फोटोग्राफीमध्ये रमताना...

यशोधरा's picture
यशोधरा in कलादालन
9 Jun 2010 - 7:21 pm
छायाचित्रण

प्रतिक्रिया

युयुत्सु's picture

9 Jun 2010 - 7:23 pm | युयुत्सु

कॅमेरा कोणता?

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

टारझन's picture

10 Jun 2010 - 12:12 am | टारझन

त्या होडीचा फोटू अगदी प्रोफेशनल ने काढल्या सारखा आलाय .. जबरा @@
ब्लॅक अँड व्हाईट आजोबा पण भारी !

यशोधरा's picture

9 Jun 2010 - 7:30 pm | यशोधरा

त्याने काय फरक पडतो? :)
नायकॉन डीएसएलाआर. डीएसएलआर असो वा पाँइट अ‍ॅंड शूट, नजर महत्वाची. पॉईंट आणि शूट कॅमेरावर पण भरपूर खेळ करता येतात, सॅचुरेशन वाढवता येतं वगैरे, वगैरे. असो.

युयुत्सु's picture

9 Jun 2010 - 7:34 pm | युयुत्सु

त्याने काय फरक पडतो?

माझ्या मते बराच फरक पडतो. लोक उच्च प्रतीचा कॅमेरा वापरून पण सुमार फोटो काढतात.

बाकी मला म्हाता-याचे पोर्ट्रेट आवडले.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

यशोधरा's picture

9 Jun 2010 - 7:42 pm | यशोधरा

धन्यवाद युयुत्सु.

मदनबाण's picture

9 Jun 2010 - 7:45 pm | मदनबाण

फोटो सुंदर आहेत... :)
इतक्या सुंदर चित्रांवर वॉटरमार्क मात्र खटकतो... :(

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

यशोधरा's picture

9 Jun 2010 - 8:05 pm | यशोधरा

बाणा, वॉटरमार्क त्यातल्यात्यात खटकणार नाही अश्या पद्धतीने एका बाजूला असा टाकलेला आहे. छायाचित्रावर मधेच कुठेही आलेला नाहीये.

मदनबाण's picture

9 Jun 2010 - 10:52 pm | मदनबाण

ह्म्म... वरुन ३रा फोटो जेव्हा मी पाहिला तेव्हा मला तसे वाटले...

जाता जाता :--- मला काय वाटतं ते सांगतो,जर मी प्रोफेशनल फोटो काढुन कोणाला विकणार नसेन ( पैसा कमवणे हा उद्देश धरला तर...) तर स्वतःच्या आनंदासाठी काढलेल्या फोटोवर शिक्का मारण्यात काय अर्थ ? दुसर्‍याने वापरला तर... हरकत नाय माझी... अंबानी( धिरुभाई) काहीही वरती घेऊन जाऊ शकला नाही तर ये फोटो वोटो क्या चीज है ? ;)
थोडक्यात स्वतः आनंद घ्या आणि दुसर्‍यांसाठी तो अबाधित ठेवुन जा...

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

यशोधरा's picture

9 Jun 2010 - 11:53 pm | यशोधरा

माझीसुद्धा तू काढलेले फोटो दुसर्‍या कोणी वापरले तर हरकत नाहीये रे! :D

>>आणि दुसर्‍यांसाठी तो अबाधित ठेवुन जा... >> तू तर माझ्या जिवावरच उठलास की! फोटो टाकू नको असे व्यवस्थित सांग ना! नाही टाकणार! पण डायरेक वरच पोचवतोस हे मात्र अतिच झाले की भौ! :P :D

श्रावण मोडक's picture

9 Jun 2010 - 11:39 pm | श्रावण मोडक

वॉटरमार्क इतका नजरेत येतोय? खरं तर, नीधपच्या छायाचित्रातील वॉटरमार्कही माझ्या नजरेत आला नाही. मी छायाचित्रातील 'सौंदर्य' हुडकण्यात कमी पडलो असेन बहुदा. :)
ही प्रकाशचित्रे ज्या व्यक्तीनं काढली असतात, तिची एक कला त्यात उतरलेली असते. त्या कलेचा आनंद दुसऱ्यांनीही घ्यावा यासाठीच ती प्रकाशित केली जातात. पण जिथे प्रकाशित होतात तिथून ती उचलली जाण्याची शक्यता या तंत्रातच आहे. ती अगदी कुणी फुकट वापरली तरी, ती उचलेगिरीच असते. तसे होऊ नये हे हुन्नरी माणसाला वाटणारच आणि त्यासाठी तो दक्षता घेणारच. त्यात त्याचे काहीही चुकत नाही. आणि माध्यमांमध्ये असे लोक असतातच जे अशा कृती उचलतात. म्हणूनच या तंत्रज्ञानात वॉटरमार्कही आले. त्यांचा अवलंब होणारच. उलट अनेकजण तो करत नसल्याचे पाहून मला आश्चर्य वाटते.
या वॉटरमार्कमुळे या कलेचा आस्वाद घेता येत नसेल तर त्याचा दोष माध्यमावर टाकला पाहिजे, कारण चोरी होणार नाही अशा रीतीने या कलाकृती प्रकाशित करता न येणं हा माध्यमाचा अपुरेपणा आहे. या माध्यमांमध्ये ही प्रकाशचित्रे अशाच वॉटरमार्कसह येतील हे माणसाचाच एकूण या माध्यमांवरील इतिहास पाहता स्पष्ट आहे. (आता इथं, खरं तर, माध्यमाचा काय दोष? ते खुलं असणं योग्यच असं कोणीही म्हणेल. तत्वतः मी सहमत आहे. पण तेवढा खुलेपणा झेपण्याची माणसाची लायकी, किंवा पात्रता म्हणूया, नसेल तर तो दोष माणसं स्वतःवर न घेता माध्यमावरच टाकतील हे नक्की!!! मी फक्त तेच लिहितोय.)
यापलीकडे अस्सल आस्वादासाठी कलाकाराशी संपर्क साधून इतर माध्यमांचा विचार करता येतोच.

चतुरंग's picture

10 Jun 2010 - 12:09 am | चतुरंग

(वॉटरमार्क्स थेट दिसणार नाहीत फक्त संगणकाचा शापक (कर्सर) चित्रावरुन फिरला तरच दिसतील असे काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे का?)

चतुरंग

श्रावण मोडक's picture

10 Jun 2010 - 12:42 am | श्रावण मोडक

उत्तम सूचना. तांत्रीक, मांत्रिकांनी यावर जरूर विचार करावा.
प्रेरणा - याच धाग्यातील पहिले, तिसरे, चौथे, पाचवे आणि सहावे प्रकाशचित्र घ्या. त्यातील वॉटरमार्कचा भाग कापून टाकला तरीही ती प्रकाशचित्रे (अर्थात, थोडी डावी, पण) उत्तमच राहतात. १, ३, ४ मध्ये किंचित खोली जाते. पण म्हणून स्वयंभूपणे न्यून येत नाही. न्यून दिसते ते मूळ छायाचित्राच्याच संदर्भात. याचा अर्थ इथं घेतलेली दक्षताही पुरेशी नाही. हे पाहिले की, नीधपने टाकलेले वॉटरमार्क अगदी प्रकाशचित्राच्या मध्ये का आहेत हे पटते.
यातली कुठलीही तांत्रीक करामत मी केलेली नाही. मी फक्त दृष्टीपटलासमोर प्रकाशचित्रे आणून एक खेळ करून पाहिला आणि तो बरोबर निघाला.

नीधप's picture

10 Jun 2010 - 8:47 am | नीधप

श्रा मो धन्स.

- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

यांनी काढलेले फोटो बघताना कर्सर फोटोवर नेला तर
कॉपी करू नये .तुमचा पत्ता मला कळतो आहे अशी सूचना येते. असे काही करता येईल

भडकमकर मास्तर's picture

10 Jun 2010 - 11:09 pm | भडकमकर मास्तर

हे खरंच लै भारी...
मला आठवतंय मी एकदा राईट क्लिक केले तर हे वाचले होते आणि दचकलो होतो...

भडकमकर मास्तर's picture

10 Jun 2010 - 1:55 am | भडकमकर मास्तर

वॉटरमार्क इतका नजरेत येतोय ?
अगदी..
माझ्या तरी लै वेळा नजरेत येतो...

पण वॉटरमार्क टाकल्याने चित्र ढापता येत नाही असे कोणी सांगितले?
ढापायचेच तर कसेही ढापता येते...
वॉटरमार्क काढायची तंत्रे पुष्कळ असतात...
ते जाउदे...

वॉटरमार्क कसा टाकावा ( तो काढणे सर्वात अवघड होईल ,[ अवघड बरं, मी अशक्य म्हणतच नाहीये...]अशा पद्धतीने) याचीही तंत्रे असतात.....
असो...

माझ्या मते
१.वाटरमार्क संपूर्ण चित्रात असून नसल्यासारखा असावा.
फिकट रंगाचा...
२.ढापणार्‍या माणसाला तो खोडणे अति अवघड जावे...
३. चित्राच्या मुख्य भागाच्या जवळ, फिकट रंगात , बारीक पट्टीसारखा पारदर्शक असावा ( तुमचा काय तो नाव गाव पत्ता देऊन त्या लेयरची ओपेसिटी कमी करावी)
४.बर्‍याच चांगल्या वाटरमार्क्स करणारे कलाकार त्या त्या संस्थळाची पाणीखूण बारीक आडव्या पट्टीच्या स्वरूपात संपूर्ण चित्रभरून पण अत्यंत बारीक आणि पारदर्शक ठेवून वापरतात...

पाणीखूण करण्याविषयी माझे दोन शब्द इथे संपले...

नीधप's picture

10 Jun 2010 - 8:51 am | नीधप

>>पण वॉटरमार्क टाकल्याने चित्र ढापता येत नाही असे कोणी सांगितले?
ढापायचेच तर कसेही ढापता येते...
वॉटरमार्क काढायची तंत्रे पुष्कळ असतात...<<
पण वॉटरमार्क टाकल्याने ढापले जाण्याची टक्केवारी तरी कमी होते हे तर खरं आहे ना.

>>वॉटरमार्क कसा टाकावा ( तो काढणे सर्वात अवघड होईल ,[ अवघड बरं, मी अशक्य म्हणतच नाहीये...]अशा पद्धतीने) याचीही तंत्रे असतात.....<<
याबद्दल अजून माहिती मिळाल्यास आवडेल. इथे नाही तर विपु किंवा व्यनि मधे द्यावी.

- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

मदनबाण's picture

10 Jun 2010 - 9:22 am | मदनबाण

वॉटरमार्क कसा टाकावा ( तो काढणे सर्वात अवघड होईल ,[ अवघड बरं, मी अशक्य म्हणतच नाहीये...]अशा पद्धतीने) याचीही तंत्रे असतात.....<<
याबद्दल अजून माहिती मिळाल्यास आवडेल. इथे नाही तर विपु किंवा व्यनि मधे द्यावी.

इथे माहिती दिल्यास सर्वांनाच त्याचा उपयोग होईल. :)

वॉटरमार्कमुळे मूळ चित्राचे सौंदर्य नष्ट होउ नये हीच माफक इच्छा आहे.

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

यशोधरा's picture

10 Jun 2010 - 10:02 am | यशोधरा

>>माझ्या मते
१.वाटरमार्क संपूर्ण चित्रात असून नसल्यासारखा असावा. फिकट रंगाचा... >> बर्‍यापैकी फिकट आहे असे वाटते मी टाकलेला वॉमा. अजून फिकट हवाय का?

२.ढापणार्‍या माणसाला तो खोडणे अति अवघड जावे... >> ह्याबाबत कल्पना नाही, पण तो कडेला असल्याने क्रॉप करता येईल म्हणा.

३. चित्राच्या मुख्य भागाच्या जवळ, फिकट रंगात , बारीक पट्टीसारखा पारदर्शक असावा ( तुमचा काय तो नाव गाव पत्ता देऊन त्या लेयरची ओपेसिटी कमी करावी) >> मुख्य भागाच्या जवळ वॉमा टाकला तर चित्राचा विचका होतो, कितीही फिकट टाका.

४.बर्‍याच चांगल्या वाटरमार्क्स करणारे कलाकार त्या त्या संस्थळाची पाणीखूण बारीक आडव्या पट्टीच्या स्वरूपात संपूर्ण चित्रभरून पण अत्यंत बारीक आणि पारदर्शक ठेवून वापरतात >> ही सूचना चांगली आहे, पण प्रोफेशनल्ससाठी अधिक योग्य. तसही मी जिथे फोटो होस्ट करते, त्या संसथाळाच्या काही मर्यादा आहेत. तेह्वा तसे करता येत नाही आहे सद्ध्या.

पण चित्र न पाहता वॉमाच पहाणारे कोणी असले तर वॉमा कसाही टाकला तरी तोच दिसेल ना? :)

नीधप's picture

10 Jun 2010 - 1:01 pm | नीधप

पण चित्र न पाहता वॉमाच पहाणारे कोणी असले तर वॉमा कसाही टाकला तरी तोच दिसेल ना?<<
ये बात सोला आने सच यशो...

- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

अवलिया's picture

10 Jun 2010 - 1:09 pm | अवलिया

>>>पण चित्र न पाहता वॉमाच पहाणारे कोणी असले तर वॉमा कसाही टाकला तरी तोच दिसेल ना?

हाच तो कळीचा मुद्दा.

वॉमा दिसतोच अशा सोईस्कर गृहितकावर आधारलेला.

हे परमेश्वरा काय हे घोर अज्ञान... असो. सगळ्यांनाच ज्ञानी करण्याचा मक्ता मी घेतलेला नाही तेव्हा पाण्याची चिन्हे ...आपलं... वॉटर मार्क पुराण चालु द्या !

--अवलिया

यशोधरा's picture

10 Jun 2010 - 1:11 pm | यशोधरा

गुरुजी, नुसतीच टीका करण्यापे़क्षा शहाणे करुन टाका पाहू सकळ अज्ञानी जन! :)

श्रावण मोडक's picture

10 Jun 2010 - 11:04 pm | श्रावण मोडक

मास्तर, तुमच्या दोन शब्दांनंतर माझ्यापुरते आभार प्रदर्शन करतो.
वॉटरमार्क टाकल्याने प्रकाशचित्रे ढापता येणार नाहीत असं थोडंच आहे, हे मान्यच. पण बाजारात कडीकोयंडा काढण्याची हत्यारे, डुप्लिकेट चाव्या मिळतात हे ठाऊक असूनही आपण कुलपं लावतो घरादारांना; तसाच हा एक प्रकार (अशी इतरही बरीच उदाहरणे देता येतील. लांबवत नाही). याला भले भ्रम म्हणा किंवा काहीही. पण ही तशीच आणि तेवढीच व्यवस्था आहे हे माझ्याइतकेच तुम्हालाही मान्य व्हावे.
शनीशिंगणापूर ते (चोराची) आळंदी यातलं अंतर फारसं नसतं, इतकंच.
वॉटरमार्क कसा टाकावा याविषयी तुमच्या मतांशी सहमत. तुमच्यातला फोटोशॉप एक्स्पर्ट दिसतो आहेच त्यात. अर्थातच, तसे काही सोपे तंत्र असेल तर त्याचाच वापर कलाकारांनी करावा. म्हणजे प्रकाशचित्रांचा आस्वाद नीट घेता येईल. अवलियांच्या म्हणण्यानुसार तसं काही तंत्र असावं असं दिसतं आहे. ज्याने-त्याने शोध घ्यावा.
थांबतो. धाग्यावरचा मुख्य भाग प्रकाशचित्रांचा. त्याचा आनंद घेऊया.

मेघवेडा's picture

9 Jun 2010 - 7:55 pm | मेघवेडा

आईशप्पथ कसले फोटो आलेत एकेक! एकदम जॉब्बरदस्त!! चौथा फोटो नक्कीच भोगवे बीचवरचा आहे. तिथे कुणीही फोटो काढले तरी चांगलेच येतात आणि स्टीरीओटाईप होतात असा माझा समज होता ;) पण तू काढलेला हा फोटो चांगला आहेच पण जरा वेगळा वाटला.. भावला मनाला!! व्यक्तिचित्रंही सॉल्लीडच आहेत!!

छान छान!! :) अजून येऊ दे!!

>> जसे, योग्य शब्दकळा वापरली असता एखादा लेख वा कविता मनाला अधिक भावते, परिणामकारक वाटते, तसेच फोटोंचे आहे. योग्य पोस्ट प्रोसेसिंगने छायाचित्राचे सौंदर्य निखालसपणे अधिक खुलून दिसते.

अक्षरशः पटलं!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

गणपा's picture

9 Jun 2010 - 8:06 pm | गणपा

रंगीत चित्रांवर केलेले संस्कार पटकन जाणवतायत.
(त्यामुळे सौंदर्यात भर पडली आहे खर असल तरी जे नैसर्गीक ते नैसर्गिकच.)
त्यामुळे कृष्णधवल चित्रं जास्त आवडली. खास करुन म्हातारा.

बाणाशी सहमत.
मोठे वॉटरमार्क जरा खटकतात. वरुन तिसर्‍या फोटोत जरा जास्तच.
आंदो और भी. :)

सहज's picture

9 Jun 2010 - 8:21 pm | सहज

आंदो और भी!

हेच म्हणतो.

यशोधरा's picture

9 Jun 2010 - 8:13 pm | यशोधरा

गणपा, कृष्ण धवल चित्रांवर प्रोसेसिंग केलेलं नाही असं वाटलं का? मस्त की मग! :) प्रोसेसिंग जमलं आहे म्हणजे! ;)

मी हेच सांगायचा पयत्न करत आहे गणपा. पोस्ट प्रोसेसिंग हे देखील योग्य रीत्या करायला जमले पाहिज, असे मला वाटते.

अभिज्ञ's picture

9 Jun 2010 - 8:46 pm | अभिज्ञ

आईशप्पथ,
एक से एक फोटो आहेत.
फोटोप्रोसेसिंग प्रचंड आवडले.
१ले,२रे व म्हाता-याचे चित्र अतिशय आवडले.

मी काढलेल्या सर्व फोटोंवर पोस्ट प्रोसेसिंग करते. त्यात काही चुकीचे वा कमीपणाचे आहे, असे मला वाटत नाही. जसे, योग्य शब्दकळा वापरली असता एखादा लेख वा कविता मनाला अधिक भावते, परिणामकारक वाटते, तसेच फोटोंचे आहे. योग्य पोस्ट प्रोसेसिंगने छायाचित्राचे सौंदर्य निखालसपणे अधिक खुलून दिसते. उत्तम छायाचित्रणाबरोबरच, योग्य पोस्ट प्रोसेसिंग करता येणे ही देखील एक कलाच आहे, असे माझे मत.

अतिशय सहमत.

मला मात्र ह्या छंदाने आनंदाचे खूप क्षण दिले आहेत हे नक्की!

हेच तर सर्वात महत्वाचे.

असो,
अजून येउ द्यात.

अभिज्ञ.

चतुरंग's picture

9 Jun 2010 - 8:47 pm | चतुरंग

प्रकाशचित्रे सुंदरच आली आहेत. म्हातार्‍याचे व्यक्तिचित्र तर आवडलेच व मुलाचेही भावपूर्ण बोलके डोळेही आवडले. (आयुष्याशी झगडून उमर झालेल्या म्हातार्‍याचे चित्र एकेक बारकावा दिसेल असे उठावदार आणि मुले स्वप्नाळू असतात त्यामुळे थोडा सॉफ्ट फोकस ठेवून प्रोसेसिंग केले आहेस असा अंदाज.)

चतुरंग

पक्या's picture

9 Jun 2010 - 9:05 pm | पक्या

सुंदर छायाचित्रे. २ रा खूप आवडला आणि दोन्ही कृष्णधवल .
पण रंगीत चित्रातील रंग फार भडक वाटतायेत...खासकरून क्र. ३ आणि ४. ते रंग नैसर्गिक वाटत नाहीयेत.
खराब फोटो पोस्ट प्रोसेसिंग ने उजळवला/ चांगला केला तर पटण्यासारखे आहे. उदा. काळसर आलेला फोटो , खूप प्रकाश असल्याने पांढरट आलेला फोटो, ...
पण मुळातच फोटो छान आलेले असतील (सुस्पष्ट वगैरे) तर पोस्ट पोसेसिंग करू नये हे माझे मत आहे.
नैसर्गिक ते नैसर्गिकच ह्या गणपा ह्यांच्या मताशी सहमत.

वॉटर मार्क मला तरी खटकलेला नाही.

जय महाराष्ट्र , जय मराठी !

यशोधरा's picture

9 Jun 2010 - 9:06 pm | यशोधरा

पक्या, ३ आणि ४ चे रंग नैसर्गिकच आहेत. ते लीस्ट प्रोसेस्ड फोटो आहेत. ४ थ्या फोटोमधला भोगवेचा किनारा असाच दिसतो. अतिशय निरभ्र निळेशार आकाश (खरं तर आकाशात इतर रंगच नव्हते, फारसे ढगही नव्हते, फ्लॅट होतं आकाश... ) आणि स्वच्छ प्रकाश दोन्ही फोटोंमधे आहे. ३र्‍या फोटोमध्ये तर पाण्यामध्ये केवळ आकाशाच्या प्रतिबिंबाचा रंग आहे.

तुमच्या संगणकाच्या पडद्याच्या प्रखरतेवरही तुम्हांला रंग कसे दिसतात हे थोडेफार अवलंबून असते.

पक्या's picture

9 Jun 2010 - 9:07 pm | पक्या

>>तुमच्या संगणकाच्या पडद्याच्या प्रखरतेवरही तुम्हांला रंग कसे दिसतात हे थोडेफार अवलंबून असते.
हो असू शकेल कारण मला ते खूपच भडक वाटतायेत.
- जय महाराष्ट्र , जय मराठी !

यशोधरा's picture

9 Jun 2010 - 9:28 pm | यशोधरा

>>खूपच भडक >> नsssssssहीं!!!!

प्रभो's picture

9 Jun 2010 - 9:21 pm | प्रभो

मस्त!!

योगेश२४'s picture

9 Jun 2010 - 10:37 pm | योगेश२४

मला सगळेच फोटो चिक्कार आवडले.
अजुन येऊ द्यात!!!!

राघव's picture

10 Jun 2010 - 12:02 am | राघव

मला विशेषतः कर्दळीचा अन् दोन्ही पोर्ट्रेट्स आवडलेत.
किनारेही छान आहेत पण का कुणास ठाऊक कॅमेरा वा लेन्स वेगळी वापरल्यासारखं वाटतंय (चु. भू. द्या. घ्या.)

हे आवडले असतील तर, पुन्हा कधीतरी अजून फोटो पोस्टेन.
नेकी और पूछपूछ??? :) येऊ द्यात बिनधास्त!

(फोटूप्रेमी) राघव

यशोधरा's picture

10 Jun 2010 - 12:06 am | यशोधरा

सग़ळे फोटो त्याच कॅमेराने आणि एकाच लेन्सने घेतले आहेत राघव. मला विविध लेन्स कुठे परवडायला? :) पण अशी विविध लेन्स माझ्याकडे असतील हा विचारही मस्त आहे! :) आमेन, आमेन :)

बेसनलाडू's picture

10 Jun 2010 - 12:08 am | बेसनलाडू

(आस्वादक)बेसनलाडू
कॅमेरा कोणता याबरोबरच इतर तांत्रिक बाबींचे पुरेसे ज्ञान असणे/नसणे, सौंदर्यदृष्टी (कोठे, कधी, कोणता फोटो काढावा इ.) असणे/नसणे, यांचाही प्रकाशचित्रवर परिणाम होतो, असे वाटते.
(प्रेक्षक)बेसनलाडू

राघव's picture

10 Jun 2010 - 12:25 am | राघव

ते सर्व तर प्राथमिकरीत्या गरजेचे आहे. अँगल वा प्रकाशाचा वापर या सोबतच, नक्की फ्रेम किती व कशी ठेवायची यावरही बरंच अवलंबून असतं की.

अर्थात् कुणा बॅडमिंटन चांगलं खेळता येणार्‍याला जरा चांगली रॅकेट मिळाली तर सोने पे सुहागा! :)

(आस्वादक) राघव

प्राजु's picture

10 Jun 2010 - 12:12 am | प्राजु

मस्तच!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2010 - 12:50 am | बिपिन कार्यकर्ते

यशोताय आहेच गुणाची. :) तिचा फोटोब्लॉगतर निव्वळ अप्रतिम आहे. इथे दिलेले सगळेच फोटो मस्त आहेत. खूप आवडले आहेत.

खुद के साथ बातां: शिकव म्हणलं तर शिकवत नाही :(

बिपिन कार्यकर्ते

Nile's picture

10 Jun 2010 - 4:24 am | Nile

झकास फोटु, निर्मयीदेवींशी याविषयाबद्दल एकदा सविस्तर चर्चा करायची आहे. ;)

-Nile

यशोधरा's picture

10 Jun 2010 - 9:56 am | यशोधरा

सगळ्यांचे आभार. :)
मतांची, आक्षेपांची उत्तरे देते १-२ दिवसांत.

वॉटरमार्क संबंधात बरीच चर्चा झालेली आहे म्हणून त्याबद्दल माझे मत मांडते -

माझ्या मते वॉटरमार्क असण्यात गैर काही नाही, अर्थात त्यामुळे मूळ चित्राला धक्का पोहोचू नये हे मात्र मान्य. मी वॉमा कडेला टाकण्याचे हेच कारण आहे की मूळ चित्राला धोका पोहोचवायला मला आवडत नाही, चित्राचे सौंदर्य त्याने नष्ट होते. तरीही फोटोग्राफरची आयडेंटीटी कळावी म्हणून वॉमॉ असला तर काय बिघडले? लेखाच्या शेवटी नाही का लेखकाचे नाव असते? तसेच हेही.

जसे वर काहीजणांनी म्हटले आहे तसे ज्याला ढापायचे आहे तो काहीही केले तरी ढापणार, तेह्वा ती चिंता मला नाही. पुन्हा मी इतक्या महान लोकांचे इतके सुरेख फोटो पाहते, तेह्वा मी काढलेले फोटोग्राफ्स कोणी आवर्जून ढापतील असे काही मला वाटत नाही! (ढापायला अजूनही खूप सुरेख फोटो आहेत मंडळी!) त्यामुळे मी काढलेला हा एक सुवर्णमध्य समजूयात.

विमुक्त's picture

10 Jun 2010 - 11:30 am | विमुक्त

सुंदर!!! फुलांचे फोटो तर बेस्टच...
३ रा फोटो नाही आवडला इतका, पण बाकीचे मस्तच आहेत...

अवलिया's picture

10 Jun 2010 - 12:15 pm | अवलिया

सुरेख फोटो.

वॉटर मार्क मधे आणुन फोटोंचा विचका न केल्याबद्दल धन्यवाद.

वॉटरमार्क फोटोच्यामधे टाकायचे असल्यास ते टाकण्याची एक पद्धत आहे.
फुकटात ज्ञान मिळत नसते.
योग्य गुरु शोधून त्याला दक्षिणा देवुन शिकुन घ्यावी, फायदा होईल.

असो.

--अवलिया

स्वाती दिनेश's picture

10 Jun 2010 - 2:01 pm | स्वाती दिनेश

यशो, फोटो सुंदर आहेत..
स्वाती

धमाल मुलगा's picture

10 Jun 2010 - 6:43 pm | धमाल मुलगा

खल्लास! खत्रा...जबरान !!!! विषय संपला.

क्काय वो एकेक फोटो म्हणायचं....
बाकी, का कोण जाणे, मला स्वतःला तरी असे कृष्णधवल फोटो जास्त भावतात त्यामुळे माझ्याकडुन त्या 'दोन बालपणाचे दोन फोटो' ह्यांना सर्वात जास्त टाळ्या. :)

बरं ते वॉटरमार्क वॉटरमार्क चं काय ओरडाआरडा चाल्लाय रे?
च्यायला, ज्याला टाकायचा त्याला टाकूद्या, ज्याला नाय टाकायचा त्यानं नका टाकू..अरे हाऽय काऽय नाऽय काऽय?
इथं तं वॉटरमार्क म्हणजे कंपनीचा लोगो वॉलपेपरवर टाकल्यागत धुराळा उडिवलाय की रं!!!
आरं बाबान्नो....त्या चित्रांमधी वॉटरमार्क हाय....वॉटरमार्काभोवती चित्र नव्हं....ह्या आता समजुन काय ते :)

यशोधरा's picture

10 Jun 2010 - 10:39 pm | यशोधरा

>>बरं ते वॉटरमार्क वॉटरमार्क चं काय ओरडाआरडा चाल्लाय रे?>>
तेच तर म्हणते ना मी! :D

>>ज्याला टाकायचा त्याला टाकूद्या, ज्याला नाय टाकायचा त्यानं नका टाकू..अरे हाऽय काऽय नाऽय काऽय? >> ह्ये ब्येष्ट! :)

अरुंधती's picture

10 Jun 2010 - 6:51 pm | अरुंधती

यशोधरा, मस्त फोटोज! खास करून कृष्णधवल व्यक्तिचित्रे आवडली! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

शानबा५१२'s picture

10 Jun 2010 - 11:22 pm | शानबा५१२

खुप छान फोटो आहेत.
मला पहील्यांदा (जर तुम्ही हे फोटो स्वःता त्या निसर्गाच्या सानिध्यात राहुन काढले असले तरच!)......कलादालन मधले फोटो एवढे आकर्षक वाटले.

हो watermark अजुन छोटा करता येईल..आणी तस केल्यास फोटो अजुन ठळक दीसतील.
दुसर फुल हळदीच आहे का??

खुप आवडले फोटु म्हणून प्रतिक्रीया दीली......अजुन असले तर ते पण 'पोस्टा' :*

धन्यवाद!!

यशोधरा's picture

10 Jun 2010 - 11:37 pm | यशोधरा

>>जर तुम्ही हे फोटो स्वःता त्या निसर्गाच्या सानिध्यात राहुन काढले असले तरच >> स्वतः फोटो काढायचे म्हणजे तसं करावच लागत हो शानबा! किं करोमी? स्वतःच काढलेत मी ते. दुसर्‍यांचे इथे का लावणार?

दुसरं फूल कर्दळीचं आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. :)

शानबा५१२'s picture

10 Jun 2010 - 11:48 pm | शानबा५१२

नाही म्हणजे कोणी घरच वगैरे फोटो काढुन आल की आपण त्याचा वापर अधिकाराने करतो म्हणून विचारल...बाकी अश्या निसर्गाच्या सानिध्यात येण भाग्याचच!!

किं करोमी?

........??????? करोमी????????????????????

आणि ते व्रुध्द पुरुषाच छायाचित्र एकदम world class आहे!!
आपण ह्या क्षेत्रात काही course वगैरे केलाय का???

यशोधरा's picture

10 Jun 2010 - 11:56 pm | यशोधरा

नाही कोर्स वगैरे नाही केलाय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jun 2010 - 12:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्रमाने म्हणायचे तर एक, दोन,चार, पाच क्रमांकांचे फोटो आवडले.
अजून येऊ द्या...!

-दिलीप बिरुटे

ज्ञानेश...'s picture

13 Jun 2010 - 8:55 pm | ज्ञानेश...

मला १,२,४ सर्वाधिक आवडले.

वॉटरमार्कसंबंधी एवढ्या घनघोर चर्चेनंतरही माझ्या लक्षात एक गोष्ट आली नाही- त्या शेवटच्या फोटोत दोन-दोन वॉटरमार्क्स का आहेत? :^o
('शैलजा' आणि छायाप्रकाश)

यशोधरा's picture

14 Jun 2010 - 8:44 am | यशोधरा

एक वॉमा काढायचा कंटाळा आणि आळस केल्यामुळे. :(

केशवराव's picture

14 Jun 2010 - 1:29 am | केशवराव

यशोधरा, याला कावळ्याची चाल म्हणायचे म्हणजे फारच झाले. विनय विनय म्हणजे तरी किती ?

बाकी फोटो फारच छान ! म्हातारा -- लै भारी !!

Manish Mohile's picture

16 Jun 2010 - 4:18 pm | Manish Mohile

सगळेच फोटो छान आहेत पण त्यातल्या त्यात मला दोन्ही फुलांचे आणि म्हातारबुवांचा विशेष आवडले.

कॅमेरा कुठला वापरता ? नविन घेण्याचा विचार आहे. त्यावेळी ह्या माहितीचा उपयोग होईल.

चिगो's picture

30 Oct 2010 - 4:38 pm | चिगो

जबराट फॉटु.. खुप आवडले. आणि नक्की पोष्टा हं आणखी फोटो..

चित्रा's picture

30 Oct 2010 - 5:44 pm | चित्रा

छायाचित्र (खरेतर सगळीच) अतिशय सुंदर आहे/त. तात्यांचे आभार मुखपृष्ठावर टाकल्याबद्दल.

या लेखनाची तारीख बघितल्यावर लक्षात आले की इथे आधी लक्ष कसे गेले नाही ;)

रेवती's picture

31 Oct 2010 - 12:17 am | रेवती

ही कावळ्याची चाल नाही यशो!
मस्त आलेत फोटो.
अजून पहायला आवडतील.

सूड's picture

31 Oct 2010 - 10:01 am | सूड

+१

इंटरनेटस्नेही's picture

31 Oct 2010 - 5:37 am | इंटरनेटस्नेही

मस्त! सगळेच फोटो आवडले. लहान मुलाचा पिक बघुन मला माझ्या लहानपणाचीच आठवण झाली.
पुढील कामासाठी शुभकामना.

वॉटरमार्क: सगळ्यात योग्य रीतीने दिलेले आहेत. स्वतः यशोताई म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी सुर्वणमध्य साधलेला आहे.

इंट्या.

सूड's picture

31 Oct 2010 - 10:03 am | सूड

फटु झकासच असत गो यशो !! :)

यशोधरा's picture

1 Nov 2010 - 1:09 pm | यशोधरा

बर्‍याच दिवसांनी नवीन प्रतिक्रिया मिळाल्याने मस्त वाटले! धन्यवाद! :)
रेवती, चिगो, नक्की पोस्टेन.

नरेशकुमार's picture

4 Nov 2010 - 8:27 am | नरेशकुमार

फोटो छान आहेत.
वॉटरमार्क लहान पाहिजे.