गाभा:
नमस्कार,
माझे वय आजमितीला सुमरे २१ वर्ष आणि ४.५ महिने आहे. मला सुमारे ५ वर्षांपासून रात्री काम करणे आणि दिवसा झोपणे, अशा (सामान्यतः अनारोग्यकारक समजल्या जाणार्या दिनक्रमाची ) सवय लागली आहे. तर रात्रीची झोप येण्यासाठी काय करावे? अशा प्रकारचे अनैसर्गिक वेळापत्रक असल्यामुळे शरीरावर होणारे दूरगामी परिणाम यांची कृपया माहिती द्यावी.
--
आपला नम्र,
इंटरनेटप्रेमी, मुंबई, महाराष्ट्र राज्य.
प्रतिक्रिया
12 Mar 2010 - 5:13 am | शुचि
(१)भरपूर झपझप चालणे (२) झोपण्यापूर्वी कोमट दूध पीणे याने झोप बरी लागू शकते.
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
12 Mar 2010 - 9:59 am | सुनील
वयाच्या सोळाव्या वर्षापासून आपण दिवसा झोपा काढून रात्री कोणते काम करता, ते जाणण्यास उत्सुक आहे! ;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
12 Mar 2010 - 9:22 pm | प्रकाश घाटपांडे
सेम असेच म्हंतो
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
12 Mar 2010 - 10:26 am | अरुंधती
तुम्हाला इन्टरनेटवर 'हाऊ टू गेट स्लीप' या विषयावर गूगलदेवता खूप सार्या लिन्क्स चा प्रसाद देईल तो कृपया ग्रहण करावा.... एक से एक उपाय आहेत! बघाच करून!
:-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
12 Mar 2010 - 8:56 pm | तिमा
फारिनला जाऊन लगेच परत या. बाडी क्लाक उलटं होईल आनि रातच्याला झ्वॉप लागलं!!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
12 Mar 2010 - 9:08 pm | हेरंब
फॉरिनला जाण्याची जरुर नाही. पण तिथे जाऊन आल्यावर ज्या पध्दतीने 'जेट लॅग ' घालवतात तशी तुमची संवय घालवता येईल. दिवसा जागे रहाण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आवडत्या गोष्टीत दिवसा रमवा. बाहेर फिरायला जा, व्यायाम करा. बघा, तुमचा दिनक्रम नॉर्मल होईल.
एखाद्या सदस्याने समस्या विचारली तर त्याची टवाळी करु नये असे मला वाटते.
12 Mar 2010 - 9:29 pm | अमेरिकन त्रिशंकू
शीर्षकातला Abstinence हा शब्द यासंदर्भात चुकीचा वाटतोय. Absence म्हणायचे आहे का?
12 Mar 2010 - 10:53 pm | विसोबा खेचर
रोज संध्याकाळचे दोन-तीन पेग टाका आणि झोपा मस्तपैकी! :)
तात्या.
12 Mar 2010 - 11:07 pm | पक्या
स्वतःच वय 'सुमारे' ? :?
शरिरावर होणारे परिणाम आता कळणार नाहीत पण साधारण पन्नाशी उलटल्यावर दिसू लागतील. आपण दिवसा झोपत असला तरी पूर्ण ८-९ तास झोपता काय? तेवढी झोप रोज मिळणे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असते.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
13 Mar 2010 - 3:10 am | राजेश घासकडवी
मला झोपायला त्रास होत असे म्हणून मी निद्रा-तज्ञ डॉक्टरकडे गेलो. त्याने मला खालील पथ्यं पाळायला सांगितली. तीन आठवड्यात माझं झोपेचं तंत्र खूपच सुधारलं.
१. ठरलेल्या वेळी उठण्याचा प्रयत्न, व दुपारी झोप न घेणे.
२. व्यायाम अत्यावश्यक आहे, शक्यतो सकाळी वा दुपारी. एकविसाव्या वर्षी संध्याकाळी देखील केल्याने हरकत नाही.
३. सूर्यप्रकाशात बाहेर पडा अगर खिडक्या उघड्या ठेवा
४. संध्याकाळी चारनंतर चहा, कॉफी, सिगरेट घेऊ नका
५. दोन पेग घेणं एखाद्या रात्री ठीक आहे, पण नियमाने नको. दारूने झोप लागते, पण मिळणारी झोप उत्तम दर्जाची नसते.
६. या शारीरिक बाबींपलिकडे मानसिक बाबीही महत्त्वाच्या असतात. तुम्हाला अपयशामुळे म्हणा किंवा एकंदरीत काही कारण नसताना पूर्वी ज्या गोष्टींत रस वाटायचा त्यात रस वाटेनासा झाला आहे का? उगीचच खूप कंटाळा, शैथिल्य वाटतं का? नकारात्मक विचार येतात का? तसं असल्यास हे डिप्रेशनचं लक्षण असू शकेल.
एकंदरीतच जर पाच वर्षं हा प्रकार चालू असेल तर तुमच्या डॉक्टरला जरूर भेटा. ते या बाबतीत निदान करू शकतील. एकविसाव्या वर्षी हे अंगावर काढता येतं, पण नंतर त्याचे वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.
राजेश
13 Mar 2010 - 8:20 am | टारझन
सह्ही ... एक वेगळाच काथ्याकुट .. :)
- ( इच्छाधारी झोपाळु) टारोबा स्लिपर
13 Mar 2010 - 9:03 am | मदनबाण
अनैसर्गिक वेळापत्रक असल्यामुळे शरीरावर होणारे दूरगामी परिणाम
याच्या बद्धल जाणुन घ्यायला नक्कीच आवडेल...
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
13 Mar 2010 - 9:06 am | पाषाणभेद
अरे तु म्हटले आहे की "माझे वय आजमितीला सुमरे २१ वर्ष आणि ४.५ महिने आहे. मला सुमारे ५ वर्षांपासून रात्री काम करणे आणि दिवसा झोपणे, अशा (सामान्यतः अनारोग्यकारक समजल्या जाणार्या दिनक्रमाची ) सवय लागली आहे. तर रात्रीची झोप येण्यासाठी काय करावे? अशा प्रकारचे अनैसर्गिक वेळापत्रक असल्यामुळे शरीरावर होणारे दूरगामी परिणाम यांची कृपया माहिती द्यावी. "
तु तर रात्री कामे करतोस मग तुला रात्रीची झोप घेण्यासाठी वेळ कुठे आहे? की तुला असे म्हणायचे आहे की "पुरेशी झोप दिवसा घेण्यासाठी काय करावे?" लवकर कळव म्हणजे मार्गदर्शन करता येईल.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
13 Mar 2010 - 11:05 am | युयुत्सु
माझे music therapy चे काही फुकट ट्रॅक्स www.yuyutsu.biz येथुन डाउन करुन घ्यावेत आणि ते ऐकावेत. ते ऐकून एका ४० वर्षे झोप नसलेल्या बाईला (ती बोईंग मध्ये नोकरी करत होती.) झोप येउ लागली. असे अनेकांचे अनुभव आहेत.
अधिक माहिती साठी वैयक्तिक संपर्क साधावा.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
13 Mar 2010 - 11:24 am | प्रमोद देव
इथल्या काही कवितांना मी लावलेल्या चाली माझ्याच आवाजात ऐकाव्यात...गातांना मलाही भरपूर जांभया येतात. ;)
इतर कुणी जो ऐकेल तो तर नक्कीच झोपेल. पाहा प्रयोग करून...एकदम फुकट आहे..
साईड इफेक्ट्स: कान खराब होण्याची शक्यता. :D
वरचा प्रतिसाद गंमत म्हणून दिलाय...
आता गंभीर प्रतिसाद...
वर काही लोकांनी खरंच खूप चांगले उपाय सुचवलेत. मध्यंतरी कैक वर्षे मी देखिल रात्री झोप न लागण्याने त्रस्त होतो...आता हळूहळू आपोआप बरीच सुधारणा झालेय.
13 Mar 2010 - 11:48 am | मदनबाण
इथल्या काही कवितांना मी लावलेल्या चाली माझ्याच आवाजात ऐकाव्यात...गातांना मलाही भरपूर जांभया येतात.
इतर कुणी जो ऐकेल तो तर नक्कीच झोपेल. पाहा प्रयोग करून...एकदम फुकट आहे..
हा.हा.हा अहो दुर्वास मुनी सॉरी सॉरी मोदबुवा अहो आम्हाला झोपायचे आहे याचा अर्थ कायमचे झोपायचे आहे असा होत नाही !!! ;)
कृहघेहेवेसांन... ;)
बाकी तुम्हाला काय काय उपाय सुचवले तरा सांगा की राव...
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
13 Mar 2010 - 11:06 am | युयुत्सु
माझे music therapy चे काही फुकट ट्रॅक्स www.yuyutsu.biz येथुन डाउन करुन घ्यावेत आणि ते ऐकावेत. ते ऐकून एका ४० वर्षे झोप नसलेल्या बाईला (ती बोईंग मध्ये नोकरी करत होती.) झोप येउ लागली. असे अनेकांचे अनुभव आहेत.
अधिक माहिती साठी वैयक्तिक संपर्क साधावा.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
13 Mar 2010 - 11:22 am | Pain
एव्हढे साधे माहीत नाही ? :O
13 Mar 2010 - 1:45 pm | चिरोटा
दुपारची झोप न घेता जर जास्त वाचन केले तर झोप चांगली येते असा माझा अनुभव आहे.खाण्यात फळभाज्यांचे/फळांचे प्रमाण वाढवा.झोप यायच्या वेळी संगीत ऐकले तर चांगला परिणाम होतो.
भेंडी
P = NP
13 Mar 2010 - 9:37 pm | इंटरनेटस्नेही
सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
-- आपला स्नेहांकित,
इंटरनेटप्रेमी, मुंबई, महाराष्ट्र राज्य.