नमस्कार मंडळी,
जुन्या काळी एकाच मोठ्या घरात २-३ पिढ्या रहात होत्या. नविन घराची गरज फारशी पडत नव्हती पण आजकाल जवळपास प्रत्येकाला स्वतःचे घर घेण्याची ईच्छा असते किंवा गरज पडते. मीही असाच विचार करत घर घ्याव (ईंवेस्टमेंट होइल, रहायला मोठं घर होइल आणी टॅक्स वाचेल म्हणुन) असं ठरवलं आणी शोध सुरु केला. पण नुसतच घर शोधायला बाहेर पडण्याऐवजी घर घेण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात असा विचार करु लागलो.
माझ्या लक्षात आलेल्या काही खालील गोष्टी, जाणकारांचे/अनुभवी लोकांची मते अपेक्षित आहेत.
१. बिल्डर आणी त्याचा अनुभव (कारण फसवणुकीचे प्रकार कमी नाहीत.)
२. घर घेतोय ती जागा महापालिकेच्या हद्दीत आहे की नाही.
३. पाणी, गॅस आणी वीज पुरवठा यांची सोय.
४. येण्या जाण्याची सोय (पब्लिक ट्रान्स्पोर्ट)
५. सोसायटी मेंटेनन्स, लिफ्ट वीज बॅकअप
६. बांधकामासाठी वापरलेल्या वस्तुंची गुणवत्ता
७. सरकारचे त्या जागेच्या आसपासचे प्लॅन्स (रस्ते किंवा काही ईतर बांधकाम , कचरा डेपो)
८. शाळा,पोलिस स्टेशन्, रेलवे स्टेशन,बस स्टँड, बाजारहाट व ईतर महत्वाची कार्यालये यांचे अंतर
९. घराची दिशा, व्हेंटीलेशन, सुर्यप्रकाश, मजला आणी बिल्डींगच्या आजुबाजुच्या इतर जागेचे भविष्यातले प्लॅन्स लक्षात घेणे महत्वाचे.
१०. घर भुकंपरोधक आहे की नाही.
११. सुरक्षितता आणी शांतता
१२. हो आणी सर्वात मह्त्वाची घराची किंमत (खिशाला परवडेल की नाही )
मला तरी एवढे मुद्दे महत्वाचे वाटतात, तुमची मते/अनुभव मांडा.
आपला,
मराठमोळा
प्रतिक्रिया
7 Jun 2010 - 3:44 pm | चिरोटा
मुद्दे बरोबर आहेत.पण (मोठा शहरांमध्ये)मनासारखे घर मिळत नाही असे म्हणतात्.काही मुद्द्यांकडे दुर्लक्ष करावे लागते.बिल्डरचा अनुभव आणि बांधकामाची गुणवत्ता हे मुद्दे मला जास्त महत्वाचे वाटतात.बाकी मुद्दे महत्वाचे आहेतच.
P = NP
7 Jun 2010 - 4:50 pm | प्रकाश घाटपांडे
या पुर्वी दिलेली घरघर ही पहा
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
8 Jun 2010 - 5:20 am | शुचि
आसपासची वस्ती पहा बुवा. मला तर तोच मुद्दा फार फार महत्त्वाचा वाटतो. मुलं ज्या मुलांमधे, लोकांमधे वाढणार ते लोक सुसंस्कारी, सुसंस्कृत पाहीजेत.
मुंबईला आम्च्या कॉलनीच्या अक्षरक्षः २ पावलं जवळ "छक्क्यांनी" वस्ती केलीये आणि कोणी उठवू नये म्हणून तिथे देऊळ बांधलय. पण आता कोणी काही करू शकत नाही.
लिफ्ट बिफ्ट ठीक आहे. लोकं महत्त्वाची. त्यांनी जपलेली मूल्य महत्त्वाची. चांगल्या वस्तीतली जागा घ्या.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
8 Jun 2010 - 9:21 am | टारझन
माझ्या मते घर हे "चांगलंच" घ्यावं ... वारंवार थोडी घेतो आपण ? ;)
- घुशी (कुजवी)
8 Jun 2010 - 9:26 am | टारझन
घुशि शी काहीसा सहमत. चांगलं घर कसं असावं हे एक्सप्लेन न केल्यामुळे अर्धा पत्ता कट केला आहे. मराठमोळा जी , जिथे घर घेताय तिथे छाण छाण पोरी आहेत का बघुन घ्या आधी .. एखादी दुर्बिण वगैरे असली तर क्या केहने ... कारण एफ्सी,एम्जी रोडांवर दिसणार्या पोरी कशा क्षणिक दिसतात , पण आपल्या कॉलनीतल्या पोरी म्हणजे .. हॅहॅहॅ ..
- (नेत्रसुखी) टार्या भयंकर यमनवाले
ह्या आमच्या कॉलनीतल्या पोरी .. ह्यांच्यावर आमचा भारी जीव :)