मराठी माणूस म्हणजे अशिक्षित, दारूबाज, आळशी, गावठी ???............... का???

मंगेशपावसकर's picture
मंगेशपावसकर in काथ्याकूट
4 Mar 2010 - 10:46 am
गाभा: 

नमस्कार मित्रहो,

आमच्या ऑफिस मध्ये घडलेला एक प्रसंग सांगतो.
हल्लीच मी माझे टी. वाय. पूर्ण केले व नोकरीच्या शोधात होतो, एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये जॉबला हि लागलो, पण ट्रेनिंग च्या वेळी आम्हाला इंग्रजी व्याकरण, गणिती, यु . के एस्सेंट विषय होते. एका फिमेल ट्रेनर चा असा समज होता (अर्थात गैरसमज) कि मराठी मुले वर्नाक बोलतात,
तिने तसे बोलून हि दाखवले. सगळ्या उमेदवारांना एक पेसेज दिला व वाचायला सांगितले, आमच्या पैकी माझ्यासकट ब-याच मराठी मुलांनी तो पेसेज ऑफिशियली यु. के . असेंट मध्ये वाचून दाखवला व तिचा गैरसमज दूर केला. पण इतर मुलांनी १-२ जण वगळता कुणाहि अमराठीस तो धड वाचता हि आला नाही .
मला सांगायचे आहे कि इतर लोकांनी मराठी माणूस म्हणजे अशिक्षित, दारूबाज, आळशी, गावठी का ठरवलेला आहे ?
कामवाली बाई मराठीच का असते?
मराठी नवरा दारू पिऊन आपल्या बायकोला मारहाण करतो हे प्रत्येक हिंदी व दुर्दैवाने मराठी सिरिअल्स मध्ये का दाखवले जाते?
मराठी माणूस इंग्रजीत अक्षम आहे असे का भासवले जाते?
एम एन सी फर्म मध्ये मारवाडी,जैन, गुजराती मराठी माणसाकडे तिरक्या नजरेने का बघतात?
विधर्भात शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो. पण हिंदी न्यूज चानेलचे संपादक प्रभू चावला, आमचे माननीय कृषी मंत्री त्याला दारूबाज आळशी का म्हणतात?

जर उत्तर सापडेल तर जरूर कळवा!!

मला मराठी असल्याचा मनापासून गर्व वाटतो !!

प्रतिक्रिया

अभिरत भिरभि-या's picture

4 Mar 2010 - 11:06 am | अभिरत भिरभि-या

>> यु. के . असेंट
उच्चाराबाबत फक्त आपणच बाप आहोत.. :)
भय्या स्कूल ला इस्कूल म्हणतो .. गुज्जुभाई अवर हॉल ला अवर होल म्हणतो. (शिव शिव !!)
आणि सारे मद्राशी एच (चुकले .. त्यांच्या भाषेत हेच्च) चा घोळ करतात.
बंगाल्यांना व्हेल म्हणायला सांगा भेल करतील

>> मराठी माणूस म्हणजे अशिक्षित, दारूबाज, आळशी, गावठी का ठरवलेला आहे ?

मी तरी असे ऐकले नाही .. मला मराठी नाटक , गायक एकूण संस्कृती याबद्दल उलट आदरच आढळला आहे. कमी पैसेवाले म्हणून हिणावतात हे खरे .. पण तीच गुजराटी लोक येथे आपल्या सिनेमाबद्दल कौतुकाने बोलतात बघा

तेव्हा तुम्ही बळेच ही आत्म-प्रतिमा (self-image) तयार करू नका ?

>> मला मराठी असल्याचा मनापासून गर्व वाटतो !!
मला नाही वाटत गर्व वगरे .. वाटलाच तर अभिमान वाटतो :)
(मांजरेकरने एक चुकीचे वाक्य म्हटले तर साला लोक पण आंधळेपणाने उचलतात)

संदीप चित्रे's picture

5 Mar 2010 - 3:01 am | संदीप चित्रे

सहमत ...
मराठीतल्या 'अभिमान' ह्या शब्दाला हिंदीमधे 'गर्व' हा शब्द आहे.
मराठीमधे 'गर्व'चा अर्थ (थोडक्यात लिहायचा तर) 'माज' असा होतो !

शानबा५१२'s picture

4 Mar 2010 - 11:09 am | शानबा५१२

ह्यांचे एक हे कारण असु शकते :
महाराष्ट्रात मराठी माणुस का ईतरांना घेउन पुढे जातोय/जाव लागतंय यांला ते मराठी माणसाच्या प्रव्रुतीला कारणीभुत ठरवतात व म्हणून असे Weak Points बघतात मराठींमधे....

वेताळ's picture

4 Mar 2010 - 11:34 am | वेताळ

मला सांगायचे आहे कि इतर लोकांनी मराठी माणूस म्हणजे अशिक्षित, दारूबाज, आळशी, गावठी का ठरवलेला आहे ?
कामवाली बाई मराठीच का असते?

महाराष्ट सोडुन मराठी बाई इतर प्रांतात कशाला कुणाकडे कामाला जाईल. मराठी बाईकाचा कष्ट करण्यात बिहारी किंवा युपी वाला बायकाच नव्हे तर भय्ये देखिल हात धरु शकत नाहीत. मराठी बायकांना कष्टाची भाकर खायला आवडते.
विषयांतर होते आहे पण मराठी व्यतिरिक्त इतर प्रांतातल्या स्त्रिया शरिरविक्रय व शरिरप्रदर्शन व्यवसायात अधिक का आढळतात?बंगाल,केरल,तामिळनाडु,बिहार व युपी ह्या प्रांतातल्या तर अधिक असतात.
दारु बाबात म्हणाल तर महाराष्ट्रात फक्त दारुच लोकांना बिनघोर उपलब्द होत असते. इतर ठिकाणी दारु,अरक,गांजा,अफु,भांग हे सगळे पदार्थ सहज उपलब्द होतात.त्यामुळे मराठी माणुस फक्त दारुच पितो.
वेताळ

कवटी's picture

4 Mar 2010 - 1:41 pm | कवटी

>>दारु बाबात म्हणाल तर महाराष्ट्रात फक्त दारुच लोकांना बिनघोर उपलब्द होत असते. इतर ठिकाणी दारु,अरक,गांजा,अफु,भांग हे सगळे पदार्थ सहज उपलब्द होतात.त्यामुळे मराठी माणुस फक्त दारुच पितो.

हा मराठी माणसावर अन्याय आहे. याचा मी जाहिर निषेध करतो.
संबंधीत लोकानी लवकरात लवकर बाकीच्याही गोष्टी मराठी माणसाना उपल्ब्ध करून द्याव्यात अशी विनंती.

कवटी

खरं आहे!
प्रत्येक हिन्दि सिनेमातही कामवाली बाई मराठीच असते.आपण याला त्या लोकांची मानसिकता म्हणूयात.पण हे बदलले पाहिजे.त्यासाठी काय करता येईल यावर चर्चा करुयात का आपण?

प्रशु's picture

4 Mar 2010 - 4:04 pm | प्रशु

आहो इत्तरांचं सोडाच पण काल आपल्या मराठमोळ्या आशाताईंनी उगाच मराठी माणसाला खडे बोल एकवले. काय म्हणे तर तो आळशी आहे.. वे॑गरे....

मराठी माणुस मोठा झाला कि तो मराठी रहात नाहि हेच खंर्....(सचीन, आशा (ह्यांना ताई न म्हट्लेलंच बर आज पासुन)

चिरोटा's picture

4 Mar 2010 - 5:00 pm | चिरोटा

वर अ.भि. ने म्हंटल्याप्रमाणे आपण बळेच तशी प्रतिमा तयार करताय असे वाटते. बंगाली/तामिळ/कन्नड माणसांची जशी प्रतिमा भारतात/बाहेर आहे तशी मराठी माणसाची नाही हे मात्र मान्य करावे लागेल.गेल्या काही वर्षातले धर्म/जात्/भाषेवरुन होणारे राजकारण व लोकांचा असलेला पाठिंबा त्या प्रतिमेला जबाबदार आहे.
भेंडी
P = NP

विसोबा खेचर's picture

4 Mar 2010 - 7:07 pm | विसोबा खेचर

कोण अमराठी काय म्हणतो तो गेला बाझवत..!

आम्ही आहोत हे असे आहोत.. आणि ते कसे आहोत ते इतरांकडून जाणून घ्यायची आम्हला इच्छा नाही आणि आम्ही तो अधिकारही कुणाला दिलेला नाही..

(मराठी) तात्या.

शुचि's picture

4 Mar 2010 - 7:16 pm | शुचि

तात्यांचं म्हणणं १००% पटलं. माणूस डिफेन्सिव्ह केव्हा होतो जेव्हा त्यालाही ती गोष्ट सूक्ष्म पातळीवर पटते आणि बोचते.
अरे आपल्याला का पटावी/बोचावी?

जेव्हा इतरत्र मधुरा-भक्तीच्या नावाखाली सर्रास गैर गोष्टींचं स्तोम माजलं होतं तेव्हा आपल्या ज्ञानेश्वरांनी "माऊली" हे भगवंताचं रूप लोकांना दाखवलं.

हे अ-मराठी लोक जे मुद्दाम काड्या घालतात ते फाट्यावर मारण्याच्या लायकीचे आहेत.

एक मात्र नक्की - जातीपातीच्या नावाखाली आपल्या लोकांना आपण दूर नाही करता कामा. एकजूट आणि ती ही प्रेमानी हवी.

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

टारझन's picture

4 Mar 2010 - 8:05 pm | टारझन

वा वा वा !! जल्ला कं प्रतिसाद हाय :)

-(प्रेमाने एकजुट होण्यास उत्सुक) टारझन

मिसळभोक्ता's picture

5 Mar 2010 - 2:58 am | मिसळभोक्ता

यु . के एस्सेंट

हे काय प्रकरण आहे ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

मुक्तसुनीत's picture

5 Mar 2010 - 3:13 am | मुक्तसुनीत

"कॉकनी"पणा करू नका बॉ फार !

अहो साहेब, अशी जाणीव करुन देणारी व्यक्ती तुमच्या संपर्कात आली तर्र त्या व्यक्तीला शब्दांचे जोडे हाणा की! (खर्रे खुर्रे जोडे मारणे शक्य नसेल तर्र)
आपल्या सर्वांची ही जबाददारी आहे की हा 'असला समज' जर काही लोकांत असेल, तर तो प्रत्येकाने पुढाकार घेऊन 'वेळीच' मोडीत काढला पाहिजे..

एक उदाहरण देतो तर आता मी बंगळूरात आहे, माझ्या कार्यालयात अखिल भारतीय 'खिचडी' आहे (विविध प्रांतीय जनमानसाची)..

(पुढील लेखनात बरेच हिंदी आले आहे.. प्रसंग जसाच्या तसा निवेदन करण्यासाठी मला ते गरजेचे वाटले)

काही दिवसांपूर्वी 'राज ठाकरे' यांचे नाव जेव्हा येनकेन कारणाने प्रकाशात होते तेव्हा 'उत्तरे'कडील काही 'प्रभुतीं'नी त्याबद्दल (किंबहुना 'त्याविरूध्द') बोलायला सुरुवात केली.. हळूच त्यांनी त्यांचा मोर्चा माझ्याकडे वळवला आणि म्हणाले,
''अर्रे तुम्हारा 'राज' क्या हल्ला गुल्ला मचा रहा है यार, सबको परेशान करके रखा है!''
मी त्यांना उत्तर दिले ते असे..
''अर्रे जिसको जो भाषा समझ मे आती है, उसी में बोलना चाहिये..
'राज'ने पहले मुंह से बोला था.. वो भाषा शायद कुछ लोगोंके पल्ले नही पडी.. न्यूज वाले भी तभी शांत थे.. लेकिन जब 'डंडे' से समझाना शुरू किया, तो सबको उनकी भाषा समझ आयी.. न्यूज वालोंको भी!''

ह्यावर त्यांनी मला 'डिप्लोमॅटिक' संकटात टाकायचे ठरवले आणि म्हणाले,
''ओ, तो तू 'मनसे' को सपोर्ट करता है क्या?'' (मागून एक क्षीण आवाज आला.. ''अरे शायद वो 'शिवसेना'वाला है.. उसके डेस्क पे 'शिवाजी राजा की तसवीर है'')
मी ह्यावर उत्तरलो..
''पहले तो मै ये 'सपोर्ट' पे बिलीव नही करता.. मेरा पॉलिसी ये है की, अगर आपको कुछ अच्छा लगता है, फिर वो कोई 'विचार' हो, या कोई 'पक्ष' हो, तो उसका सिर्फ सपोर्ट मत करो.. उसका प्रसार करो या उसका एक भाग बन जाओ.. अगर आपकी भाषा मे बोला जाये तो मै हर एक 'व्यक्ती' या 'पक्ष' या हर उस 'विचार' को सपोर्ट करूंगा जो मेरे लोगो के लिए, मेरे महाराष्ट्र के लिए कुछ अच्छा सोचेगा या कुछ अच्छा करेगा.. अगर इसमे किसीको कोई गलत बात लगती है तो 'आय डोन्ट केअर'!
हम में से हर किसीको अपने अपने प्रांत या राज्य के बारे में अभिमान है, इसमें इतना 'इश्यू' बनाने वाली क्या बात है?''

हा प्रसंग इथे सांगण्याचे कारण असे की, 'मराठी' माणसाला 'गॄहीत' धरण्याच्या प्रवॄत्ती मुळेच अशी शेलटी विशेषणे लावण्याची हिंम्मत होते..

मराठी माणूस म्हणजे अशिक्षित, दारूबाज, आळशी, गावठी ???........... अस्सं काय ??

इतरांची ती 'कॉकटेल पार्टी', आणि मराठा प्यायला बसला तर्र दारूबाज काय?
इतरांचा तो 'लेझ्यर ब्रेक, स्पा ब्रेक' आणि मराठा जर कुठे विसावला तर्र आळशी काय?
इतरांच्या छोट्या खेड्यातील लोकं म्हणजे 'स्मॉल टाऊन-स्वीट पीपल' आणि आमची लोकं म्हणजे 'गावठी' काय!!

एकच सांगतो,

पैसे फेकून डिग्र्या मिळवण्यार्‍या उत्तरेच्या लोकांपेक्षा, शेतात राबणारा आपला अशिक्षित मराठा बरा!

खबरदार जर वाटेला जाल तर्र..

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

नाद्खुळा's picture

5 Mar 2010 - 4:33 pm | नाद्खुळा

महाराष्ट्राने दुसर्यांसाठी दार कायम उघडून दिली
उपद्रवी लोण्ध्यानी मराठी मातीच बिघडून गेली

धोतर लेन्ग्याची लाज वाटते आज मराठी माणसाला
बर्गर चाच वास येतोय मराठमोळ्या कणसाला

मराठी मातीतच खेळायचं असं म्हणत बसलो
इथच सांगतो मित्रानो आपलं गणित फसलं

अटके पार लावलेला झेंडा जरा आठवा
टाच मारून याच मातीतून मराठी, गल्ली गल्लीत पोचवा

शिवाजी राजे भोसले (चित्रपट) पाहून ३ तास का होईना मन पेटलं
मराठी माणूस जागा झाल्याच क्षणभर तरी वाटलं

कल्चर बदललं ,लावणी संपली ,पोवाद्याचाही पॉप झाला
मराठीच्या मर्म वरती परसंस्कृतीचा आघात झाला

द्या पुन्हा गर्जना SS , तोच मर्द मराठी ललकार
दरी खोर्याच्या महाभूमिचे स्वप्नं करू साकार