पन्हाळा-

चिंतामणी's picture
चिंतामणी in कलादालन
9 Aug 2010 - 8:55 pm

कुठल्या वेळेस जाण्यास पन्हाळा हे छान ठिक़ाण आहे. उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा किंवा थंडीत. पन्हाळ्याच्या प्रेमात नक्कीच पडणार.

पन्हाळ्यात प्रवेश करताना प्रथम दृष्टीक्षेपास पडतो तो वीर बाजीप्रभु देशपांडे यांचा पुतळा.

From Drop Box">

हा प्रेरणादायी पुटळा पाहील्यावर मनोमन स्मरण होते त्यांच्या आणि त्यांच्याबरोबर लढलेल्या अनेक अनेक अनामीक मावळ्यांचा पराक्रम, महाराजांना वेळ मिळावा म्हणून पालखीत बसून महाराज असल्याचे भासवणार शिवा काशीद.

पन्हाळ्यावर इतिहासाच्या ब-याच पाउलखूणा पहायला मिळतात.
From Drop Box">

From Drop Box">

From Drop Box">

सध्या पावसाळा चालू आहे. या वेळी जाण्यातसुध्दा एक मजा असते.

From Drop Box" title="धुक्यात हरवली वाट.">

पन्हाळ्यावरील इतर काही दृष्ये.
From Drop Box">

From Drop Box

हा वाघ दरवाजा. येथुनच महाराज विशाळगडावर जाण्यासाठी बाहेर पडले.

From Drop Box">
From Drop Box">

From Drop Box" title="पावसामुळे झालेले हिरवेगार डोंगर आणि लांबुन जवळ येणारा पाउस दिसत आहे.">

छायाचित्रण

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Aug 2010 - 8:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो मस्तच.......!

मागच्या शनवारी पन्हाळा केवळ पावसामुळे रद्द केला.
आपल्या छायाचित्रामुळे सफर पूर्ण झाली. :)

-दिलीप बिरुटे

स्पंदना's picture

10 Aug 2010 - 8:16 am | स्पंदना

तुम्ही बुरुजवरुन दिसणारा खालचा कोल्हापुर कडचा फोटो नाही टाकला?
त्या बुरुजावर जीव कायमचा अडकलाय.
आणी हो पन्हाळ्याच्या वाटेवर एक हॉटेल आहे काहीतरी रिझॉर्ट अस, सुन्दर मटनाच जेवण, अगदी भाकरी अन पांढर्‍या रश्श्या सह!

अजून बरेच फोटो आहेत टाकण्याजोगे. पण जास्त लांबी होउन कंटाळवाणे होउ नये म्हणून निवडक फोटो टाकले.

बुरुजवरुन दिसणारा खालचा कोल्हापुर कडचा फोटो आणि इतर फोटो पुन्हा कधीतरी "भाग-२" म्हणून टाकीन.

कोल्हापुर म्हणले की जशी अंबाबाई आणि ज्योतिबा ओघाने येतात तसेच "तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा" हे ही येतातच. अनेक छोट्या छोट्या खानावळी, हॉटेल मधून उत्तम "तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा" मीळतो. म्हणून स्पेसिफीक उल्लेख केला नाही. तुला सांग़ायलाच नको की पन्हाळ्याच्या वातावरणात भूकसुध्दा छान लागते आणि जेवण कधिही जास्त होत नाही तेथे. जेव्हढे खाल तेव्हढे पचुन जाते.

स्पंदना's picture

11 Aug 2010 - 3:36 pm | स्पंदना

टाका , टाका.
त्या घळीचा पण फोटो टाकायला नका विसरु.
मला तांबड्या रश्श्याची आठवण सुद्धा सहन होत नाही हो! जीव जातो नाव घेतल तरी. हे वाचताना च भुक लागली बघा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Aug 2010 - 5:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>अजून बरेच फोटो आहेत टाकण्याजोगे. पण जास्त लांबी होउन कंटाळवाणे होउ नये म्हणून निवडक फोटो टाकले.

अहो, सगळे फोटो टाका. लेखाची लांबी काय व्हायची ते होऊ द्या.....! :)

-दिलीप बिरुटे

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

10 Aug 2010 - 8:42 am | जाई अस्सल कोल्हापुरी

सार्‍या आठवणी ताज्या झाल्या...
मनात येइल तेंव्हा गाड्या काढुन पन्हाळ्याला जाणं आठवलं,
पावसात भिजत भिजत्...पठारवरची भटकंती आठवली...
धन्यवाद

शिल्पा ब's picture

10 Aug 2010 - 11:13 am | शिल्पा ब

खुपच छान.

संकेत's picture

9 Sep 2010 - 3:04 pm | संकेत

मस्त

श्रीराजे's picture

11 Aug 2010 - 6:38 pm | श्रीराजे

छान फोटो...! दुसरा भाग येऊद्यात...

विलासराव's picture

11 Aug 2010 - 7:39 pm | विलासराव

पन्हाळा आवडला..
बघु कधि जायचा योग येतोय ते.

प्रसन्न केसकर's picture

12 Aug 2010 - 12:17 am | प्रसन्न केसकर

`तसल्या' पार्ट्या कुठं होतात हो? घेऊन जाल एकदा? सुरक्षित परत आणण्याचि जबाबदारी माझी.

चिंतामणी's picture

12 Aug 2010 - 5:21 pm | चिंतामणी

मिपाच्या "तसल्या"सभासदांची तसली पार्टी तीकडे करायची का???

फक्त तसल्याची व्याख्या मला समजावुन सांग. कारण त्या सदरात काहिही येउ शकते.

साधाभोळा चिंतामणी.

पन्हाळ्यावर जाउन बरेच वर्ष झाली...पुन्हा एकदा जायला हवे. :)
फोटो छान आहेत.

लक's picture

12 Aug 2010 - 9:21 pm | लक

Photo changle ahet
Parat jave vatnare ani man prassan karanare Panhala
Tambada Rassa peksha Pithal Bhakari ani Tak jast prasiddha

शिवभक्त १९७९'s picture

9 Sep 2010 - 2:59 pm | शिवभक्त १९७९

मजा आणलीस बघ दोस्ता! सज्जा कोठी, पुसाटी बुरुज, नायकिणीचा सज्जा, तीन दरवाजा, शिवा काशीद समाधी स्थळ काही फोटो असतील तर अपलोड कर यार्...!