प्रवाशांचा रिक्शा टॅक्सी वर बहिष्कार

आप्पा's picture
आप्पा in काथ्याकूट
11 Aug 2010 - 8:21 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी,

उद्या १२ ऑगस्ट मुंबईकरांचा रिक्शा टॅक्सी वर बहिष्कार घालण्याचे आवाहन वाचले. रिक्शा चालकांचा हा अनुभव चिंचवड येथेही येतो. भारतातील वाचकांना ही हा अनुभव येत असेल. कमी अतंरावर न येणे, किंवा जास्त भाडे घेणे, उध्दट वागणे, चुकीच्या ठिकाणी उतरवणे आदी अनंत अनुभव असतील. सर्वच प्रवाशांनी जर बहिष्कार घालण्याचे ठरविले तर?
करायची सुरवात.

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

11 Aug 2010 - 10:58 pm | शिल्पा ब

कशाने जाणार मग? बशी तर ओसंडून वाहतील.

प्रसन्न केसकर's picture

12 Aug 2010 - 12:25 am | प्रसन्न केसकर

कुणी अडवलय? आत्तापासुनच घाला. किमान एकदा पिंपरी-चिंचवड मधे सामान्य नागरीक आहेत अशी बातमी तरी छापुन येईल.

मदनबाण's picture

12 Aug 2010 - 5:05 am | मदनबाण

असा बहिष्कार ग्राहकांनी ( प्रवाश्यांनी) केलाच पाहिजे. माजलेत हे लोक...मिटर मधे झोल्,वाहन सीएनजी असेल तरी काही प्रवाश्या़कडुन पेट्रोलचे दर आकारणे (रिक्षावाले हे सर्रास करतात्),बॅच न बाळगता वाहन चालवणे, जवळ भाडेपत्रक न ठेवणे इं गैर प्रकार ही मंडळी करतात पण त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही.
मी या बहिष्काराचे समर्थन करतो...

१ दिवस बहिष्कार टाकून फार काही फरक पडेल असं काही वाटत नाही. झाला तर त्रासच होईल असे वाटते. विशेषतः शाळेतली मुले, वयस्कर लोक यांची गैरसोय होईल. We need to hit them where it hurts.

माझा १ अनुभव सांगतो. मी पुर्वी ठाण्याला मानपाड्याला राहात असे. शनिवारी अर्धा दिवस ऑफिसला जाऊन १-१:३० च्या सुमारास ठाणे स्टेशनला येऊन बसने २-२:३० ला घरी पोचून मग जेवत असे. एकदा मी असाच ठाणे स्टेशनला आलो, ऊन खूप होते म्हणून विचार केला की आज रिक्शाने घरी जाऊन मस्तपैकी झोप काढू. स्टेशनसमोर रिक्शा स्टँडवर रिक्शात बसलो. रिक्शावाल्याला सांगितले की मानपाड्याला घे, तर लगेच म्हणाला, इतक्या दूर येणार नाही. मी म्हणालो, मग स्टँडवर गाडी का लावलीस? तर तो म्हणाला, की गाडीत पेट्रोल नाही. तुम्ही दुसऱ्या रिक्शाने जा. तर मी म्हणालो की गाडी पेट्रोल पंपावर घे, पेट्रोल भर मग पुढे चल. तर तो तयार होईना. इतक्यात २-३ रिक्शावाले आजूबाजूला भांडायला आले. म्हणाले की स्टेशनवर पोलिसकडे जा. मला माहीत होते की मी पोलिस शोधायला गेलो की तो रिक्शावाला फरार होणार. तर मी म्हणालो, पोलिसलाच इथे बोलवा आणि तुम्हीपण सोबत विटनेस म्हणून थांबा. लगेच त्याचे ते चेले जाऊ दे करत परत फिरले. पण मी रिक्शातच बसून राहिलो. तो काही रिक्शा चालू करेना, आणि मी काही रिक्शातून उतरेना. २-४ मिनिटे चुळबूळ झाल्यावर मला म्हणाला, अहो साहेब, जाऊ द्या ना, पाहिजे तर २ री रिक्शा पकडून देतो. तेव्हा मी शांतपणे म्हणालो, "बघ, घरी जाऊन बसणार त्याऐवजी इथे बसतो आरामात. मी तर काही खाली उतरणार नाही. त्यामुळे तुला धंदा करायला मिळणार नाही. मानपाड्याला येत असलास तर चल. पण वाटेत क्लच सोडून गाडी बंद पाडलीस, तरी मी उतरणार नाही, मात्र त्यावेळी तुला पोलिस स्टेशनवर यावे लागेल, तिथे अजून १-२ तास जातील, याचापण विचार कर." तो काहीएक न बोलता मला घरपोच घेऊन आला. (रिक्शा बंद न पडता किंवा पेट्रोल न भरता). गंमत म्हणजे हा रिक्शावाला मराठी होता.

आपल्याला रिक्शाची गरज नाही किंवा त्याला आपली जास्त गरज आहे, हे त्याला कळले पाहिजे. शिवाय आपल्याकडे भरपूर मोकळा वेळ आहे, ते पण कळले पाहिजे, मग सहसा अडचण येत नाही. अर्थात दरवेळी आपल्याला ते शक्य नसते, त्याचाच फायदा रिक्शावाले घेतात.

शानबा५१२'s picture

12 Aug 2010 - 8:48 am | शानबा५१२

पण दुसरा रीक्षावाला जर तुम्हाला हवं तिथे सोडणार होता तर त्याच रीक्षाचा हट्ट का?

आपण स्वःता अस वागायच व नंतर त्यांना दोष द्यायचा हे चुकीचं नाही का वाटत?

मी गप्प बसायच अस नाही बोलत पण अवश्यकता नसताना का म्हणून भांडायचं??हे पाहुन दुस-या रीक्षावाल्यांच्/ग्राहकांच आपआपसातलं मत दुषित झालं असणार व हाच उगम असतो असंतोषाचा!

शिल्पा ब's picture

12 Aug 2010 - 9:18 am | शिल्पा ब

गरज नसताना का? त्या रिक्षावाल्याला काय धाड भरली होती कि यायचं नव्हतं? आणि नव्हतं कुठेच जायचं तर कशाला स्टँडावर रिक्षा लावली?

मीसुद्धा कालेजात असताना असा अनुभव आला होता पण दुसऱ्या एका रिक्षावाल्याने मी विचारात असलेल्या रिक्षावाल्याला झापले आणि तो तयार झाला.
पावसाळ्यात हे रिक्षावाले अजिबात तयार होत नाहीत यायला...हे एक आश्चर्य आहे...पाय वर करून बसतात पण भाडं घेत नाहीत.

शानबा५१२'s picture

12 Aug 2010 - 9:45 am | शानबा५१२

त्या रिक्षावाल्याला काय धाड भरली होती कि यायचं नव्हतं?

दुपारची झोप ग्राहकाला येउ शकते,रीक्षावाला माणुस नाही का?
सकाळी लवकर उठुन धंद्याला लागायचं आणी परत जेवण झाल की रीक्षा चालवायची का?
रीक्षा स्टँड्वर ईतर रीक्षावाले होते ना,मग जा की त्यांच्या रीक्षात,आपल्याला घरी गेल्याशी मतलब!

मीसुद्धा कालेजात असताना असा अनुभव आला होता पण दुसऱ्या एका रिक्षावाल्याने मी विचारात असलेल्या रिक्षावाल्याला झापले आणि तो तयार झाला.

अगदी हेच म्हणतो,आपण स्वःताचा राग हक्काने त्यांच्यावर काढतो,दुसरी रीक्षा पकडायचं म्हटलं की स्वाभिमान दुखावतो काहींचा.
त्यादीवशी 'गोल्डन नेस्ट' अस विचारणा-या ग्राहकाला रीक्षावाला नाही बोलला तेव्हा मी विचारलं 'अरे वही पे जा रहे हो तो क्यु नही लिया उन्हे?'
'ओ सर्,क्या बोलु पैसा हमे भी चाहीये लेकीन न्यु की ओल्ड गोल्डन नेस्ट पुछा तो चिल्लाने लगते है! इसलिये हम सिधा नही बोल देते है'

पावसाळ्यात हे रिक्षावाले अजिबात तयार होत नाहीत यायला..

कारण आपण फक्त भाडं देतो,रीक्षा खराब झाली तर दुरुस्त करुन देत नाही.पावसाळ्या आधी काही प्लग्स 'कव्हर' करावे लागतात,ते नाही केले की त्यात पाणी जाउन प्लग्स खराब होतात.आपण ह्या गोष्टी समजुन घेतल्यात तर तर तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही.
नाही,मी रीक्षा नाही चालवली कधी,पण दुस-याला समजुन घेण्याची व्रुत्ती(तसे आम्ही गुणीच हो!) असल्याने भांडायची वेळ येत नाही व ना स्वःता गप्प बसण्याची वेळ येते.

तेव्हा उगाच बाउ न करता ठरलेले भाडे द्यावे(जास्त नाही पण वाजवी).

शिल्पा ब's picture

12 Aug 2010 - 9:56 am | शिल्पा ब

<<<दुपारची झोप ग्राहकाला येउ शकते,रीक्षावाला माणुस नाही का?

हेच तर...मग रिक्षा भाड्याला नाही उभी करायची...सोप्पय...

<<<दुसरी रीक्षा पकडायचं म्हटलं की स्वाभिमान दुखावतो काहींचा.

पहिली केवळ कमी अंतरावरच भाडं म्हणून येत नसेल तर वेळ असल्यास त्याच रिक्षावाल्याला हिसका दाखवावा...

<<<कारण आपण फक्त भाडं देतो,रीक्षा खराब झाली तर दुरुस्त करुन देत नाही.

रिक्षा चालवणे हा धंदा आहे...आम्ही फक्त भाडच देण्यास बांधील (जर सेवा घेतली तर) अन्यथा धंदा म्हणून रिक्षा चालवायची तर तिची देखभाल रीक्षवाल्यानेच केली पाहिजे...

शानबा५१२'s picture

12 Aug 2010 - 10:09 am | शानबा५१२

.मग रिक्षा भाड्याला नाही उभी करायची........सोप्पय..

मग तुम्ही पण दुसरी रीक्षा पकडायची......सोप्पय....

वेळ असल्यास त्याच रिक्षावाल्याला हिसका दाखवावा...

वा वा रीक्षावाले फक्त हीसका खायला आहेत वाटत की आला राग की द्या हीसका!

तिची देखभाल रीक्षवाल्यानेच केली पाहिजे...

तेच करण्यासाठी रीक्षावाला पावसात रीक्षा काढत नाही.

आतातरी आपण आपला विरोध मागे घ्यावा.

शानबा५१२, तुम्हाला का हो रिक्शावाल्यांचा एवढा पुळका आलाय? त्यांचे काही चुकत नाही असे म्हणायचे आहे का? कमी अंतरावरचे भाडे नाकारणे, रात्री उशीरा भाडे नाकारणे, उर्मटपणे वागणे, मीटरमध्ये फेरफार करणे असे (किंवा या पैकी काही) उद्योग जवळजवळ सर्व रिक्शावाले करत असतात. रिक्शावाल्याने कुठलेही भाडे नाकारता कामा नये असा नियम आहे. हा नियम त्यांनी पाळलाच पाहिजे. प्रत्येक वेळेला, प्रत्येक रिक्शावाल्याला व्यवस्थित अंतराचे (फार जवळही नाही, फार लांबही नाही) भाडे कसे मिळेल? शेवटी हा धंदा आहे.

तुमचे आधीची काही वाक्ये तर तार्किकदृष्ट्या अगदीच चुकीची वाटतात.

>>दुपारची झोप ग्राहकाला येउ शकते,रीक्षावाला माणुस नाही का?
रिक्शावाला माणूस आहे ना. पण तो धंदा करतोय ना? स्टँडवर रिक्शा लावली असेल तर ती भाडे स्वीकारायलाच लावली आहे असा स्पष्ट अर्थ आहे. दुपारच्या वेळात धंदा न करण्याचा माज फक्त चितळे दाखवू शकतात कारण त्यांची दुकाने जेव्हा उघडी असतात तेव्हा गर्दीने ओसंडून वाहात असतात. रिक्शावाल्यांच्या धंद्याबद्दल अजूनतरी तशी परिस्थिती आलेली नाही. त्यातही कुठल्याही कारणाने दुपारी विश्रांती घ्यायची असेल तर रिक्शा स्टँडलाच लावता कामा नये.

>>कारण आपण फक्त भाडं देतो,रीक्षा खराब झाली तर दुरुस्त करुन देत नाही.पावसाळ्या आधी काही प्लग्स 'कव्हर' करावे लागतात,ते नाही केले की त्यात पाणी जाउन प्लग्स खराब होतात.आपण ह्या गोष्टी समजुन घेतल्यात तर तर तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही.

यात समजून घेण्यासारखे काय आहे? त्याच्या धंद्यात त्याला पैसे मिळवून देणार्‍या इक्विपमेंटची (मराठी शब्द?) व्यवस्थित काळजी घेणे हे त्याचेच कर्तव्य आहे. ग्राहक त्याची काळजी कशाला घेईल? ग्राहक जो सेवेचा मोबदला देतो आहे त्यातच या रिपेअर आणि मेंटेनन्सचा खर्च अंतर्भूत असतो. त्याअर्थाने ग्राहकच रिक्शाच्या खराबीचे पैसे देतोच आहे.

काही ग्राहकही त्रासदायक असतात. मात्र ते उदाहरण अपवादात्मक असते. प्रत्येक धंद्यामध्ये असे खवचट किंवा त्रासदायक ग्राहक भेटतातच. मात्र रिक्शावाल्यांबद्दलचा चांगला अनुभव हा अपवादात्मक आहे हा खरा प्रॉब्लेम आहे. जर मेजॉरिटी ग्राहकांना असे वाटत असेल की रिक्शावाल्यांची सेवा चांगल्या दर्जाची नाही तर याचा अर्थ रिक्शावाल्यांचेच काहीतरी चुकते आहे.

नियमानुसार आणि चांगली सेवा देणे याला कुठलाही पर्याय असताच कामा नये. त्याचे कधीही समर्थन होऊ शकत नाही.

विरोध मागे घेण्याजोगे मुद्दे मांडा मग विरोध मागे घेऊ...उगाच आक्रस्ताळेपणा करून काहीच फायदा नाही...चीन्मनाने योग्य ते उत्तर दिलेले आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Aug 2010 - 9:21 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एका मित्राचे वडीलपण मुद्दामच चक्रमपणा करतात. रिक्षात बसतात आणि म्हणतात "चल." रिक्षावाला अर्थातच विचारतो "कुठे?". तर यांचं ठरलेलं उत्तर, "पत्ता असा सांगता येणार नाही, मी तुला रस्ता सांगतो." आणि उजवीकडे, डावीकडे, सरळ चल असं सांगत कामं असतात त्याप्रमाणे गावभर फिरतात. शिवाय मीटर टाकल्याशिवाय रिक्षावाल्याला पर्याय नसतो.
काका वयस्कर दिसतात म्हणून शक्यतो रिक्षावाले भांडणही करत नाहीत.

शानबा५१२'s picture

12 Aug 2010 - 9:52 am | शानबा५१२

हो,पण तरीही रीक्षावाल्याची चुकी,हो ना?

दिपक's picture

12 Aug 2010 - 9:29 am | दिपक

असाच मिळताजुळता अनुभव मला कुर्ल्यात आला. रिक्षा स्टॅंड मधुन पुढे आली रांगेत माझा नंबर असल्याने मी बसलो. त्याला टिळक नगर असे सांगितल्यावर म्हणाला "गाडी खराब आहे नाय जाणार". मी म्हणालो "मग बसायच्या आधी सांगायचेस. आता मी उतरणार नाही." मी बसुनच हवालदार दिसतो का त्याची वाट बघत राहिलो आणि त्याला नाईलाजाने त्याला मला टिळकनगरला सोडावे लागले. गाडीत काही प्रॉब्लेम नव्हता.

दिपक's picture

12 Aug 2010 - 9:00 am | दिपक
शानबा५१२'s picture

12 Aug 2010 - 9:06 am | शानबा५१२

व्वा!!
ह्या लोकांकडे अश्या साईट काढायला,आयफोन वर भाड्याचं सॉफ्ट्वेर काढायला पैसे आहेत व दोन चार रुपये त्या गरीबाला द्यायचे नाहीत!!!

मुंबईच्या डान्स क्लबमधली एका बीयरची कींमत व रीक्षावाला एका दीवसात कमवतो ती आमदनी ह्यात कीती फरक आहे?

महागाई त्यांच्यासाठी नाही का वाढली?

आणि त्यांच्यावर उद्धटपाणाचा आरोप करणा-यांनी स्वःता आपण कस बोलतो ते निरखुन पहावं.

मी रीक्षावाल्यांच्या फेवरमधे बोलतोय कारण फक्त त्यांची बाजु चुकीची नाही.हे बोंबा मारणारे पण चुकत आहेत.

शानबा,

वरच्या धाग्यात पुणेकरांबद्दल कुठे लिहिलंय? किंवा पुण्यातल्या रिक्षावाल्यांबद्दल ?
मुळात धागाच मुंबईतल्या संपाबाबत, त्यावर उदाहरणं बहुतेक ठाणे मुंबईची, पुणे कुठे आले मध्येच?
बळंच पुण्यात येऊन हिसका दाखवायची भाषा कशासाठी...

आणि हो बरोबर आहे रिक्षावाल्यांचे स्वत:चे अनेक प्रॉब्लेम्स असतात. पण ते काही लोकांना फसवायचं, स्टँडवर उभे राहून जवळही येणार नाही आणि लांबही नाही याचं समर्थन होत नाही ना?
आता तुम्हाला पगार कमी आहे म्हणून काय तुम्ही कंपनीत इतर मार्गाने पैसे मिळवणार का?
पावसाळ्यात खराब किंवा कच्च्या रस्त्यावर न जाणं समजू शकतो. रिक्षा फसते, खराब होते. कुठेही भाडंच नाकारणं हे तुम्हाला कसं बरोबर वाटतं?

माझा पुण्यात बहुतेक वेळा चांगला अनुभव आहे. घराजवळ राहणारे बरेचसे रिक्षावाले ओळखीचे आहेत. पहाटे ५ ला सुद्धा स्टेशनला, एअरपोर्टला सोडायला येतात एक दिवस आधी सांगून. पण तरीही सकाळी बाहेरगावाहून पुण्यात आलं की काय वाट्टेल तसे फसवतात ते पाहिलं आहे.
पण बंगळुर आणि चेन्नई च्या रिक्षावाल्यांपुढे पुणे मुंबइकर रिक्षावाले म्हणजे अगदी सेवाभावीच म्हणावे लागतील. त्यामुळे थेट बहिष्कार वगैरे करण्याइतकी परिस्थिती आहे असं काही वाटत नाही.

शानबा५१२'s picture

12 Aug 2010 - 12:32 pm | शानबा५१२

अहो हे पुणेकर पहीले ओरडायला सुरवात करतात्,नेहमीच.
मग मुंबईला वारं लागत.
मी पुण्याचा उल्लेख केला कारण काही सदस्य अमेरीकेत व पुण्यात ईथुन तिथे करत असतात व आमच्या हतबलतेवर खुशाल भाष्य करतात.

ह्या विषयाला ईथेच लगाम घालावा कारण हा वाद मला 'फुटीरवादी'(?) वाटतो............(तस माझ बोलुन झालच आहे!)

परिकथेतील राजकुमार's picture

12 Aug 2010 - 1:19 pm | परिकथेतील राजकुमार

जाउ दे, शानबा आढाव. घ्या मिटवुन साहेब.

आढाव

म्हणजे काय राव?

आपल्याला पुण्याचा पुळका नाही आला हे पाहुन आश्चर्य वाटल.

शानबा५१२'s picture

12 Aug 2010 - 2:16 pm | शानबा५१२

हॅकर्स अंडरग्राउंड
वाचायला फार मजा आली,पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

बाकी गुगलकडे ही भारी हॅकर्स असणार हे नक्की.

विषयांतर :
मधे पीएसपी ३००० हॅक करण्यासाठी मिरारोडच्या एका प्रसिद्ध हॅकरला भेटलो,त्याने हातवर केले.२००० सीरीज हॅक करता येत होती,ही ३००० नाही होत.
आमच्या काही हॅकींगमधल्या कामगिरीजः
१. गुगलची ५ खाती,फक्त मजेसाठी.
२ एटेलचे २५रु/दीन आकारणारे इंटरनेट साडेतीन वर्ष फ्री मधे वापरलं,नंतर एटेलने काही नवीन पध्दती आणुन सर्व बंद केल.मी तोपर्यंत ईतर ६-७ जणांना लाभ पोहचवला होता.
३.आता त्याचीच एक नवीन ईंटरनेट सुवीधा हॅक करुन वापरतोय.
४.ईतर ३ कंपण्यांना असच लुबाडलं.
५.हे पासवर्ड्,सॉफ्टवेर हॅक/क्रॅक करणारे पहीले फार कमवायचे आता ते रस्त्यावरही मिळतात म्हणुन गप्प झालेत.
टॅली वगैरेची सॉफ्टवेर २५-५०,००० ला वि़कणारा स्वःता सांगत होता,अगदी ईराक ते अमेरीका सर्व सेटींग्स असायच्या.

आपणही आमच्या कुज्ञानात भर टाकावी ही ईच्छा!

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Aug 2010 - 12:09 pm | llपुण्याचे पेशवेll

संपादकांना विनंती आहे हा प्रतिसाद योग्य ठिकाणी हलवला जावा.

निनीकु's picture

12 Aug 2010 - 10:38 am | निनीकु

अहो.. हे बघा.. तुम्ही जेव्हा एखादी सेवा जीवनावश्यक अशा यादीत सामिल करता तेव्ह झोप आली असेल.. वगैरे कारणे चालणार नाहीत.

प्रश्न रिक्षात बसणा-या माणसाकडे किती पैसे आहेत याचा नाहीये.... तर रिक्षा अत्यावक्षक मध्ये सामील करून त्याचे सगळे फायदे घ्यायचे आणि प्रत्यक्षात लोकांची अडवाअडवी करायची...या वॄत्तीला विरोध आहे.

आणि महागाई चे बोलायचे झाले तर ... असे बरेच लोक असतील की ज्यांची कमाई त्यांना खर्चाला पुरेल इतकया प्रमाणात वाढत नाही मग सगळ्यांनी इतरांना लुटत बसायचे का?

असो..... मला वाद घालत बसायची इच्छा नाही

अमोल केळकर's picture

12 Aug 2010 - 10:32 am | अमोल केळकर

बहिष्काराबाबत सगळीकडे आनंदी आनंद आहे

(मुंबईहून ) अमोल केळकर

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Aug 2010 - 10:59 am | llपुण्याचे पेशवेll

१. हा हा हा. रिक्षावाले, गरीब, सामान्य माणूस वगैरे वाचून हसू आले.
२. वरती पुणे आणि इतर उल्लेख वाचून परत हसू आले. पुण्यात टॅक्सी वापरात नाही. टॅक्सी फक्त पुणे-मुम्बई जायला किंवा एयर पोर्टला जायला वापरतात किंवा तिथेही मोटारसायकलने जातात. असो. त्यामुले सदर आंदोलनाचा पुण्याशी संबंध असेल असे वाटत नाही.
३. ज्यांना रीक्षा किंवा बस दोन्हीने प्रवास नको असेल त्यांनी सरळ मोटारसायकल किंवा सायकलने जावे. :)
४. बाकी कोण PHd करायला पुण्यात येणार असेल तर स्वतःचे वाहन घेऊन यावे अन्यथा पुण्याच्या रीक्षावाल्यांकडून पदोपदी अपमानित व्हावे लागेल.
५. चालूद्या. गंमत बघतो आहे.

भारतीय's picture

12 Aug 2010 - 11:30 am | भारतीय

काही फरक पडणार नाही हो हे असले स्टंट्स करून.. कुणीतरी 'मीटर जॅम' साईट तयार करतयं काय, त्याला प्रसिद्धि मिळते काय, सगळा आनंदी-आनंद!! ह्याने ऊगाच सामान्य माणसांचे हाल होणार..

ब्रिटिश टिंग्या's picture

12 Aug 2010 - 2:41 pm | ब्रिटिश टिंग्या

आपल्याला कळत नसेल तर गप रहावं माणसाने :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Aug 2010 - 3:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>>आपल्याला कळत नसेल तर गप रहावं माणसाने<<
माणसांबद्दल टिंग्याचा प्रतिसाद पाहून ड्वाले पानावले.

त्यांना सांगून पण कळत नाही अन नाही सांगितले तर उडवण्यासारखे प्रतिसाद लिहित बसतात.

पाटिल-माने's picture

12 Aug 2010 - 6:15 pm | पाटिल-माने

पुन्यात काहि ठिकाणि रिक्शावाले तोडाला येइल ते भाड सागतात. २ कि.मि. ला ४० रु काय म्हणुन द्यायचे. जर कोणि जॉब साठि कल्याणिनगर मधे येत असेल तर त्याचि वाटच लागते. कारण पिमटि च्या फेर्या पन जास्त नाहित इकडे.....

रेवती's picture

12 Aug 2010 - 7:25 pm | रेवती

धागाकर्ते आप्पा यांनी मुंबईच्या बंदबद्दल लिहिताना मध्येच चिंचवड का आणलय?
याचा अर्थ रिक्षावाल्यांचे असे अनुभव सगळीकडे (थोड्या फार फरकाने ) येताना दिसतात.
रिक्षावाल्यांशी भांडण करून मला इतका कंटाळा आलाय कि आता जी फसवणूक वाट्याला येते ती सहन करण्याशिवाय काही करत नाही.

जोशी &#039;ले&#039;'s picture

13 Aug 2010 - 10:08 am | जोशी 'ले'

ज्यांना रिक्षा वाल्यांचा अनुभव नाही त्यांना त्यांचा पुळका येतो असा माझाही अनुभव आहे ...जर सकाळी ८ / ८.३० च्या दरम्यान तुम्ही घाटकोपरहून अंधेरी करता रिक्षा पकडण्या साठी रिक्षा वाल्यान विचाराल तर ' राजांची स्वारी या वेळेस अंधेरी संस्थाना कडे प्रस्थान करणार नाही'... अशा अर्थाची छ्या, च्च, क्लेअक , अशी उत्तरे तुम्हाला १/२ नाही तर १५/२० रिक्षावाल्यान कडून मिळतील , आणि त्यात तुमचा अर्धा तास आरामात जाईल , नंतर ट्राफिक वाढेल ...मीटर जास्त होईल ...लेट मार्क मिळेल... त्याचा भुर्दंड सोसावा लागेल तो आपल्याला ..
माझ्या ऑफिस मधले एक सहकारी जे पुढच्या वर्षी रिटायर होतील ते रोज अर्धा तास लवकर निघतात व १ तास उशिरा घरी पोहचतात कारण -रिक्षा मिळत नाही, या साठी एकच उपाय हा कि सरळ रिक्षात बसायचे व उतरायचे तिथेच जिथे आपल्याला उतरायचे आहे' जरी त्याने दुसरी रिक्षा पकडून दिली तरी कारण - म्हातारी मेल्याचे दुख नाही पण काळ सोकावतो शिवाय या 1800-22-0110 टोल फ्री. नं. वर फोन करून कम्प्लेंट द्यावी किंवा http://www.trafficpolicemumbai.org/Complaint_Auto_taxi_form.htm इथे तुम्ही कम्प्लेंट नोंदाऊ शकता..
मी तर रोज सकाळ एन्जोय करतो जरा लवकर तर येतोच कारण मला काही प्रोब्लेम नाही येत कारण वर दिलंय..तो आपल 'धंदे कि टाइम खोटी ' नाही करत व किक मारून चालू पडतो

नितिन थत्ते's picture

13 Aug 2010 - 11:00 am | नितिन थत्ते

बहिष्कार यशस्वी झाला की नाही याबद्दल वर्तमानपत्रांतून फार काही आलेले नाही.
अयशस्वी झाला असेल तर दु:खद आहे.
यशस्वी झाला असेल (>६०% रिक्षा टॅक्सी गिर्‍हाइकाशिवाय राहिल्या) तर पुढे रिक्षा टॅक्सीच्या मुजोरीत काही फरक पडतो का ते पहायचे.

माझा सध्याचा अनुभव असा:
विमानतळावरून ठाण्याला मेरू किंवा तत्सम वातानुकूलित टॅक्सीने आल्यास मीटरने सुमारे ३६० रु + टोल ३० रु असे एकूण ३९० रु होतात. तेथूनच प्रीपेड साध्या काळ्या पिवळ्या टॅक्सीचे ४६० रु घेतात. दोनेक वर्षांपूर्वी मी साध्या टॅक्सीने (प्रीपेड नाही) विमानतळ ते ठाणे येत असे तेव्हा ४०० रु होत असत. म्हणजे साध्या टॅक्सीचे भाडे वातानुकूलित रेडिओ टॅक्सीपेक्षा जास्त होते.

हाच अनुभव कोठूनही कोठेही गेले तरी येतो. काळी-पिवळीचे भाडे रेडिओटॅक्सीपेक्षा जास्त होते. टॅक्सीच्या कंडिशनबाबत तर बोलायलाच नको.

म्हणजे एकतर सर्वांचे मीटर भयंकर टॅम्पर्ड आहेत किंवा आर टी ओ ने भयंकर जास्त भाडी मंजूर केली आहेत.

आप्पा's picture

13 Aug 2010 - 11:46 am | आप्पा

रेवती ताई
मी ३० वर्षे ठाण्यात राहुन गेली ५ वर्षे चिंचवड येथे रहात आहे. त्यामुळे मुंबई ठाण्याचा अनुभव आहे. चिंचवड येथे मीटर हा प्रकार नाही. काही ठिकाणी शेअर रिक्क्षा आहेत. एकावेळी ४ ते ५ प्रवासी घेतले जातात. एकट्याने जायचे असल्यास मनाला येईल त्याप्रमाणे भाडे घेतात. त्यामुळे कधी कधि पुणे ठाणे येथील मीटरने घेऊन जाणारे रिक्शावाले बरे वाटतात. रस्ता माहीत असेल तर ते फसवत नाहीत पण नवीन माणूस असेल तर हमखास फसवीला जातो.
असो काही अंशी मुंबईत हा बहिष्कार यशस्वी झाला असे समजले.
http://www.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6302377.cms