पुणेरी (सर)मिसळ...

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in काथ्याकूट
23 May 2010 - 2:33 pm
गाभा: 

हॉटेलमध्ये उपलब्ध असणारया शेव, चिवडा आदी खाद्यपदार्थाँची भेसळ म्हणजेच मिसळ. ही खातांना झणकेबाज 'शांपल' ची मागणी दणकेबाज खवय्यांकडून झाली की एक पाव दोन तुकडे झालेच म्हणून समजा! त्यातही मिसाळांची मिसळ पुढ्यात असेल तर विचारायलाच नको. वाढता वाढता कधी पोतंभर पाव अनेकांच्या उदरांत शिरून पावन होतात हे मिसाळांच्या पिसाळांनाही कळत नसायचे. पिसाळ महाशय मिसाळांचे सख्खे मेहुणे असले तरी दोघांची दुःखे वेगळीच असणार हे उघड आहे! कारण पिसाळ महोदय मिसाळांकडे वाढपी, आचारी, घरगडी अशा स्वरुपाचे हरकाम करणारे हरगडी होते. ते मेहुणे असले तरी पाहुणे म्हणून कधी जगलेच नाहीत.तशी संधी मिळालीच नाही किँवा दिली गेली नाही म्हणा हवं तर!
मिसाळांना आपल्या हॉटेलची खासियत असलेली 'पुणेरी मिसळ' अटकेपार फडकावयाची होती, म्हणूनच त्यांनी पिसाळांना लग्नानंतर सासरीच ठेऊन घेतले. खरेतर पिसाळांचा हात धरू शकणारा कुणीही मिसळकार पुण्यनगरीत आढळणार नाही हे मिसाळांना चांगलेच उमजले होते. आपल्या बहिणीचा हात त्यांच्या हाती देऊन मिसाळांनी फार मोठा मुत्सद्दीपणा दाखवला होता. पिसाळांचे नऊ दिवस संपले अन् मिसाळांचे सुरू झाले. अल्पावधितच पुणेरी मिसळ भलतीच लोकप्रिय झाली...
योग्य मिश्रणाची प्रमाणबद्ध सरमिसळ झाली की तिथे कुसळ कुणाला दिसणार? उसळीसाठी जिथे मुसळाचं काम नाही तसंच कुसळासाठी -म्हणजे अल्प वेतनासाठी- मिसळ का बनवायची, पळू पळू का वाढायची? असा प्रश्न अन् गंड पिसाळांना सतावू लागला. गंडाला कंड सुटला की बंड होणार हे ठरलेले. आपल्या जिवावर मिसाळ मिसळ विकतात, तेव्हा आपणच पुणेरी मिसळचा धंदा का सुरू करू नये असं पिसाळांना वाटू लागलं. मग त्यांनी जलद हालचाली करून आपला वेगळ्या चुलीचा निर्णय जाहीर केला...
एका ठिकाणी, एकाच मशागतीखाली वाढलेली वेल दुसरीकडे उपटून लावायची ठरविल्यास कशी येईल? तसेच झाले. आपले माहेर सोडून बाहेर पडायला सौ.पिसाळांनी नकार दिला! ते ऐकून पिसाळ कधी नव्हे इतके पिसाळले. परंतु तोंडात दोन मुठी शेवचिवडा घेण्यापलिकडे त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते.
नाही म्हटलं तरी सान्निध्यात येऊन सौ.ना पिसाळांचा गुण नाही पण वाण लाभला होताच. त्यादेखील योग्य प्रमाणात 'भेसळ' कशी करायची हे शिकल्या होत्या. त्यांना मिसाळांचे वैभव त्यागून जायचे नव्हतेच. सरतेशेवटी नाइलाजास्तव पिसाळ मजकूर आपला बाडबिस्तारा गुंडाळून चालते झाले...
अशा प्रकारे पुणेरी मिसळ मनाने कोसळलेल्या पिसाळांसोबत हद्दपार झाली असून सध्या आपण जी मोठ्या चवीने खातो ती आहे फक्त भेसळ.. फक्त भेसळ!
'ओरिजनल' मिसळ कुठे मिळेल का?

प्रतिक्रिया

शुचि's picture

24 May 2010 - 12:29 am | शुचि

लेखन ढिसाळ नसून रसाळ झाले आहे.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मी-सौरभ's picture

24 May 2010 - 12:43 am | मी-सौरभ

रटाळ :(

-----
सौरभ

अन्या दातार's picture

25 May 2010 - 1:19 am | अन्या दातार

पुण्यात कधी ओरिजिनल मिसळ मिळते यावर निदान माझा तरी विश्वास नाही बसत.
यकदम वर्जिनल मिसळ चापायची असेल तर ५ नद्यांच्या गावाला पर्याय नाही!
नाद्या बाद मिसळीचे एकमेव ठिकाण--> कोल्हापुर!!!!

टारझन's picture

25 May 2010 - 1:27 am | टारझन

पुण्यात कधी ओरिजिनल मिसळ मिळते यावर निदान माझा तरी विश्वास नाही बसत.

=)) =)) =)) =)) अरे वा ? =)) मिसळीही ड्युप्लिकेट बनायला लागल्यात की =)) =))

अन्या दातार's picture

25 May 2010 - 8:52 pm | अन्या दातार

पुण्यात मिसळ म्हणजे पोहे, शेव आणि त्यावर थोडी तवंग असलेली आमटी

छ्या! ही काय मिसळ झाली? तर्री नाही, बटाट्याची भाजी नाही, मटकीची उसळ नाही.
म्हणजे मिसळीच्या नावावर गळ्यात मारलेले पोह्याला मि डुप्लिकेट मिसळ म्हणतो!

टारझन's picture

25 May 2010 - 8:55 pm | टारझन

म्हणजे मिसळीच्या नावावर गळ्यात मारलेले पोह्याला मि डुप्लिकेट मिसळ म्हणतो!

अच्छा म्हणजे ही दातार सर्टिफाईड ड्युप्लिकेट मिसळ आहे तर .. मग असु द्या :)

- वाण्या उधार

llपुण्याचे पेशवेll's picture

26 May 2010 - 11:55 am | llपुण्याचे पेशवेll

अरे टारू,
कोल्ह्याला द्राक्षे आंबट रे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

मदनबाण's picture

25 May 2010 - 9:29 pm | मदनबाण


कुरुंदवाडला एकाटेंची मिसळ लयं भारी असते...
गायक अजित कडकडे कधी नरसोबावाडीला आले आणि त्यांना जर वेळ मिळाला तर ते इथे अवश्य भेट देतात असे मला वाडीकर मंडळींकडुन कळाले,तेव्हा मी सुद्धा या ठिकाणी मिसळ चापुन आलो. :)

कोल्हापूरच्या मिसळीला तोड नाही !!!
चोरगे,फडतरे,मोहन यांच्या इथे मिसळ चापणार्‍यालाच खर्‍या मिसळीची चव कळते... ;)

जाता जाता :--- ही खातांना झणकेबाज 'शांपल' ची मागणी दणकेबाज खवय्यांकडून झाली
खी खी खी... ख्या ख्या ख्या...झणझणीत तर्रीला असलं पांचट नाव दिल जात यातच सर्व आलं... ;)

मदनबाण.....

Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.

डॉ.श्रीराम दिवटे's picture

26 May 2010 - 11:26 pm | डॉ.श्रीराम दिवटे

मिपावर एखादे चित्र कसे डकवावे ते कितीही प्रयत्न केला तरी जमत नाहीये. जाणकार मित्रांनी मदत करावी.

रामपुरी's picture

26 May 2010 - 3:53 am | रामपुरी

१००% सहमत... 'मिसळीत पोहे' हा भयंकर प्रकार फक्त पुण्यातच बघायला मिळतो. उगीच गुळमुळीत काहीतरी खाण्यात अर्थ नाही.

युयुत्सु's picture

25 May 2010 - 10:44 am | युयुत्सु

यत्ता सात्वीत आम्ही अस्ले निबंध लिहायचो....

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

विनायक पाचलग's picture

25 May 2010 - 12:38 pm | विनायक पाचलग

ओरिगिनल मिसळीसाठी आमच्या घरी यावे
चोरगे मिसळवाले आमच्या बिल्डींग मध्ये राहतात..
सगळ्याना फुकट व अनलिमिटेड कोल्हापुरी मिसळ मिळेल...
खुले निमंत्रण
(फडतरे दिली असती हो, पण ती फार कमी वेळ मिळते आणि खुप गर्दी असते)
आपलाच,
विनायक पाचलग
वाँट टु टॉक

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 May 2010 - 12:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ओरिगिनल म्हणजे ओरिगामीतली मिसळ का?

च्यायला, हे फडतरे आणि मिसाळ बनवतात ती ओरिजिनल मिसळ तर आम्ही इतर सगळे काय उल्हासनगर मिसळ खातो, बनवतो का?

अदिती

पंगा's picture

25 May 2010 - 8:18 pm | पंगा

च्यायला, हे फडतरे आणि मिसाळ बनवतात ती ओरिजिनल मिसळ तर आम्ही इतर सगळे काय उल्हासनगर मिसळ खातो, बनवतो का?

अरे वा! उल्हासनगरवाले मिसळसुद्धा बनवू लागले काय हल्ली?

आमच्या वेळीं असें नव्हतें.

- (दिवंगत अण्णा बेडेकरांचा (पत्यांशांदे) कट्टर फ्यान, पण तरीही 'ओपन माइंड'वादी) पंडित गागाभट्ट.

मेघवेडा's picture

25 May 2010 - 10:39 pm | मेघवेडा

>> उल्हासनगरवाले मिसळसुद्धा बनवू लागले काय हल्ली
अरे कर्मा! आता मिसळीचीही सिंधी आवृत्ती??

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 May 2010 - 10:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

छ्या, या लोकांना "उल्हासनगर माल" म्हणजे काय तेही सांगायचं का?

अदिती

पंगा's picture

25 May 2010 - 10:59 pm | पंगा

म्हणूनच विचारले.

की आजकाल तेथे हेही बनू लागले काय, म्हणून.

- पंडित गागाभट्ट.

मेघवेडा's picture

25 May 2010 - 11:01 pm | मेघवेडा

कार्टे, वरच्या प्रतिसादाला अनुसरून लिहिलाय तो प्रतिसाद मी. लागली लगेच डमरू वाजवायला ;)

-- मेघवेडा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 May 2010 - 11:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मेल्या, मी किंवा इतर कोणीही घरी बनवलेली मिसळ "उल्हासनगर" का नाही हे सांग ... असेल तर तुला कायम जॅकेट पटोटो खावं लागेल, कध्धी कध्धी मिसळ मिळणार नाही!

फडतरेंची मिसळ ओरिजिनल तर त्या फडतरेच्या घरी जी मिसळ बनते ती पण चीनी बनावटीची का?

अदिती

पंगा's picture

25 May 2010 - 11:24 pm | पंगा

मेल्या, मी किंवा इतर कोणीही घरी बनवलेली मिसळ "उल्हासनगर" का नाही हे सांग ...

"का नाही"? की "की नाही"? नाही, भलताच अर्थ निघाल्यासारखे वाटले, म्हणून विचारले...

असेल तर तुला कायम जॅकेट पटोटो खावं लागेल

हे "जॅकेट पटेटो" काय असते म्हणे?

फडतरेंची मिसळ ओरिजिनल तर त्या फडतरेच्या घरी जी मिसळ बनते ती पण चीनी बनावटीची का?

"चिनी" की "यूएसए"? एकदाच काय ते नक्की ठरवा!

- पंडित गागाभट्ट.

मेघवेडा's picture

25 May 2010 - 11:36 pm | मेघवेडा

वरचे काही प्रतिसाद वाचून अंमळ मौज आली!

=))

हे "जॅकेट पटेटो" काय असते म्हणे?
संजोबै, द्या उत्तर!! :D

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 May 2010 - 11:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

घ्या उत्तर!

अदिती

पंगा's picture

26 May 2010 - 8:32 pm | पंगा

आस्क अ स्टुपिड क्वेश्चन...

- पंडित गागाभट्ट

वेताळ's picture

25 May 2010 - 1:06 pm | वेताळ

मिसळ खायला मी तरी नक्की येतो रे.
आज रिझल्ट ना? किती टक्के पडले? पेढे कधी?
वेताळ

पंगा's picture

25 May 2010 - 7:38 pm | पंगा

एक प्रश्नः

चोरगे मिसळवाले आमच्या बिल्डींग मध्ये राहतात..
सगळ्याना फुकट व अनलिमिटेड कोल्हापुरी मिसळ मिळेल...
खुले निमंत्रण

हे खुले निमंत्रण देण्यापूर्वी चोरग्यांना विश्वासात घेऊन त्यांचे याबद्दलचे मत अजमावले आहेत काय?

- पंडित गागाभट्ट

विनायक पाचलग's picture

25 May 2010 - 8:03 pm | विनायक पाचलग

त्यांनी समजा पैसे मागितले तर मी देइन...
एवढे काय त्यात???
अतिथी देवो भव

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

पंगा's picture

25 May 2010 - 11:25 pm | पंगा

त्यांनी समजा पैसे मागितले तर मी देइन...

त्यापेक्षा सरळ तुम्हीच का नाही देत? उगाच चोरग्यांना गृहीत धरून 'प्रायमरी पेयर' म्हणून मध्ये कशाला आणायचे?

- पंडित गागाभट्ट

टारझन's picture

25 May 2010 - 8:52 pm | टारझन

ओरिगिनल मिसळीसाठी आमच्या घरी यावे

जबरा !! हा मात्र अभिनव प्रकार उत्सुकतावर्धक आहे :) सद्ध्या आमच्या इथे इलेच्रिकीटी गेलीये ... लाईट आली की येतो उत्साह वाढवायला ;)

बाकी कोदांनी त्यांचा लेख सोडुन अन्यत्र प्रतिसाद लिहीण्याचा उपास सोडलेल्या दिसतोय .. अभिणंदण ;)

- (ओरिगिनल) टारझन

अन्या दातार's picture

25 May 2010 - 8:54 pm | अन्या दातार

कधी येउ ते सांगा. :)

llपुण्याचे पेशवेll's picture

26 May 2010 - 11:53 am | llपुण्याचे पेशवेll

नको नको फडतरे मिसळ नको हो.. फार फालतू आणि सपक असते.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

विशाल कुलकर्णी's picture

25 May 2010 - 6:23 pm | विशाल कुलकर्णी

डॉक्टरसाहेब अहो काळाचा महिमा आहे, मिसळ असो किंवा मिसळपाव चव ही बदलतच राहणार. कधी एकदम फर्मास लागेल तर कधी थोडीफार बेचवही लागेल. महत्वाचें काय तर मिसळपाव खायचे सोडायचे नाही. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

Pain's picture

26 May 2010 - 12:28 am | Pain

कोल्हापूरच्या मिसळीला तोड नाही !!!
चोरगे,फडतरे,मोहन यांच्या इथे मिसळ चापणार्‍यालाच खर्‍या मिसळीची चव कळते...

जाता जाता :--- ही खातांना झणकेबाज 'शांपल' ची मागणी दणकेबाज खवय्यांकडून झाली
खी खी खी... ख्या ख्या ख्या...झणझणीत तर्रीला असलं पांचट नाव दिल जात यातच सर्व आलं...

बेडेकर मिसळीएवढी चवदार मिसळ आजपर्यन्त कुठेच खाल्ली नाही.

सहापैकी तिखट ही एकच चव कळणार्यांसाठी*: कुठ्ल्याही टपरीवर मिसळ मागवा आणि त्यात १ किलो तिखट घाला. झाली तुमची आवडती मिसळ तयार.

मदनबाण's picture

26 May 2010 - 12:39 am | मदनबाण

बेडेकर मिसळीएवढी चवदार मिसळ आजपर्यन्त कुठेच खाल्ली नाही.
अस्स होय्...बरं ठीक आहे...कधी योग आला तर तिथेही मिसळीचा आस्वाद नक्कीच घेईन. ;)

सहापैकी तिखट ही एकच चव कळणार्यांसाठी*: कुठ्ल्याही टपरीवर मिसळ मागवा आणि त्यात १ किलो तिखट घाला. झाली तुमची आवडती मिसळ तयार.
ही अशी मिसळ अजुन माझ्या तरी खाण्यात आलेली नाही... ;)

मदनबाण.....

Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.

रामपुरी's picture

26 May 2010 - 4:03 am | रामपुरी

योग आला नसेल तर आनंदाची गोष्ट आहे. आमचा एकदाच योग आला होता. अजून पस्तावतोय. कोल्हापूरचे असाल तर बेडेकर मिसळीच्या नादाला लागू नका. ती फक्त पुणेरी लोकांसाठीच ठीक आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

26 May 2010 - 12:03 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत. बेडेकर मिसळ अगदीच टुकार आहे. गोड लागते गोड.
त्यापेक्षा श्री उपहार गृह, रामनाथ इथल्या मिसळी मस्त आहेत. किंवा हातगाड्यांवर मिसळ विकणारे असंख्य आहेत. मस्तं असते मिसळ त्यांच्याकडे पण. आणि गाडी जितकी कळकट तितके सँपल भारी असतं तिथलं.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

पांथस्थ's picture

26 May 2010 - 6:20 pm | पांथस्थ

गाडी जितकी कळकट तितके सँपल भारी असतं

येकदम बराबर.

जाता जाता: पुणेरी मिसळ कशीही असो अनेक जणांना लगेच जळजळ सुरु होते. असो!

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर