गेल्या वीकेंडला "दार-उल्-सल्तनत" बिजापूर ला जायचा योग आला. त्याचे फोटोज टाकीन तेव्हा टाकीन पण परतीच्या प्रवासात काही छान (माझ्या मते) फ्रेम्स मिळाल्या.
परतीचा प्रवास तसा कण्टाळवाणाच पण या ट्रिप मधे देव माझ्यावर निहायत खूश होता. समोर हिरवा-निळा पट होता. माझी तोफ (Canon) धडाडू लागली........
प्रतिक्रिया
24 Aug 2010 - 9:02 pm | रेवती
आम्हालाही फक्त तोफगोळेच दिसतायत!;)
24 Aug 2010 - 10:09 pm | पैसा
किल्लेदार राम राम घेवा. पन चित्रं दिसत न्हायीत. चिकटविताना गडबड झाल्याली दिसत्ये.
24 Aug 2010 - 10:24 pm | चतुरंग
'मेघवेडे' फोटू क्लास आलेत! ;)
24 Aug 2010 - 10:47 pm | मेघवेडा
हा हा हा! असेच म्हणतो!
24 Aug 2010 - 10:26 pm | पैसा
आता दिसतात
24 Aug 2010 - 10:27 pm | रेवती
फोटू मस्त आलेत!
24 Aug 2010 - 10:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
झक्कास! सुंदरसे फोटो निवडून मोठ्ठे प्रिंट मारून आणा आणि फ्रेम लावून टाका घरात.
24 Aug 2010 - 10:40 pm | बेसनलाडू
(आस्वादक)बेसनलाडू
24 Aug 2010 - 10:41 pm | शिल्पा ब
झकास..
24 Aug 2010 - 10:41 pm | प्रभो
लईच भारी... साला दहा वर्षं झाली विजापूरला जाऊन.
बाकी, आमच्या गावच्या रस्त्याचं (सोलापूर) दुरुन दर्शन घडवल्याबद्दल धन्स रे.. :)
24 Aug 2010 - 10:44 pm | विलासराव
अप्रतिम छायाचित्रे.
आवडले.
24 Aug 2010 - 10:53 pm | पांथस्थ
किल्लेदारा,
मस्तच आहेत फोटो!
असे आभाळ मला कधीच टिपता येत नाही काही टिप्स द्या की राव!
24 Aug 2010 - 11:31 pm | किल्लेदार
mazhya photos na flickr war bhootbadha zali aahe. tyaamule te neat disat nahit. koni upay sangel ka?
24 Aug 2010 - 11:59 pm | चतुरंग
फ्लिकरवरच्या फोटोवर राईट क्लिक - > प्रॉपर्टीज -> यूआरेल कॉपी -> मिपावरच्या चित्राच्या खिडकीत पेस्ट -> ओके ->
पूर्वदृश्य
(साईज अॅडजस्ट करायचा असल्यास मिपावरच्या चित्रखिडकीत हवी ती मापे भरुन बघू शकता. पूर्वदृश्यात कसे दिसते आहे हे समजतेच त्यानुसार कमीजास्त करता येईल.)
सगळे मनासारखे झाले की मग प्रकाशित करा
(मांत्रिक)चतुरंग
24 Aug 2010 - 11:34 pm | नंदन
ढगांचे फोटू मस्तच आलेत. विजापूरचेही येऊद्यात.
25 Aug 2010 - 12:19 am | मस्त कलंदर
सॉल्लीड फोटो. आवडले हे वे सां न ल
25 Aug 2010 - 12:27 am | सुनील
फोटो मस्तच!
25 Aug 2010 - 5:51 pm | अरुंधती
सर्व ढग्गोबांचे पुंजके मस्त दिसत आहेत! आकाशाचा रंग तर खासच! :-)
25 Aug 2010 - 9:16 pm | सूड
झकास.....आताच वर्षावर्णन डकवलं त्यातलं ढगांचं वर्णन आठवलं.
25 Aug 2010 - 9:20 pm | स्वाती दिनेश
सुंदर फोटो..
स्वाती
25 Aug 2010 - 11:10 pm | किल्लेदार
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद....
16 Sep 2010 - 4:58 pm | नि३सोलपुरकर
सुंदर फोटो..झकास
16 Sep 2010 - 8:24 pm | Pain
फोटो आवडले.
सोलापूरला अनेकदा गेलोय. तिथून विजापूर किती दूर आहे ? आदिलशाहीच्या किती इमारती शिल्लक आहेत ?
16 Sep 2010 - 9:18 pm | मस्तानी
राहवलं नाही म्हणून हा एक आमच्या कडून सुद्धा ... आभाळ शेवटी सगळीकडे सारखंच, नाही का :)
17 Sep 2010 - 7:00 am | सुनील
हा फोटो कुठला?