पावसाने थोडी विश्रांती घेतल्याने (खुप दिवसांनंतर) माझा म्यान केलेला कॅमेरा बाहेर काढला आणि माझ्या मुलाला घेऊन शुटआउटसाठी बाहेर पडलो. त्याने पण काही फोटो काढलेले आहेत केके(कृष्णकांत) असे लिहीले आहे. आत्ता सातवित आहे पण माझ्या बरोबर राहुन अॅगल मारायचा/लावायचा सेन्स चांगलाच डेव्हलप होतोय ;-). साईट वर गेल्यावर शेकडो फुल पाखर पिंगा घालत होती.त्या पैकी काही निवडक फुल(आणि)पाखर आपल्या आस्वादा साठी सादर. :-)
फोटोंची मजा व्यवस्थीत लुअटण्यासाठी एफ११ दाबुन मग फोटो बघा
१
२
३
४
५
६
फुल (कॅमे-याने) टिपत-टिपत पुढे आल्यवर ही अशी झाडांना लगडलेली फुलपाखर दिसली आणि जिव सुखावला
७
८
९
१० बाय केके
११ बाय केके
१२
१३ बाय केके
१४
१५ बाय केके
१६
१७
१८ बाय केके
१९
२०
२१ बाय केके
२२
२३
२४
२५
२६
२७
घरी आल्यावर या सरड्याचे फोटो बघुन केके म्हणतो कसा " बाबा त्याने बघा मी.बिन सारखे आप्ले प्रायव्हेट पार्ट झाकुन ठेवलेत" ;-)
२८
कॅमेरा = निकॉन डि ९०
लेन्स = निकॉन प्राईम लेन्स १०५
प्रतिक्रिया
4 Sep 2010 - 7:25 pm | चतुरंग
फुलं (आणि) पाखरं छानच आहेत. केकेच्या वयाच्या मानाने फोकसिंग आणि फ्रेममधे मुख्य चित्र कुठे हवे ह्याची समज छानच आहे!
रंगा
4 Sep 2010 - 7:37 pm | jaypal
फोकसिंग आटुक्मीटेक वर हाय. :-)
त्याला प्रथम फ्रेमिंग आणि कंपोझिंग शिकवतोय मग फोकसिंग आणि मग आवड टिकली तर मॅन्युअल सेटिंग्ज
4 Sep 2010 - 7:28 pm | विनायक प्रभू
लय भारी
4 Sep 2010 - 8:27 pm | बोका
छान फोटो !!
फोटो घेतलेल्या साइटबद्दल सुद्धा थोडे सांगा.
4 Sep 2010 - 9:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्तच! १८व्या फोटोतलं फुलपाखरू मला फार आवडतं.
4 Sep 2010 - 10:13 pm | मदनबाण
सुंदर...
4 Sep 2010 - 10:37 pm | शिल्पा ब
नेहमीप्रमाणेच भन्नाट...
तुमचं लेकरूही मस्त फोटो काढतंय..छान.
5 Sep 2010 - 12:06 pm | उपेन्द्र
ग्रेट... १ नंबर...
7 Sep 2010 - 7:48 pm | प्रभो
लई लई लई भारी!!!
7 Sep 2010 - 8:30 pm | हेम
आत्ता सातवित आहे पण माझ्या बरोबर राहुन अॅगल मारायचा/लावायचा सेन्स चांगलाच डेव्हलप होतोय
सातवीतच हे इतकं, मग अकरावीपर्यंत चांगलीच प्रगती होईल..!
फोटोंनी मजा आणली.
7 Sep 2010 - 8:34 pm | मनीषा
फुलं आणि पाखरं -- सुरेख !
8 Sep 2010 - 9:37 am | निखिल देशपांडे
जयपाल भौ..
लै भारी फोटो आहेत
केके ने काढलेले तर खुप चांगले आले आहेत
8 Sep 2010 - 1:53 pm | जिप्सी
जयपालभौ,तुम्हाला आणि केकेला आमंत्रण,मी तुम्हाला सह्याद्रीतल्या एका मस्त पठारावर नेतो,मी अनेकवेळा बघीतलेला निसर्गाचा खजिना तुम्ही लोकांपर्यन्त पोचवा.
8 Sep 2010 - 5:20 pm | अरुंधती
मस्त टिपली आहेत फुलं आणि पाखरं! :-)
जरा फोटोजना वॉटरमार्क टाका ना, नैतर तुम्हालाच ईमेलमधून साभार येतील!!
8 Sep 2010 - 5:59 pm | इन्द्र्राज पवार
जयपाल....मजा आली ही मन प्रसन्न करून टाकणारी फुले, बागडणारी फुलपाखरे पाहुन. जगप्रसिद्ध निसर्गमित्र आणि शास्त्रज्ञ सर डेव्हीड अॅटेनबरो यांनी बीबीसी मार्फत प्रकाशित केलेली "लाईफ" ही मालिका गेल्या महिन्यातच पाहायला मिळाली होती. त्यात तर फुलपाखरांवर ('इनसेक्ट्स" एपिसोड) छान टिपण आणि व्हिडिओ फूटेज आहेत. तुमच्या चिरंजीवाना अभ्यासासाठी म्हणून जरूर दाखवा. नमुन्यासाठी (आणि केके ला दाखविण्यासाठी.,..) त्यातील तीन. [व्हिडिओ पाहताना आवडली म्हणून फ्रीझ करून घेतली होती. मोशनमध्ये फिल्म असल्याने तुमच्या कॅमेर्यासारखी क्वॉलिटी येणे अर्थातच शक्य नाही... पण ती मालिका कशी असेल याची कल्पना येईल.]
व हे दुसरे
अन् तिसरे
इन्द्रा
8 Sep 2010 - 8:27 pm | हेम
व्व्व्व्व्व्वा! इंद्राशेठ ..एकदम झक्कास प्रतिसाद. सर डेव्हीड अॅटनबरोंची लाइफ सिरीजची पुस्तकंसुद्धा सम्रुद्ध खजिना. उदा. प्रायव्हेट लाइफ ऑफ प्लॅण्ट्स..त्यांच्या लघुपटांच्या डीव्हीडीज् ही मिळतात बहुधा.
8 Sep 2010 - 8:49 pm | इन्द्र्राज पवार
"सर डेव्हीड अॅटनबरोंची लाइफ सिरीजची पुस्तकंसुद्धा सम्रुद्ध खजिना.."
~~ धन्यवाद. ही सीरीज मला माहित आहे. डिव्हीडी तर सर्व पाहिल्या आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे मला सर अॅटनबरोंच्या आवाजाची जबरदस्त मोहिनी पडलेली आहे. फिल्म चालू असताना ते क्वचितच कॅमेर्यासमोर येतात (ही गोष्ट निसर्गदृश्यांच्या चित्रीकरणात महत्वाची मानली जाते) आणि कॅमेर्यासमोर घडणार्या घटनांवर इतके सुरेख, अभ्यासू भाष्य करतात की, कित्येकवेळी मी हेडफोनमधून त्यांचेच "नॅरेशन" ऐकत राहतो. ८६ वर्षाचे झाले आहेत....पण अभ्यासाची तीच भूक अजून जिवंत आहे.
चित्र चांगली आली आहेत का? अशासाठी विचारतो की, जर इथल्या सदस्यांना आवडली तर अशी माझ्याकडे हजारो (स्क्रीन फ्रीझ करून काढलेली..) आहेत, तीवर योग्य ते भाष्य करून इथे देण्याचा विचार करीन.
जयपाल यांचे मत घ्यावे असे वाटते....ते या क्षेत्रातील इथले बॉस आहेत.
इन्द्रा
8 Sep 2010 - 8:50 pm | विलासराव
वरील सर्वांशी सहमत.
फोटु लई आवडले.
8 Sep 2010 - 8:57 pm | हेम
..हा विषय असा आहे की, चित्रांच्या क्वालिटीपेक्षा तो फ्रीझ केलेला क्षण पहायला मिळणे अधिक आनंददायी ठरेल...त्यामुळे भाष्यासकट आस्वाद आपण सगळेच घेऊ.
9 Sep 2010 - 10:46 am | jaypal
वाचकांचे आणि प्रतिसाद्कर्त्यांचे मनापासुन आभार :-)
जिप्सी = आपला संपर्क पत्ता द्या म्हणजे आमंत्रण स्विकारण सोप्प होईल
ईंद्राजी = सर डेव्हीड अॅटनबरोंचे आम्ही दोघे (मी आणि केके) ही जबरद्स्त फॅन आहोत. शेवटाचा फोटो तर बापच. आपली कल्पना आवडली फक्त ते मिसळ पावच्या धोरणात बसत काते पाहुन मग होऊन जाउ द्या ...........आम्ही स्वागतास तयारच आहोत.
9 Sep 2010 - 7:33 pm | इन्द्र्राज पवार
"मिसळ पावच्या धोरणात बसत काते पाहुन मग होऊन जाउ द्या "
थॅन्क्स.... मी विचारतो संपादक मंडळाला. इथे सातत्याने 'यू ट्युब' वरील रेफरेन्सेस (फक्त गाणी नव्हे तर घटनांचेसुद्धा..) धाडधाड येत असतातच....त्यामुळे 'कॉपीराईट' ची काही अडचण नसावी. शिवाय व्हिडीओ फूटेज न देता त्या त्या सेगमेन्टमधील 'क्लासिक' समजले जाणारे प्रसंग आपल्याकडील कॅमेर्याने (वा तशी सोय असलेल्या सॉफ्टवेअरने) फ्रीझ केले जाणार आहेत....इतरांच्या आनंदासाठी.
पाहु या.
इन्द्रा
11 Sep 2010 - 7:10 am | प्रशान्त पुरकर
होउन जाउ द्या राव.........
11 Sep 2010 - 4:01 am | चित्रा
सुंदर फोटो..
11 Sep 2010 - 7:31 am | मराठमोळा
जयपालशेट,
अप्रतिम फोटो आहेत.. खुपच सुंदर! :)
11 Sep 2010 - 2:57 pm | सुनील
अप्रतिम फोटो! केके सातवीत आहे हे तुम्ही सांगितले म्हणून. अन्यथा विश्वास बसला नसता!
11 Sep 2010 - 11:21 pm | राजेश घासकडवी
नेहेमीप्रमाणेच तुमचे फोटो आवडले. चांगला कॅमेरा विश्वासाने आपल्या मुलाला हाताळायला देऊन त्याला आपली पॅशन व कला देत आहात हेही आवडलं. त्याचेही फोटो आवडले.