मुखवटे आणि चेहरे

नितिन थत्ते's picture
नितिन थत्ते in काथ्याकूट
6 Jun 2010 - 10:01 pm
गाभा: 

संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरू याला लवकरात लवकर फाशी द्यावे अशी वारंवार मागणी करणार्‍या आणि त्या निमित्ताने सरकारवर तोंडसूख घेणार्‍या कट्टर देशभक्त भाजपने, "अफजल गुरूला फाशी देऊ नये" असे प्रतिपादन राज्यसभेत करणार्‍या आणि इंदिरा गांधींच्या मारेकर्‍यांची तसेच जेसिका लालचा खुनी काँग्रेसी मनु शर्मा तसेच हर्षद मेहता आदि इतर अनेक गुन्हेगारांची वकिली करणार्‍या राम जेठमलानी यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. :O X( >:)

राम जेठमलानी यांनी २००४ मध्ये पंतप्रधान वाजपेयी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. अलिकडेच त्यांनी पुनः भाजप मध्ये प्रवेश करण्याची आणि राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती . त्यांना लगेचच राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली.

Politics makes strange bedfellows हे सत्य पुन्हा दिसून आले.

प्रतिक्रिया

टारझन's picture

6 Jun 2010 - 10:09 pm | टारझन

आजंच "राजनिती" हा अप्रतिम सिणेमा पाहुन आलो ... मस्त वास्वतदर्शी पिक्चर आहे ... आणि हे राजकारण म्हणजे वास्तवदर्शी सिनेमाच आहे , नाही का ? :)

नेमकी टिपण्णी केलीये नितिन सर !! :)

छोटा डॉन's picture

8 Jun 2010 - 2:06 pm | छोटा डॉन

>>आजंच "राजनिती" हा अप्रतिम सिणेमा पाहुन आलो ... मस्त वास्वतदर्शी पिक्चर आहे
ऑ ?
काय सांगता ?
बाकी असो. ;)

बाकी थत्तेसाहेबांना नक्की राग कशाचा आला ?
जेठमलानींना उमेदवारी मिळाल्याचा की ती 'भाजपा'ने देऊ केल्याचा ?
बाय द वे, गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचे पुत्र 'महेश जेठमलानी' ही भाजपकडुन लढल्याचे आठवले.

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

आनंदयात्री's picture

6 Jun 2010 - 10:10 pm | आनंदयात्री

खरे आहे. घटना मोठी दु:खद आहे.
त्या कुत्र्या अफजल गुरुला लवकरात लवकर टांगला पाहिजे !!

टारझन's picture

6 Jun 2010 - 10:23 pm | टारझन

जो शब्द बोल्ड मधे लिहायला हवा , तो पांढर्‍या शाईत लिहीला गेलाय, वाईट वाटले .

- फुस्करिणी

श्रावण मोडक's picture

6 Jun 2010 - 10:51 pm | श्रावण मोडक

छ्या नितिनराव. तुम्ही "Politics makes strange bedfellows हे सत्य पुन्हा दिसून आले" इतकं अंडरस्टेटमेंट का केलंत?
माझा एक प्रश्न आहे - स्ट्रेंज असूनही बेडफेलोज होत असल्यानं हे स्काऊंड्रल्स असतात की स्काऊंड्रल्स असल्यानं स्ट्रेंज-बेडफेलोज होतात?

इंटरनेटस्नेही's picture

7 Jun 2010 - 1:37 am | इंटरनेटस्नेही

ह्म्म्म्म वाचतोय...
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

प्रियाली's picture

7 Jun 2010 - 3:16 am | प्रियाली

८६ वर्षांच्या वृद्धाला राज्यसभेची उमेदवारी स्वीकारण्या इतपत एनर्जी ;) कुठून मिळते?

धमाल मुलगा's picture

7 Jun 2010 - 3:13 pm | धमाल मुलगा

एटले हायकल्लास! :)

आपल्या प्रश्नाच्या अधिक माहितीकरिता भेटा अथवा लिहा: 'नाद' तिवारी :D
ह्यांचा सर्वसमावेशक असा प्रगाढ अभ्यास आहे...प्रॅक्टिकली! पुस्तकी नव्हेच.

विकास's picture

7 Jun 2010 - 10:31 pm | विकास

कदाचीत झंडू च्यवनप्राश घेत असतील ते! :)

बाकी आपल्याकडील एकंदरीत सर्व पक्षिय राजकारण्यांकडून नक्की तेव्हढे (एनर्जिटीकली मधे मधे करत स्वतःचे घोडे पुढे दामटवणे) शिकण्यासारखे आहे....

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

टारझन's picture

7 Jun 2010 - 10:42 pm | टारझन

तो आप रिव्हायटल लेना कब शुरु कर रहे है ?

- झाडपाल

विनायक पाचलग's picture

8 Jun 2010 - 9:33 am | विनायक पाचलग

कोल्हापुरात सारे पाटील म्हणुन आमदार आहेत वय वर्षे ९० फक्त........

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

शुचि's picture

7 Jun 2010 - 6:16 am | शुचि

>>अनेक गुन्हेगारांची वकिली करणार्‍या >>
शरद सारडा ची वकीली राम जेठमलानी नीच केली होती ना?
वकीली करण्याबद्दल काही नाही. गुन्हेगारांनाही वकील हा लगतोच. पण सातत्याने फक्त गुन्हेगारांचा कैवार का? नाम मे राम बगल मे छुरी असं म्हणायला वाव आहे.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

विजुभाऊ's picture

7 Jun 2010 - 4:27 pm | विजुभाऊ

हे जेठमलानी एकेकाळी भाजपचे उपाध्यक्ष होते.
साधनशुचितेच्या गप्पा मारणारे भाजपावादी अशा वेळेस सोयीस्करपणे मूक होतात हे वेळोवेळी दिसून आलेले आहे.
संघ म्हणजे भाजप नव्हे पण हे ठाऊक आहे. पण संघपरीवारातील भाजप चे दुटप्पी धोरण त्याच्या जन्मापासून चालत आलेले आहे. असो.
मुंह मे राम बगल मे **** ...जय भाजप्पा

अवलिया's picture

7 Jun 2010 - 5:46 pm | अवलिया

>>>>मुंह मे राम बगल मे ****

**** म्हणजे "विजुभाउ" का ?

--अवलिया

नितिन थत्ते's picture

7 Jun 2010 - 9:22 pm | नितिन थत्ते

मुंह मे राम बगल में अफजल.

नितिन थत्ते

अवलिया's picture

8 Jun 2010 - 11:15 am | अवलिया

चला या निमित्ताने तुम्ही "छुरी" आणि "अफजल" हे समानार्थी आहेत हे मान्य केलेच तर.. ;)

--अवलिया

समंजस's picture

7 Jun 2010 - 10:36 am | समंजस

जेठमलानींचा निषेध...
त्यांना राज्यसभेत आणणार्‍या भाजपाचा सुद्धा निषेध.....

[भाजपाचा निषेध करण्यापलीकडे आणखी काही करणे शक्य नाही :( कारण आम्ही सुजाण/सज्ञान मतदारांनी त्यांना सत्तेबाहेर ठेवलेले आहेच.
हाँ, दिल्ली सरकारला अफजलगुरूच्या फायली वर ४ वर्ष बसायला सांगितलेल्या त्या शिवराज पाटिल यांना आणि त्यांच्या पक्षाला सत्तेत बसायला देउन मात्र आम्ही सुजाण/सज्ञान मतदारांनी महान कार्य केलं आहे त्याबद्दल आमचे अभिनंदन :) ]

धमाल मुलगा's picture

7 Jun 2010 - 3:09 pm | धमाल मुलगा

अत्यंत समंजस प्रतिसाद आणि म्हणुनच प्रचंड सहमत.

बाकी, एक पक्ष-मुखवटा आणि एक उमेदवार-चेहरा असं गणित सापडलं लेखात त्यामुळे मुखवटे आणि चेहरे ह्या शिर्षकामुळं अंमळ गोंधळलोय.
मला वाटलं होतं आधी भा.ज.पा.ने सुरुवात करुन इतर मुखवटे आणि त्यांचे केवळ गुन्हेगारांची वकिलपत्रंच नव्हे, तर अट्टल गुन्हेगार हेच चेहरे असलेल्या आणि देश विकायला काढलेल्या परमपवित्र पक्षांबद्दलही लिहिलं असेल..
छे:! नाहीच सापडलं काही. अगदीच भा.ज.पा.सारखा ( ;) ) पक्षपातीपणा झाला बुवा हा. :P

अवलिया's picture

7 Jun 2010 - 3:21 pm | अवलिया

चालायचच....

बाकी ख-या जगात राजकारणी आणि आंतरजालावर विचारवंत नसतील तर सुनं सुनं वाटतं ब्वा..

--अवलिया

ऋषिकेश's picture

7 Jun 2010 - 3:49 pm | ऋषिकेश

राजनिती(न)!
निषेधा व्यतिरिक्त काय करणार!
टारझनच्या प्रतिक्रीयेशी सहमत
हे तो राजकारण!!

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

नितिन थत्ते's picture

7 Jun 2010 - 9:18 pm | नितिन थत्ते

भाजपऐवजी दुसर्‍या कुठल्या पक्षाचे नाव या बातमीत असते तर १०० च्या वर ठराविक छापाचे प्रतिसाद आले असते असा अंदाज आहे. ;)

नितिन थत्ते

इनोबा म्हणे's picture

7 Jun 2010 - 11:23 pm | इनोबा म्हणे

भाजपऐवजी दुसर्‍या कुठल्या पक्षाचे नाव या बातमीत असते तर... तुम्ही ही बातमी इथे दिली नसती असा अंदाज आहे. ;)
बाकी चालू दे!

नितिन थत्ते's picture

8 Jun 2010 - 7:40 am | नितिन थत्ते

बरोबर. मला धागा काढावाच लागला नसता. नेहमीच्या यशस्वी धागेकर्त्यांनी चार - पाच धागे काढले असते.

आणि त्यात सगळेच चोर/भ्रष्ट आहेत अशा अर्थाची वाक्ये अभावाने दिसली असती.

:)

नितिन थत्ते

टारझन's picture

8 Jun 2010 - 9:11 am | टारझन

च्यायला .. काल इण्याने थत्त्यांना मस्त कात्रीत घेतला आहे असं वाटलं होतं .. पण थत्त्यांनी काय भारी टोलावलाय ...
इण्या आणि थत्ते दोघांनाही परणाम :) ___/\___

- निस्ता ट

अवलिया's picture

8 Jun 2010 - 11:17 am | अवलिया

आत्ता थत्त्यांचं खरं दु:ख समजलं, मी भलतंच समजत होतो. ;)

असो.

--अवलिया

धमाल मुलगा's picture

8 Jun 2010 - 4:25 pm | धमाल मुलगा

शम्मत रे नानुस!
आत्ता कळलं ;)
म्हणजे १०० नाही निदान ५० तरी असं गणित होतं काय? ;)
प्रतिसाद न मिळाल्याचं इतकं वाईट नाही बॉ वाटुन घ्यायचं.
हे म्हणजे कसं झालं, निवडणुकीला उभं रहाणार्‍यानं निकालानंतर जाहीर सभेत मतदारांना शिव्या घातल्यासारखं.

अहो सोप्पं गणित आहे, असं वाटतं ना आपल्याला, की अमुक ठिकाणी अमुक इतके प्रतिसाद अमुक विषयाला येणार नाहीत, तर मग ते जिथे मिळतील तिथे ते टाकायचं...शिंपल.

इनोबा म्हणे's picture

8 Jun 2010 - 1:01 pm | इनोबा म्हणे

मला धागा काढावाच लागला नसता. नेहमीच्या यशस्वी धागेकर्त्यांनी चार - पाच धागे काढले असते.

आणि तुम्हीही नेहमीप्रमाणे आपली गांधीटोपी सावरत संघाच्या चड्डीत हात घातलाच असता.

नितिन थत्ते's picture

8 Jun 2010 - 1:22 pm | नितिन थत्ते

तो तर मी आत्तापण घातलाच.
फक्त एरवी सगळ्यांना जसा कंठ फुटतो तसा यावेळी फुटला नाही कारण आता आपल्या आवडत्या पक्षावर कसे तोंडसुख घेणार?

(आपली सर्वांची तथाकथित जाज्ज्वल्य देशभक्तीपर बरळ पक्षनिरपेक्ष नसते हेच मला दाखवायचे आहे)

नितिन थत्ते

इनोबा म्हणे's picture

8 Jun 2010 - 1:30 pm | इनोबा म्हणे

फक्त एरवी सगळ्यांना जसा कंठ फुटतो तसा यावेळी फुटला नाही
खरं आहे. कुणाला विरोध करण्यासाठी कंठ फुटतो तर कुणाला विरोध थोपवण्यासाठी.

धमाल मुलगा's picture

8 Jun 2010 - 4:39 pm | धमाल मुलगा

>>फक्त एरवी सगळ्यांना जसा कंठ फुटतो तसा यावेळी फुटला नाही कारण आता आपल्या आवडत्या पक्षावर कसे तोंडसुख घेणार?
सोप्पंय! आधीच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे 'मुखवटे आणि चेहरे' न दिसता केवळ 'मुखवटा आणि चेहरा'च दिसतोय लेखात..
मुळातच लेख जर पुर्वग्रहदुषित मतामधुन आला आहे, तर त्यावर कशा प्रतिसादांची अपेक्षा असणार? :)

>>(आपली सर्वांची तथाकथित जाज्ज्वल्य देशभक्तीपर बरळ पक्षनिरपेक्ष नसते हेच मला दाखवायचे आहे)
खरंय!
"सर्वांची" हा शब्द फार्रर्रच महत्वाचा..नाही का? ;)
बाकी, भाजपाची बदलती निती पाहुन त्या पक्षाच्या पाठीराख्यांनी स्वतःच भाजपाला सत्तेपासुन दूर ठेवलं ह्यालाच देशभक्ती म्हणत असावेत असा माझा अंदाज आहे.
(जाज्वल्य वगैरे शब्द ज्यांच्या उरात आग आहे त्यांच्यासाठी! साठ वर्षांहुनही अधिक काळ फेकलेल्या तुकड्यांशी मिंधेगिरी असणार्‍यांची कसली आलीये 'जाज्वल्य' देशभक्ती? जाज्वल्य शब्दाचा अर्थ बाईला पुढे करुन चुलीतल्या अर्धविझल्या निखार्‍यांवर स्वतःच्या पोळ्या भाजणार्‍यांना काय कळावा?)

आणि, अट्टल खुनी, दरोडेखोर, चोर, बलात्कारी, सुपारी घेणारे माफिया, भूखंड गिळणारे, 'सहकार' ह्या चळवळीवर पाशवी बलात्कार करणारे ह्यांना मात्र 'जागरुक देशभक्त' निवडुन आणतात ही खरी पक्षनिरपेक्ष जाज्वल्य(?!) देशभक्तीपर कृती वाटते.

बाकी, बरळ वगैरे शब्द पाहुन आपला विवादामधला तोल पुन्हा एकदा ढळला आहे हे स्पष्ट झाले, म्हणुनच माझा हा प्रतिसाद अशा भाषेत आला.

II विकास II's picture

8 Jun 2010 - 4:51 pm | II विकास II

आणि, अट्टल खुनी, दरोडेखोर, चोर, बलात्कारी, सुपारी घेणारे माफिया, भूखंड गिळणारे, 'सहकार' ह्या चळवळीवर पाशवी बलात्कार करणारे ह्यांना मात्र 'जागरुक देशभक्त' निवडुन आणतात ही खरी पक्षनिरपेक्ष जाज्वल्य(?!) देशभक्तीपर कृती वाटते.
== भाजप, शिवसेना, मनसे तत्सम पक्षांनी सहकार चळवळीत काय योगदान दिले आहे कळु शकेल का? जेव्हा हवे तेव्हा तयार नेते मात्र आयत केले आहेत?

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

धमाल मुलगा's picture

8 Jun 2010 - 5:34 pm | धमाल मुलगा

=)) =)) =))

_/\_ अगाध आहात!

मेघवेडा's picture

8 Jun 2010 - 5:39 pm | मेघवेडा

तुमचे प्रतिसाद फारच मनोरंजक असतात असं माझं निरीक्षण आहे! अजून येऊ द्या!! :)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

अवलिया's picture

8 Jun 2010 - 7:06 pm | अवलिया

संपादित - पुन्हा पुन्हा प्रतिसाद लिहुन संपादकांना त्रास देवु नये.

--अवलिया

विकास's picture

7 Jun 2010 - 10:29 pm | विकास

राम जेठमलानींना सगळ्यात पहील्यांदा जनतेने गुन्हेगार ठरवले ते मंजुश्री सारडा खून खटल्यात जेंव्हा त्यांनी शरद सारडांचे वकीलपत्र घेऊन सोडवले तेंव्हा. त्या नंतरच्या निवडणूकीत भाजपाने मुंबईत (मुंबईपुण्यापुरतेच) जो सपाटून मार खाल्ला त्यात इंदिरा हत्या लाटेप्रमाणेच जेठमलानींना उमेदवारी दिली हे देखील कारण होते.

त्यानंतर जेठमलानींचे ब्रिटीश गुरूद्वारात जाऊन खलीस्तानवाद्यांसमोर केलेले भाषण हा माझ्या लेखी अजूनही गंभीर मुद्दा होता. कारण त्यात त्यांनी गुन्हेगाराला पण घटनेने हक्क दिला आहे म्हणून वकीली करत कायद्याचे पालन केले नव्हते, तर स्वेच्छेन तो निर्णय घेतला होता असे म्हणावे लागेल.

त्यानंतर (किंवा आधी माहीत नाही) त्यांनी इंदिरा हत्याप्रकरणात गुन्हेगारांची वकीलपत्रे घेतली.

अफझलगुरूच्या संदर्भात ते बोलले तेंव्हा ते कुठल्या पक्षाकडून निवडून आले होते अथवा भाजपातून बाहेर पडले असले भाजपकडून निवडून गेलेले होते, ते माहीत नाही. माहीत असल्यास अवश्य सांगावे.

भाजपऐवजी दुसर्‍या कुठल्या पक्षाचे नाव या बातमीत असते तर १०० च्या वर ठराविक छापाचे प्रतिसाद आले असते असा अंदाज आहे.

दुर्दैवाने यात नवीन काहीच घडलेले नाही. या संदर्भात कोणी भाजपाचे बरोबर आहे असे म्हणणार देखील नाही. समंजसच्या वरील उत्तराशी सहमतच. अर्थात यात काही रिलेटीव्ह रँकींग नाही की एक गाढव आहे म्हणले, म्हणजे दुसरा ऑटोमॅटीक घोडा होतो असे नाही...

देश आपत्कालीन स्थितीतून जात असताना तीन तीन वेळेस पोषाख बदलणारेगृहमंत्री काय आणि ताज मधे चित्रपट निर्मात्याला विध्वंस दाखवायला जाणारे (पण पोलीसांचे प्रश्न न सोडवणारे) तत्कालीन मुख्यमंत्री काय यांचे बस्तान बसवले म्हणून कोणी काँग्रेसला अथवा मा. सोनीयाजींना काही बोलते आहे का? अर्थात या बाबतीत, मुंह मे राम म्हणायच्या ऐवजी, "डोक्यावर गांधीटोपी आणि डोक्यात केवळ जनतेची फसवणूक", असे म्हणता येईल :)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

इनोबा म्हणे's picture

7 Jun 2010 - 11:28 pm | इनोबा म्हणे

त्यानंतर जेठमलानींचे ब्रिटीश गुरूद्वारात जाऊन खलीस्तानवाद्यांसमोर केलेले भाषण हा माझ्या लेखी अजूनही गंभीर मुद्दा होता. कारण त्यात त्यांनी गुन्हेगाराला पण घटनेने हक्क दिला आहे म्हणून वकीली करत कायद्याचे पालन केले नव्हते, तर स्वेच्छेन तो निर्णय घेतला होता असे म्हणावे लागेल.

देश आपत्कालीन स्थितीतून जात असताना तीन तीन वेळेस पोषाख बदलणारेगृहमंत्री काय आणि ताज मधे चित्रपट निर्मात्याला विध्वंस दाखवायला जाणारे (पण पोलीसांचे प्रश्न न सोडवणारे) तत्कालीन मुख्यमंत्री काय यांचे बस्तान बसवले म्हणून कोणी काँग्रेसला अथवा मा. सोनीयाजींना काही बोलते आहे का? अर्थात या बाबतीत, मुंह मे राम म्हणायच्या ऐवजी, "डोक्यावर गांधीटोपी आणि डोक्यात केवळ जनतेची फसवणूक", असे म्हणता येईल

वरील मुद्द्यांशी सहमत आहे.

अवलिया's picture

8 Jun 2010 - 11:18 am | अवलिया

+२

--अवलिया

शिल्पा ब's picture

7 Jun 2010 - 11:29 pm | शिल्पा ब

+१
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

Pain's picture

7 Jun 2010 - 10:55 pm | Pain

सर्व पक्ष आणि त्यांचे सर्व लोक (कार्यकर्ते वगैरे) भ्रष्ट आहेत.भारताशी त्यांना काहीही देणेघेणे नाही.
प्रत्येक घोटाळा, खून वगैरे गोष्टींबद्दल त्रागा आणि एकमेकांची उणीदुणी काढायला नकोत.

विकास's picture

7 Jun 2010 - 11:35 pm | विकास

सर्व पक्ष आणि त्यांचे सर्व लोक (कार्यकर्ते वगैरे) भ्रष्ट आहेत.भारताशी त्यांना काहीही देणेघेणे नाही.
प्रत्येक घोटाळा, खून वगैरे गोष्टींबद्दल त्रागा आणि एकमेकांची उणीदुणी काढायला नकोत.

पूर्ण सहमत! नाहीतर खूपवादावादी झाल्यावर what a pain! असे म्हणावे लागते. ;)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)