक्षरासाठी टंकताना किबोर्ड ची कोणती बटणे टाइप करावी लागतात ते इथे दिले आहे.
http://www.misalpav.com/node/1312
अ = a
आ = aa
इ = i
ई = ee
उ = u
ऊ = oo
ए = e
ऐ = ai
. (अनुस्वार) = M (shift + M)
: = colon key
= E (कॅपिटल E)
= O (कॅपिटल O)
क्=k
क् + अ = क = k + a = ka
क् + आ = का= k + aa = kaa
क् + इ = कि= k + i = ki
क् + ई = की =k + ee = kee
क् + उ = कु = k + u = ku
क् + ऊ = कू = k + oo = koo
क् + ए= के = k + e = ke
क् + ऐ = कै = k + ai = kai
क् + अनुस्वार = कं=k +M (असा कॅपिटल M टंकण्यासाठी shift + M)
कः=k + a + :
कॅ=k + E (कॅपिटल E)
कॉ=k + O (कॅपिटल O)
प्रत्येक मुळाक्षराठी काय टंकावे लागते ते एकदा समजून घ्या.
जसे की ख् साठी kh, ग् साठी g, घ् साठी gh...
अवांतर - k टाइप केलं तरी ते 'क' असे दिसतं, पण प्रत्यक्षात ते 'क् ' असे असतं, त्यामुळे जर तुम्हाला क (पूर्ण अक्षर) असे लिहायचे असेल तर ka असे टाइप करावे लागते.
cheers! keep rocking!!!
15 May 2008 - 7:23 am | पिवळा डांबिस
या धाग्याचा विषय काय आहे?
लग्नाच्या परवान्याचे नूतनीकरण की अंजलीताईंची शिकवणी?
इतकी कळकळ असेल तर अंजलीताईंना व्यक्तिगत निरोप पाठवून मार्गदर्शन करा. त्यांना एक समजत नसेल पण तुम्हाला तरी समजावयास हरकत नाही की या धाग्याचा विषय काय आहे ते?
आमच्या स्पष्ट बोलण्याबद्दल क्षमा करा, पण ह्या साईटवरचेच "टंकलेखन सहाय्य" वापरून माणूस १०-१५ मिनिटांत मराठी टायपिंग शिकू शकतो! आम्ही असेच शिकलो, मिपावरचे बहुतेक सदस्य तसेच शिकले, यांत काही नाविन्य नाही. तेंव्हा तुम्हाला अंजलिताईंचे लाड करायचे असतील तर जरूर करा पण ते इतर विषयांचा रसभंग करणार नाहीत असे बघा, प्लीज!!
तुम्ही त्यांना वैयक्तिक निरोपाची शिकवणी ठेवण्यात आमची काहीच हरकत नाही!!!
काही अधिक-उणे बोललो असेल तर क्षमस्व!!
आपला,
पिवळा डांबिस
15 May 2008 - 7:56 am | रविराज
पुन्हा विषयांतर होणार नाही. क्षमस्व. त्यां प्रतिसाद देण थांबवतील अस म्हणाल्या म्हणून मी प्रतिसाद दिला. स्वता:ची लाल करण्याचा हेतू नव्हता!!
15 May 2008 - 9:49 pm | पिवळा डांबिस
श्री. रविराज,
तुम्ही स्वतःची लाल करीत आहांत असे आम्हाला मुळीच वाटले नाही. गैरसमज नसावा.
उलट इतके टायपिंग करण्यातली तुमची कळकळ समजली. फक्त तुमच्या मदतीची (लेखनाची) जागा अयोग्य आहे असं वाटलं म्हणून लिहिलं.म्हणून तर आम्ही आमच्या प्रतिक्रियेत,
काही अधिक-उणे बोललो असेल तर क्षमस्व!!
असं म्हटलं.
असो. आता व्यनिने संपर्क झाला आहेच. तरी इतर वाचकांसाठी हा खुलासा...
आपला,
पिवळा डांबिस
12 May 2008 - 11:02 pm | विश्वजीत
अन्जलितई, तुमी नुत्निकरन करून घ्य/ त्यत्च तुमच्ये अनि सगल्यान्चे भले आये!
13 May 2008 - 8:09 pm | देवदत्त
दाढे साहेब,
वरील प्रतिसादात माझ्या हसून लोळण्याचा राग मानू नका. तुमच्या उत्तराने फटकन हसू आले. :)
तसेच आणखी एक विचार. ज्याप्रमाणे कायम (२० वर्षांचा) परवाना मिळेपर्यंत शिकाऊ परवाना मिळतो तसा ह्यातही असेल का? ;)
खरे तर असं काही होऊ नये असेच वाटते.
तरी आधी सांगितल्याप्रमाणे थोडेफार लिहितो आहे. पण पेठकरकाकांचे प्रश्न समोर ठेवून. अर्थात माझे ह्यातील विचार तितकेसे प्रगल्भ नाहीत हेही नमूद करतो.
पेठकर काका,
पहिल्यांदा तु्मचे प्रश्न पाहून खरोखरच काहीही सुचले नाही :)
वाहन चालकाच्या सक्षमते प्रमाणेच संसार चालकांच्या (पती-पत्नी) सक्षमतेची तपासणी करावी काय? त्या साठी काय निकष असावेत असे तुम्हाला वाटते?
काहीही निकष जरी ठरविले आणि त्या निकषांनुसार पती किंवा पत्नी अक्षम ठरविले तर त्यांचे लग्न मोडले आहे असे सरकारने घोषित करावे काय?
त्या कुटुंबाच्या संतती बाबत काय निर्णय घ्यावा?
वरील प्रश्नांची उत्तरे थोडेफार घटस्फोटाच्या प्रकरणातील निकालाप्रमाणे जातील असे वाटते.
त्यांचे मानसिक आणि भाव विश्व जे अशा निर्णयाने उध्वस्त होईल त्याची जबाबदारी कोणी घ्यावी?
जिथे एकटा नवरा (खूपशा उदाहरणात) किंवा एकटी पत्नी (नगण्य उदाहरणात) अर्थार्जन करीत असेल तिथे विवाह प्रमाणपत्र नुतनीकरण न झाल्याने विभक्त होण्याची वेळ आली तर दुसर्याच्या आर्थिक गरजांची सोय कोण पाहणार? सरकार?
हे प्रश्न विचार करण्याजोगे आहेत. कारण इथे सरकार निर्णय देणार आहे, पति पत्नीची मर्जी नसेल तरी.
असे झाल्यावर दुसर्या सक्षम जोडीदाराचा शोध पुन्हा नव्याने घ्यावा का? की त्यांना सक्षमतेची एखादी सरकार मान्य कसोटी पार करावी लागेल?
एखाद्याला वाटल्यास ते त्या निकालाच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकतो. किंवा मग त्यांना ती मुभा असू शकेल. पण त्यात ह्यात जर फक्त एखाद्याच्या चुकीमुळे जर तो विवाह रद्द ठरविला तर त्याला मुभा द्यावी का हा प्रश्न आहे. पण इथे पुन्हा ते निकष काय हेच.
जर असेल तर, नवीन कसोटी उत्तीर्ण झाल्यावर परत त्याच दोघांना (पुर्वाश्रमीचे पती-पत्नी) संसार सुरू करावा लागेल की नवीन दुसरा सक्षम जोडीदार शोधायची मुभा असेल?
नूतनीकरण करता येतं की हो :)
नेमक्या नुतनीकरणाच्या वेळी विवाह प्रमाणपत्र हरवले तर काय उपाय योजता येईल?
ह्म्म... वाहन चालक परवान्याप्रमाणे ह्यालाही नेहमी सोबत ठेवावे लागेल का? घरी ठेवता येईल की. जर घरूनच गहाळ झाले तर त्याच्या क्रमांकावरून ड्युप्लिकेट मिळेल की.
एक विवाह अस्तित्वात असताना दुसरीकडे संबंध ठेवणार्या जोडीदाराला 'डबल सक्षमतेचे' प्रमाणपत्र मिळू शकेल काय?
तिथे द्विभार्याप्रतिबंधक कायदा पुढे येतो.
नुतनीकरणाच्या नियोजित वेळे आधीच मुलांना आपल्या आई-वडीलांना अक्षम ठरविण्याचा अधिकार असेल काय?
ती वेगळी कसोटी असेल.
त्या विरुद्ध आई-वडीलांना कोर्टात धाव घेता येईल का?
जर मुलांना अधिकार दिला तर पालकांना तो हक्क असेलच की.
जर निकाल मुलांविरूद्ध गेला तर मुलांना १५ वर्षाकरता अक्षम ठरवून त्यांच्या विवाह संबंधावर बंदी आणता येईल का?
हे नाही कळले मला.
वयाच्या ७०-८० व्या वर्षी अलझेमर, पार्किंन्सन, दमा, पक्षाघात, विस्मृती वगैरे रुग्णांसारख्या परावलंबी जीवांनाही विवाह प्रमाणपत्राच्या नुतनीकरणाचे फायदे/तोटे मिळू शकतील का?
म्हणजे कसे?
अशा उतारवयात एका जोडीदाराचा मृत्यू झाल्यास उरलेल्या जोडीदारास नवीन जोडीदार शोधताना (गरज पडल्यास) सक्षमतेच्या त्याच चाचण्यांना सामोरे जावे लागेल का?
की नैसर्गिकरित्या शरीरात होणार्या बदलांनुसार 'काही' अटी शिथिल करता येतील?
:/ बहुधा हो.
तरूण वयातील विवाह प्रमाण पत्राचा कालावधी १५ वर्षे (वाहन परवान्याप्रमाणे) ठेवला तर ७०-८० वर्षानंतर उर्वरीत आयुष्य १५ वर्षांचे असेलच असे खात्रीलायकरित्या सांगता येणार नाही, त्यांना 'लाईफ लाँग' परवाना द्यावा का?
अरेच्च्या असेही काही असते का?
13 May 2008 - 8:46 pm | प्रभाकर पेठकर
वाहन चालकाच्या सक्षमते प्रमाणेच संसार चालकांच्या (पती-पत्नी) सक्षमतेची तपासणी करावी काय? त्या साठी काय निकष असावेत असे तुम्हाला वाटते?
काहीही निकष जरी ठरविले आणि त्या निकषांनुसार पती किंवा पत्नी अक्षम ठरविले तर त्यांचे लग्न मोडले आहे असे सरकारने घोषित करावे काय?
त्या कुटुंबाच्या संतती बाबत काय निर्णय घ्यावा?
वरील प्रश्नांची उत्तरे थोडेफार घटस्फोटाच्या प्रकरणातील निकालाप्रमाणे जातील असे वाटते.
घटस्फोट हा पती-पत्नीचा विभक्त होण्याचा वैयक्तीक निर्णय असतो. पण इथे ' तुम्ही संसार करण्यास सक्षम किंवा अक्षम आहात' असे सरकार ठरवणार आहे. (तुमच्या इच्छे विरुद्ध)
नवीन कसोटी उत्तीर्ण झाल्यावर परत त्याच दोघांना (पुर्वाश्रमीचे पती-पत्नी) संसार सुरू करावा लागेल की नवीन दुसरा सक्षम जोडीदार शोधायची मुभा असेल?
नूतनीकरण करता येतं की हो
नाही एकदा अक्षम ठरवून सरकारने तुम्हाला संसार 'कंटिन्यू' करायला परवानगी नाकारली आहे. तुमचे लग्न मोडले आहे. अशा परिस्थितीत सक्षमतेची नवीन चाचणी (ठरावीक कालानंतर) द्यावी लागेल का? देऊन 'पास' झाल्यावर पुन्हा त्याच जोडीदाराशी लग्न करावे (कारण आधीचे मोडले आहे) लागेल की नवीन जोडीदार शोधावा?
एक विवाह अस्तित्वात असताना दुसरीकडे संबंध ठेवणार्या जोडीदाराला 'डबल सक्षमतेचे' प्रमाणपत्र मिळू शकेल काय?
तिथे द्विभार्याप्रतिबंधक कायदा पुढे येतो.
इथे फक्त पुरुषाचा विचार केलेला नाही. 'जोडीदार' असे म्हंटले आहे. दुसरे असे की 'द्विभार्याप्रतिबंधक कायद्या'साठी दुसरे लग्न होणे आवश्यक असते. पण लग्नाशिवाय नुसते संबंध असू शकतात.
जर निकाल मुलांविरूद्ध गेला तर मुलांना १५ वर्षाकरता अक्षम ठरवून त्यांच्या विवाह संबंधावर बंदी आणता येईल का?
हे नाही कळले मला.
म्हणजे असे की जाणून-बुजून मुलांनी आई-वडीलांच्या सक्षमते विरुद्ध तक्रार केली आणि ती तक्रार खोटी शाबित झाली तर अशा मुलांना शिक्षा काय? शिक्षाच नसेल तर जरा आई-वडीलांनी फटकारले की लगेच मुले आई-वडीलांच्या सक्षमते विरोधात कोर्टात धाव घेतील. असे होऊ नये म्हणून खोट्या तक्रारदारास (मुलांस) 'पुढील १५ वर्ष लग्न करण्यास बंदी' अशी शिक्षा ठेवावी का?
वयाच्या ७०-८० व्या वर्षी अलझेमर, पार्किंन्सन, दमा, पक्षाघात, विस्मृती वगैरे रुग्णांसारख्या परावलंबी जीवांनाही विवाह प्रमाणपत्राच्या नुतनीकरणाचे फायदे/तोटे मिळू शकतील का?
म्हणजे कसे?
म्हणजे एखाद्या रुग्णाला आपल्या जोडीदाराची आपल्यामुळे होणारी फरपट सहन झाली नाही तर तो स्वतःहून स्वतःला 'अक्षम' घोषीत करू शकेल का?
(किंवा) त्या जोडीदारास आपला जोडीदार कायम स्वरूपी रुग्ण असून संसार चालविण्यास 'अक्षम' आहे तेंव्हा विवाहप्रमाण पत्र नुतनीकरण करू नये असे सरकारला कळविता येईल का?
13 May 2008 - 9:33 pm | देवदत्त
माझी माघार :T :? :/ /:) @) L) :B :| 8|
15 May 2008 - 7:49 am | विसोबा खेचर
मॅरेज सर्टिफिकेटचे नूतनीकरण असावे का?
काय सांगू शकत नाय बा! म्यॅरेज हा आपला इशय नाय! :)
आपला,
(आजन्म अविवाहित) तात्या.
16 Sep 2010 - 4:46 pm | प्रकाश घाटपांडे
दाक्तर सायेब लई औघाड प्रश्न ईचारता ब्वॉ! बघा दोन वर्षात ल्वॉक काय बी बोलना!