कोकणात भटकताना मनोहर मनसंतोष गडाच्या पायथ्याच्या शिवापूर गावी पोचले. जातच राह्यले. अश्याच एका शिवापूर भेटीत डागदराकडून घराकडे परत जाणारे हे आजोबा आजी भेटले.
आजोबांना आधार देत देत हळूहळू घरापर्यंत नेणार्या आजी, हात पाय सुजलेले आजोबा... घर बहुतेक गडकरवाडीच्या डोंगरात म्हणजे थोडा चढ मग वहाळ ओलांडायचा आणि मग एक छोटा पण खडा चढ संपवायचा की आलंच घर...
सगळं कसं एकमेकांच्या साथीनं.. किती काय काय दिवस पाह्यले असणार त्यांनी. कित्ती वर्षं कुणास ठाऊक. आत्ताचेही दिवस कष्टाचे असतीलच की पण तरी डोक्यात जास्वंद का होईना माळण्याइतक्या आजी उत्साही होत्याच.
ते दूर जाईपर्यंत, डोळ्यात आलेल्या पाण्यामुळे मला दिसेनासे होईपर्यंत मी त्यांच्याकडेच बघत राह्यले. हे असंच कायम रहावं अशी इच्छा करत आणि तोच आशिर्वाद त्यांच्याकडे मागत....
- नी
----------------------
मिपावर फोटो चढवणे हे थोडं कटकटीचं असल्याने आधी इतरत्र टाकलेलं हे फोटो फिचर इथे टाकायला कंटाळा केला होता.
प्रतिक्रिया
8 Jun 2010 - 8:49 am | नीधप
काहीतरी गंडलं फोटो टाकताना... अब क्या?
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
8 Jun 2010 - 8:53 am | भाग्यश्री
फ्लिकरवर आहेत ना? मग तिथे फोटोच्या वर ऑल साईझेस असा टॅब असेल. तिथे क्लिक करून मिडीयम्/लार्ज साईझ सिलेक्ट करून खालचा कोड कॉपी कर.
8 Jun 2010 - 9:00 am | नीधप
जमलं... धन्स भाग्यश्री!
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
8 Jun 2010 - 9:16 am | रामदास
एक वेगळासा विषय.
एक छोटी कविता या छायाचित्रणासाठी.
हातात असू दे थरथरणारा हात
ओठात असू दे तेच पुराणे गीत.
मी मिटले डोळे तू हळूच दे ना हाक
ही सांज कलंडे रात्रीच्या अंधारात,
एक हलका झोका मला पुरेसा.....
8 Jun 2010 - 9:19 am | नीधप
उफ्फ... क्या बात है!!
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
8 Jun 2010 - 10:28 pm | संदीप चित्रे
माझ्या मनातलीच दाद
फोटो आणि कविता सुरेखच.
बाप्पांनी चढवलेला साज ऐकायचाय अजून
8 Jun 2010 - 9:35 am | विनायक पाचलग
त्या वृद्ध जोडप्याला..
असा क्षण फोटोत पकडणार्याला...
आणि कवितेला ,कविता करणार्याना..
सलाम
विनायक पाचलग
वाँट टु टॉक
8 Jun 2010 - 9:52 am | श्रावण मोडक
ही सांज कलंडे रात्रीच्या अंधारात
क्या बात है!
8 Jun 2010 - 9:53 am | प्रकाश घाटपांडे
अगदी समयोचित कविता!
विचार करत होतो काय असेल अंतर्मनात दोघांच्याही.कुणीतरी एक आधी जाणार. आपल्या पश्चात सहचारी ला आधार कुणाचा?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
8 Jun 2010 - 10:09 am | प्रमोद देव
http://www.divshare.com/download/11635970-586
:)
8 Jun 2010 - 10:17 am | प्रकाश घाटपांडे
मूळ लेख सुंदर
त्यावर रामदासांची कविता सुंदर
बाप्पांनी त्यावर साज पण अगदी पाउणतासात चढवला तो ही सुंदर
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
8 Jun 2010 - 3:13 pm | बिपिन कार्यकर्ते
खूप हळ्वं केलंत साहेब मनाला, कविता खूपच सुंदर. सध्या कृष्णाबाई सुर्व्यांचं 'मास्तरांची सावली' वाचतो आहे. त्यात बाईंनी नारायण सुर्व्यांच्या मृत्यूबद्दल केलेलं मागणं असंच मनात कालवाकालव करून गेलं.
नी, या फोटोजवर मागेच प्रतिकिया दिली होती. परत एकदा आवडले.
बिपिन कार्यकर्ते
8 Jun 2010 - 9:22 pm | चतुरंग
(रामदासांचापंखा)चतुरंग
8 Jun 2010 - 10:23 pm | प्राजु
मस्तच!!
नीरजा... हे फोटोरूपी काव्यही मस्तच गं!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
8 Jun 2010 - 9:31 am | टारझन
टची फोटूस ....
संतमहात्मे म्हणुनंच गेलेत ... "म्हातारपण देगा देवा ............" (ही आपल्या लाडक्या देव काकांवर वैयक्तिक टिपण्णी नाही , कलोअ)
-(म्हतारपणाची कुतुहलतेनं वाट पाहाणारा) बुढ्ढा ट
8 Jun 2010 - 9:45 am | शिल्पा ब
सध्या आनं दि आनं दगडे जिकडे तिकडे चोहीकडे अस्ल्यामुळे म्हतार्पनाची वाट बघुशि वाटत नाही...
(अगदी तरुण) काहीपण
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
8 Jun 2010 - 9:58 am | सहज
म्हातारपणावरुन आठवले. न रहावून एक दुवा.
8 Jun 2010 - 10:03 am | शिल्पा ब
खूप छान माहिती मिळाली पपा डॉक यांच्याबद्दल...धन्यवाद सहजराव.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
8 Jun 2010 - 10:05 am | मदनबाण
फोटो द्वारे केलेले अनुभव कथन आवडले... :)
मदनबाण.....
"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget
8 Jun 2010 - 10:16 am | मस्त कलंदर
मस्त फोटोज... आधी पाहिले होते.. तुझ्या ब्लॉगावर की माबो वर ते नाही आठवत..
रामदास काकांच्या कवितेला _/\_
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
8 Jun 2010 - 10:22 am | आनंदयात्री
सुरेख !!
8 Jun 2010 - 10:35 am | मनिष
ब्राउनिंगच्या ओळी आठवल्या...
रामदास यांची कविताही खासच!
8 Jun 2010 - 10:39 am | शिल्पा ब
Grow old with me, the best is yet to be
वाह!! यापुढे बोलायलाच नको... जन्म जन्मान्चे नाते...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
8 Jun 2010 - 10:43 am | नीधप
लिओनार्दो कोहेन कुणी ऐकतं का?
त्याचं Dance me to the end of love! ऐकलंय?
मला नेहमी तेच आठवतं या फोटोंबरोबर...
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/
8 Jun 2010 - 10:48 am | वेताळ
आम्हाला तर बालकवीच आठवतात.
वेताळ
8 Jun 2010 - 3:06 pm | संजा
वा ! क्या बात है
फोटो बघुन मला 'Anthony Gonsalvis' ची प्रकर्षाने आठवण येतेय.
त्याच 'My name is anthony' कोणी ऐकलय का ?
संजा
8 Jun 2010 - 3:23 pm | पुष्करिणी
अतिशय बोलके आणि तितकेच हळवे करणारे फोटो आणि प्रतिसादातील कविताही..
मेरे हाथ में तेरा हाथ हो
सारी जन्नते मेरे साथ हो...
पुष्करिणी
8 Jun 2010 - 6:11 pm | शुचि
आजीबाईंनी रुप्यायवढं कुंकू लावलय. मस्त फूल खोवलय आणि मंद गुलाबी नऊवारी पतळ नेसल्यात. परत त्याच मदत करतायत आजोबांना, आधार देतायत.
आजोबा नशीबवान आहेत. छान वाटलं बघून. दोघांना भरपूर चांगलं, मंगलमय आयुक्ष लाभो.
नी छान प्रसंग टिपलायत तुम्ही.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
8 Jun 2010 - 9:21 pm | चतुरंग
बरोबरची टिप्पणीही आवडली.
चतुरंग
8 Jun 2010 - 11:47 pm | विनायक प्रभू
सहमत
8 Jun 2010 - 10:08 pm | भाग्यश्री कुलकर्णी
आयुष्याची आता,झाली उजवण
येतो तो तो क्षण अमृताचा.
ही बोरकरांची कवीता आठवली फोटो बघताना.
8 Jun 2010 - 10:21 pm | पिवळा डांबिस
बराय बुवा लोकांना कविता वगैरे सुचतात!! (आणि त्यांना चाली वगैरे पण लावून मिळतात!!!)
आम्हालाही फोटो आवडले.....
म्हणून हौसेनं काकूलाही दाखवले.....
तर खालील प्रतिक्रिया,
"म्हणून सांगत असते तुझे उद्योग जरा जपून करत जा म्हणून!!! उद्या तूही असाच मोडून बसलास तर मलासुद्धा तुला असंच डॉक्टरकडे घेऊन जावं लागणारै!!!"
~X(
मज फूल ही रुतावे.....
:''(
8 Jun 2010 - 10:45 pm | चतुरंग
काय पण वळिखलंय काकूंनी पिडांना? ;)
काकूंना आमचा नमस्कार सांगा हो! :)
चतुरंग
8 Jun 2010 - 10:58 pm | श्रावण मोडक
काकूंना दंडवत. :)
पिडांकाकांची बायकोच असा विचार करू शकते आणि काकांना टोला मारू शकते.
8 Jun 2010 - 11:11 pm | मस्त कलंदर
काकू अगदी हुश्शार हो!!!
त्यांच्यासमोर काकांचा डांबिसपणा पांढराफटक पडत असेल नाही?
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
8 Jun 2010 - 11:41 pm | चतुरंग
पांढरा डांबिस! ;)
चतुरंग
9 Jun 2010 - 8:08 am | नीधप
बिच्चारी...
ती इथे मिपावर नाही म्हणून तिच्या नावावर सिडॉ काहीही खपवतात...
;)
- नी
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/