अंधश्रद्धा निर्मूलनाच्या आयचा घो! - २

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
7 May 2010 - 8:29 am
गाभा: 

काही दिवसांपूर्वी मी सुरु केलेल्या "अंधश्रद्धेच्या आयचा घो" ही चर्चा प्लासिबो परिणामाच्या व्याख्येवरून न होताच संपली. (पहा - http://misalpav.com/node/11586).

वैद्यकेतर क्षेत्रात प्लासिबो परिणाम असू शकतो हे मान्य करण्यास घासकडवी तयार नव्हते. आजच ही बातमी वाचनात आली.
http://www.dailymail.co.uk/news/worldnews/article-1270093/New-research-s...

ही बातमी वाचल्यावर मला असा प्रश्न विचारावासा वाटतो की प्लासिबो परिणामाचा विस्तार वैद्यकेतर क्षेत्रासाठी करण्यास काय हरकत आहे?

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

7 May 2010 - 4:06 pm | अरुण मनोहर

मानसशास्त्रात ऑटोसजेशन म्हणून एक प्रकार असतो. आपणच आपल्याला एखादी सुचना करून ठेवायची, व बाह्य मनात ती विसरून जायची. (म्हणजे त्याचा नंतर काहीही विचार करयचा नाही, ते होण्यासाठी मुद्दाम काही प्रयत्न करायचा नाही).
योग्य तो परिणाम हमखास एकना एक दिवस दिसतो.
पहा करून.
तावित हे एकप्रकारचे ऑटोसजेशनचेच साधन आहे. हा तावित मी बांधला आहे. नक्की मी सगळ्या संकटांमधून तरणार. किंवा प्रसाद घेऊन निघालो आहे, नक्कीच सगळे चांगले होणार.

ही स्वत्ळ्चीच शक्ती स्वत्: साठी काम करत असते. ह्यात कोणतीच अंधश्रद्धा नाही. पण खरोखर आंधळेपणानेच विश्वास ठेवून केले तरच परिणाम दिसतो. म्हणजे दगडातला देव पावतो. अन्यथा टाईम पास.

प्रकाश घाटपांडे's picture

7 May 2010 - 4:13 pm | प्रकाश घाटपांडे

पण खरोखर आंधळेपणानेच विश्वास ठेवून केले तरच परिणाम दिसतो. म्हणजे दगडातला देव पावतो. अन्यथा टाईम पास.

आंधळा विश्वास आणि अंधश्रद्धा यात नेमका फरक काय?
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

अरुण मनोहर's picture

7 May 2010 - 4:24 pm | अरुण मनोहर

माझे ते वाक्य ऑटोसजेशन च्या संदर्भात होते. ऑटोसजेशन जर परिणामकारक करायचे असेल तर त्यावर पूर्ण, आणि एकही प्रश्न न करता विश्वास हवा.

त्याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणा किंवा आणखी काही.

विकास's picture

7 May 2010 - 9:03 pm | विकास

आंधळा विश्वास आणि अंधश्रद्धा यात नेमका फरक काय?

मला वाटते, अंधश्रद्धा ही देव-धर्म आणि त्यासंदर्भात बुवाबाजी करणार्‍यांवर असते. बहुतांशी तशी श्रद्धा बहुतेक करून "निर्बुद्ध, मद्दड" जनता ठेवते.

आंधळा विश्वास हा मला वाटते अशा अंधश्रद्धेवर टिका करणार्‍या आणि त्यासाठी विज्ञानाचे (कसेही) संदर्भ दाखवणार्‍यांना (आक्रस्ताळी) पाठींबा देणार्‍या तथाकथीत बुद्धीवाद्यांच्या प्रतिसादातून दिसतो...

श्रद्धा अथवा विश्वास काही का असेना जर काही आंधळे असले तर तसा ठेवणारे आंधळेच...

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

स्मृती's picture

8 May 2010 - 7:21 pm | स्मृती

निर्बुद्ध.. मद्दड... वाचून खरंच हसू आलं. .. असो.

मला वाटतं की कमकुवत मनाचे लोक साधारणतः अंधश्रद्धाळू असतात.. ज्यांना काहीही करताना कुठल्यातरी प्रकारे नैतिक पाठिंबा लागतो.. म्हणजे आपण करतोय ते योग्य आहे यावर ज्यांचा विश्वास नसतो असे हे लोक असतात बहुधा..

नितिन थत्ते's picture

7 May 2010 - 4:24 pm | नितिन थत्ते

या धाग्याला योग्य जागी मारायचे ठरवले होते.

नितिन थत्ते

युयुत्सु's picture

7 May 2010 - 4:51 pm | युयुत्सु

या धाग्याला योग्य जागी मारायचे ठरवले होते.

का हो? एव्हढे का रागावलात?
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

अरुंधती's picture

7 May 2010 - 8:39 pm | अरुंधती

प्लासिबो इफेक्टसंदर्भात वैद्यकेतर क्षेत्रांमध्ये झालेल्या संशोधनात अजून एक भर : मार्केटिंग व प्लासिबो इफेक्ट : http://www.neurosciencemarketing.com/blog/articles/marketing-and-the-pla...

माहिती खूपच रोचक वाटली! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

डॉ.श्रीराम दिवटे's picture

8 May 2010 - 9:53 am | डॉ.श्रीराम दिवटे

डॉक्टर जेव्हा प्लासिबो म्हणून एखादे औषध देतात तेव्हा रूग्ण विश्वास ठेऊन ते ग्रहण करतो. इथे अंधश्रध्देचा संबंध येतो कुठे???

युयुत्सु's picture

8 May 2010 - 1:24 pm | युयुत्सु

चर्चेच्या सोयी साठी अंधश्रद्धेची आणि विश्वासाची व्याख्या कराल का डॉक्टर साहेब?

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.