गाभा:
मिपावरील सदस्य अनेक नीरनिराळ्या क्षेत्रात काम करतात. तसेच बहूसंख्य मिपाकर मध्यमवर्गीय असावेत असे वाटते. भावी आयुष्यासाठी बचत करणे, पैसा जोडणे या आजच्या जीवनात आवश्यक गोष्टी आहेत याविषयी दुमत नसावे. केलेली बचत कुठे गुंतवावी याविषयी विपुल साहीत्य उपलब्ध असले तरी त्यातून उपयुक्त माहिती बाजूला काढणे कठीण होऊन बसते. अनेक गुंतवणूकीच्या पर्यायांपैकी शेअरबाजारात पैसे गुंतवणे हा एक पर्याय आहे. मात्र शेअरबाजारात पैसे कसे गुंतवावेत हा एक मोठाच प्रश्न आहे. याबाबत मिपा सदस्यांकडून स्वानुभवावरून मार्गदर्शन मिळवावे हा या चर्चेचा उद्देश आहे.
या काथ्याकुटातून पुढील मुद्द्यांवर प्रकाश पडावा अशी अपेक्षा आहे:
- गुंतवणूक करतांना तांत्रिक विश्लेषण (Technical analysis) योग्य की मूलभूत विश्लेषण (Fundamental analysis) योग्य?
- तांत्रिक विश्लेषणात कुठल्या पद्धती (कँडल स्टिक, मुविंग अॅवरेज वगैरे) फायदेशीर ठरू शकतात?
- मूलभूत विश्लषण करत असतांना कशाला (प्राइस अर्निंग रेशो, करंट अॅसेट्स, कर्ज परिस्थिती, नफ्यात होऊ शकणारी वाढ) महत्त्व द्यावे?
- सामान्य व्यक्तिस नियमीत गुंतवणूक (वेळ तसेच आवश्यक असलेली माहिती विचारात घेता) करणे शक्य आहे काय?
याव्यतिरिक्त इतर माहिती असल्यास तीही येथे द्यावी. धन्यवाद.
प्रतिक्रिया
13 Aug 2010 - 10:52 pm | सुनील
येथे फक्त अकॅडेमिक चर्चा अपेक्षित आहे की गुंतवणूकीविषयी टीप्सदेखिल?
13 Aug 2010 - 10:55 pm | क्रेमर
चर्चेचा उद्देश शेअरबाजारासंदर्भात व्यापक मुद्द्यांवर चर्चा व्हावी असा आहे. पण टीप्स दिल्या तरी चालतील. टीप्स बरोबर काही कारणमिमांसा दिल्यास अतिउत्तम. पण निव्वळ टीप्स देण्याची इच्छा असल्यास तेही चालू शकेल.
13 Aug 2010 - 10:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
क्रेमर, तुम्ही फार तांत्रिक शब्द (मराठीत जार्गन) वापरले आहेत; उदा: तांत्रिक विश्लेषण, मूलभूत विश्लेषण... मराठी/इंग्लिश शब्दांचे अर्थ समजत असले तरीही तुमचा मुद्दा कळतच नाही आहे. तुम्ही कृपया या सर्व संज्ञांचे अर्थही सांगाल का?
13 Aug 2010 - 11:02 pm | क्रेमर
अदिती, तुम्ही चांगला मुद्दा मांडला आहे. घाईत तांत्रिअ शब्दांचे स्पष्टीकरण द्यायचे राहून गेले. क्षमस्व.
मूलभूत विश्लेषण: कंपनीचा नफा-तोटा, अॅसेट्स-लायाबिलिटीज (मराठी शब्द?), कंपनी व्यवस्थापनाचा इतिहास व कॅश फ्लो याबाबत विदा वापरून कंपनीच्या शेअरच्या भावाविषयी काही अनुमान बांधता येते. ढोबळमानाने या प्रक्रियेस मूलभूत विश्लेषण असे म्हटले जाते. यात बर्याचदा कंपनीच्या आकडेवारीबरोबरच कंपनी ज्या उद्योगात आहे त्या उद्योगाबद्दलही काही प्रवाहांचा वापर केलेला असतो.
तांत्रिक विश्लेषण: शेअरचा बाजारात असलेला भाव, त्याचा इतिहास तसेच किती शेअर्सची उलाढाल झाली याबाबतचा ऐतिहासिक विदा वापरून भविष्यात शेअरच्या भावाचा काय प्रवाह असू शकेल याविषयी अनुमान बांधण्याच्या प्रक्रियेस तांत्रिक विश्लेषण असे ढोबळमानाने म्हटले जाते.
13 Aug 2010 - 11:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
धाग्यात इतरही तांत्रिक शब्द आहेत, त्यांच्याही व्याख्या स्पष्ट करता येतील का?
(अर्थात अडाणी) अदिती
13 Aug 2010 - 11:16 pm | क्रेमर
इतर तांत्रिक शब्दांच्या अर्थासाठी विकि पानांचा दुवा देत आहे. पण जसे शक्य होईल तसे ती माहिती मराठीत देण्याचा प्रयत्न करीन.
या पानावर तांत्रिक विश्लेषणासंदर्भात माहिती आहे. कँडलस्टिक चार्टिंग वगैरेविषयी माहिती तेथे मिळेल.
या पानावर मूलभूत विश्लेषणाविषयी माहिती आहे. तेथे प्राइस-अर्निंग रेशो वगैरेंविषयी माहिती मिळेल.
13 Aug 2010 - 11:09 pm | शानबा५१२
1) Rhea, Robert - Dow Theory
2) Murphy, John J. - Technical Analysis of Financial Markets
3) Edwards & Magi- Technical Analysis of Stock Trends
Hope these would serve your purpose.
These books were suggested to me by one of the famous market analysts in India.That person was ranked 5th among all the market analysts in india.
Please do not expect useful info from me expect this,but I can tell you some DOs and DON'Ts.
(उपक्रमवरही फार उपयोगी माहीती आहे)
13 Aug 2010 - 11:18 pm | क्रेमर
शानबा, माहितीबद्दल धन्यवाद. या पुस्तकांचा संक्षिप्त सारांश दिला तर आणखी मदत होईल.
काय करावे व काय करू नये तेही सांगा.
13 Aug 2010 - 11:35 pm | शानबा५१२
[माझं म्हणण ईथे(कदाचित फक्त ईथेच) कुणाला पटत नाही.आपल्याला पटाव अशी अपेक्षा नाही,पण जे सांगणार आहे ते न पटण्यासारख असेल पण खरं आहे]
मला एक सांगा ते सर्व market analysts दुस-यांना सांगतात की हे विकत घ्या हे एवढे वाढेल वगैरे वगैरे.मग ते स्वताचा पैसा का पाण्यासारखा ओतत नाहीत?बसुन कमवण्यापेक्षा दुस-याना का सल्ले देतात?
तुम्हाला सुचवलेले शेअर्स त्यांनी स्वःता कीती प्रमाणात विकत घेतले आहेत हे तुम्हाला माहीती असते का?
हे सर्व analyses तंतोतंत(कींवा ९०%माना) खरे असते तर आज मार्केटमधे सर्व बेरोजगार भरती झाले नसते का?
माझ्या एका नातेवाईकाने आठवी पास असुनही ईतका पैसा ह्या क्षेत्रात कमवला तो काय हे सर्व शिकुन कमवला का?
सर्व केतन पारेख व हर्षद मेहता संपलेत का आज?
(आपण भारतीय की?.........आपल्याला ह्याबाबतीत ५०% पुस्तकी ज्ञान आहे अस कळत म्हणुन ईथे जरा थांबतो,ह्या प्रश्नांबद्दल आपले म्हणने ऐकायला आवडेल.)
(मला वाचुन काय शिकायला मिळाल?...............अस वाटत असेल तर हेच म्हणेन की "ह्या व्यवसायात नवीन असाल तर सर्व गोष्टींसाठी दुस-याचे डोके वापरा,स्वःताची बुध्दी थोडा वेळ ऐकण्यासाठी वापरावी.पण तुम्ही ज्याचे ऐकत आहात त्यावर आपला विश्वास असणे जरुरी आहे)
14 Aug 2010 - 12:36 am | क्रेमर
जर गुंतवणूक सल्लागारांना कुठला शेअर चढणार किंवा उतरणार याची माहिती असती तर इतरांना ती माहिती देण्यापेक्षा स्वत:च पैसे गुंतवून त्यांनी भरपूर पैसे कमावले नसते का? हा युक्तिवाद जूना असून अनेक अर्थतज्ज्ञांनी शेअरच्या किंमतीत असलेल्या अनिश्चिततेविषयी वापरला आहे. बर्टन माल्किल या अर्थतज्ञाने त्याविषयी पुस्तकही (ए रँडम वॉक डाउन वॉल स्ट्रीट) लिहिले आहे. पण येथे गुंतवणूक सल्लागार देत असलेल्या सल्ल्यांविषयी चर्चा अपेक्षित नाही तर काही ढोबळ ठोकताळ्यांबद्दल चर्चा सुरू आहे. प्रत्येक गुंतवणूकदार काहीतरी आडाखे बांधून पैसे गुंतवतो. तर ते काय आहेत? असे काहीसे चर्चेचे स्वरूप आहे.
माझे स्वत:चे मत रँडम वॉक हायपॉथिसिसपाशी जाणारे आहे. शेअरचे भाव भविष्यात कुठे असतील हे सांगता येणे कठिण आहे असेच माझे मत आहे. परंतु असे असूनही काही गुंतवणूकदार शेअरमधून नियमीत नफा कमावतात असे दावे मी ऐकलेले आहेत. वॉरन बफेट यांच्यासारखे गुंतवणूकदार 'वॅल्यु इन्वेस्टिंग'चे तंत्र वापरतात. अशा तंत्रांची ओळख या चर्चेतून होईल अशी अपेक्षा आहे.
14 Aug 2010 - 1:06 am | शानबा५१२
माझ्यामते एखाद्या कंपनीच्या मागील व वर्तमान स्थीतीची पुर्ण माहीती असल्यास कोणत्याही आभ्यासाशिवाय मोजकीच सुत्र वापरुन पैसा वाढवता येईल व ह्यात पैसा गमावण्याचा धोकाही नसतो.
मी आजच डीश टीव्हीचे शेअर विकले.सकाळी चहा व सिगरेट पिताना(घराबाहेर) order place केली व नंतर गाडीत असताना order पुर्ण झाल्याच समजल.
मीसुद्धा तितका अनुभवी नसलो तरी एक गोष्ट सांगु शकेन की ह्याबतीत हा व्यवसाय एकदम अव्वल आहे,because you have NO BOSS!!
(बाकी आम्ही रसायनशास्त्राचे प्रश्न सोडवायला अतुर आहोत,तसल कायतरी विचारा की!)
14 Aug 2010 - 12:45 am | क्रेमर
उपक्रमावर काही माहिती सोप्या शब्दात आहे. येथील चर्चेत त्याचा फायदा होऊ शकेल म्हणून दुवे देत आहे.
उपक्रमावरील चर्चा, आजानुकर्ण यांचा लेख.
14 Aug 2010 - 1:08 am | कुंदन
शेअरबाजारात गुंतवणूक स्वतःच्या पैशांनी करावी.
जर कर्ज घेउन करायची असेल , तर जेव्हढे कर्ज फेडायची आपली ऐपत/लायकी असेल , तेव्हढेच कर्ज घ्यावे.
14 Aug 2010 - 9:00 am | मदनबाण
मी ज्या साईट्स पाहतो/वाचतो आणि ज्याचा उपयोग करतो त्या इथे देत आहे...
म्युचलफंड साठी :--- http://new.valueresearchonline.com/
http://www.moneycontrol.com/mutualfundindia/
शेयर्स साठी :--- http://www.moneycontrol.com/
http://utvmoney.mangopeople.com/
http://awaaz.in.com/
http://www.business-standard.com/india/index2.php
http://www.smartinvestor.in/
http://www.bazaartrend.com/
चार्ट साठी :--- http://www.buzzingstocks.com/in/index.pl
http://www.icharts.in/charts.html
गुंतवणूक करतांना तांत्रिक विश्लेषण (Technical analysis) योग्य की मूलभूत विश्लेषण (Fundamental analysis) योग्य?
साईटवर अनेक रिपोर्ट पीडीफ स्वरुपात उपलब्ध असतात त्याचा तुम्ही वापर करु शकतात...
उदा. http://www.business-standard.com/stockpage/stock.php उदा. इथे ब्रोकर्स कॉल म्हणुन असलेल्या विभागात आहेत तसे रिपोर्टस. पण हे सुद्धा १०० % उपयोगी असतात असे नाही.
तांत्रिक विश्लेषण आणि मूलभूत विश्लेषण चांगले असलेले शेयर्स वर जायलाच हवे असे नाही,पण शेयर्स खरेदी करताना त्याचा नक्कीच फायदा होउ शकतो.
तांत्रिक विश्लेषणात कुठल्या पद्धती (कँडल स्टिक, मुविंग अॅवरेज वगैरे) फायदेशीर ठरू शकतात?
मी कँडल स्टिक किंवा MACD समजण्याचा प्रयत्न करतोय...यूट्युबवर या विषयावर अनेक व्हिडीयोज उपलब्ध आहेत...ज्यांना शिकायच आहे त्यांनी ते व्हिडीयोज जरुर पहावेत...
http://marketlive.in/stock-market-tutorials/stocks-tutorial.php
मूलभूत विश्लषण करत असतांना कशाला (प्राइस अर्निंग रेशो, करंट अॅसेट्स, कर्ज परिस्थिती, नफ्यात होऊ शकणारी वाढ) महत्त्व द्यावे ?
अर्थातच... म्युचल फंड कोणत्या शेयर्स मधे आपला स्टेक वाढवत आहेत हे जरी पाहिल तरी त्या माहितीचा तुम्हाला फायदा होउ शकतो...थोडक्यात कोणतीही माहिती चांगलीच.
सामान्य व्यक्तिस नियमीत गुंतवणूक (वेळ तसेच आवश्यक असलेली माहिती विचारात घेता) करणे शक्य आहे काय?
सहज शक्य आहे... म्युचल फंड मधे एस आय पी द्वारा तुम्ही नियमीत गुंतवणुक करु शकता, हल्ली गोल्ड ईटीएफ मधे सुद्धा गुंतवणुक करता येण्याचे पर्याय उपलब्ध आहेत...
सध्या तरी मी बाजारा पासुन लांब राहण्याचे ठरवले आहे...
14 Aug 2010 - 11:07 am | डीलर
investing in any market or asset you need to fist find out :
Whats you income and what proportion of income you can put for risky investments
Investment horison (what is time frame you looking to invest in the market)
Short Term ( up to1 to 3 months)
Medium Terrm ( 6 months to 1 year)
Long Term (More than 1 year )
The opinions can very on the above classification
Returns that you are expecting (never expect very high return in short term; those are windfall gains and not return)
Your Risk appetite. (Low risk low Profit High Risk High/No profit)
Once you have determined above parameter you can look for following
Fundamental Analysis
Together with the Financial Statement analysis you also need to study
Prospect of the industry in which you want to invest (currently Capital Goods, Infrastructure industry is favoured as it’s perceived that India has tremendous potential to develop its infrastructure). If market has positive sentiment on one industry ancillary industry may do well equally (if focus is on Auto then auto ancillary may do well too)
Macro economic environment in any Economy.
Monetary and Fiscal Policies that may have direct effect on Company or industries current as well as future earning capacity. (Slow down in US economy has direct bearing on IT industry earnings or sudden fluctuations in Currency market can put pressure on Exporting companies’ margins)
Technical Analysis.
Most of the time short term investors rely more on Technical Analysis. While using technical analysis there are many options (studies) available. Always study more than one technical analysis tool to verify the underlying trend is confirmed by all of them. While using technical analysis it’s equally important what time horizon you are looking at. Hourly charts are more suitable for intra-day trading than daily or weekly charts. One cannot take long term decisions on hourly charts analysis.
Always use combination of fundamental and technical analysis and never rely too much on one analysis.
LAST but not the least NEVER RELY on TIPS blindly. Unless you have convinced yourself about the information received do not invest.
All said and done, Market actually works on two sentiments GREED and FEAR.
इतक सगळ मराठी मधे टाइप करणे office मधून श्क्य नाही म्हणून english मधे लिहीले आहे. नियमात बसत नसेल तर प्रतिसाद कढून टाकवा
14 Aug 2010 - 7:50 pm | रामदास
मी पण माझी हौस भागवून घेतो.
१ )जर ही तुमच्या शेअर बाजारातल्या गुंतवणूकीची सुरुवात असेल तर निफ्टी च्या पन्नास किंवा बीएसई च्या तीस शेअर पैकी निवड करा. (*स्वसंपादनाची सोय हाताशी असलेली बरी .)
२) व्याजी आणलेल्या पैशानी गुंतवणूक करू नका .व्हिआरेसच्या पैशाची गुंतवणूक करू नका .बायकोच्या पैशांना हात लावू नका .(*मध्यमवयीन माणसाचे पुन्हा लग्न होणे जरा कठीणच असते )
३)ऑप्शन आणि फ्युचर मध्ये मिनी निफ्टीच्या पलीकडे जाऊ नका. मिनी निफ्टीत दिलेल्या मार्जीनवर वार्षीक अठरा टक्के परतावा खात्रीशीर रित्या मिळवता येतो. (*खात्री म्हणजे अगदी दहा मिनीटात एक साईट फोडणे या स्पीडनी नाही.)निफ्टीत रोज पंधरा पॉईंट मिळवणे फारसे कठीण नाही.
४) कँडल स्टीक पेक्षा साधे ओएचएलसी वाले चार्ट बघा. मॉक ट्रेडींग साठी दहा शेअर निवडून विल्यमस %आर नावाचा इंडीकेटर वापरा. ओव्हरबॉट रीजनला सेल करा आणि ओव्हरसोल्ड रीजनला खरेदी करा. उदा :आता एनेचपीसी ओव्हरसोल्ड आहे का बघा.
५) डे ट्रेडींग करण्यासाठी बराच निगरगट्टपणा लागतो. छातीत डाव्या बाजूला ग्रॅनाईटचा तुकडा असावा लागतो. हे हळव्या माणसांचे काम नाही .(*शंभर प्रतिसाद वाकडे पडले तरी नाव न बदलणारी माणसे डे ट्रेडींग करू शकतील.)
तूर्तास इथेच थांबतो .मागणीनुसार आणखी "गोष्टी सांगेन युक्तीच्या चार "
*कंसातील वाक्ये हलके घेणे.
14 Aug 2010 - 9:37 pm | मृत्युन्जय
ओव्हरबॉट रीजनला सेल करा आणि ओव्हरसोल्ड रीजनला खरेदी करा
हे कसे आणि कुठुन कळेल. लिंक देणार का प्लीज?
14 Aug 2010 - 10:06 pm | मदनबाण
हेच मला सुद्धा विचारायचे आहे...
4 Oct 2011 - 7:34 am | क्रेमर
१ आणि २ याच्याशी सहमत आहे. नव्या गुंतवणूकदारांनी नव्या कंपन्यांविषयी सावध राहणे हे योग्यच आहे. जर तुम्ही नवे असाल तर ३) पासूनही लांबच रहावे हे उत्तम. ४) आणि रामदास यांनी इतर प्रतिसादात सांगितलेल्या आरएसआय (रिलेटिव स्ट्रेंन्ग्थ इंडिकेटर) यापासूनही लांबच रहावे. किंबहूना चार्ट्स हा शब्द वापरून गुंतवणूकीचा सल्ला देणार्या लोकांचे अजिबात ऐकू नये. यासाठी मी काही विदा गोळा करून 'आउट ऑफ सँपल' प्रयोग केलेले आहेत. ज्योतिषाइतकेच 'टेक्निकल अॅनालिसिस' किंवा 'तांत्रिक विश्लेषण' धादांत खोटारडेपणा आहे असे मला मी केलेल्या प्रयोगांवरून ध्यानात आलेले आहे. मोठ्या प्रमाणावर अर्थशास्त्रज्ञ याच विचारांचे आहेत. मात्र अँड्र्यु लो नावाच्या एका अभ्यासकांचे मत मात्र यापेक्षा विपरीत आहे. मला व्यक्तिशः शेयरच्या किंमतींचा अंदाज येऊन आपण खूप नफा कमवावा असे वाटते. मी बर्याचदा यावर काम करतो पण मला माझ्या 'वाटण्याला' काहीच एम्पिरिअल पुरावा सापडत नाही किंवा वाटाण्याला नेहमीच अक्षता लागतात. तरीही मी या प्रपंचावर वेळ घालवत असतो. ५)च्या बाबतीत 'ज्याची-त्याची जाण-समज' ही आंतरजालीय विद्वत्ता वापरून निर्णय घ्यावा.
या प्रतिसादाला स्वतंत्रपणे प्रयोग केलेले नसल्याने उत्तर देण्यास वेळ लागला. कुणालाही मी केलेल्या प्रयोगांची माहिती हवी असल्यास व्यनि करावा.
14 Aug 2010 - 10:16 pm | शानबा५१२
हे अगदी बरोबर बोललात्,रामदास सर.
मागे एकदा घरी सिगरेटी स्टायलीत फुकत एका कंपनीचे शेअर विकत घेतले ,डे ट्रेडीगसाठी,ते शेअर्स आजपर्यंत मला चिपकुन आहेत!
ज्या दीवशी शेअरची प्राईज खाली येत होती तेव्हा मला अटॅक यायचा बाकी होता,मी उगाच बटन दाबुन बर वाटत होत्,म्हणुन हे शेअर्स विकत घेतले होते.पण जाम ईमानदार निघले पठ्ठे!
"गोष्टी सांगेन युक्तीच्या चार " ......................एकायला उत्सुक आहे.......................पण 'कंसा'बरोबर बर्का!!
15 Aug 2010 - 3:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चर्चा आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. धन्यु...!
-दिलीप बिरुटे
15 Aug 2010 - 6:54 pm | रामदास
अलाहबाद बँकेचा चार्ट नमुन्यादाखल देतो आहे.
१)शेअरच्या भावाची वाटचाल एकाच दिशेनी चालली आहे.
२)पुरेशी उलाढाल आहे म्हणजे विकण्याची वेळ आली तर ग्राहक सहज मिळतील.
३)आता प्रश्न आहे विकावे की खरेदी करावे .त्याचे ऊत्तर दोन वेगळ्या गटांसाठी वेगवेगळे असेल.
ज्यांच्या हातात शेअर आहेत त्यांनी तळात दिलेला चार्ट बघा.
शेअर ओव्हर बॉट रीजनला(० ते -२०) आहेत पण भाव पडत नाही आहेत .
म्हणजे या वाढलेल्या भावात फिकीर न करता खरेदी चालू आहे. अशी खरेदी कोण करेल ?
ज्यांना काही विशीष्ठ माहीती असेल तेच खरेदी करत आहेत.
असे कोण असतील .आपल्यापैकी नक्कीच कुणी नाही.
मग ज्या दिवशी ही मोठी खरेदी थांबेल त्या दिवशी भाव पडायला सुरुवात होईल. तेव्हा या शेअरची विक्री करावी.
भाव पडतील तेव्हा सोबत न्यूज असेल . ट्रेडर्स रिमोर्स म्हणतात तसा प्रकार दिसेल. भाव खाली पडून वर जातील. तेव्हा पण विक्री करावी.
२)ज्यांच्या कडे शेअर नसतील त्यांनी स्टॉपलॉस लावून खरेदी करायला हरकत नाही.(ते ग्रॅनाईटचं लक्षात ठेवा.)
4 Oct 2011 - 11:20 am | मदनबाण
बाजारा पासुन लांब राहण्याचे दिवस पुन्हा आलेले दिसत आहेत !
4 Oct 2011 - 3:23 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मी तर म्हणेन की (लाँग टर्म इंवेस्टर्स असाल तर) बाजारात हळूहळू घुसण्याचे दिवस आले आहेत.
(ते ग्रानाईट चे इथे पण थोडेसे लागू आहे हं)