ह्याला बोलतात निळे डोळे!

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in कलादालन
3 Jul 2010 - 10:24 pm

काही महीन्यांपुर्वी 'एका' जागी गेलो होतो,पहील तिकडे सारख जाण असायच्,आता नाही.तेव्हा मित्रांबरोबर बसलेलो असताना हे मांजराच पिल्लु सारख पायाशी यायच् व कपड्यांना दातात पकडुन मांडीवर येउन बसायच.मी थोडावेळ गोंजारल की लाडात येउन तिथेच झोपायच्. :) .मी वैतागुन त्याला जोरात उचलायचो व दुस-या मित्राकडे द्यायचो तर ते परत माझ्याकडेच यायच.मित्राने बिस्कीट दाखवल तर माझ्यापाशी बसुन तोंड पोहचेल एवढच तोंड वर करायच व दुर पकडल तर ते घेण्यासाठी पुढे सरायच नाही.तेच बिस्कीट मी पकडल की ते तोंडात पकडायला माझ्या मागेही यायच!! बघणारे विचारयचे,"अरे घर से लाया है क्या?" मी "नही" म्हणालो की "फीर लेके जाना घर पे!" बोलायचे.
मी घरी विचारल पण घरी पोपट पिंज-याबाहेर सोडलेले असतात म्हणुन "नाही............तु संभाळणार आहेस का?" अस उत्तर आल.
मग मी त्याला दुध.बिस्कीट द्यायचो तेव्हा खाउन झाल की मी त्याला लांब सोडुन यायचो,तर ते रस्ता शोधत शोधत यायच व परत मांडीवर येउन बसायच.एकदा मी त्याला 'खुपच'(काही मीटर) लांब सोडुन आलो,तर ते पिल्लु रस्ता शोधत शोधत आल व पुन्हा माझ्यासमोर उभ राहील्,मी त्याच्या कडे आश्चर्याने बघितल तर ते मान वर करुन माझ्याकडे बघुन हसल.(म्हणजे मला तस वाटल की हसतय म्हणुन!)
मग थोड्या दीवसांनी मी 'तिथे' जायच बंद केल्,पण आजही आठवण आली की त्या पिल्लाच कौतुक वाटत.
अशा त्या निळ्या डोळ्याच्या 'चिनु'ला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा!

'चिनु' हे नाव माझ्या एका म्रुत पाळीव प्राण्याला अर्पण........'तो' प्राणी पाळु नका बोलतात कायदेवाले!!
चांगला खाउन पिउन झोपला होता गादीवर,झोपेतच मेला बिचारा!
चिनुच्या आत्म्याला शांती लाभो म्हणुन आपण प्राथना करावी.

कला

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

3 Jul 2010 - 10:37 pm | शिल्पा ब

अय्या!!! किती गोSSSSSSड पिल्लु आहे...

अवांतरः शीर्षक वाचून कोणाचे डोळे दाखवताय आता असा प्रश्न पडला होता..असो.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

कानडाऊ योगेशु's picture

4 Jul 2010 - 12:17 am | कानडाऊ योगेशु

स्वतःवर अतोनात प्रेम कसे करावे हे मांजराकडुन शिकावे.
काय त्यांच्या त्या एकेक अदा!
जरा वेळ मिळाला कि बसले नट्टापट्टा करत.
आणि शिकार करताना ते दाखवत असलेली चपळाई तर लाजवाब.
आम्ही ही घरात एक मांजर पाळले होते.अश्याच एका दिवशी खाऊन पिऊन सुस्त होऊन ते हॉलमध्ये गादीवर मस्त पहुडले होते.
घराबाहेर काही मोठी झाडेही होती आणि त्यावर बहुधा काही पक्ष्यांची मारामारी चालु होती.मांजर एकदा खिडकितुन झाडावर काय चालले आहे हे डोकावुन बघुन ही आले आणि पुन्हा सुस्त झाले.
थोड्यावेळाने अचानक गादीवर हालचाल झाली मी मान वळवुन बघायचा अवकाश तर काही क्षणांपूर्वीच गादीवर मस्तपैकी पहुडलेले हे महाशय झाडाखाली होते आणि तोंडामध्ये एक पक्षी पकडलेला होता.थोड्यावेळापूर्वी डोळ्यामध्ये दिसणारी सुस्ती,आळस सगळे जाऊन त्याचे डोळे अगदी चमकत होते.
साधारण पणे वीसएक फुटाचे अंतर फक्त एक-दोन उड्यामध्ये एका सेकंदात त्याने गाठले होते.पक्षी झाडावरुन (साधारण २० फुट उंचीवरुन) खाली पडत होता आणि त्याला बिचार्याला पंख फडफडवायचीही संधी मिळाली नाही.त्याआधीच मांजराने त्याला पकडले होते.बराच वेळ मी काय घडले व कसे घडले हे ह्याचे स्लोमोशन मध्ये डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत होतो.

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

टारझन's picture

4 Jul 2010 - 12:34 am | टारझन

साधारण पणे वीसएक फुटाचे अंतर फक्त एक-दोन उड्यामध्ये एका सेकंदात त्याने गाठले होते.

=)) सहमत आहे , आमच्या इकडचं एक मांजर तर एका मिन्टात पुण्याहुन चारपाच ढांगांत मुंबैला पोचलं होतं :)

इंटरनेटस्नेही's picture

4 Jul 2010 - 5:31 pm | इंटरनेटस्नेही

सहमत आहे , आमच्या इकडचं एक मांजर तर एका मिन्टात पुण्याहुन चारपाच ढांगांत मुंबैला पोचलं होतं

ही ही ही ही =)) टारझन साहेब, मुळ लेखापेक्षा आपल्या प्रतिक्रिया जास्त मनोरंजक असतात.... मी तर केवळ आपल्या प्रतिक्रिया आणि लेख वाचण्यासाठी येतो मिसळपाव वर.

--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

II विकास II's picture

4 Jul 2010 - 1:02 am | II विकास II

>>अशा त्या निळ्या डोळ्याच्या 'चिनु'ला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा!

शुभेच्छा

अजुन माहीती येउ द्यात.

>>चिनुच्या आत्म्याला शांती लाभो म्हणुन आपण प्राथना करावी.
केली.

वेताळ's picture

4 Jul 2010 - 11:21 am | वेताळ

चांगला खाउन पिउन झोपला होता गादीवर,झोपेतच मेला बिचारा!
चिनुच्या आत्म्याला शांती लाभो म्हणुन आपण प्राथना करावी.

असाकसा काय गादीवरच मेला. खायला काय घातले होतेस त्या पाळिव प्राण्याला?

काही महीन्यांपुर्वी 'एका' जागी गेलो होतो,पहील तिकडे सारख जाण असायच्,

ही एक जागा कोणती ह्याबद्दल काही कळु शकेल का?
मांजराची एव्हढी आवड असेल तर आमच्या मांजरीला पिल्ल झाल्यावर तुला फोन करतो,तुझा फोन नंबर मला देवुन ठेव.
वेताळ

योगी९००'s picture

4 Jul 2010 - 1:50 pm | योगी९००

मांजराची एव्हढी आवड असेल तर आमच्या मांजरीला पिल्ल झाल्यावर तुला फोन करतो,तुझा फोन नंबर मला देवुन ठेव.

त्यांचे पोपट पिंजर्‍याबाहेर खुल्ले सोडले असतात म्हणून ते कदाचित तुम्हाला फोन करणार नाहीत. त्यांच्या पोपटाची काळजी घेणारा एखादा प्राणि किंवा एखादी "जागा" असेल तर सांगा..

खादाडमाऊ

अश्या निळ्या डोळ्याच्या मांजरांच्या सानिध्यात जे येतात त्यांची प्रतिभा फुटकळ गोष्टीत वाया जाते असं ऐकुन आहे. तेंव्हा पुन्हा एकदा "सावधान"


***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

II विकास II's picture

4 Jul 2010 - 7:06 pm | II विकास II

ह्या चित्रातील मांजराचे डोळे निळे आहेत की नाहीत हे स्पष्ट दिसत नाही.

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

कानडाऊ योगेशु's picture

4 Jul 2010 - 9:38 pm | कानडाऊ योगेशु

मित्रा जयपाल ही अशी एकेक चित्रे कुठुन आणतोस यार तु?
वर इंटरनेटप्रेमी ने म्हटल्याप्रमाणे टारुभाऊंच्या प्रतिक्रियांबरोबरच तु चिकटवत असलेली चित्रे पाहायलाही जाम मजा येते.लगे रहो.!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.