नातीगोती व वंशावळी जपण्याचा नवा ई-मार्ग....

स्वछंदी-पाखरु's picture
स्वछंदी-पाखरु in काथ्याकूट
13 Jul 2010 - 2:33 pm
गाभा: 


आजकालच्या धकाधकीच्या व अंतरजालाच्या जीवन पद्धती मध्ये नातीगोती जपणे खरोखरच अवघड झाले आहे, म्हणूनच कि काय आता हे जपण्यासाठी अंतरजालामध्येच हि सुविधा उपलब्ध झालि आहे.
www.geni.com हे संकेतस्थळ कसे काम करते??
Geni हे संकेतस्थळ आपण आपली वंशावळी बनवण्यासाठी वापरता येईल,आपल्या नातेवाइकांमधे नवीन कार्यक्रम किंवा छायाचित्रे प्रकाशित करता येतील, ह्या संकेतस्थळाचा उपयोग
आपल्या नातेवाईकांसोबत आपल्या वंशाच्या नवीन किंवा असलेल्या शाखांचा आराखडा बनवता येतो.
ह्या संकेतस्थलावरील सहज आणि सोप्या अंतरफलका (Simple Interface) चा वापर करुन तुम्ही स्वतःचे खाते बनवून स्वतःच्या परिवारपासुन सुरुवात करु शकतात. हे संकेतस्थळ
पुर्णपणे मोफत आहे व ते आपल्या नातेवाईकांना आपल्या वंशाचे सदस्य होण्यासाठी अत्यंत त्वरीत सम्पर्क साधुन नम्र विनंती / अर्ज देते. ह्या सोप्या कार्यप्रणाली मुळे तुम्हाला तुमची वंशावळी
फारच त्वरीत बनवुन त्याचा आढावा घेता येतो.

जसे जसे आपण आपली व माहिती असलेल्या नातेवाईकांची माहीती टाकाल, Geni स्वयंचलीत पध्दतीने तुमच्या परिवाराच्या ईतर परीवाराशी संभाव्य संबध असल्याची सुचना तुम्हाला
ई-पत्रा द्वारे कळवेल, जेणेकरुन तुमच्या वंशावळिचा / परिवाराचा विस्तार अधिक गतिने होतो. किन्बहुना आपली वंशावळी ही संपूर्ण जगतातील वंशावळीचा एक भाग पण बनु शकेल.
सध्याच्या वर्तमान परीस्थिती नुसार Geni वर संपुर्ण जगत वंशावळी मध्ये ४० लाखांवर खाते आहेत.

वंशावळीतील/ परीवारातील प्रत्येक सदस्याला एक वैयक्तीक खाते असते व ह्या खात्यावरुन त्याच वंशावळीतील ईतर सदस्याला त्याच्य बद्दल माहीतीची देवाण घेवाण करता येते, उदा.
छायाचित्र,नात्यांमधे होणारे लग्न,मुंजी,बारसे ईत्यादी. ह्याचा सर्वोत्तम फायदा म्हणजे आपले नातेवाईक व नात्यातील घडामोडींशी संपर्कात राहता येते.तसेच एक किंवा अधिक परीवार
मिळुन आपल्या पूर्वजांची वंशावळी अत्यंत सहज बनवता येईल.
Geni हे एक निजी संकेतस्थळ आहे. फक्त तुमच्या वंशावळीतील/ परीवारातील सदस्यच तुमचे खाते बघु शकतात. Geni तुमचा जालातील निरोप पत्ता ह ईतरत्र कुठेही प्रकशित करणार
नाही, त्यामुळे तुम्हाला spam ची चिंता नाही होणार. तुम्ही किंवा वंशावळीतील/ परीवारातील कर्त्या (Administrator) ने केलेले सर्व बदल सर्वांना एका दैनिक पारीवारिक वृत्तपत्राद्वारे कळवले जाते.
आधिक माहीती साठी कृपया येथे पहा....
मि.पा वर पहीले लेखन करीत आहे. चू.भू.मा. अ.

स्वछंदी पाखरु.....

आज का डोळ्यात माझ्या, पाणी पुन्हा दाटले होते...
कासाविस या व्याकुळ आत्म्यात, आभाळ भरून साठले होते...

पण... पंख पिंजर्‍यातच अडकलेले होते..........

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Jul 2010 - 10:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

उपयुक्त माहीती. धन्यवाद.

अदिती

आनंदयात्री's picture

14 Jul 2010 - 12:16 am | आनंदयात्री

उत्तम. अत्यंत उपयुक्त माहिती.
अकाउंट बनवतो आणी सांगतो काय वाटले ते !!

Manoj Katwe's picture

14 Jul 2010 - 6:29 am | Manoj Katwe

उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.
मी अगोदर पासूनच ह्यामध्ये account काढले आहे.
पण मनातील काही शंकेचे जर निरासारण हवे होते.
काही प्रश्नांची उत्तरे मला ह्यात मिळाली नाही.
१) माझ्या दूरच्या नातेवैकांची मुलगी हि माझी पत्नी झाली तर ती मुलगी हीच आता माझी पत्नी आहे हे कसे दाखवितात ?
२) मी जर माझे संपूर्ण कुटुंबाची माहिती ह्यात टाकली आणि काही कारणाने जर हि website बंद पडली तर माझी माहिती नाहीशी होईल का ? कि मला ती माझ्या घरच्या संगणकावर उतरवून घेता येईल ?
३) हि माहिती मी कशाप्रकारे excel मध्य घेऊ शकतो जेणे करू मला हि माहिती इतरत्र सुद्धा वापरता येईल.
४) अशा प्रकारच्या अजून कोण कोणत्या websites आहेत ?
बाकि, हे बघा माझे कुटुम्ब झाड

मोहन's picture

14 Jul 2010 - 5:45 pm | मोहन

छान माहिती दिलीत . धन्यवाद.

मोहन

धमाल मुलगा's picture

14 Jul 2010 - 6:56 pm | धमाल मुलगा

मीही वापरतोय ही ऑनलाईन वंशावळ!

आपल्या कुटुंबियांचे/नातेवाईकांचे मेल आयडी त्यामध्ये दिले की त्यांनाही आमंत्रण जातं आणि मस्त मोठ्ठी वंशावळ तयार होत जाते.

घरगुती समारंभांचे फोटो वगैरे तिथेच टाकता येतात त्यामुळे ही एक आणखी सोय. :)

रामदास's picture

14 Jul 2010 - 7:53 pm | रामदास

अवांतर वाटल्यामुळे मी प्रकाटाआ.

मी ऋचा's picture

15 Jul 2010 - 1:43 pm | मी ऋचा

मी आत्ताच बनवली माझी ट्री...

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2010 - 9:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीबद्दल आभारी....!

-दिलीप बिरुटे

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

21 Jul 2010 - 12:58 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

.....छान आहे .......अर्थात्...ज्याना नाती गोती जपायची आहेत त्यान्च्यासाठी !....."गोत्यात " आणणारी नाती कश्शाला जपायची..असे आपले माझे मत आहे!... पण अदर्वाइज ...उत्तम आहे! 8>

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

21 Jul 2010 - 1:00 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

.....छान आहे .......अर्थात्...ज्याना नाती गोती जपायची आहेत त्यान्च्यासाठी !....."गोत्यात " आणणारी नाती कश्शाला जपायची..असे आपले माझे मत आहे!... पण अदर्वाइज ...उत्तम आहे! 8>