एच.जे.एस.च्या वेबसाईट वरील मजकुरानुसार,
Ban on mosque-loudspeakers fitted in Saudi Arabia
August 25, 2010
Shravan Krushna Pratipada Kaliyug Varsha 5112
Mumbai(Maharashtra): Ban has been imposed in Saudi Arabia to use loudspeakers on mosques. All loudspeakers in Mecca have been made non-functional by the Saudi Government as a stringent step towards controlling noise pollution. Here, even a small mosque uses loudspeaker to sound ‘baang’. The month of Ramzan crosses all limits of use of loudspeakers and sound pollution. The above observations were made by the Health Department; under whose advice, the Saudi Government has taken the above decision. The Department has advised that loud noise causes adverse effect on health. (When the country, that has the birth place of Prophet Mohammad and the place where he carried on his mission, can impose a ban on loudspeakers on mosques, why it cannot be banned in India for the same reasons? Such daring, however, will not be shown by the pro-Muslim Congress Rulers in India. The rule has to be handed over to patriotic rulers for such action ! – Editor SP)
Some sects, in Islamic countries, consider Saudi Arabia as their ideal. The ban on loudspeakers in Saudi mosques has motivated some sects to remove loudspeakers even on their mosques. (If such sects are India, will they too take similar action or will conveniently follow Saudi Govt. only wherever it is of benefit? – Editor SP) The Islamic countries, which do not consider Islamic thoughts of Saudi as their ideal, are discussing this issue. Now, it has become a matter of concern for imams of all mosques and those who read ‘namaz’ that the decision taken by Saudi Government can cause similar problem even here. (The problem has already been created in India; but all parties’ policy of appeasement of Muslims result in taking care of Muslims rather than the citizens ! – Editor SP)
Source: Dainik Sanatan Prabhat
भारतात असे कधी घडेल का ?
आपले राजकारणी सर्व धर्म समभावाच्या नावाखाली केवळ दाढ्या कुरवाळताना दिसतात.
खरे धर्मनिरपेक्ष शासन आपण कधी अनुभवणार की नाही ?
प्रतिक्रिया
30 Aug 2010 - 10:15 am | वेताळ
ईग्लिंश वाचताना त्रास होतोय.
30 Aug 2010 - 10:25 am | शेलार मामा मालुसरे
तुमचे इंग्लिश व मराठी दोन्हीही चांगले आहे हे मला माहिती आहे.
का सताविता मला ?
नागपुरला यायचे काय झाले ?
30 Aug 2010 - 10:51 am | वेताळ
काय फरक पडत नाही.पण माझे मत असे आहे कि ज्यावेळी मशीदीत नमाज पढत असतात त्यावेळी मंदीरावर स्पिकर बंद करावेत व नमाज झालेवर आपली भजने सुरु करावीत.
सकाळी मशीदीत अजान देतानाचा आवाज कधी कधी चांगला असतो. एकायला बरे वाटते.
30 Aug 2010 - 12:17 pm | llपुण्याचे पेशवेll
काय फरक पडत नाही.पण माझे मत असे आहे कि ज्यावेळी मंदिरात भजनं चालू असतात त्यावेळी मशिदीवरचे स्पिकर बंद करावेत व भजन झालेवर नमाज सुरु करावेत.
सकाळी मंदिरात भजन गातानाचा आवाज कधी कधी चांगला असतो. एकायला बरे वाटते.
30 Aug 2010 - 1:05 pm | वेताळ
काही भजने खरोखरच सुंदर असतात.बाकी आजकाल चांगल्या कोलेतीचे स्पिकर मिळत नसल्या मुळे सौदीसरकारने बंदी घातली असावी असा माझा कयास आहे.
30 Aug 2010 - 11:11 am | कर्ण
सौदी हे मुस्लिम देश आहे; अर्थातच तेथे मशिदि जास्त असतीलच मह्न्जे आवाज हि जास्त असेल ... लाउड स्पिकर खर तर वापरण्याचि गरजच नाही .. गली गली मशिद अस्ल्यामुळे आजान चा आवाज सर्वापरयन्त पोहचेलच ...
वेताळशी सहमत
30 Aug 2010 - 11:00 pm | शिल्पा ब
आणि इथे तेवढ्या मशिदि नाहीत असं वाटतं का तुम्हाला?
31 Aug 2010 - 1:24 pm | कर्ण
हो .... मदिंरा एवढी तरी नाहि .... जस पुण्यामधे आहे प्रत्येक चोकात मदींर दिसते ....
30 Aug 2010 - 12:07 pm | गांधीवादी
तिथे कदचित हे शक्य असेल कारण, तिथे त्यांच्या मतांमुळे कोणी निवडून येत नसेल ना ?
पण इथे भारतात सरकार अक्षरशः कोसळते, त्यामुळे इथली परिस्थिती जरा वेगळी आहे.
हो हिंदू किव्वा त्यांची मंदिरे ह्यामुळे सरकारला काही फरक पडत नाही,
त्यामुळे त्यांना काही सवलती दिल्या नाही तरी चालते, उलट कर लावला जातो, आणि
त्यांना मात्र त्यांच्या धर्म क्षेत्रांसाठी सवलती जाहीर केल्या जातात,
AIR INDIA तोट्यात उगाचच नाय का ?
30 Aug 2010 - 1:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
गांधीवादी: आणखी थोडी माहिती.
सौदीमधे लोकशाही नाही, राजेशाही आहे. सरकार निवडून येत नाही! पण तरीही बदल घडवून आणताना लोकमताची कदर करावी लागते, हे 'एका तेलियाने'मधे वाचले आहे.
30 Aug 2010 - 1:36 pm | गांधीवादी
>> त्यांच्या जीवावर सरकार निवडून येत नाही
म्हणूनच तर ना अदिती ताई. ते हे करण्याची daring करू शकतात,
>> बदल घडवून आणताना लोकमताची कदर करावी लागते
आपल्या इथे फक्त काही (१२ %,( बाराच्या म्हणावे का ?)) लोकांच्या मताची कदर करावी लागते
30 Aug 2010 - 12:32 pm | चिंतामणी
सौदी सरकार "भगवे" असावे असे वाटते.
30 Aug 2010 - 12:42 pm | नितिन थत्ते
गांधीवादी यांच्या (आणि इतर भगव्यांच्या) माहिती साठी -
हज यात्रेसाठी दिली जाणारी सबसिडी रद्द करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे आणि मुस्लिम नेत्यांनी यास पाठिंबा दिला आहे.
मुस्लिम नेत्यांच्या पाठिंब्याचे कारण म्हणजे ही सबसिडी एअर इंडियाला ८२५ कोटी रुपये मिळवून देते. मुसलमानांचा त्यातून काही फायदा होत नाही आणि टीकेचे धनी मात्र व्हावे लागते हा आहे. थोड्या सर्चनुसार मुंबई जेद्दाह विमान प्रवासाचे बाजारातील रिटर्न तिकीट २०० पौन्ड = १५००० रु होते. (वर दिलेल्या दुव्यात १८००० हजार म्हटले आहे). हज यात्रेकरूंना १२००० रु भरावे लागतात. एअर इंडियाला ५५००० रु सबसिडी मिळते (कशाबद्दल?)
कुठल्याश्या जुन्या कराराननुसार एअर इंडियानेच जाणे सक्तीचे आहे.
सबसिडी नाही दिली तर एअर इंडिया आणखी तोट्यात जाईल अशी परिस्थिती दिसते आहे.
30 Aug 2010 - 1:31 pm | गांधीवादी
थत्ते काका मी आपला प्रतिसाद २-३ वेळा नीट वाचला,
कोणत्या कारणासाठी मुस्लिम नेत्यांनी यास सबसिडी रद्द करण्याच्या प्रक्रियेस पाठींबा दिला आहे हे कारण कोणते हे मला समजायला थोडे अवघड गेले,
पण हे कारण नक्कीच त्यांचे देशप्रेम वगेरे नाही. जर ह्यांच्या नावाखाली सरकार AIR INDIA ला मदत करीत आहे (असे काही कारण असेल तर) ते ह्यांना नको आहे, असेच दिसते आहे. त्यांना सरकारची सबसिडी नको आहे हे सुद्धा कुठे नमूद केलेले नाही, ती सबसिडी AIR INDIA च्या मार्फत नको. ते निव्वळ धंद्याचा विचार करत आहेत. असेच मला दिसत आहे
कदाचित माझे निरीक्षण चुकीचे असेल, आपण कृपया स्पष्ट करावे.
परत मुस्लिम नेते ग्लोबल टेंडर मागवून त्यावर सुद्धा सरकारची सबसिडी मागणार नाही, हे कशावरून ?
30 Aug 2010 - 2:40 pm | नितिन थत्ते
माझ्या प्रतिसादाची तीन कारणे आहेत.
१. तुमच्यासारख्या लांगूलचालनवाद्यांना दाखवून देणे की सरकार 'तुम्हाला हवे त्या दिशेने' आधीच कृती करीत आहे, कृती करण्यास कचरत नाहीये.
२. नसलेल्या सबसिडीचा बाऊ केला जात आहे. म्हणून मुस्लिमही या कृतीस अनुकूल आहेत.
३. तुम्हाला मुस्लिम विरोधात ज्या ठराविक गोष्टी सांगितल्या जातात त्या खर्या आहेत का हे तपासून पाहणे चांगले.
मुस्लिम देशभक्त आहेत म्हणून सबसिडी नाकारत आहेत हा दावा मी कुठेही केलेला नाही.
हज सबसिडीमुळे एअर इंडिया तोट्यात जाते ही तुमची माहिती चुकीची आहे हे मान्य करा.
30 Aug 2010 - 4:36 pm | चेतन
http://www.financialexpress.com/news/haj-subsidy-has-air-india-fuming/36...
या लिंकनुसार the amount paid by the pilgrims for the round trip to Jeddah and Medina at Rs 12,000
This year, in order for the pilgrimage of 1,23,211 pilgrims, the total cost estimated by the government is Rs 847 crore, of which the subsidy requirement will be approximately Rs 700 crore.
थत्ते काका मला अजुनही कळत नाही की जर फक्त १८००० (खर म्हणजे सगळ्यात कमी ३३००० तिकीट आहे) तिकिटासाठी लागत असतील तर बाकीचे पैसे जातात कुठे? (तरी या लोकांना ऑथराईज्ड शहरातुन नेण्याचा खर्चसुध्द्दा यात समविष्ट आहे)
>>नसलेल्या सबसिडीचा बाऊ केला जात आहे. म्हणून मुस्लिमही या कृतीस अनुकूल आहेत.
हे वाक्य नक्कीच दिशाभुल करणारे आहे
चेतन
30 Aug 2010 - 5:15 pm | नितिन थत्ते
ही घ्या १५००० पासून जेड्डाची रिटर्न तिकीटे.
31 Aug 2010 - 11:32 am | प्रदीप
झाली आहे का हा दुवा देण्यात. कारण मी आताच तो पाहिला तर त्यातील कमीतकमी दर रू. २४,८९१- इतका आहे.
30 Aug 2010 - 5:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सरकारी नोकरांना एअर इंडीयाचे तिकीट त्यांच्या कार्यालयात गेल्यास ५५ हजारांना आणि तेच (तेच विमान, तीच वेळ इ.इ) तिकीट इतर ट्रॅव्हल एजंट्स, एअर इंडीयाची वेबसाईट इथे २५-३५ हजारांत उपलब्ध हे मी स्वतः अनुभवलं आहे. माझ्या हापिसातल्या अनेक कर्मचार्यांनी कमी-अधिक फरकाने असाच अनुभव घेतला आहे.
(सरकारी कर्मचार्यांसाठी) मधली वर्षे एअर इंडीया (किंवा इंडीयन एअरलाईन्स) नेच प्रवास केला पाहिजे हा नियम शिथील केला होता असं ऐकीवात आहे; पण आता शक्यतोवर एअर इंडीया (किंवा इंडीयन एअरलाईन्स)ची सक्ती आहे. जिथे एअर इंडीया (किंवा इंडीयन एअरलाईन्स) जात नाहीत त्या ठिकाणी तुम्ही रेल्वेने गेलात (भले ते ठिकाण परदेशात असेल, रेल्वे महाग पडत असेल तरीही) तर ते चालण्याजोगे असते.
(सर्कारी खर्चाने स्वातीताईच्या घरी राकलेट चापणारी) अदिती
31 Aug 2010 - 11:23 am | प्रदीप
काही अॅनेकडोटल माहिती:
एयर इंडियास हजच्या विमानांना प्राधान्य द्यावे लागते. उदा. दोन सारखीच विमाने एकाच विमानतळावरून एकाच दिवशी, वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी तयार आहेत-- त्यातील एक हजचे व दुसरे अन्य ठिकाणचे नॉर्मल कमर्शियल उड्डाण, आणी हजच्या विमानात बिघाड जाहीर झाला, तर ते दुसरे तयार विमान कमर्शियल उड्डाण रद्द करून हजच्यासाठी द्यावे लागते.
हजच्या फ्लाईटच्या काही अन्य 'गमतीजमती'ही ऐकल्या आहेत---उदा. चेक इन करून मग उड्डाणाची वेळ आली, की पॅसेंजर गेटकडे नाही, तो गायब. बरीच शोधाशोध करून शेवटी तो कुठेतरी सापडणार--- एका कोपर्यात तो शांतपणे नमाज करत बसला असणार! अजून एक ऐकलेले म्हणजे हजवरून येणार्या एका फ्लाईटमधे पाशिंजरांनी वॉशरूमीत चक्क आंघोळी करणे सुरू केले, तेव्हा पाणी बाहेर इतरस्त्र येऊ लागले. तसेचे ते खाली झिरपून अन्यत्र जाईल अशीही भिती निर्माण झाल्याने कप्तानाला ए. सी. अंशतः बंद करावा लागला इ.
एयर इंडीयाच्या सर्विसेसविषयी बरेच काही लिहीता येईल, पण हजसाठी तसेच मिनीस्टर्स इ. स्पेश्यल मंडळींसाठी त्या सेवेस बरेच राबवून घेतले जाते हेही खरे आहे.
30 Aug 2010 - 1:31 pm | रणजित चितळे
आपल्या येथे नियमीत पणे लाऊड स्पिकर वर आपण बांग ऐकतो. गल्ली गल्ली तुन मशिदी असतात (मी महाराष्ट्र सोडुनची वास्तवता सांगत आहे) आणि त्यामुळे आपल्या मुलांना अगदी जन्मापासुन ठराविक वेळा बांग ऐकण्याची आता सवय होत चालली आहे. सकाळी विष्णुसहस्त्रनाम ऐकायच्या ऐवजी त्यांचा शिस्तीत ब्रेन वॉश चालला आहे कारण लाऊड स्पिकर मुळे स्पष्ट व मोठ्यांदी ऐकायला मिळते व ते ह्यात काही वावग नाही म्हणुन स्वीकारायला लागले आहेत. अजुन एक पिढी जाऊ द्यात मग त्यांना विष्णुसहस्त्रनाम काय आहे ते माहीत नसेल पण बांग गुणगुणायला लागतील.
हे राम हे राम
30 Aug 2010 - 1:47 pm | परिकथेतील राजकुमार
श्री. चितळे, आपला प्रतिसाद वाचुन डोक्याला हात मारुन घेतला बघा :)
आमच्या घराच्या बरोब्बर मागेच एक मस्जीद आहे. वयाच्या अठराव्या वर्षी मला जाण आली, हिंदु-मुस्लीम फरक कळायला लागला, रोज रोज कानावर पडणारे लक्षात राहु लागण्याच्या वयात मी आलो असे मानले तरी गेली १० वर्षे मी नित्यनेमाने लाऊडस्पिकर्स वरुन दिली जाणारी अजान ऐकत आहे. मात्र अजुनही ती माझी पाठ झालेली नाही. मुळात ऐकुन ऐकुन अजान पाठ होते पण वर्षानुवर्ष घरी विष्णुसहस्त्रनामाचे पुस्तक असुन ते पाठ होत नसेल तर दोष कोणाचा ??
बाकी आमच्या अरिफ, जेनिफर सारख्या मित्र-मैत्रीणींना गणपतीची आरती देखील अगदी तोंडपाठ आहे आणि कधी आरतीच्या वेळी अथवा संकष्टीला घरी आले तर ति अगदी मोठ्या आवाजात म्हणताना त्यांना कधीच लाज वाटलेली नाही. गंमत म्हणजे हि आरती पाठ असल्याबद्दल त्यांनी कधी तक्रार पण केली नाहीये ;)
30 Aug 2010 - 2:50 pm | llपुण्याचे पेशवेll
आम्हीही ऐकायची नसताना रोजच्या रोज बांग ऐकत आहोत. बाकी आमच्या जेनिफर, आरिफ नावाच्या मित्र मैत्रिणींना आरत्या पाठ नाहीत तसे आमच्या नितीन, जीवन, प्रसाद इ. मित्रांनाही पाठ नाहीत. आरिफ जेनिफर कडून जशी आरत्या पाठ असण्याची अपेक्षा नाही नितीन, जीवन, प्रसाद इ. कडून अजान पाठ असण्याचीही नाही. पण नितीन, जीवन, प्रसाद यांना रोज बांग ऐकावीच लागते तेच आरिफ, जेनिफर यांना मात्र रोज आरती ऐकावी लागत नाही.
चितळेंचा मुद्दा थोडासा अतिरंजित वाटला तरी संपूर्ण अयोग्य नाही. भारतात तरी (भारत तथाकथित धर्मनिरपेक्ष असल्याने) मंदिर आणि मशिदींना समान न्याय असावा असे वाटते.
30 Aug 2010 - 2:54 pm | नितिन थत्ते
>>भारतात तरी (भारत तथाकथित धर्मनिरपेक्ष असल्याने) मंदिर आणि मशिदींना समान न्याय असावा असे वाटते.
भारतात मंदिरांवर लाऊडस्पीकर लावून रोज आरत्या म्हणण्यास बंदी असल्याची माहिती मला नाही. कोणाला असल्यास खुलासा करावा.
रात्री १० नंतरचे माहिती नाही.
30 Aug 2010 - 3:00 pm | llपुण्याचे पेशवेll
पहाटे ५ च्या आधी सनई चौघडे इ जर लाऊडस्पीकरवर लावले तर पुण्यात पोलिस येऊन ते बंद करायला लावतात. तुकाराम पादुका चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक इ. ठीकाणी काकड आरती काकड्याची भजने सकाळी ५ आधी लाऊडस्पीकरवरून प्रक्षेपीत होऊ दिली जात नाहीत. मॉडर्न समोरच्या मशिदीचा कर्णा मात्र पावणेपाच वाजता 'चलो भाईंयो उठो नमाज का वक्त हो गया' असे ठणाणला तरी चालतो. नेहेमीप्रमाणे पोलिस अशा प्रकार झाल्या नसल्याच्या नोंदी दाखवतात किंवा अपवादात्मक झाले असेल असे म्हणतात.
कोणताच प्रकार नवीन नाही.
बाकी तुम्ही लांगूलचालनाची बाजू घेणार असल्याचे माहीत असल्याने अधिक खुलाशाची गरज भासत नाही.
30 Aug 2010 - 3:06 pm | नितिन थत्ते
ओके. हे चूक आहे.
विरोध करणे आवश्यक आहे.
30 Aug 2010 - 3:58 pm | परिकथेतील राजकुमार
माझ्यामते जेवढे ध्वनीप्रदुषण (शब्दशः डोके उठणारा ठणठणाट) मंदीरे अथवा सार्वजनीक मंडळांतर्फे एका महिन्यात केला जातो तेवढा कुठल्याच मशीदीद्वारे वर्षभरात देखील केला जात नसेल :)
गणपती = संकष्टी / चतुर्थी + गणपतीचे १० दिवस + अनंत चतुर्दशी + गणेश जन्म
१५ ऑगस्ट / २६ जानेवारी
मंडळाला मिळालेले एखाद्या स्पर्धेतील बक्षीस + म्हसोबा उत्सव + दहिहंडी उत्सव + नवरात्री + सत्यनारायण
मोजा मालक.. वर्षातले किती दिवस ठणठणाट सहन करावा लागतो ते मोजा :)
तरी ह्यात अपवाद असल्याने (स्वामी समर्थ उत्सव + पालखीचे स्वागत) इत्यादी दिवस धरलेले नाहीत :)
30 Aug 2010 - 4:52 pm | llपुण्याचे पेशवेll
ध्वनिप्रदूषण हा मुद्दा इथे तरी गैरलागू आहे. इथे नको असताना आवाज सहन करावा लागणे हा मुद्दा आहे. आणि बांगेच्या बाबतीत तो रोज सहन करावा लागतो. दिवसातून कमीतकमी ३ दा तरी. म्हणजे ३६५ * ३ = १०९५
आणि वरील उत्सवात उल्लेखिलेले सण एकूण मिळून ६० - ६५ च्या आसपास जातो आकडा. बाकी सगळ्या मंदिरांमधे कर्णे लाऊन आरत्या वगैरे केल्या जात नाहीत रोजच्या रोज. पण बांग मात्र सगळ्या मशिदीत कर्णे लावूनच दिली जाते. असो.
30 Aug 2010 - 5:01 pm | परिकथेतील राजकुमार
असहमत असहमत असहमत !!
मी दिलेल्या उदाहरणातील अनेक ठणठणाट हे सुद्धा नको असताना सहन करावे लागणारे आवाजच आहेत :) आणि '३६५ * ३ = १०९५' ह्या सर्वाच्या एकुण कालावधीची तुलना करता ह्या सर्वाला नुसता १० दिवसाचा गणेशोत्सवच पुरुन उरेल. बांग कुठेही दिवसभर अथवा १० ते १० अशी सलग दिली जात नाही ह्याची नोंद 'केल्या' जावी. उरीपुरीला लग्न / उरुस / तोरण हे धिंगाणे आहेतच.
संस्कृतीच्या रक्षणाच्या नावाखाली आणि धर्माला धार आणण्याच्या नावावर अक्षरशः कानावर अत्याचार केले जात आहेत.
30 Aug 2010 - 5:03 pm | अवलिया
उरीपुरीला लग्न / उरुस / तोरण हे धिंगाणे आहेतच.
सहमत आहे. वाजंत्री काय, रस्त्यावर घोडे काय ? वर अख्खा देश भुकेने तडफडत असतांना रंगवलेले तांदुळ घेउन नवरा नवरीला मारणं काय !! छ्या ! हिंदूंनी अगदी वात आणला आहे. दोन रुपड्याचं पेन आणुन कागदावर फराटे मारुन लग्न करायला कधी शिकतील ... कोणास माहित !!
30 Aug 2010 - 5:08 pm | llपुण्याचे पेशवेll
हां मग ठणठणाट म्हणा. ठणठणाट हा ध्वनिप्रदूषण असेलच असे नाही. विषेशतः चतुर्थ्या वगैरेला लावलेले लाऊडस्पीकर फार सुसह्य असतात. त्यामुळे हे त्यातून बाद.
संस्कृतीच्या रक्षणाच्या नावाखाली आणि धर्माला धार आणण्याच्या नावावर अक्षरशः कानावर अत्याचार केले जात आहेत.
सहमत आहे. आमची मागणी समान न्यायाची आहे. :)
30 Aug 2010 - 5:15 pm | परिकथेतील राजकुमार
धन्यवाद.
आपणच पुढाकार घेउन ह्यापुढे शक्य त्या ठिकाणी डॉल्बी वगैरेंची भिंत उभारुन बांग दिली जाईल ह्याची व्यवस्था करावी. तसेच मुस्लीम धर्मीय सणासांठी सर्वधर्मीयांकडून वर्गणी गोळा करता येईल असा सरकारी आदेश काढण्याची देखील काही व्यवस्था होते का पहावी ;)
30 Aug 2010 - 5:20 pm | llपुण्याचे पेशवेll
आपणच पुढाकार घेउन ह्यापुढे शक्य त्या ठिकाणी डॉल्बी वगैरेंची भिंत उभारुन बांग दिली जाईल ह्याची व्यवस्था करावी. तसेच मुस्लीम धर्मीय सणासांठी सर्वधर्मीयांकडून वर्गणी गोळा करता येईल असा सरकारी आदेश काढण्याची देखील काही व्यवस्था होते का पहावी
तुम्हाला परत ठणठणाटाचा त्रास होईल म्हणून बंद करण्याच्या बाबतीतला समान न्याय आम्ही म्हणत आहोत, हे तुमच्या लक्षात यावे म्हणून हा उपप्रतिसाद.
30 Aug 2010 - 10:54 pm | कापूसकोन्ड्या
ध्वनिप्रदूषण हा मुद्दा इथे तरी गैरलागू आहे. इथे नको असताना आवाज सहन करावा लागणे हा मुद्दा आहे. आणि बांगेच्या बाबतीत तो रोज सहन करावा लागतो. दिवसातून कमीतकमी ३ दा तरी. म्हणजे ३६५ * ३ = १०९५-----
---
एकदम अमान्य
तुमचा चा विरोध कशाला आहे आवाजालाच ना? कारण धार्मिक कामासाठी लोकांना बोलवण्यावर भारतासारख्या सेक्युलर देशात अशी मागणी करणे बेकायदेशीर आणि घटनाविरोधी तसेच अनसिव्हीलाइज्ड आहे.
प्रस्तुत लेखनात दिलेली लिंक पाहिली. तिथे असणारी माहिती अत्यंत प्रचरकी थाटाची वाटली. हिंदूच्या कल्याणापेक्षा अत्यंतिक टोकाचा मुस्लीम द्वेश दिसला.त्यामुळे ती लिंक महिती पेक्षा जास्त काड्या घालणारी वाटली. असो.
खालील मते पहा.
१.गणपति उत्सव आणि हिंदूधर्म किंवा धार्मिकता याचा काहिही संबध राहिलेला नाही. बळजबरी वसूल केलेली वर्गणी, बेधुंद दारू पाशन, टोकाची बेशिस्त्,छातीत धडकी बसतील अश्या कर्कश्य आवाज करण्यार्या भिंती , अचकट विचकट चाळे, आणि मंडपाखाली बसून पत्ते कुटणे. या सर्व क्रियांमध्ये कुठे आहे धर्म?
२. तुम्हाला फक्त दिवसातुन तीन वेळा दिलेल्या बांगेचा एवधा त्रास होतो, तर मुस्लिमां ना आणि अश्रध्द ( आणि सश्रध्द) लोकांना गणेशोतवस्वमध्ये किती त्रास सहन करावा लागत असेल? गणपति उत्सव चालू असताना पुण्याला यायचे सोडून लोकं आता पुणे सोडून बाहेर जातात.केवळ आपले कान वाचावे म्हणून. यातून वाजणारी गाणी पण काय असतात?
३.बांग फक्त काही मिनीटेच असते. इतरवेळी वाजत असलेला स्पीकर आणि त्यांचा भीतीदायक आवाज त्याचे काय? पोलीसांना फाट्यावर मारून अनिर्बंध असा गोंगाट चालू असतो. शिवाय सागायची चोरी. धार्मिक भावना केंव्हा दुखावतील आणि काय म्हणता काय होइल याची भीती वेगळीच,
४. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाण दिन, अण्णाभाउ साठे यांची जयंती, श्रावणामध्ये चाललेली सार्वजनीक सत्यनारायणाची पूजा आणि रिक्षाचालकां चा सार्वजनीक पुजेचा कार्यक्रम या सर्व प्रसंगी चाललेल्या ध्वनी प्रदुषणांचा डेसिबल काढा.
५. सातारा रोड असलेल्या अनेक लग्न कार्यालयाशेजारी चाललेला गोंगाट पहा.
सर्वांची बेरीज करा!! बांगेचा आवाज काहीच नाही.
केवळ मुस्लीम म्हणौन विरोध करू नका. आवाजाला जरूर करा
मी एक हिंदू आहे,आहे. गणपती हा एक देव आहे, तसेच ती एक संकल्पना आहे असे मानणारा मी एक सश्रध्द माणूस आहे.
याची नोंद घ्या.
30 Aug 2010 - 9:47 pm | शेलार मामा मालुसरे
पैगंबर जयंती ७ दिवस,
रमजान इफ्तार ३० गुणीले ८
मोहरम ताजिय रोज रात्री ३ तास गुणिले १० दिवस
ऊरुस ईस्तेक्बाल जो प्रत्येक मशिदीत असतो ७ दिवस
जरा डोळे आणि कान उघडे ठेवा सारे उमजेल.
30 Aug 2010 - 6:55 pm | विजुभाऊ
आरिफ, जेनिफर यांना मात्र रोज आरती ऐकावी लागत नाही.
महोदय कुठे आहात. थोडा अभ्यास ठेवावा . आपल्या भारतातल्या एकजात सगळ्या सरकारी आणि खाजगी आकाशवाण्या ; रोज सकाळी भक्तीगीते या नावाखाली फक्त एका तथाकथीत धर्माच्याच देवतांच्या स्तुती गीतांचा रतीब वाजवत असतात. त्याबाबत कोणत्याच अरीफ अथवा जेनिफर अथवा योहान अथवा फुलचंद गुलाबचंद अथवा कर्तार , अथवा होमाय रुसी यानी कधीच तक्रार केलेली नाहीय्ये.
30 Aug 2010 - 1:58 pm | रणजित चितळे
मी महाराष्ट्रा बाहेरील वास्तवता सांगीतली. मराठी माणुस शिवाजी महाराजांचा भक्त असल्या कारणाने तो जास्त जागरुक आहे. पण युपी, बिहार, केरळ मध्ये परिस्थीती वगळी आहे
30 Aug 2010 - 2:51 pm | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे. बाकी ते पुण्यात हज हाऊस बांधणार होते त्याचे काय झाले?
30 Aug 2010 - 3:09 pm | गांधीवादी
पुण्यात हज हाऊस कशाला, पूर्ण हजच बांधून देऊ या ना !
नाहीतरी माझ्या एक संशोधनाप्रमाणे शनिवार वाडा हा पृथ्वीचा मध्य (केंद्र बिंदू) आहे.
मुस्लीम लोक सुद्धा हज ला पृथ्वीचा मध्याच मानतात,
मग शनिवार वाड्यातच बांधून टाकू एक हज. काय म्हणता ?
कधी करायाची सुरवात ?
हलके घ्या :
अवांतर : CWG खेळामुळे १०-१५ दिवसात लोकांच्या आवक जावक मुले जर देशाची प्रगती होणार असेल तर हज बांधल्यानी किती हाज यात्री दरवर्षी भारतात प्रवास करतील आणि देश कित्ती कित्ती प्रगती करेल हे विचारायलाच नको
(त्यामुळे विचारू नका )
30 Aug 2010 - 5:40 pm | वेताळ
हिंदु बहुसंख्य म्हणुन रस्त्याने ठणठणाट करत असतील तर ते मान्य पण मुस्लिम फक्त तीन वेळ उणेपुरे ३ मिनीटे बांग देत असतील तर ते अन्यायकारक हे काही पटले नाही.दिवाळीत तर इतर धार्मियांपेक्षा हिंदु लोक वातावरणाची अ़क्षरशः वाट लावतात,त्याबद्दल काही तर लिहा.
चितळेसाहेब शिवाजी महारांजाचा मधीच मुस्लिम धर्मियांना विरोध नव्हता. उलट त्यानी मशीदी व दर्गे ह्याना वर्षाला ठराविक देणग्या मिळतील अशी व्यवस्था केली होती. ह्या उलट मंदीरातुन करोडो रुपयाचा भ्रष्टाचार होत आला आहे. आताच गाजत असलेले तिरुपती मंदीरातील जवळ जवळ करोडो किंमतीचे दागिने त्याच्याच पुजार्याने लुटले आहेत. याबद्दल हिंदु का मुळ गिळुन गप्प आहेत?
30 Aug 2010 - 6:12 pm | अवलिया
सहमत आहे,
अवांतर - मुळ कसे गिळावे याबाबत काथ्याकुट काढावा का?
30 Aug 2010 - 6:14 pm | llपुण्याचे पेशवेll
हिंदु बहुसंख्य म्हणुन रस्त्याने ठणठणाट करत असतील तर ते मान्य पण मुस्लिम फक्त तीन वेळ उणेपुरे ३ मिनीटे बांग देत असतील तर ते अन्यायकारक हे काही पटले नाही.
पुण्यात उण्यापुर्या ३ मिनीटांपेक्षा बराच जास्त वेळ बांग चालू असते.
म्हणजे मशिदितून भ्रष्टाचार होतच नाही असे म्हणायचे आहे का तुम्हाला? मध्यंतरीच एक मुल्ला पैसे घेऊन पाहीजे तसा फतवा काढून देताना सापडला होता स्टींग ऑपरेशन मधे.
चितळेसाहेब शिवाजी महारांजाचा मधीच मुस्लिम धर्मियांना विरोध नव्हता.
नसेलही. पण शिवाजीमहाराजांनी कल्याण भिवंडीच्या मशिदी पाडल्या होत्या हे माहीत आहे का तुम्हाला? बाकी आम्हाला शाळेत शिकवले जायचे शिवाजी महाराजांनी कुराणाची प्रत सन्मानाने परत केली होती. आता या शिवाजी महाराजांनी सुरत लुटली तेव्हा पेटारे च्या पेटारे भरून उचलून आणले होते. त्यात तर किती कुराणे सापडली असण्याची शक्यता आहे. ती काय लोकं शोधून शोधून परत केली असं म्हणायचं आहे का? कैच्याकैच. आणि त्या शिवाजी महाराजांनी हजारो मंदिरांना उत्पन्न इनामं दिली होती हे माहीत असेलच.
30 Aug 2010 - 5:42 pm | इन्द्र्राज पवार
"खरे धर्मनिरपेक्ष शासन आपण कधी अनुभवणार की नाही ?"
श्री.शेलार मामांचा मुख्य प्रश्न हा आहे. अन् त्याला उत्तर आहे "कधीही नाही". अठरापगड जातीच्या घटकांनी पूरेपुर भरलेला हा एक अब्ज+ लोकसंख्येचा देश कदापिही धर्मनिरपेक्ष राजकारणाने जगाला सामोरे जाऊ शकणार नाही. त्यामुळे या प्रश्नातील उत्तराचे जे स्वप्न प्रश्नकर्त्याच्या मनात आहे ते प्रत्यक्षात कालत्रयीही येऊ शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे. अहो, मूठभर लोकसंख्या असलेल्या पारशांसाठी जे सरकार देशभर 'पारसी डे' ची सार्वजनिक सुट्टी जाहीर करते, ते सरकार "मशिदीवरील लाऊडस्पीकर बांग" थांबवेल हे दिवास्वप्न आहे. शिवाय या बांगेमुळे वा त्याद्वारे होत असलेल्या "अल्ला"च्या प्रार्थनेमुळे हिंदुतील कुणी राम हा रहीम होण्यासाठी मशिदीत जाऊन पाळीत उभा राहिला आहे हे चित्र नाहीच नाही.
कोल्हापुरात पहाटे पाच वाजता महालक्ष्मी मंदिरात सनई चौघड्याचे मंजुळ स्वर सुरू होतात तर त्याचवेळी हाकेच्या अंतरावर असलेल्या बाबुजमाल पीरातून बांग ऐकू येते. या दोन्ही स्वराची सवय (दोन्हीही सौम्य आवाजात असतात) या परिसरातील रहिवाश्यांना इतकी झाली आहे की, एखादा दिवस यातील एक आवाज ऐकू आला नाही तर त्याना चुकल्यासारखे होईल. माझे एक नातेवाईक गेली ५०-५५ वर्षे या दोन्ही ठिकाणाच्या दाट मध्यवस्तीत राहतात (शेकडो राहतात), पण आज या तारखेपर्यंत त्या घरातील एकाही मुलाला वा मुलीला (तसेच त्या ज्येष्ठ नातेवाईकाला) त्या दोन-अडीच मिनिटे चालणार्या बांगेतील "अल्ला हू अकबर" या व्यतिरिक्त एकही शब्द वा पुकार कळालेला नाही आणि कुणाला समजून घेण्याची इच्छाही नाही. जो कुणी मुल्ला-मौलवी असतो, तो येतो, बांग देतो, निघून जातो. बस्स. फार किरकोळ आणि रूटीनची बाब आहे. शिवाय आमचा हिंदु धर्म इतका का तकलादू पायाचा आहे की, लाऊडस्पीकरवरून "अल्ला" ला पुकारले म्हणून धर्मावर आक्रमण झाले वा त्याला तडा गेला?
सौदीमध्ये ज्या कारणासाठी 'लाऊडस्पीकर बंदी' कायदा करण्यात येणार आहे किंवा केला गेला आहे, त्यातील प्रदुषणाचा मुद्दा त्यांना महत्वाचा वाटला म्हणून. शिवाय तेथील 'राजेशाही' पद्धती इथे कदापिही अवतरणार नाही. लोकशाहीच्या चौकटीतच कायदेकानू करावे लागतात. आज कॉन्ग्रेसचे जे सरकार आहे त्यांच्या पूर्वजांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वधर्मसमभाव हे धोरण राबविले आणि कुणाच्याही धर्मभावना दुखावल्या जाणार नाही हे पाहिले. 'हिंदुत्वा'चा मुद्दा घेऊन केन्द्रात एक फुल्ल टर्म सत्ताधारी झालेल्या भाजपप्रणित आघाडी सरकारलादेखील 'मशिदी' च्या बाबतीत असले निर्णय घेता आले नाहीत, ते आता आवळ्याभोपळ्याची मोट असलेल्या सरकारला घेता येईल असे मानणे दूधखुळेपणा ठरेल.
इन्द्रा
30 Aug 2010 - 6:18 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
केंद्र सरकारने हा दिवस ऑप्शनल हॉलिडेच्या यादीत टाकला असावा. आमच्या हापिसात हीच पद्धत आहे.
बाकी प्रतिसादाशी सहमत.
सौदीमधली बंदी कदाचित पाश्चात्य तंत्रामुळेही घातली असेल. हे मत 'एका तेलियाने' आणि 'हा तेल नावाचा इतिहास आहे' ही पुस्तकं वाचूनच!!
30 Aug 2010 - 9:50 pm | शेलार मामा मालुसरे
मस्त मांडणी.
30 Aug 2010 - 6:40 pm | इन्द्र्राज पवार
"केंद्र सरकारने हा दिवस ऑप्शनल हॉलिडेच्या यादीत टाकला असावा."
इल्ला ! वर्षानुवर्षे १९ ऑगस्ट या दिवशी "पारशी न्यू इयर" (फरवर्दिन) म्हणून केन्द्र सरकार, राज्य सरकार, मान्यताप्राप्त संस्था, शाळा-महाविद्यालये, विद्यापिठे, जि.प., बॅन्का, विमा इ. यांना 'सार्वजनिक सुट्टी' असतेच. हिंदु धर्मांच्या ज्या सुट्ट्या सार्वजनिक म्हणुन शासनाने मान्य केल्या आहेत त्याशिवाय त्याच अनुषंगाने 'ईद-ए-मिलाद, महावीर जयंती, गुड फ्रायडे, रमजान ईद, बकरी ईद, गुरू नानक जयंती आणि नाताळ' ह्या देशातील इतरधर्मियांसाठी सार्वजनिक स्वरूप म्हणून जाहीर केलेल्या आहेत, ज्या सर्वच धर्मीयांना मिळत असतात. इथे वैकल्पाचा प्रश्न येत नाही.
(थोडेसे अवांतर : वेतन आयोगाने नवीन वेतनश्रेणी जाहीर करताना देशभर केवळ "तीनच सार्वजनिक सुट्ट्या" (२६ जाने., १५ ऑगस्ट, म.गांधी जयंती) असाव्यात आणि राज्य पातळीवर तीन वैकल्पिक सुट्ट्या असाव्यात अशी शिफारस केली होती, जिला नेहमीप्रमाणे कामगार युनियन्सनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि सुट्ट्याची खिरापत मागील अंकावरून पुढे सुरूच राहिली आहे.)
30 Aug 2010 - 6:41 pm | परिकथेतील राजकुमार
अशोकरावांनी दहीहंडी निमित्त मुंबईत सार्वजनीक सुट्टी जाहीर केल्याचे आजच सकाळी स्टार माझा वर ऐकले :)
30 Aug 2010 - 6:50 pm | इन्द्र्राज पवार
होय. खरं आहे हे ! आणि वरतून अन्य जिल्हाधिकार्यांनी आपापल्या जिल्ह्यासाठी आपल्या पातळीवर सुट्टीबाबत निर्णय घ्यावा असेही सांगून टाकले. इकडे कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीवर नजर ठेवणार्यांनी शहरात 'दहीहंडी' च्या दंग्यासाठी ठिकठिकाणी एक लाख, दीड लाख अशी घसघशीत बक्षिसे जाहीर केल्यामुळे रा.रा.जिल्हाधिकारी इथेही सार्वजनिक सुट्टी जाहीर करणारच.
30 Aug 2010 - 6:54 pm | परिकथेतील राजकुमार
वाह !
चला, म्हणजे आता गटारीसाठी देखील सार्वजनीक सुट्टीची मागणी करायला हरकत नाही.
30 Aug 2010 - 10:02 pm | मिसळभोक्ता
गटारीला सुटी नको, गटारीच्या दुसर्या दिवशी हवी, असा एक मामुली बदल सुचवतो.
31 Aug 2010 - 10:36 am | llपुण्याचे पेशवेll
आम्ही स्वतःसाठी गुरुवार हा एक वैकल्पिक सुटीचा दिवस द्यावा असे सुचवतो म्हणजे बुधवार यथासांग पार पडेल . ऐवजी आम्ही रविवारी काम करू.
30 Aug 2010 - 10:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
गेले तीन वर्ष मी सरकारी नोकर असून आमच्या कार्यालयास यातले एकही वर्ष पारशी नववर्ष दिनाची सुट्टी नव्हती. पण वैकल्पिक सुट्टी घेतल्यास ना नसते. या वर्षी सगळ्या सुट्ट्या देताना गुरूवार, शुक्रवार किंवा सोमवारचा मुहुर्त साधायचा आटोकाट प्रयत्न केला आहे. त्यामुळे "माझ्यासारखे चंगळवादी पाश्चात्य संस्कृतीचे पाईक" सरकारवर अंमळ खूष आहेत.
30 Aug 2010 - 8:16 pm | रणजित चितळे
आपल्या ज्या गॅझेटेड सुट्टया असतात त्यात मुस्लीम बांधवांखातर किती व बाकीच्यां करता किती ह्या कोणी मोजल्या आहेत का.
30 Aug 2010 - 9:00 pm | इन्द्र्राज पवार
मी महाराष्ट्र राज्य गॅझेटच्या आधारे आपल्याकडील सुट्ट्यांची वर्गवारी करू शकतो. सन २०१० मध्ये अशा एकूण २४ सार्वजनिक सुट्ट्या शासनाने जाहीर केल्या. त्याची वर्गवारी खालीलप्रमाणे :
१. देशव्यापी सुट्ट्या : ४ (प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, कामगार दिन, म.गांधी जयंती)
२. हिंदू सण : ८ (महाशिवरात्री, होळी, गुढी पाडवा, रामनवमी, गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी २ दिवस)
३. मुस्लिम सण : ४ (ईद-ए-मिलाद, रमजान ईद, मोहरम, बकरी ईद)
४. व्यक्ती २ : शिवजयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
५. पारशी १ : पारसी न्यू इयर
६. ख्रिश्चन २ : गुड फ्रायडे, नाताळ
७. जैन १ : महावीर जयंती
८. शीख १ : गुरू नानक जयंती
९. अन्य १ : बुद्ध पौर्णिमा
याशिवाय जिल्हाधिकारी आपल्या अधिकारात त्या त्या जिल्ह्यासाठी ३ जादाच्या (स्थानिक म्हणून) सुट्ट्या जाहीर करू शकतात.
(* १ मे ची सुट्टी देशपातळीवर 'कामगार दिन' म्हणून जाहीर केलेली असत, तरी याच दिवशी 'महाराष्ट्र दिन' म्हणूनही सुट्टी मानली जाते.)
30 Aug 2010 - 9:23 pm | चन्द्रशेखर सातव
तसेही आपल्याकडे शहरांत व गावांत पण आवाज हे धर्मश्रद्धेचे मोठे परिमाण आहे.ज्याचा आवाज जास्त मोठा ते मंडळ किंवा प्रभाग जास्त श्रद्धाळू.आपले धर्म रस्त्यावर जास्त आणि देवळात किवा मशिदीत कमी पाळले जातात.अर्थात, काही सन्माननीय अपवाद आहेत.निदान या बाबतीत तरी ख्रिस्चन धर्माकडून काही शिकण्यासारखे आहे,ते त्यांचा धर्म चर्च मध्येच पाळतात.
30 Aug 2010 - 11:23 pm | शिल्पा ब
एक तर मुसलमानांची बांग म्हणा, त्यांचे दर शुक्रवारचे भाषण म्हणा किंवा हिंदूंच्या सणाच्या आणि उत्सवाच्या दिवशींचे म्हणा ध्वनी प्रदूषण होतेच...काय कारण आहे एवढ्या मोठ मोठ्याने देवाच्या नावाने ओरडायची? देव (असलाच तर ) काय बहिरा आहे? अन बहिरा असेल तर तो तुमचे दुखः ऐकू न आल्याने दूर करू शकणार नाही...सगळं जगच असं ओरडून त्याची भक्ती करायला लागलं तर नसला तरी देव बहिरा होऊन जाईल..
दखल घ्यावी..
आणि हो उगाच शिवाजी महाराजांना यात ओढू नका...त्यांच्या दारातल पायपुसणं होण्याची लायकी नसलेले लोक सत्तेवर आहेत.
31 Aug 2010 - 10:08 am | वेताळ
सगळे सण आणि उत्सव ह्यातच वाया घालवतात.
वर मामा ने दिलेल्या
पैगंबर जयंती ७ दिवस,
रमजान इफ्तार ३० गुणीले ८
मोहरम ताजिय रोज रात्री ३ तास गुणिले १० दिवस
ऊरुस ईस्तेक्बाल जो प्रत्येक मशिदीत असतो ७ दिवस
दिवशी माझ्या बघण्यात तर कोणतेच मुस्लिम स्पिकर लावुन ओरडताना दिसले नाहीत. आजकाल सर्वधर्मियाना दंगा करुन,दारु पिउन,पत्ते खेळायला एकमेव हक्काचा सण म्हणजे गणेश चतुर्थी हा झाला आहे.मुस्लिम पोरे देखिल उत्साहाने पहिल्या दिवसा पासुन शेवटच्या दिवसा पर्यंत मंडपात नाचताना दिसताहेत्. क्रिस्ती धर्मियाच्यात दारु पिणे वर्ज्य नसलेमुळे त्याना काही अडचण येत नाही.त्याना नाचायला व पियायला कोणत्या सणाची वाट बघावी लागत नाही.
मामा मला तरी आर एस एस चा छुपा कार्यकर्ता वाटतोय.
31 Aug 2010 - 10:26 am | शेलार मामा मालुसरे
तुमची शंका अथवा संशय चुकीचा आहे.
तुम्ही थोडे कोल्हापुर सोडुन इतर शहरात व मुस्लीम मोहल्ल्यात फिरल्यास तुम्हाला माझे म्हणणे पटेल.
मी मुब्र्यात राहत असतानाचे अनुभव तर खुप वाइट आहेत.
असो तुमच्या मताची मी कदर करतो.
तुम्ही सांगितलेला गणेशोसोत्सव शहरातला आहे.
अजुनही देशाची ६५ % जनता गावामध्ये राहते,
गणेशोसोत्सव फक्त महाराष्ट्रहोत् मोठ्या प्रमाणात होतो तर मशिदींवरील बांग सर्व देशातुन दिली जाते.
माझा प्रश्न तुम्ही डोळे उघडे ठेउन वाचावा,
मी आपल्या देशातील तथाकथित धर्मनिरपेक्षतेबद्दल प्रश्न विचारलेला आहे.
31 Aug 2010 - 10:48 am | नितिन थत्ते
>>गणेशोसोत्सव फक्त महाराष्ट्रहोत् मोठ्या प्रमाणात होतो तर मशिदींवरील बांग सर्व देशातुन दिली जाते.
प्रत्येक राज्यात आपापले उत्सव असतात. गुजरात - नवरात्र
बंगाल - दुर्गापूजा
वगैरे
31 Aug 2010 - 1:57 pm | क्लिंटन
कोणीच होळी/रंगपंचमीचा उल्लेख कसा केला नाही?त्यावेळी ध्वनीप्रदूषण नसते पण रस्त्यावरील कोणावरही (विशेषत: तरूण मुलींवर) हक्काने फुगे मारणे, रस्त्यावरील कोणावरही रंग फेकणे असे प्रकार चालतात. झाडे जाळून होणारे प्रदूषण आणि पर्यावरणाची हानी या गोष्टींविषयी बोलायलाच नको.
मशिदींमधून किती प्रमाणात मोठ्याने बांगा दिल्या जातात याची कल्पना नाही कारण मी कधीच मशिदीच्या आसपास राहिलेलो नाही. अशा बांगा देऊन लोकांना दररोजचा त्रास दिला जात असेल तर त्याचे अजिबात समर्थन अजिबात नाही.तसेच बकरी ईदला बकऱ्यांना हलाल करायच्या प्रकाराचा मी नेपाळमध्ये एका देवळात कोंबडी कापायचा प्रकार अनवधनाने बघितला त्या प्रकाराइतकाच मला तिटकारा आहे. त्यांच्या इतर सणांविषयी मला काही कल्पना नाही म्हणून त्याविषयी काही लिहित नाही. पण हिंदुंचे सण म्हणजे बेशिस्तपणा आणि हुल्लडबाजींनी परिपूर्ण का असतात? गणेशोत्सवाचे काही विचारूच नका.नवरात्रांदरम्यान नाचण्यामागे कृष्णभक्ती हा हेतू किती जणांचा असेल? मला वाटते त्यात मुलींशी लगट करण्याचाच हेतू अनेकांचा असतो.किमान काही सणांदरम्यान (गणेशोत्सव, दुर्गापूजा) लाऊडस्पीकरवरून बोंबाबोंब कान फुटेपर्यंत चालू असते. आणि या सगळ्यांवर काही बोलले तर धार्मिक भावना दुखावल्या जातात म्हणून काही बोलायचे नाही! त्या मानाने ख्रिश्चन लोकांचे सण चांगले वाटतात. एक तर ख्रिसमस आणि गुड फ्रायडे-ईस्टर सोडून फारसे सण नाहीतच आणि जे आहेत त्यात असा धांगडधिंगा तरी नसतो. बहुतेक वेळी हे सण आले कधी आणि गेले कधी हेच कळत नाही.
हा असा public nuisance धार्मिक भावनांच्या नावाखाली किती दिवस आणि का सहन करायचा?
31 Aug 2010 - 12:17 pm | इन्द्र्राज पवार
"आजकाल सर्वधर्मियाना दंगा करुन,दारु पिउन,पत्ते खेळायला एकमेव हक्काचा सण म्हणजे गणेश चतुर्थी हा झाला आहे."
... सहमत. आता यात भर घाला "नवरात्री"च्या धुमाकुळाची ! कोल्हापुरात तर आजकाल 'गणराया` पेक्षा हुल्लडबाजांना `दुर्गामाते` च्या आगमनाची उत्सुकता जास्त असल्याचे दिसून येत आहे. कारण? अर्थातच तो फाल्गुनीच्या आणि बाबल्याच्या गर्बा रिमिक्स डिस्कोच्या तालावर नॉनस्टॉप चालणारा नाचाचा हैदोस. गणेशाच्या मूर्तीसमोर नाचता तर येते पण तीत 'मुली' नसतात, त्यामुळे 'नवरात्री' चे आकर्षण !
रात्री ११ नंतर डॉल्बीला बंदी आहे (पण कागदावर....). तक्रार केलीच तर पोलिसमामांचे ठरलेले उत्तर आहेच, "अहो, क्क्याय व्हतयं !! नऊ दिवसानंतर गुमान होत्यातच की सगळी !" त्यामुळे ऐकत/पाहात राहणे ही एकमेव स्ट्रॅटेजी.
इन्द्रा
31 Aug 2010 - 10:43 am | वेताळ
भारतात जेव्हढी आजपर्यत सरकारे आली तेव्हढी सगळी मुलतत्ववाद्यामा खाद्य पुरवत आली आहेत. त्यामुळे दिवसा गणिक मुलतत्ववादी वाढत आहेत. प्रत्येक सामान्य गोष्टीत काहीतरी काळेबेरे आहे हे, हे लोक जाणिवपुर्वक समाजात पसरत आहेत्.त्यामुळे प्रत्येकाची नजर इतर धर्मियांकडे बघण्याची बदलत आहे.
मी कोल्हापुर मध्ये असु दे अथवा मुंबई मध्ये त्याचा काही फरक पडत नाही. एक सरळ साधे उदाहरण देतो. आजकाल हिंदु धर्मिंयांमध्ये किती एकी आहे? एक मराठा, एक ब्राम्हण,एक लिंगायत तर एक दलित असे एक ना हजार प्रकार आहेत्. यातला प्रत्येक जण दुसर्याला संशयीत नजरेने बघत असतो.मागच्या एका धाग्यात दादोजीचा पुतळा काढण्यावरुन जी चर्चा झाली त्यात किती लोक खालच्या पातळीला जावुन एकमेकांवर टिका करत होते ते तुम्ही पाहिले आहेच. मग कशाला तुम्ही इतर धर्मियाना नावे ठेवता?तुमच्या धर्माततच इतका पराकोटीचा द्वेष एकमेकां विरुध्द भरला असताना इतर लोकांची काळजी कशाला करता?
निदान तथाकथित धर्म निर्पेक्षपणा मुळे अजुन आपल्या देशात यादवी झाली नाही हे आपले भाग्यच मी समजतो.
31 Aug 2010 - 3:13 pm | शेलार मामा मालुसरे
भारतात जेव्हढी आजपर्यत सरकारे आली तेव्हढी सगळी मुलतत्ववाद्याना खाद्य पुरवत आली आहेत. त्यामुळे दिवसा गणिक मुलतत्ववादी वाढत आहेत. प्रत्येक सामान्य गोष्टीत काहीतरी काळेबेरे आहे हे, हे लोक जाणिवपुर्वक समाजात पसरत आहेत्.
ह्या २ ओळींशी मी सहमत आहे.
31 Aug 2010 - 1:15 pm | रणजित चितळे
मी गॅझेटेड म्हणजे केंन्द्रसरकार गॅझेट बद्दल लिहीत होतो. १८ सुट्ट्यांमधे मुस्लीम बांधवांकरता किती असतात ते.
आणि एका प्रसिद्ध मासिका नुसार आपल्या देशात रेल्वेकडे सगळ्यात जास्त जागेची मालकी आहे, त्या खालोखाल वक्फ बोर्डा कडे व त्या नंतर सैन्याकडे रिअल इस्टेट आहे.
31 Aug 2010 - 9:37 pm | हुप्प्या
मशीदीतून निघणारी बांग कानाला फार सुखावह नसते. पण ती त्यामानाने अगदीच अल्पकाळ चालते. आणि वाद्ये वगैरेचा ठणठणाट नसल्यामुळे तितकी वाईट वाटत नाही. अर्थात तीही कमी आवाजात करता आली तर आनंदच आहे. मशीदीत अनेक वाईट गोष्टी घडू शकतात, घडल्या आहेत जसे डोकी भडकवणारी भाषणे, लोकांना कडव्या इस्लामची आठवण करून देणे, जिहादला उद्युक्त करणे, अतिरेक्यांना आसरा देणे, शस्त्रे साठवणे इत्यादी. पण ध्वनीप्रदूषणाचा क्रम बराच खालती आहे असे माझे मत.
पण गणेशोत्सव, नवरात्र, गरबा, दांडिया, लग्ने, मुंजी, सत्यनारायण, सत्कार असल्या कार्यक्रमांच्या निमित्ताने जो काही ध्वनीप्रदूषणाचा धिंगाणा चालतो तो भयावह आहे. एखादे वाईट दृश्य असेल तर डोळे मिटणे, इतरत्र बघणे असे पर्याय असतात. पण ह्या उच्चरवात चालणार्या गोंगाटाकडे दुर्लक्ष करणे केवळ अशक्य आहे. तिथून दूर जाणे एवढाच पर्याय उरतो. ज्यांची घरे त्या तथाकथित उत्सवाच्या जवळ आहेत त्यांना हाही पर्याय व्यवहार्य नाही.
लोकांकडून वर्गणी गोळा करून, महागडे कर्णे भाड्याने घेऊन त्यांच्यावरच अत्याचार करायचे हे प्रकार थांबवायला युद्ध पातळीवरून काहीतरी केले पाहिजे. असल्या आवाजाने लहान बाळांच्या कानाचे जन्माचे नुकसान होऊ शकते, वृद्ध लोकांचे स्वास्थ्य हरवते पण तरूण लोकांनाही झोप नीट न लागल्यामुळे विविध व्याधी जडू शकतात.
माझ्या मते भारतीय लोकांच्या दोन अत्यंत घाणेरड्या सवयी आहेत. एक म्हणजे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि दुसरे सार्वजनिक शांतताहरण करणारे ध्वनिप्रदूषण. याविरुद्ध काहीतरी केलेच पाहिजे असे मला वाटते. दोन्ही गोष्टी भारतीय लोकांचेच नुकसान करणार्या आहेत. आणि सहज टाळण्याजोग्या आहेत. ज्यांना हे करायची खाज असेल त्यांना अकूस्टिकली आयसोलेटेड चेंबर अर्थात ध्वनीकक्ष बनवायची सक्ती करावी. ते जमत नसेल तर बंदी. निसर्ग सौदर्य जसे जपण्याची गोष्ट आहे तशीच सार्वजनिक शांतताही आहे हे लक्षात घेतले पाहिजे.