फोटोंवर वॉटरमार्क/कॉपीराईट मार्क टाकणे "आवश्यक" आहे.

योगेश२४'s picture
योगेश२४ in कलादालन
25 Jun 2010 - 9:48 am

मी काढलेली काहि प्रकाशचित्रे मलाच फॉरवर्डेड मेल मधुन येत आहेत (अगदी शिर्षक आणि दिलेल्या कॅप्शनसहित).
दुर्दैवाने मी त्यावर वॉटरमार्क आणि कॉपीराईट मार्क टाकलेले नव्हते :(. (मला स्वतःला वॉटरमार्क आणि कॉपीराईट मार्क टाकणे आवडत नाही, त्यामुळे फोटोचे मूळ सौंदर्य कमी होते हे "माझे" मत होते.) पण काही दिवसांपासुन मीच काढलेले फोटो मलाच मेलमधुन येताना पाहिल्याने आता हे टाकणे गरजेचे वाटु लागले आहेत.

सध्या हे दोन मेलमधुन सर्वत्र फिरत आहेत.

भर पावसात . . . . . . .माळशेज घाटात
http://www.misalpav.com/node/12638

गडकोटांचा महाराष्ट्र माझा
http://www.misalpav.com/node/12158

छायाचित्रण

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

25 Jun 2010 - 10:00 am | अमोल केळकर

सहमत
वॉटरमार्क आणि कॉपीराईट कसे टाकावेत याबद्दल कुणी माहिती देऊ शकेल का?
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विंजिनेर's picture

25 Jun 2010 - 10:19 am | विंजिनेर

हॅ हॅ हॅ,
एक तर तुमचे मत (आता तरी) बदला किंवा कॉपी इज द बेस्ट फॉर्म ऑफ फ्लॅटरी असे सम्झून स्वतःवर खूष व्हा...
अधिक माहिती साठी युयुत्सु किंवा अवलिया यांना भेटा.

jaypal's picture

25 Jun 2010 - 10:24 am | jaypal

वॉटरमार्क टाकता येतो .
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

आनंद घारे's picture

25 Jun 2010 - 3:19 pm | आनंद घारे

वॉटरमार्क टाकला तर कॉपी करता येत नाही असे नाही (बहुधा). कॉपीराइटचे चिन्ह टाकले तरी त्यासकट ते चित्रही कॉपी करता येतेच. ते कोणी कॉपी केले ते शोधून त्याला कोर्टात खेचले तर त्याच्याकडून नुकसानभरपाई मागता येईल.
याबद्दलचे माझे (अ)ज्ञान इतपतच आहे. जाणकारांनी त्यात भर टाकावी अशी विनंती आहे.
आंतर्जालावरील काही चित्रे कॉपी किंवा सेव्ह करताच येत नाहीत. त्यासाठी सोफ्टवेअरमध्ये काही तजवीज केलेली असते. त्याबद्दलही माहिती द्यावी.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Jun 2010 - 3:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> आंतर्जालावरील काही चित्रे कॉपी किंवा सेव्ह करताच येत नाहीत. <<
काही उदाहरण आहे का? असेल तर उलट प्रयत्न करण्याची फार इच्छा होत आहे.
मूळ चित्रं उचलता आलं नाहीच तर स्क्रीनशॉट घेणं फार कठीण नाही.

वॉटरमार्कसाठी लिनक्समधे 'इमेजमॅजिक' नावाचं सॉफ्टवर वापरून स्क्रिप्ट लिहून सगळ्यांच फोटोंवर एका झटक्यात वॉटरमार्क टाकता येईल.

अदिती

आवशीचो घोव्'s picture

26 Jun 2010 - 8:37 pm | आवशीचो घोव्

वॉटरमार्कसाठी लिनक्समधे 'इमेजमॅजिक' नावाचं सॉफ्टवर वापरून स्क्रिप्ट लिहून सगळ्यांच फोटोंवर एका झटक्यात वॉटरमार्क टाकता येईल.

+1

अधिक माहितीसाठी येथे टिचकी द्या. ;-)
http://www.selonen.org/arto/netbsd/watermarks.html

http://creativecommons.org/about/licenses/

आनंद घारे's picture

27 Jun 2010 - 10:55 pm | आनंद घारे

लगेच देता येणार नाही, पण राइट क्लिक करून 'सेव्ह पिक्चर अ‍ॅज' वर क्लिक केल्यानंतर 'धिस फॅसिलिटी ईज डिसेबल्ड' असा मेसेज आलेला मी पाहिला आहे. स्क्रीन शॉट किंवा स्निपिंग टूल वापरणे शक्य आहेच. त्यासाठी अल्पसा प्रयत्न करावा लागतो. मात्र व्हिडिओमधील स्टिल फोटो स्क्रीन शॉट घेऊनही येत नाहीत असा माझा अनुभव आहे.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jun 2010 - 10:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> राइट क्लिक करून 'सेव्ह पिक्चर अ‍ॅज' वर क्लिक केल्यानंतर 'धिस फॅसिलिटी ईज डिसेबल्ड' असा मेसेज आलेला मी पाहिला आहे. <<
आख्ख्या पानाचा 'एचटीएमेल सोर्स' पहा, त्यात चित्राची लिंक दिसेल; ती उघडली की आख्खं चित्रचं आपलं! :-D
व्हीडीओवर मी प्रयोग केलेले नाहीत म्हणून माहित नाही.

अदिती

आनंद घारे's picture

28 Jun 2010 - 6:33 pm | आनंद घारे

पण कधीकधी हा सोर्स फार प्रचंड असतो आणि त्यात खूप सारे एसआरसी असतात. तेंव्हा मात्र ते शोधण्यापेक्षा स्निपिंग सोपे वाटते.
असो . चित्रे ढापण्याचे मार्ग आहेत.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jun 2010 - 10:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> पण कधीकधी हा सोर्स फार प्रचंड असतो <<
आख्खा सोर्स उघडला की त्यात "जेपीजी" किंवा "पीनजी" किंवा तत्सम शब्दांसाठी सर्च करायचं,
किंवा
चित्रं सिलेक्ट करून "व्ह्यू सिलेक्शन सोर्स" करायचं!
चित्रं सिलेक्ट होत नसेल तर आधीचं किंवा नंतरचं टेक्स्ट सिलेक्ट करायचं! हायलायटींग होतं.

अदिती

टारझन's picture

28 Jun 2010 - 10:59 pm | टारझन

हॅहॅहॅ ... पण मी म्हण्तो ह्या सगळ्या खटाटोपाची गरजंच काय ? चोरलेली वस्तु आत्मिक समाधान देत नाही (आणि तसंही फोटु चोरुन काय समाधान भेटतं देव काका जाणो )

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jun 2010 - 11:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> ह्या सगळ्या खटाटोपाची गरजंच काय <<
सुद्द आणि पष्ट शब्दांत: खा ज

चोरलेले फोटो काय कामाचे? इथे स्वतः काढलेले फोटो जालावर चढवायला आणि लोकांना लिंका द्यायला विसरायला होतंय!

अदिती

II विकास II's picture

28 Jun 2010 - 11:03 pm | II विकास II

प्रत्येकाची खाज निराळी असते.
काही लोक लेख चोरतात, काही फोटो.

आनंद घारे's picture

28 Jun 2010 - 11:32 pm | आनंद घारे

दुसर्‍याच्या मालकीची एकादी वस्तू मी त्याला नकळत काढून घेतली, त्यानंतर ती माझ्याकडे असली, पण त्याच्याकडे नसली, तर त्याला चोरी असे म्हणतात.
जालावर सर्वांना दाखवण्यासाठी टाकलेल्या चित्राची एक प्रत काढून मी माझ्याकडे ठेवली तर त्यात त्याचे काय बिघडणार आहे? असा युक्तीवाद केला जातो. त्यामागचे कारण एवढेच की ते चित्र पुन्हा पहावे असे मला कालांतराने कधी वाटले तर ते मला ऑफलाईन सापडू शकते. त्यासाठी पुन्हा जालावर जाऊन ते धुंडाळण्याची गरज पडत नाही. असली माझ्या दृष्टीने खास आणि सहजपणे न सापडणारी चित्रे मिळवण्यासाठीच वर दिलेल्या क्लुप्त्यांचा वापर होतो.
ते चित्र मी माझ्या नावाने विकून त्यातून पैसे कमावले तर अर्थातच तो गुन्हा आहे.
माझ्या मूळ प्रतिसादातला मुख्य मुद्दा हा आहे की वॉटरमार्क किंवा कॉपीराइट मार्क टाकल्यामुळे चित्रे कॉपी करणे थांबवता येत नाही. त्यासाठी वेगळी यंत्रणा लागते.

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

पंगा's picture

29 Jun 2010 - 12:16 am | पंगा

त्यापेक्षासुद्धा, कॅश/टेंपररी इंटरनेट फाइल्स फोल्डर वगैरेंमध्ये चित्रे आपोआप डाउनलोड वगैरे होत नाहीत काय? (चूभूद्याघ्या.)

- पंडित गागाभट्ट.

"It is better to keep your mouth shut and appear stupid than to open it and remove all doubt."

प्रभो's picture

29 Jun 2010 - 12:31 am | प्रभो

होतात...काही चित्रपट उतरवून घ्यायला या प्रकारचा उपयोग करतो मी.... :)

पंगा's picture

29 Jun 2010 - 12:43 am | पंगा

छान. So I am not as stupid as I thought I was. (Maybe stupider, but certainly not as stupid.)

You made my day. आभारी आहे.

- पंडित गागाभट्ट.

Nile's picture

29 Jun 2010 - 1:00 am | Nile

काही प्लेअर्स मात्र हुशार असतात हो, आख्खा व्हिडिओ कॅश मध्ये जमा करतच नाहीत. :)
(पण कॅश मधुन हार्ड डिस्कवर साठवणे(तशी सॉफ्टवेअर्स्/अ‍ॅडऑन्स मिळतात) म्हणजे थोडेसे तांत्रिक ज्ञान हवे. )

-Nile

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jun 2010 - 8:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

होतात ना, पण ते शोधायला लागतातच!
शंका: मी आत्ताच हे* चित्रं उघडलं /tmp फोल्डरमधे काहीही दिसत नाहीये.

अदिती
(*हा फोटो मीच काढलेला आहे, उगा चोरी करायचा प्रयत्न असा संशय घेऊ नये.)

टारझन's picture

27 Jun 2010 - 10:58 pm | टारझन

माझं माझं करणे सोडा :) लोभ-मोह हा वाईट असतो :)

- स्वामी टारानंद वाटरमार्के

अरुंधती's picture

30 Jun 2010 - 6:18 pm | अरुंधती

आताच मला हे ईमेल व फोटोज फॉरवर्ड मधून आले! :(

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/