श्वानत्रस्त विरुद्ध श्वानप्रेमी!!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
7 Mar 2010 - 10:18 am
गाभा: 

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस पुणे, मुंबईत गंभीर होत चालला आहे. अर्थातच इतर शहरात सुद्धा असेलच. दिवसा सुद्धा आणि विशेषकरून रात्री अंधार पडल्यावर या भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य सुरू होते. त्यांच्या रात्री च्या मोठमोठ्याने ओरडण्याने झोपमोड सुद्धा होते.

लहान-थोर सगळ्यांनाच या भटक्या कुत्र्यांपासून त्रास होत असतो. रात्री दुचाकी वाहनांमागे पळत असल्याने वाहनांचे अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू होण्याचा संभव असतो. पायी चालणाऱ्या सर्वांनाच कुत्र्यांचा त्रास होतो. कुत्रा चावून लचका तोडून व्यक्तीला मरण ओढावू शकते. कुत्र्यांमुळे इकडे तिकडे घाणीचे साम्राज्य होते.

काही कथित प्राणीप्रेमी संघटना या कुत्रांवर काही बंदोबस्त करायला का नाही म्हणतात हे आकलनापलिकडचे आहे. त्यांना मारणे उचित नसेल तर प्राणीप्रेमी मंडळींनी सरकारी किंवा संघटनेच्या किंवा स्वत:च्या पैशातून त्या कुत्र्यांसाठी एक घर/संग्रहालय बनवून त्यात त्यांना पोसावे आणि २४ तास सोसावे. नसबंदी वगैरे करून त्यांची पैदास नियंत्रीत करण्याचे मागे कुठेतरी वाचले ते प्रत्यक्ष होते की नाही देव जाणे! प्राणीप्रेमी, श्वानप्रेमी मंडळींनी एकदा तरी रात्री गल्लीतून एकटे जावून दाखवावे. म्हणजे या गोष्टींची तीव्रता व त्रास त्यांना समजेल.एकदा तरी त्यांना(सुद्धा) एक तरी कुत्रा कडकडून चावावा, अशी माझासारख्या असंख्य श्वानत्रस्त व्यक्तींची मनापासून इच्छा आहे.

तसेच पाळीव कुत्र्यांना सकाळी फिरायला घेवून येणारी श्वानप्रेमी (कुत्राप्रेमी म्हणू नका बरं! ते चिडतील!) मंडळी रस्त्यावरच्या इतर जाणाऱ्या येणाऱ्या मंडळीचे बिनधास्त चालणे मुश्कील करून टाकतात. तसेच ही श्वानप्रेमी मंडळी इकडे तिकडे श्वान-विष्टा पसरवून निघून जातात. त्यांना प्रेम असेल कुत्र्यांबाबत, पण ते घरी राहूद्या! इतर सार्वजनीक ठिकाणी ते इतरांना दाखवण्याची आवश्यकता नाही. एवढे बरे की, काही ठीकाणी बागेत श्वान आणण्यास बंदी आहे. नाहीतर सकाळचा व्यायाम, जॉगींग सुद्धा भीत भीत करण्याची पाळी येईल.

याबाबत काय करता येईल?
पालीका/सरकार या प्राणीप्रेमी मंडळींच्या दबावाखाली एवढं का झुकतं?
ह्या श्वानप्रेमी/प्राणीप्रेमी संघटना या कुत्र्यांची जबाबदारी का घेत नाही?
याबाबत कुठे तक्रार करायची?
अनेकदा ओरड होउनही भटक्या कुत्र्यांसंदर्भात पालीका/सरकार ठोस पावले उचलून निर्णय का घेत नाही?

प्रशिक्षीत कुत्रे घराची राखण करतात, पोलीसांत त्याचा उपयोग होतो, ही एक वेगळी गोष्ट झाली, पण म्हणून त्यांना सामान्य माणसांना चावून मारून टाकण्याची परवानगी द्यावी, असे नाही.

प्रतिक्रिया

योगेश२४'s picture

7 Mar 2010 - 10:36 am | योगेश२४

अगदी मनातल लिहिल आहे.
त्यांना मारणे उचित नसेल तर प्राणीप्रेमी मंडळींनी सरकारी किंवा संघटनेच्या किंवा स्वत:च्या पैशातून त्या कुत्र्यांसाठी एक घर/संगहालय बनवून त्यात त्यांना पोसावे आणि २४ तास सोसावे.>>>> हे मात्र खरं

वेताळ's picture

7 Mar 2010 - 10:40 am | वेताळ

चांगला उपाय आहे. किंवा ह्या भटक्या कुत्र्याना जमा करुन प्राणीप्रेमी व श्वानप्रेमी लोकाच्या घरी नेवुन सोडावे.
वेताळ

प्रकाश घाटपांडे's picture

7 Mar 2010 - 11:14 am | प्रकाश घाटपांडे

लिखाण श्वान त्रस्त दिसते.
हा न संपणारा विषय आहे. कुत्र्यांनी माणसांना केलेली इजा/हल्ला याची संख्या व माणसांनी माणसांना केलेली इजा/हल्ला यांची संख्या अजमावल्यास गोष्टी लक्षात येतील.
महानगर पालिका नसबंदी हा उपाय प्रभावी पणे अमलात आणत आहे. नसबंदी झाल्यावर तंगडीला केस खरवडून खुण करतात.
श्वानप्रेमी व श्वानद्वेष्टे हे जगभरात पुर्वीपासुन आहेत. नंतरही राहणार आहेत. माणुसघाणे लोक ही जगात आहेतच की. सगळे माणस जशी सारखी नसतात तसे सगळे भुभु पण सारखे नसतात.
आमच्या मते माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू तो स्वत:च आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

शुचि's picture

7 Mar 2010 - 12:07 pm | शुचि

नाही पण ही समस्या अतिशय गंभीर आहेच.
मी खूप वर्षापूर्वी भारतात होते तेव्हा, आमच्या वसाहतीतील एक कुत्री अशीच पिसळली होती. मी मुलीला कडेवर घेऊन खाली गेले तर अंगावर आली धाऊन, नशीब माझ्या हातात खाण्याचा डबा होता मी तो खाली टाकला जो की फुटून पसरला, आणि ती गुंतली आणि मी सूंबाल्या केला.
हीच कुत्री दुसर्‍या एकाच्या अंगावर धावून गेलेली याच्या हातात इस्त्री चे कपडे होते, त्याने ते तिच्या तोंडात कोंबले.
शेवटी तिला वीष घातलं.
पण माणसानी जगायचं कसं????
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

ज्ञानेश...'s picture

7 Mar 2010 - 6:01 pm | ज्ञानेश...

हीच कुत्री दुसर्‍या एकाच्या अंगावर धावून गेलेली याच्या हातात इस्त्री चे कपडे होते, त्याने ते तिच्या तोंडात कोंबले.
शेवटी तिला वीष घातलं.
पण माणसानी जगायचं कसं?
:?

का कोण जाणे- ही तीन विधाने एकत्र वाचून मजा आली.
बाकी अंगावर धावून आलेल्या कुत्र्याच्या तोंडात इस्त्रीचे कपडे कोंबणे अंमळ अवघड कला असणार ! =))

वेताळ's picture

7 Mar 2010 - 12:20 pm | वेताळ

मी खूप वर्षापूर्वी भारतात होते तेव्हा, आमच्या वसाहतीतील एक कुत्री अशीच पिसळली होती. मी मुलीला कडेवर घेऊन खाली गेले तर अंगावर आली धाऊन, नशीब माझ्या हातात खाण्याचा डबा होता मी तो खाली टाकला जो की फुटून पसरला, आणि ती गुंतली आणि मी सूंबाल्या केला.


ह्यावरुन असे वाटते कि ती कुत्री भुकेली होती म्हणुन पिसळल्याचे सोंग करीत होती.
मला वाटते पिसळलेले कुत्रे ज्याला रेबीज झाला आहे ते काही खातपित नाही.जरी त्याला मारले नाही तरी ते लवकरच मरण पावते.
वेताळ

शुचि's picture

7 Mar 2010 - 12:44 pm | शुचि

बरोबर ती भुकेली असल्याने हल्ला करत होती कारण सर्वांनी खाणं देणं बंद केलं होतं त्या दिवसात आणि तिला पिल्लं झाली होती.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मदनबाण's picture

7 Mar 2010 - 12:44 pm | मदनबाण

मी श्वानप्रेमी आहे आणि श्वानत्रस्त सुद्धा आहे, कसे ? कारण मला भु भु मंडळी आवडतात, पण रस्त्यावर मोकाट असणार्‍या या कुत्रांची प्रजा मात्र अती त्रासदायक झाली आहे...रात्रीचे शांत झोपणे मुश्कील झाले आहे,रात्रीच यांना काय उत येतो ते ठाकुक नाही पण च्यामारी पार रान उठवतात !!! ~X(
पुर्वी रस्त्यावर गाय-बैल दिसायचे ते मात्र हल्ली दिसत नाहीत,हे गाय-बैल अचानक कुठे गायब झाले, का गेले कत्तलखान्यात? याची चौकशी मात्र हे प्राणी प्रेमी करताना कुठे दिसत नाहीत,पण आता त्रासदायक ठरणार्‍या कुत्र्यांसाठी यांचे प्रेम उफाळुन का येते हे समजत नाही.

श्वानप्रेमी मंडळींनी एकदा तरी रात्री गल्लीतून एकटे जावून दाखवावे. म्हणजे या गोष्टींची तीव्रता व त्रास त्यांना समजेल.एकदा तरी त्यांना(सुद्धा) एक तरी कुत्रा कडकडून चावावा, अशी माझासारख्या असंख्य श्वानत्रस्त व्यक्तींची मनापासून इच्छा आहे.
१०००% सहमत... असा लचका तोडला पाहिजे की उठा बसायचे वांधे झाले पाहिजेत मग कळेल यांना...

सगळे माणस जशी सारखी नसतात तसे सगळे भुभु पण सारखे नसतात.
सहमत...आमच्या कॉलनीतील गण्या असाच होता...कधी तरी लिहीन त्याच्या बद्धल.
आमच्या मते माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू तो स्वत:च आहे.
सहमत... मधमाशी पासुन हत्ती पर्यंत सर्व प्राण्यांना आपल्या स्वार्थासाठी वापरणार्‍या माणसा विरुद्ध प्राणी मात्र मुकेच आहेत...

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

विसोबा खेचर's picture

7 Mar 2010 - 1:13 pm | विसोबा खेचर

नसबंदी वगैरे करून त्यांची पैदास नियंत्रीत करण्याचे मागे कुठेतरी वाचले ते प्रत्यक्ष होते की नाही देव जाणे!

ठाण्या-मुंबैत अल्पश्या प्रमाणात हा प्रयोग यशस्वी झाला आहे..

खुद्द आमच्याच बिल्डिंगमध्ये एक कुत्रा व एक कुत्री सुखाने नांदत आहेत.. कुत्र्याची नसबंदी केली आहे. दोघं अगदी छान मजा करत असतात आणि त्यांच्या पिल्लावळीची भिती नसल्यामुळे आम्हीही त्यांचा रोमान्स अगदी छान एन्जॉय करतो... :)

तात्या.

अप्पा जोगळेकर's picture

7 Mar 2010 - 1:25 pm | अप्पा जोगळेकर

त्यांच्या पिल्लावळीची भिती नसल्यामुळे आम्हीही त्यांचा रोमान्स अगदी छान एन्जॉय करतो...
तात्या, इतके वाईट दिवस का आले ? तुमच्याकडे पूजेच्या चकत्या (सीडी) नाहीत का ? माझ्याकडे आहे भरपूर ष्टॉक.

बाकी 'क्षणाचा सोबती' म्हणतात ते बरोबर आहे. नागरी वस्तीत राहण्याचा पहिला अधिकार माणसाचा आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

7 Mar 2010 - 1:43 pm | अविनाशकुलकर्णी

श्वान वस्तितुन जाताना हातात खाण्याचा डबा ठेवा....हा मार्ग बरा वाटतो..बाकि नसबंदि वगैरे च खर नाहि..

तुमच्याकडे पूजेच्या चकत्या (सीडी) नाहीत का ? माझ्याकडे आहे भरपूर ष्टॉक.

अप लोड करण्या साठी तात्यांचि परवांन्गी घ्या

नितिन थत्ते's picture

8 Mar 2010 - 2:03 am | नितिन थत्ते

>>पालीका/सरकार या प्राणीप्रेमी मंडळींच्या दबावाखाली एवढं का झुकतं

येथे त्यांचे हात न्यायालय नावाच्या कुणालाच उत्तरदायी नसलेल्या एण्टिटीमुळे बांधले गेलेले आहेत.

नितिन थत्ते

Dipankar's picture

8 Mar 2010 - 10:24 am | Dipankar

माझी अशी इच्छा आहे कि एक ट्रक भर कुत्री एका श्वानप्रेमीच्या बंगल्यात सोडावीत आणि मजा बघावी

आम्ही वाजंत्री (कृती पेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो)