ही भटकंती जरा जुनी आहे पण जास्त आठवणीत राहीलेली....
सकाळीच पाण्याची बाटली आणि केकचा पुडा घेऊन वाशी-अलिबाग एस-टी धरली आणि कर्नाळ्याचा पायथा गाठला.गणेशचतुर्थीचा दिवस आणि त्यातही मिड-वीक असल्यामुळे कोणीही नव्हते. कधीही पाऊस पडेल असे अन्धारून आले होते.
कर्नाळ्याचा पायथा आणि एकंदर परीसरच गच्च झाडीने झाकलेला आहे. हे जंगल नवख्या माणसाला दचकवेल असे भयाकारी नक्कीच आहे. पण तसे घाबरण्याचे काही कारण नाही. इथे वन्य प्राणि मला तरी कधी दिसले नाहीत. कर्नाळा पक्शी अभयारण्य आहे.
या वेळी माझ्याकडे माझा जुना Canon A400 होता. १-२ भट्क्यांपलीकडे दिवसभरात कोणीही दिसले नाही. कर्नाळा एक दिवस माझा पर्सनल फोटो स्टुडीओ होता.
त्यातलेच काही फोटोज....
प्रतिक्रिया
17 Jul 2010 - 1:02 pm | यशोधरा
छान. ३, ८, ९ आणि ११ खूप आवडले.
17 Jul 2010 - 1:04 pm | श्रावण मोडक
वा. विकांताची सुरवात छान झाली माझ्या. आभारी आहे.
17 Jul 2010 - 1:19 pm | गणपा
नादखुळे फोटो आहेत सगळेच
=D>
शेअरकेल्या बद्दल धन्यवाद :)
17 Jul 2010 - 1:28 pm | अरुंधती
मस्त! :)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
17 Jul 2010 - 1:30 pm | अस्मी
सुंदर...अप्रतिम!!!!
इतकी सुंदर हिरवाई पाहून प्रसन्न वाटलं...शेवटचा फोटो खूपच आवडला :)
- अस्मिता
17 Jul 2010 - 1:36 pm | अस्मी
.....
17 Jul 2010 - 1:52 pm | पांथस्थ
भटकंती मस्त झालेली दिसते आहे. एकटं भटकणे म्हणजे सुख असते. स्वत:शी संवाद साधता येतो. त्यात आजुबाजुला इतका सुंदर निसर्ग म्हणजे विचारुच नका.
सगळी छायाचित्रे मस्त आली आहेत.
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
17 Jul 2010 - 11:09 pm | रंगोजी
सगळेच फोटो छान आलेत. हिरवाईमुळे प्रसन्न वाटतात.
७ वा, ८ वा आणि शेवटचा खासकरून आवडला
=D>
-रंगोजी
18 Jul 2010 - 1:21 am | मराठमोळा
पहिल्या फोटोतल्या बेंचवर जाउन बसण्याचा मोह झाला. :)
फोटो सुंदर आहेत.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
18 Jul 2010 - 9:04 am | लिखाळ
वा !! फोटो छान आहेत. आवडले
-- लिखाळ.
देवाने विचारले अक्कल हवी की टू-व्हिलर? अनेक पुणेकरांनी टू-व्हिलरची निवड केली.
18 Jul 2010 - 10:04 am | प्रचेतस
वाह रे वाह किल्लेदारा, सुरेख फोटो.
18 Jul 2010 - 6:01 pm | किल्लेदार
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद............
18 Jul 2010 - 9:33 pm | प्रभो
जहबहरा!!!
19 Jul 2010 - 12:06 pm | विमुक्त
शेवटचा फोटो एकदम बेस्ट...
19 Jul 2010 - 1:40 pm | मितभाषी
.
19 Jul 2010 - 9:31 pm | jaypal
१,४,,५,६,८,११,१५,१७,व१८ जास्त आवडाले =D> =D> =D>
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
1 Sep 2024 - 4:48 pm | श्वेता२४
आहाहाहा !!!! काय ते फोटो !!!! एक से बढकर एक.... मस्तच एकदम!!