मिसळपाव आणि अमेरिकन कायदा ...

sagarparadkar's picture
sagarparadkar in काथ्याकूट
3 Jun 2010 - 6:26 pm
गाभा: 

मिसळपावला भेट देणार्या माननीय सभसदांना एक प्रश्नं आहे.

अमेरिकेतील कायदे-कानू मिसळ्पाव वरील साहित्याला लागू होतात का?

तसे असेल तर जगाच्या दुसर्या टोकाला राहणार्या एखाद्या सभासदाने काही आक्षेपार्ह लिहिल्यास त्यांस अमेरिकन कायद्याद्वारे अमेरिकेच्या खामगाव खुर्द च्या कोर्टात खेचता येते का? हे शक्य असेल तर त्याचाच दुसरा अर्थ असा काढता येइल कि अमेरिकेचा कायदा सर्व जगात लागू होतो. मग इतर देशांचे सार्वभौमत्व कसे काय अबाधित राहणार?

हे जर शक्य असेल तर आमच्या ठकाची वाडी, पोष्ट चोरे बुद्रुक, तालिका आटपाट, जिल्हा टिनपाट येथील 'प्रथम वर्ग न्यायालय' हे सुद्धा मिसळपाव वरील आक्षेपार्ह सभासदावर कारवाइ करू शकतील काय?

थोडा प्रकाश पडला तर बरं होईल ...

अवांतर - काही वर्षांपूर्वी "महाराष्ट्र सरकारच्या शब्दकोषांत वकील ह्या शब्दाला (व्यावसायिकाला नाही) असणारे समानार्थी शब्द म्हणून 'झगडपिल्लू' आणि '*डू' हे दाखविले होते आणि अनेक वकीलांनी ह्या दोन शब्दांना आक्षेप घेतल्यावर ते काढून टाकण्यात आले" अशा प्रकारची बातमी एका मराठी व्रुत्तपत्रांत वाचल्याचे आठवतंय. बातमीच्या सत्यतेबद्दल मी स्वतःच साशंक आहे.

ता.क. : ह्या अवांतर मधील टंकनाचा मिसळपाव वरील कोणाशीही काहीही संबंध नाही (या धाग्याचाही नाही), आहे असे वाटल्यांस तो निव्वळ योगायोग समजावा.

संपादकांना हे लेखन आक्षेपार्ह वाटल्यास, उडवून टाकावे ही नम्र विनंती.

प्रतिक्रिया

विकास's picture

3 Jun 2010 - 6:33 pm | विकास

तसे असेल तर जगाच्या दुसर्या टोकाला राहणार्या एखाद्या सभासदाने काही आक्षेपार्ह लिहिल्यास त्यांस अमेरिकन कायद्याद्वारे अमेरिकेच्या खामगाव खुर्द च्या कोर्टात खेचता येते का?

या बद्दल मला माहीती नाही. पण जर कोणी काही कशाबद्दलही आक्षेपार्ह लिहीले तर संपादक ते लेखन उडवून टाकू शकतात. :-)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

अवलिया's picture

3 Jun 2010 - 6:46 pm | अवलिया

पण जर कोणी काही कशाबद्दलही आक्षेपार्ह लिहीले तर संपादक ते लेखन उडवून टाकू शकतात.

आक्षेपार्ह हा शब्द आक्षेपार्ह आहे. योग्य वाक्य :

पण जर कोणी काही कशाबद्दलही लिहीले तर संपादक ते लेखन उडवून टाकू शकतात.

--अवलिया

पिवळा डांबिस's picture

3 Jun 2010 - 10:40 pm | पिवळा डांबिस

जगाच्या दुसर्या टोकाला राहणार्या एखाद्या सभासदाने काही आक्षेपार्ह लिहिल्यास त्यांस अमेरिकन कायद्याद्वारे अमेरिकेच्या खामगाव खुर्द च्या कोर्टात खेचता येते का?
काय कल्पना नाही बुवा!
बहुतेक संकेतस्थळांचे सर्व्हर पण अमेरिकेतच आहेत म्हणे! म्हणजे भारतातल्यासारखा कायद्यातला अमेरिकेचा "वहिवाटीचा हक्क" तरी चालू शकेल असं वाटतं!!
अधिक माहिती चौकशी करून सांगेन.
आपला नम्र,
पिवळा डांबिस
(खामगाव खुर्द)

स्वगतः काय मस्त आयडिया दिलीत राव!!! >:)

ऋषिकेश's picture

3 Jun 2010 - 11:45 pm | ऋषिकेश

माझ्यामते एखादे संस्थळ ज्या सर्वरवर रजिस्टर्ड आहे तो सर्वर ज्या देशात असेल त्या देशाचा नियम संस्थळास लागू होतो. (मिपावरील कायदेतज्ञ मंडळींनो, बरोबर बोलतोय का मी?)
मिसळपावचा सेवादाता अमेरिकन आहे का? असल्यास हो या संस्थळाला अमेरिकेचे नियम लागु होतात

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.