गुगल व स्काईप वर बंदी - मूर्खपणाचा कहर

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
14 Aug 2010 - 10:11 am
गाभा: 

आजच्या सकाळमध्ये स्काईप वर बंदी घालणे आवश्यक असल्याचे सुरक्षा यंत्रणांचे मत प्रसिद्ध झाले आहे. सर्दी झाली म्हणुन नाक कापून टाकायचा असा हा प्रकार वाटतो.

http://72.78.249.124/esakal/20100814/5012159758951521931.htm

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

14 Aug 2010 - 10:24 am | नितिन थत्ते

काल सायंकाळी पाहिलेल्या बातम्यांमध्ये ब्लॅकबेरीने अ‍ॅक्सेस कोड द्यायचे मान्य केलेले दिसते.

सुरक्षेच्या दृष्टीने जे गरजेचे आहे ते करायलाच हवे.

मदनबाण's picture

14 Aug 2010 - 10:28 am | मदनबाण

सुरक्षेच्या दृष्टीने जे गरजेचे आहे ते करायलाच हवे.
१००% सहमत...

शानबा५१२'s picture

14 Aug 2010 - 10:34 am | शानबा५१२

१००% शयमत.

___________________________________________________
.......WORK IN PROGRESS........

बोलघेवडा's picture

14 Aug 2010 - 10:43 am | बोलघेवडा

हा खरच मूर्खपणाचा कळस आहे. सुरक्षा यंत्रणा म्हणे .डोम्बलाची सुरक्षा यंत्रणा !!!

हे म्हणजे घटस्फोट होतो म्हणून लग्नावर बंदी घालण्यासारखं आहे.

त्रिवार निषेध.

शिल्पा ब's picture

14 Aug 2010 - 10:47 am | शिल्पा ब

<<<हे म्हणजे घटस्फोट होतो म्हणून लग्नावर बंदी घालण्यासारखं आहे.

=)) =)) उपमा प्रचंड आवडली..

हे म्हणजे घटस्फोट होतो म्हणून लग्नावर बंदी घालण्यासारखं आहे.

हा हा हा लई भारी ;-) हसून हसून खुर्चीवरुन खाली, पडू ना आम्ही =))

हा हा .. मूळ बातमी आणि त्या खालच्या प्रतिक्रिया वाचल्या. अंमळ मजा वाटली.
बातमीमध्ये म्हटले आहे की दहशतवादी हल्लेखोरांनी स्काईपचा वापर केला होता म्हणून स्काईपवर बंदी !
या न्यायाने, त्यांनी टेलेफोन, मोबाईल तसेच टॅक्सी, लोकल, बोट इत्यादिंचासुद्धा वापर केला होता. तसेच ताजमधले जीने, लिफ्ट, मुंबईचे रस्ते हे सुद्धा त्यांच्या वापरात होते... याची नोंद सरकार दरबारी नाही असे दिसते :)

प्राजक्ताचि फुले's picture

14 Aug 2010 - 12:54 pm | प्राजक्ताचि फुले

१००% सहमत !!!

विलासराव's picture

14 Aug 2010 - 10:52 am | विलासराव

स्काईप वर बंदी म्हणजे आमचे वांधे होणार........बाकी आपल्या हातात काय आहे म्हणा? दुसरा मार्ग शोधावा लागेल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Aug 2010 - 10:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

फोनवर बोलणं परवडणार नाही!!

(समदु:खी) अदिती

गुगलटॉक, याहू मेसेंजर आणि इतर व्हॉईप सर्विसेसचे ते काय करणार आहेत?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Aug 2010 - 11:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तेच होईल असं वाटतंय. (आपल्याकडे जेनेरिक नाव घेण्यापेक्षा ब्रांड नेम घेतण्याची पद्धत असावी. उदा. झेरॉक्स!)

विलासराव's picture

14 Aug 2010 - 11:05 am | विलासराव

गुगलटॉक, याहू मेसेंजर आणि इतर व्हॉईप सर्विसेसचे ते काय करणार आहेत?

बहुतेक करुन दहशतवादी हल्लेखोरांनी अजुन त्याचा वापर केलेला दिसत नाही. किंवा सरकारला अजुन त्याचा सुगावा लागला नसेल.

सरकारी कारभार म्हनजे ना........जाऊ द्या सर्वांना माहीतीच आहे.

नितिन थत्ते's picture

14 Aug 2010 - 11:04 am | नितिन थत्ते

दहशतवाद्यांनी स्काईप वापरला म्हणून स्काइपवर बंदी हा दिशाभूल करणारा दावा आहे.

स्काईप वापरून केलेल्या संभाषणाचे रेकॉर्ड सुरक्षा यंत्रणांना देण्यास नकार दिल्यामुळे बंदी येऊ घातली आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Aug 2010 - 11:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्काईपमधे पीअर-टू-पीअर कनेक्शन होतं त्यामुळे स्काईपकडे संभाषणं रेकॉर्ड करता येतात का? जाणकारांनी खुलासा करावा.

अजूनतरी बंदी घालावी असे मत दिसतेय . बंदी येईल असे मलातरी वाटत नाही.

स्काईप मॉडिफाइड वर्षन ऑफ सीप प्रोटोकॉल वापरते. सिप प्रोटोकॉल चा उपयोग फक्त कॉल एस्टब्लिश करण्यपुरता आणि नॅट ट्रवर्सल करता होतो. त्यानंतर सर्व काही पीअर-टू-पीअर कनेक्शन असते आणि अकेशनली मैं सर्वर ला रिपोर्टिंग होते. त्यामुळे मलाही माहीत नाही की स्काईप कॉल्स कसे काय रेकॉर्ड करू शकेल.

निखिल देशपांडे's picture

14 Aug 2010 - 11:12 am | निखिल देशपांडे

बातमी आणि प्रतिक्रिया वाचुन हसत आहे.
सगळ्यात आधी सरकारने स्काइप किंवा गुगल दोघांनाही अजुन नोटिस दिलेली नाही.
हे सगळे प्रकरण सुरु झाले ब्लॅकबेरी पासुन. आता ब्लॅकबेरी ने सरकारला लिगली मेल्स इंटर्सेप्ट करायची सोय दिली तर त्यांचा वरची बंदीची शक्यता टळली आहे. अशाच दोन सुविधा देणारे म्हणुन गुगल आणि स्काईपचे नाव पुढे आले.

भारतातल्या इमेल प्रोव्हाइडर्स ला लिगली प्रत्येक इमेल सात वर्षा पर्यंत जपुन ठेवणे बंधनकारक आहे. म्हणजेच एखाद्या मेल बॉक्स चे गेल्या सात वर्षातले इमेल कम्युनिकेशन सरकार कधीही मागु शकते. जिमेल च्या केस मधे सरकारला सध्या तांत्रिक दृष्टा मेल डिक्रिप्ट करता येत नाहिए. त्याच मुळे जर गुगलने योग्य पावले उचलेले तर बंदी घातल्या जाणार नाही.

स्काईपची पण सेम केस आहे. स्काइप कॉल डिक्रिप्ट करणे शक्य नाहिए, आणि सुरक्षा एजन्सिज ला अशी सोय असणे अतिशय गरजेचे आहेच. जर स्काइप या संदर्भात सरकारला मदत करायला तयार नसेल तर त्यांचावर भारतात बंदी का घालु नये???? स्काइप ही भारतात रजिस्टर्ड कंपनी नाहिए त्यामुळे त्यांचाबाबत बंदीची शक्यता नाकारता येत नाही.

समंजस's picture

14 Aug 2010 - 3:30 pm | समंजस

सहमत

भारत सरकार ने बंदी अजून तरी कुठल्याच सर्विसेस वर टाकलेली नाहीय. त्यामुळे हा धागा सध्यातरी निरर्थक आहे. जर बंदी एखाद्या सर्विस वर टाकलीच तर तेव्हा ह्या धाग्याचं प्रयोजन योग्य असेल.

[अवांतरः अमेरीकन सरकारच्या सुरक्षा एजेसींजना हवी ती माहिती देश हिताच्या/सुरक्षेच्या नावाखाली देणे ते सुद्धा विना तक्रार, बोभाटा न करता हे या प्रकारच्या सर्विसेस देणार्‍या कंपन्यांना मान्य असतं परंतु भारत किंवा ईतर देशांनी अश्या माहितीची मागणी केल्यास यांच्या व्यक्ती स्वातंत्र्या वर, व्यवसाय स्वातंत्र्या वर, ग्राहक हितांवर संकट का येतं?? फक्त अमेरीकेने सुरक्षेची काळजी घ्यावी इतर देशांनी नाही?? मागील काही दिवसांतील धाग्यांवरचं हे वाक्य आठवलं "ऑल ऍनिमल्स आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल " ]

परिकथेतील राजकुमार's picture

14 Aug 2010 - 11:53 am | परिकथेतील राजकुमार

असे काही होणार नाही.

देशाला विकायला बसलेली माणसे आहेत ही, ही कसली सुरक्षीततेची काळजी घेणार ? आणि ह्यांची 'किंमत' मोठ मोठ्या कंपन्या व्यवस्थीत ओळखुन आहेत.

आणि मुळात बंदी घालणार म्हणजे काय करणार ? ज्या प्रकारे बंदी घातलेल्या अतिरेकी संघटना २४ तासात नविन नाव घेउन कार्यरत होतात त्याच प्रकारे ह्या सेवा सुरु होतील. भारतात अशा कितीतती बंदी घातलेल्या सेवा आणि संस्थळे आज वेगळ्या नावानी तेवढ्याच जोमानी कार्यरत आहेत.

शिल्पा ब's picture

14 Aug 2010 - 11:55 am | शिल्पा ब

<<भारतात अशा कितीतती बंदी घातलेल्या सेवा आणि संस्थळे आज वेगळ्या नावानी तेवढ्याच जोमानी कार्यरत आहेत.

उदा. ?

परिकथेतील राजकुमार's picture

14 Aug 2010 - 12:03 pm | परिकथेतील राजकुमार

ते आम्ही तुम्हाला विनामोबदला का सांगावे ? ;)

भारतीय's picture

14 Aug 2010 - 12:13 pm | भारतीय

"गुगल व स्काईप वर बंदी - मूर्खपणाचा कहर"

वरील वाक्यात "गुगल व स्काईपवर बंदी" ऐवजी "हा असा धागा काढणे" असे वाचावेसे वाटते..

देशाच्या सुरक्षिततेबद्दल जे करावे लागेल ते केलच जावं.. त्यात तडजोड नको.. अन अशा गोष्टींची अंतरजालावर चर्चाही नको.. धागा काढणार्‍यांनी केवळ हेडलाईन वाचून धागा सुरू केलाय असे दिसते.. आपण गुगल व स्काईप वापरतो म्हणजे आपण फार शहाणे झालो असा होतो काय? बातमीच्या मुळापर्यंत जा व बंदीचा विचार (हो! विचारच झालाय, अजून बंदी आली नाही!) का केला गेलाय हे शोधा..

चिरोटा's picture

14 Aug 2010 - 12:15 pm | चिरोटा

नेहेमी प्रमाणे 'पुढारलेले' देश गुगल्/स्काईपवरील संभाषणे कशी चोरुन ऐकतात यावर आपल्या सरकारने/मिडियाने उहापोह करावा आणि मगच निर्णय घ्यावा.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Aug 2010 - 12:20 pm | परिकथेतील राजकुमार

देशाच्या सुरक्षिततेबद्दल जे करावे लागेल ते केलच जावं.. त्यात तडजोड नको.. अन अशा गोष्टींची अंतरजालावर चर्चाही नको..

गुगल व स्काईप वर (ज्या प्रमाणात / प्रकारात असेल त्या) बंदी आणल्याने देशाच्या सुरक्षीततेत कशी वाढ होणार आहे हे भारतीय ह्यांच्याकडून जाणुन घेण्यास उत्सुक आहे.

तसेच आतापर्यंत सरकारने बंदी आणलेली साईटसची / सेवांची यादी देखील त्यांनी इथे द्यावी, तसेच ती बंदी कितपत यशस्वी झाली हे पण जाणुन घेण्यास (पुराव्यानीशी) उत्सुक आहे :)

नितिन थत्ते's picture

14 Aug 2010 - 12:43 pm | नितिन थत्ते

आम्हाला एका "वहिनींची" आठवण झाली.

भारतीय's picture

14 Aug 2010 - 12:53 pm | भारतीय

पराभाऊ.. नक्कीच..

अन आम्ही हे विनामोबदला सांगु ;)

तुमच्या प्रतिसादावर प्रतिक्रिया देण्याऐवजी मी या विषयावर एक वेगळा धागा लवकरच सुरू करील.. त्यात आय होप तुमचे शंकेखोर मन शांत होईल .. (नाही झाले तरी काय फरक पडतो!).. तुर्तास ईतकेच सांगु ईच्छितो कि हा धागा व त्यावरील येणार्‍या प्रतिक्रिया या केवळ अर्धवट ज्ञानावर आधारीत आहेत. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जे विषय संवेदन्शील असतात त्यावर आपण ईथे चिरफाड करणे योग्य नाही!..

अवांतरः मी ईथे जेंव्हा वाचनमात्र होतो व सदस्यनाम सक्रीय झाले नव्हते तेंव्हा तुमचे 'किस्से कॅफेतले' वाचून तुमचा फॅन झालो होतो (म्हणजे अजूनही आहे).. तुम्ही त्या प्रांतात अजून का लिहित नाही? ईथे एवढं टेंशन घेण्यापेक्षा तिथे दोन क्षण विरंगुळा होईल आमचा..

शिल्पा ब's picture

14 Aug 2010 - 12:56 pm | शिल्पा ब

<<<आय होप तुमचे शंकेखोर मन शांत होईल .. (नाही झाले तरी काय फरक पडतो!

अहो हे मन जर शांत नाही झालं तर तुमच्या ब्लोगची वाट लावेल..
साधंसुधं नाही हे मन, पुणेरी फोडणीचं आहे.

शिल्पाताई आम्हीही पुणेरीच !! फोडणी अगदी वरपून खायची सवय आहे!!

शिल्पा ब's picture

14 Aug 2010 - 1:06 pm | शिल्पा ब

अरे वा...होऊन जाऊ द्या मग...हाय काय न नाय काय.. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

14 Aug 2010 - 1:22 pm | परिकथेतील राजकुमार

तुमच्या प्रतिसादावर प्रतिक्रिया देण्याऐवजी मी या विषयावर एक वेगळा धागा लवकरच सुरू करील.. त्यात आय होप तुमचे शंकेखोर मन शांत होईल .. (नाही झाले तरी काय फरक पडतो!).. तुर्तास ईतकेच सांगु ईच्छितो कि हा धागा व त्यावरील येणार्‍या प्रतिक्रिया या केवळ अर्धवट ज्ञानावर आधारीत आहेत. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जे विषय संवेदन्शील असतात त्यावर आपण ईथे चिरफाड करणे योग्य नाही!..

सर्व प्रतिक्रीया का काही प्रतिक्रीया ??

नाही, आमची पण प्रतिक्रीया अर्धवट ज्ञानावर आधारीत आहे असे आपल्याला वाटत असेल तर आपण बंदी आणलेल्या संस्थळांची नावे द्या, मी १० मिनिटात सगळी उघडुन त्यांचे स्क्रीनशॉट इथे टाकुन दाखवतो :)

काय बोलता राव तुम्ही सुरक्षीततेविषयी ? आय पी बॅन झाला म्हणुन तक्रार नोंदवल्यावर मॉनिटर जप्त करणारे पोलिस इथे सुरक्षीततेवर देखरेख ठेवणार ? =)) एकदा आमच्याकडे सायबर क्राईमवाले कॅफेत तपासणीला आहे की बोलावतो तुम्हाला :) नाही छान करमणुक झाली तर बोला.

मालक अहो सायबर सुरक्षा सल्लागार वगैरे पदांवर काम करणार्‍यांच्या ऑफीसेस मधल्या राउटरची युजरनेम पासवर्ड सुद्धा ४/४ वर्ष 'डिफॉल्ट' वर सेट असतात, काय बोलायचे आता ?

असो..

तुमच्या धाग्याची वाट बघत आहे.

'अंडरग्राऊंड हॅकर्स ' समोर आम्ही कस्पटासमानच हो! असो..

परिकथेतील राजकुमार's picture

14 Aug 2010 - 1:37 pm | परिकथेतील राजकुमार

'अंडरग्राऊंड हॅकर्स ' समोर आम्ही कस्पटासमानच हो! असो..

काय सांगता ?

बर मग निदान

तुर्तास ईतकेच सांगु ईच्छितो कि हा धागा व त्यावरील येणार्‍या प्रतिक्रिया या केवळ अर्धवट ज्ञानावर आधारीत आहेत

ह्यावर तरी प्रकाश टाकाल काय ? कोणत्या प्रतिक्रीया ह्या अर्धवट ज्ञानावर आधारीत आहेत हे जरा सांगु शकाल काय ? तसेच ज्यांनी अशा अर्धवट ज्ञानावर प्रतिक्रीया दिल्या आहेत, त्यांच्या ज्ञानात आपण काही भर घालु शकाल काय ? आमचे ज्ञान वाढवायला आम्हालाही आवडेलच :) आणि सध्या ते शक्य नसेल तर आपले वरिल विधान त्वरीत मागे घ्यावे, अन्यथा अर्धवट ज्ञान पुर्ण करावे.

भारतीय's picture

14 Aug 2010 - 1:56 pm | भारतीय

पराभाऊ दमानं !

एकदम द्वंद्वयुद्धच खेळू लागलात तुम्ही !! ज्यांना 'गुगल व स्कईपवर बंदीचा विचार हा मुर्खपणा वाटतो' त्यांना त्याविषयी पुर्ण माहीती नाही असे वाटते अथवा त्यांची मते पुर्वग्रहदुषित आहेत असे वाटते.. 'अर्धवट ज्ञान' हा शब्द तुम्हास (वा ईतर कोणास ) अपमानास्पद वाटला असल्यास दिलगिरी व्यक्त करून तो शब्द मागे घेतो.. आणि या विषयावर (गुगल/ स्काईप्/बंदी वगैरे ) अधिक प्रकाश टाकण्यासाठी लवकरच (थोडे पुढेमागे होऊ शकते ) एक धागा सुरू करील ..

हे पण जाणुन घेण्यास (पुराव्यानीशी) उत्सुक आहे

+१०००

धाग्यातील विचाराशी असहमत.

१) सरकारला ह्या कंपन्यांवर बंदी घालायची हौस असेल असे वाटत नाही. शिवाय लक्षात घ्या कोण्या राजकारण्याने खुन्नसमधे अथवा लाच खायला कोण्या कंपनीला ब्लॅकलिस्टमधे टाकले नाही.
२) सुरक्षा यंत्रणा जर काही आक्षेप घेत असतील तर त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल व काही अनुचित प्रकार घडल्यावर त्यांना शिव्या घालायला आपणच पुढे असणार ना?
३) संदेशवहन तंत्रज्ञानातील ज्या काही बारीक सारीक बाबी आहेत की ज्याच्या माहीतीमुळे देशाच्या शत्रुंचा छडा लावणे सोपे व्हावे. अशी माहीती जी या खाजगी कंपन्यांच्याजवळ आहे व त्याचा उपयोग सुरक्षा यत्रणांना होउ शकतो अशी माहीती उपलब्ध करुन द्या अन्यथा बंदीला सामोरे जा इतका अर्थ तूर्तास लावत आहे.
४) चीनने ह्याच कंपन्यांवर दबाव आणुन त्यांना हवी ती माहीती मिळवण्याची सोय केली.

चीनने ह्याच कंपन्यांवर दबाव आणुन त्यांना हवी ती माहीती मिळवण्याची सोय केली.
सहमत... गुगलने चीन सरकारशी मांडवली केली म्हणुनच ते त्यांचे हापिस तिथे थाटु शकले... नाहीतर गुगलला चीन मधे स्थान नव्हतच आधी.

शानबा५१२'s picture

14 Aug 2010 - 1:50 pm | शानबा५१२
गुगल व स्काईप वर बंदी - मूर्खपणाचा कहर

ह्या वाक्याशी सहमती दाखवणा-या प्रतिसादकर्तांना एवढच म्हणेन की आपली आज देशाला गरज आहे.तेव्हा आपण सुरक्षा खात्यात भरती व्हावे व त्या मुर्ख्,अनाडी जे देशाची सुरक्षा व्यवस्था संभाळत आहेत त्यांची जागा घ्यावी.

@प. राजकुमार

जे एखादी साईट बंद करतात ते काही हॅकींग जाणत नसतात का?
आपला बॅन केलेली साईट १० मिनिटात खोलण्याचा दावा अतिशयोक्ती वाटतो.
मीसुद्धा ऑर्कुटची खाती मिनिटात हॅक करणारे पाहीलेत पण त्यांना आज त्यांचे 'सिनियर हॅकर' काहीच करु देत नाहीत.तेव्हा आपण आपला दावा मागे घ्यावा.ह्या गोष्टी आपल्या काल्पनिक कथेत वाचायला ब-या वाटतात.

MATURE बाळ शानबा.

शिल्पा ब's picture

14 Aug 2010 - 1:57 pm | शिल्पा ब

<<<ह्या वाक्याशी सहमती दाखवणा-या प्रतिसादकर्तांना एवढच म्हणेन की आपली आज देशाला गरज आहे.तेव्हा आपण सुरक्षा खात्यात भरती व्हावे व त्या मुर्ख्,अनाडी जे देशाची सुरक्षा व्यवस्था संभाळत आहेत त्यांची जागा घ्यावी.

MATURE बाळ शानबा.

तुम्ही आजकाल paradox मध्ये लिहिणे चालू केले आहे काय ?

शानबा५१२'s picture

14 Aug 2010 - 2:40 pm | शानबा५१२

Life is full of contradictions.even in field of science,when a theory is proposed,there are contradictions ,which are named as 'exceptions'.

ह्याच धरतीवर आम्ही लिहायला सुरवात केली आहे(थोड्याश्या विश्रांतीनंतर)

Pyridoxine बद्दल बोलु शकतो,पण आपण लिहलेला शब्द आमच्या प्रांतात येत नाही.

मी काही केमीस्ट्रीबद्दलच्या फोरम्सवर लिहतो,तिथे ती परदेशी भाषा व लोक खुप डोकंफोडी करायला लावतात.म्हणुन मग ईथे येउन मराठीत लिहायला आवाडत.(डोकं गहान ठेउन लिहायला जास्त आवडत)

परिकथेतील राजकुमार's picture

14 Aug 2010 - 2:04 pm | परिकथेतील राजकुमार

@प. राजकुमार

जे एखादी साईट बंद करतात ते काही हॅकींग जाणत नसतात का?
आपला बॅन केलेली साईट १० मिनिटात खोलण्याचा दावा अतिशयोक्ती वाटतो.
मीसुद्धा ऑर्कुटची खाती मिनिटात हॅक करणारे पाहीलेत पण त्यांना आज त्यांचे 'सिनियर हॅकर' काहीच करु देत नाहीत.तेव्हा आपण आपला दावा मागे घ्यावा.ह्या गोष्टी आपल्या काल्पनिक कथेत वाचायला ब-या वाटतात.

MATURE बाळ शानबा.

हसुन हसुन मेलो =)) =))

शानबा उगाच वाकड्यात घुसायचे तर घुसावे माणसाने पण उगाच मनाला येतील ती विधाने कशाला करायची ? काल ही आपण असाच एक प्रतिसाद दिलात ज्यात तुम्ही किती भारी हॅकर आहात, इंटरनेट कंपनीला कसे वर्षभर फसवत आहात वगैरे दिले आहेत. आता तुमचाच मुद्दा बघायचा तर इंटरनेट कंपनीवाले येवढे मुर्ख असतात का हो ? नसतात ना ? मग तुम्ही कसे काय फसवताय बॉ त्यांना ?

जे एखादी साईट बंद करतात ते काही हॅकींग जाणत नसतात का?
आपला बॅन केलेली साईट १० मिनिटात खोलण्याचा दावा अतिशयोक्ती वाटतो.

ऑफीसात बॅन असलेल्या साईट देखील कशा उघडायच्या हे जाणणारे अनेक महाभाग इथे मिपावर देखील आहेत, ते सगळे काय हॅकर अथवा हॅकींगचे ज्ञान असणारे आहेत काय ? हॉटेलात २० रुपये मोजल्यावर जर गरम गरम इडली मिळत असेल तर तिची पाककृती आपल्याला माहिती नसल्याने काही फरक पडणार आहे का ? बॅन साईट सांगीतलेल्या उपायांनी उघडल्याशी मतलब ना ? नक्की काय प्रोसेस होते त्याच्याशी काय घेणे देणे लोकांना ?

मीसुद्धा ऑर्कुटची खाती मिनिटात हॅक करणारे पाहीलेत पण त्यांना आज त्यांचे 'सिनियर हॅकर' काहीच करु देत नाहीत.

ऑर्कुट खाती हॅक करणार्‍या हॅकर्समध्ये पण सिनियर ज्युनिअर असते ? खी खी खी .. बळच काही पण...

शानबा५१२'s picture

14 Aug 2010 - 2:26 pm | शानबा५१२

ओके!!!!!!!!!

आपल्याशी काही अनबन नाही पण जे समजत ते बोलणार्,कारण मी काही रात्री जागुन हॅकीगची आर्टीकल्स वापरली आहेत.(आणि परीक्षेत हेच सर्व आठवल)
आपलं म्हणने पटल म्हणुन तर आम्ही आज हाताची घडी........ह्या अवस्थेत आहोत.
मी जे ईंटरनेट हॅक केल होत्,ते सीम कार्ड द्वारे सुविधा देणार होत.स्टॅटीक आयपी वगैरे भानगड मला समजत नाही.
जी सुविधा सुरु व्हायला चार दीवस लागयचे ती सुवीधा मी २ मिनिटात सुरु करु शकत होतो.आता ती पध्दत जर चालत असती तर आपल्याला सर्व क्रुती सांगितली असती.पण ती सुविधा मला हॅक करायला नाही मिळाली.आज जी सुविधा हॅक केली आहे,ती मला वापरायची नाही तरी चालु आहे व पैसे कधीतरी कमी होतात.कदाचित कंपनी मी लुटलेल्या पैश्यांची,अशी काही अंशी(०.०००००००१%) भरपाई करत असावी.
हे सर्व उपद्रव(?) (म्हणजे साईट वगैरे हॅक करुन त्रास देणे)करण्यापेक्षा,टेलिकॉम कंपन्या ज्या लोकांना लुबाडतात्,त्यांना लुबाडाव अस मला मनापासुन वाटत्,म्हणुन मी जी मेहनत करतो/करायचो त्याला फळ नेहमी मिळाल.

>> मनापासुन वाटत्,म्हणुन मी जी मेहनत करतो/करायचो त्याला फळ नेहमी मिळाल.

शानबा५१२ की शानबा रॉबिनहुड

सुरक्षेच्या कारणास्तव गूगल, स्काइप या इंटरनेट ब्राउजर्सवर भारतात बंदी येण्याची शक्‍यता आहे.
इंटरनेट ब्राउजर्सवर ? मला तरी वाटले होते ते चॅट आणि मेसेजिंग सॉफ्टवेयर आहेत ;)

बाकी सध्या ह्या सरकारची धोरणे, वागणूक पाहता त्यांच्यावर टिप्पणी करणेही वायफळ वाटते. :(

गोगोल's picture

15 Aug 2010 - 8:55 am | गोगोल

ऑफीस मधून बॅन केलेल्या साइट्स (फेस बुक, पोर्न ई ई) आक्सेस करायच्या असतील, तर
www.kproxy.com ही वेब साइट वापरावी. त्यातील SSL encryption ओन केल्यास तुमच्या DNS requests
आणि तुमचे येणारे पॅकेट्स कुणीही इनस्पेक्ट करू शकत नाही.