फोटो खरच छान आले आहेत...आवडले..अगदी शार्प...पाकळीवरचे बारीक डिटेल सुद्धा दिसताहेत..
गुलमोहोराचे इतके धागे निघाले तरी आम्हाला गुलमोहोर आवडतो...बाकीच्या मेम्ब्रांनाही आवडत असावा नाहीतर, 'आता कंटाळा आला' असे प्रतिसाद आले असते. असो,
फोटो आवडले हे महत्वाचे.
एक फुकटची सूचना- जमले तर तुम्ही काढलेल्या रंगीबेरंगी पक्षांचे फोटो टाका..(म्हणजेच असे फोटो काढा)
( कुठलाही फोटो हल्ली उपभोग्य वस्तूचाच वाटायला लागलाय... कदाचित पाणावलेल्यामुळे डोळ्यांमुळे असेल @) )
चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके
आम्ही कळ्या नाही पण पाकळ्या खायचो. पांढरा रंग असलेली पाकळी म्हणजे राजा आणि लाल पाकळ्या म्हणजे राण्या (म्हणजे एकाला चार!). फक्त पांढर्या रंगाची पाकळी खाल्ली जायची. असो.
गुलमोहोराचे झाड उन्हाळ्यात मस्त फुलते. आणि उन्हाळ्यात आम्ही पुण्याहुन आज्जी-आजोंबाकडे अंमळनेरला जायचो. खांदेशातला रणरणता उन्हाळा आणि त्यात गुलमोहोराची मस्त छाया. बालपणाच्या/सुट्टिच्या आठवणी जाग्या झाल्या.
प्रतिक्रिया
10 Jun 2010 - 10:44 am | मदनबाण
वा... सुंदर... :)
मदनबाण.....
"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget
10 Jun 2010 - 10:48 am | दिपक
वा... सुंदर... :)
10 Jun 2010 - 10:53 am | शिल्पा ब
फोटो खरच छान आले आहेत...आवडले..अगदी शार्प...पाकळीवरचे बारीक डिटेल सुद्धा दिसताहेत..
गुलमोहोराचे इतके धागे निघाले तरी आम्हाला गुलमोहोर आवडतो...बाकीच्या मेम्ब्रांनाही आवडत असावा नाहीतर, 'आता कंटाळा आला' असे प्रतिसाद आले असते. असो,
फोटो आवडले हे महत्वाचे.
एक फुकटची सूचना- जमले तर तुम्ही काढलेल्या रंगीबेरंगी पक्षांचे फोटो टाका..(म्हणजेच असे फोटो काढा)
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
10 Jun 2010 - 10:56 am | किल्लेदार
वा वा छान. कुठला Camera ?
10 Jun 2010 - 11:02 am | नाना बेरके
आम्ही लहानपणी गुलमोहोराची फुले, कळ्या खायचो.
( कुठलाही फोटो हल्ली उपभोग्य वस्तूचाच वाटायला लागलाय... कदाचित पाणावलेल्यामुळे डोळ्यांमुळे असेल @) )
चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके
10 Jun 2010 - 4:57 pm | पांथस्थ
आम्ही कळ्या नाही पण पाकळ्या खायचो. पांढरा रंग असलेली पाकळी म्हणजे राजा आणि लाल पाकळ्या म्हणजे राण्या (म्हणजे एकाला चार!). फक्त पांढर्या रंगाची पाकळी खाल्ली जायची. असो.
गुलमोहोराचे झाड उन्हाळ्यात मस्त फुलते. आणि उन्हाळ्यात आम्ही पुण्याहुन आज्जी-आजोंबाकडे अंमळनेरला जायचो. खांदेशातला रणरणता उन्हाळा आणि त्यात गुलमोहोराची मस्त छाया. बालपणाच्या/सुट्टिच्या आठवणी जाग्या झाल्या.
छायाचित्रे मस्त आहेत. इथे टाकल्याबद्दल धन्यवाद!
- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
11 Jun 2010 - 1:57 am | टिउ
आम्ही त्याला (पांढर्या पाकळीला) कोंबडा म्हणायचो...थोडीशी आंबट, तुरट चव असते. लहानपणी झाडावर चढुन सगळे कोंबडे फस्त करायचो.
हल्ली पण झाडावर चढुन बसतो...पण कोंबडे हल्ली झाडाखाली (झुंजत) असतात! ;)
10 Jun 2010 - 11:56 am | नेहमी आनंदी
आम्ही या कोंबड्यांची लढाई खेळायचो....
गुलमोहर खुप सुरे़ख...
11 Jun 2010 - 12:54 am | राघव
कधी कधी म्हणतात, "गुलमोहर बघ, कसा पेटलाय!"
ते का म्हणतात ते समजले!! :)
राघव
11 Jun 2010 - 1:42 am | टारझन
घेतला क्यामेरा की क्लिकव ... घेतला क्यामेरा की क्लिकव :)