लोकहो,
कलादालनमध्ये फोटो टाकताना कृपया कॅमेरा वापरलात कोणता ते आवर्जून लिहा. या माहितीचा अप्रत्यक्ष उपयोग बराच आहे. कोणत्या कॅमे-याने किती चांगले (किंवा किती वाईट) फोटो येऊ शकतात ही माहिती नवीन कॅमेरा निवडताना/घेताना उपयोगी पडते. पिकासा सारख्या वेब-अल्बम मध्ये ही आणि इतर माहिती लगेच कळते. पण इथे डकवलेल्या फोटोंच्या बाबतीत तशी मिळत नाही. असो.
-युयुत्सु
प्रतिक्रिया
11 Jun 2010 - 10:53 am | योगेश२४
पुढच्या वेळी नक्कीच!!!! :)
11 Jun 2010 - 11:45 am | युयुत्सु
आत्ताच का नाही?
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
11 Jun 2010 - 11:53 am | बिपिन कार्यकर्ते
निखिल देशपांडे आणि इनोबा यांना एक सूचना...
कलादालनात धागा टाकताना, वर्गीकरणामधे प्रथम पातळीवर छायाचित्र असा पर्याय असावा, आणि तो पर्याय निवडला असेल तरच, त्या नंतर दुसर्या पातळीवर कॅमेर्यांची नावे / मॉडेल / ब्रँडनेम्स असावीत. लवकरच मिपावर वर्गीकरणानुसार धागे धुंडाळता येतील अशी अपेक्षा आहे. तेव्हा असे वर्गीकरण खूप महत्वाचे असेल.
बिपिन कार्यकर्ते
11 Jun 2010 - 11:57 am | अवलिया
छान सुचना.
--अवलिया
11 Jun 2010 - 12:08 pm | निखिल देशपांडे
सुचनेची नोंद घेतली आहे. त्यावर काम करण्यात येईल.
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
11 Jun 2010 - 2:13 pm | विंजिनेर
तुम्ही काय कलादालनातल्या प्रत्येक नव्या धाग्यानंतर कॅमेरा घ्यायला धावणार आहात काय? :?
(सॅच्युरेटेड)विंजिनेर
11 Jun 2010 - 2:27 pm | मदनबाण
तुम्ही काय कलादालनातल्या प्रत्येक नव्या धाग्यानंतर कॅमेरा घ्यायला धावणार आहात काय?
पण इतरांना याची मदत होउ शकते ज्यांनी कॅमेरा घेतला नसेल किंवा ज्यांना अजुन आधुनिक कॅमेरा घ्यायचा असेल. :)
मला हा कॅमेरा घ्यायचा फार मोह होत आहे...
http://www.nikon.co.in/productitem.php?pid=1366-e2e1ec9d2b
पण सध्या मोह आवरावा म्हणतो... ;)
(निकॉन प्रेमी)
मदनबाण.....
"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget
11 Jun 2010 - 3:46 pm | युयुत्सु
प्रत्येक नव्या धाग्यानंतर कॅमेरा घ्यायला धावलो नाही तरी माझा सध्याचा कॅमेरा कालबाह्य झाल्यावर धावावेच लागेल. तेव्हा इथले लोकांचे अनुभव जमेस येतील.
शिवाय दूसरा फायदा म्हणजे भारतातल्या वातावरणातले फोटो कोणत्या कॅमे-यावर कसे दिसतात हे इथे पाहून यावरून थोडा का होईना अंदाज बांधता येतो. बरेच रिव्हयु साईट्स व्यावसायिक फोटोग्राफरनी काढलेले फोटो नमुन्यादाखल देतात, त्यामुळे सगळेच कॅमेरे चांगले वाटतात.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.