अनवट
भरलेल्या डोळ्यांसमोर सार अस्प्सष्ट ....पण तरीही श्रवण इंद्रिये तशीच तल्लख!! बाजूला तसे कधीही विशेष भावना प्रधान न होणारे माझे धनी ...हाताच्या ओंजळीत हनुवटी ठेवून स्तब्ध ..डोळ्यात भारलेले भाव. थोड स्पष्ट दिसाव म्हणून मी डोळे मिटते आणि माझ्या गालावर अश्रू ओघळले. मला हळूच ढोसलत Loree माझ्या हातात टिशू खुपसते ...ओशाळवान हसत मी थोडे डोळे कोरडे केले....तोवर समोर जुगल बंदी संपून परत सारे जण समेवर पोहोचले होते...' अलफत उन बिन इन बिन नुखता पाठ पढाया ......' अरे आत्ताच तर "हला s s s रिया s s मथुरा s में बाज्या s s ढोल..असं कृष्ण जन्म आळवला जात होता आणि विस्तारा पाठोपाठ जुगलबंदी न कर्णेन्द्रीये भारावून गेली होती ..सारंगीन अंतर्बाह्य थरारून सोडलं होत ...काळीज पिळवटून निघावेत तसे ते सूर अन लागोपाठ समेवर पोहोचताच "बुलेशाह" चा अलफत इन बिन......."
हे श्रवणेन्द्रीयानना मिळणार स्वर्ग सुख कमी वाटलं म्हणून की काय डोळ्यासमोर आत्ता पर्यंत स्टेज म्हणून आपण जे काही कल्पित आलो त्याला सुरुंग लावत अख्खा 'हवामहाल' उभा होता!!
परवा सकाळी चुकून टी.व्ही. लावला...सकाळच्या धावपळीत टी. व्ही. लावण म्हणजे एव्हरेस्ट वर चढताना भांगडा करणं झाल..पण कसा कुणास ठाऊक लावला....सकाळच्या मुलाखतीत दोन भारतीय चेहरे दिसले, मग तशीच कामाकड दुर्लक्ष करत थोडे कान टवकारले...जे केस वाढलेले गृहस्त बोलत होते ते होते केरळाचे Roysten Abel ...आणि त्यांच्या बाजूला फारसा संभाषणात सहभाग नसलेला थोडासा ग्रामीण ढंगाचा एक इसम!. मुलाखत कार कुठल्या तरी seduction बद्दल बोलत होते आणि Roysten तेव्हढ्याच हिरीरीन माहिती देत होते मग मुलाखत कार या इसमाकडे वळून म्हणाला....can you please play that for me? what do you call it again..? " करताल" क्षणभर ही उसंत ना लावता हा थोडासा ग्रामीण ढंगाचा इसम बोलला....आणि पुढच्या क्षणी त्याचे हात ठेका धरल्यासारखे नाचू लागले.. हातातल्या दोन लाकडी पट्ट्या एकमेकावर चिपळी सारख्या वाजवत त्यान एक तोडा सादर केला..काम गेली खड्ड्यात..बाहेर पडायला होणारा वेळ तसाच नजरे आड करत मी टी. व्ही. ला चिकटले..मधेच त्यांनी कार्यक्रमाची झलक दाखवली अन मी संपले...मी.पां. च्या भाषेत फुटले , खपले ...कार्यक्रमाचे नाव...."The Manganiyar Seduction"
कधी नाही ते धन्याच्या पाठी भून भून लावली " काही देऊ नकोस पण हा कार्यक्रम दे ..
तर परिणामी आम्ही दोघ Esplanade मध्ये !!
पडदा वर जाण्या पूर्वी हळुवार आलापी सुरु झाली.. अगदी आपण पूर्वी आकाश वाणी वर ऐकायचो तशी...आं आ आ ....असं... अन पडदा वर गेला . स्टेज वर ९ झरोक्यांच्या चार मजली स्ट्रक्चरन श्वास अडकला!! . दिग्दर्शक म्हणाले होते की राजस्थान च्या स्त्रिया या झरोख्या तून सारे कार्यक्रम पहायच्या , पण त्या झरोक्यात उभ्या; त्या स्वत:च एक प्रेक्षणिय गोष्ट होऊन जायच्या. अन हीच संकल्पना मनाशी धरत हे असं स्टेज उभारलं गेल.
हे झाल नमनाच घडा भर तेल!! अहो कार्यक्रम सुरु झाला अन सार भोवतालाच विसरलं... एका एका झरोख्यात एक कलाकार !! त्याचे सादरीकरण सुरु झाल की त्या झारोख्याचे लाईट लागत. तर सुरवातीच्या त्या आलापीचा स्त्रोत होता "दिलरुबा" आता एक गोष्ट झाली... मला वाद्यं बघून आणि ऐकून (वाजवायचो पण आम्ही!! पण मास्तर खवळायचे त्या वाजवण्यावर) माहिती आहेत पण ही सारी नाव आणि कलाकारही राजस्थानचे..(त्यामुळे नाव वेगळी)... कुठल्याही प्रकारचे शास्त्रीय... वां घराण्याशी बांधील नसलेले... फिरस्ते...नाव....मंगनियार ....त्यांची वाद्ये ..त्यांची गायकी अन...त्यांचा वेश ..काहीही न बदलता तस्सच्या तस्स "अनवट" राखून Roysten न हा कार्यक्रम उभारलाय. अन या कार्यक्रमच यश या अनवट बांधणी मूळेच आहे.
दिलरुबा च्या पाठोपाठ भारदस्त आवाजात बुलेशाह च्या चार विस्तृत बंदिशी एक एक करत चार कलाकार म्हणतात, हा सारा वेळ फक्त दिलरूबाची साथ अन एक कडाक्याची थाप देत मृदंग उतरतो. नऊ प्रकारची वाद्ये..सारी त्या वाळवंटातली सुमधुर.. प्रत्येक कलाकाराला पुरा वाव ...एक जण सादर करीत असताना बाकीचांच्या न कळत येणारी मान हलवून दाद !! अप्रतिम संगीत! सत्तर मिनिट कशी संपतात हे समजत ही नाही. मन असं भिकारी होऊन जात आणि काही ऐकायला मिळेल का या आशेन!
हे लोक राजस्थानच्या सीमेवरचे..सुफी मुस्लीम...फिरस्ते ...पण यांचे देव मात्र हिंदू..अन त्या मूळे कृष्ण जन्म गाऊन संपला की कोठलाही भेद मनी न बाळगता ते बुले शाह ची बंदिश मिसळतात . ढोल वादक तर भान हरपून टाकेल असा ढोल वाजवतात. प्रत्येक गायक स्वत:च गायन सादर करतो पण कुठेही कंटाळवाण असं वाटत नाही !! प्रत्येक वाद्याची स्वत:ची अशी ओळख दाखवत हा कार्यक्रम पुढ सरकतो....सहा दिलरुबा चार मृदंग..दोन सारंग्या..दोन एक तार् या सारखी दिसणारी पण दोन तारी वाद्य..दोन पुंग्या..होय !! अतिशय सुरेल...तोंडात घालून वाजवलेल एक टणत्कारी वाद्य,,,,तीन ढोल..(पोटात पडसाद उठतात ) दोन बासूरया.. पण वाजवतो एकटाच. अन एकाचं वेळी !!! जवळ जवळ बारा गायक (त्यातली दोन मिसरूड न फुटलेली पोर ... इतकी तयारी न गात होती की बस) हरकती घेत, ताना मारत; पण कुठलाही कट्टर पणा नाही. शास्त्रीय संगीत गाणारे, गाताना जे वेदनादायक चेहरा करतात; त्या साऱ्या हरकती घेताना अतिशय प्रसन्न चेहरे..... अन हा सारा वेळ हातात त्या "करताल " घेऊन देह भान हरपून नाचणारा "देवो खान "!!
कुठे सी.डी. मिळाली तर किंमत न पाहता घ्या. कोणाला लाइव्ह मिळाला तर हा अनुभव सोडू नका...
माझ्या बाजूला बसलेली seattle ची स्वत: C A T S मध्ये काम करणारी Lorie तितकीच भारावलेली. टिश्यू देवून...बाहेर पडल्यावर .. हे काय..ते काय...
कार्यक्रमाच्या शेवटी दिग्दर्शक येऊन चार शब्द बोलून गेले...४६ खान घेऊन इम्मिग्रेशन... सोप नाही असं मिश्कील पणे बोलून...आता शेवटी एक ..कृष्ण भजन ऐका असं सांगून गेले..
हा शेवटचा अनुभव अतिशय भारावून टाकतो...अवीट ...सारे कलाकार..अगदी वादक सुद्धा ...एक ही वाद्य न वाजवता अतिशय भावपूर्वक हे शेवटच भजन सादर करतात...आणि उरल सुरलं...seduction ....पूर्ण होत.
इथे पहा
प्रतिक्रिया
22 May 2010 - 12:01 am | शिल्पा ब
वाह!!!! क्लिप तर वेड लावणारी...अजुन असे काही असेल तर इथे टाका...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
22 May 2010 - 6:46 am | मिसळभोक्ता
सिडक्शन हा शब्द वापरल्याबद्दल धन्यवाद.
कित्ती छान लिहितेस तू अपर्णा. कसं तुझ्या डोक्यात सगळं येतं, कुणास ठाऊक, वॉव. (हे शिशु कडून साभार. म्हणजे शिल्पा आणि शुची, नाही तर उगाच धावाल तिकडे.)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
23 May 2010 - 2:58 am | शुचि
मिभो कशाला खोडी काढली हो? शिशु म्हणे :)
सगळेजण नुसते खोडसाळ आहेत.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
23 May 2010 - 3:13 am | शुचि
आणि वर वॉव वगैरे मसाला लावलाय =)) ......
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
22 May 2010 - 8:04 am | अरुंधती
अप्रतिम! गाण्यांची शैली, भरदार खडे आवाज, सहजता, स्वर-फेक, स्टेज सेटची सुंदर अनोखी रचना, प्रकाशयोजना, सादरीकरण..... सगळंच आवडलं! तिथे यूट्यूबवर इतर पण क्ल्पिस आहेत त्यांच्या! धन्यवाद अपर्णा ओळख करून दिल्याबद्दल! :-)
काही क्लिप्सः
ह्या क्लिपमधली पुंगी व ढोल ऐका :
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
22 May 2010 - 9:01 am | फटू
नाव लेखाला साजेसं... छान जमला आहे.
- फटू
लेखक पावन मनाचा | साही प्रतिसाद जनाचा ||
जाणते रागें झाले वन्ही । "संजा" सुखें व्हावें पाणी ||
प्रतिसाद शस्त्रें झालें क्लेश । घ्यावा नव्या लेखाचा ध्यास ||
मिपा "प्ल्याटफार्म" "नेट" द्वारा । लेख पाडा कोज्ञानेश्वरा ॥
22 May 2010 - 9:46 am | प्राजु
मस्त!!!!!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
22 May 2010 - 11:48 pm | मेघवेडा
उ त्त म!! :)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
23 May 2010 - 12:45 am | संदीप चित्रे
लाइव्ह बघायचा योग कधी आणि कुठे येईल माहिती नाही अजून.
'दुधाची तहान..'प्रमाणे सध्या 'तू नळी'वरच समाधान मानतोय.
अरूंधतीने दिलेल्या क्लिप्सही छान आहेत.
>> दिग्दर्शक म्हणाले होते की राजस्थान च्या स्त्रिया या झरोख्या तून सारे कार्यक्रम पहायच्या , पण त्या झरोक्यात उभ्या; त्या स्वत:च एक प्रेक्षणिय गोष्ट होऊन जायच्या. अन हीच संकल्पना मनाशी धरत हे असं स्टेज उभारलं गेल.
अरूंधतीने दिलेल्या दुसर्या क्लिपमधे दिग्दर्शक वेगळंच काहीतरी म्हणतोय !
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
23 May 2010 - 7:36 am | स्पंदना
बघा बघा!! ऑडियन्स बदलला कि म्हणन पण बदलतय!... असु दे असु दे....आपण चान्गल तेव्हढ पहायच ..चान्गल ऐकायच्,,....चान्गल बोलायच....
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
23 May 2010 - 6:00 am | सहज
लै भारी. अर्थात झरोक्यातुन नाही तरी चाळीच्या जाळीतुन बघणार्यांसाठी (अश्या काहीश्या वाटु शकेल अश्या ) अनवट कल्पनेतुन अमेरिकन गान,नृत्यसंस्कृतीची एक झलक दाखवणारा व A Broadcast from the Computer Hell Cabin असे तितकेच अनवट नाव असलेल्या अल्बम मधील जंकी -एक्सएल अर्थात जे एक्स एल ने एल्वीसच्या एका लोकप्रिय गाण्याचे केलेले अनवट रिमिक्स बघताना असेच भारावुन जायला होते. मग बघा व लुटा लुफ्त
23 May 2010 - 10:00 am | मदनबाण
वा...सुंदर. या कलाकारांची ओळख करुन दिल्याबद्धल धन्यवाद !!! :)
या वरुन मला जलतरंग आठवले...
मदनबाण.....
Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.