विंडोज व्हिस्टा मध्ये काही गेम्स चालत नाहीत त्यासाठी काय करावे? व्हिस्टा सोबत आणखी एक ओ. एस. कशी टाकावी?

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
25 Jan 2010 - 10:06 am
गाभा: 

काही गेम्स मी जेव्हा "विंडोज व्हिस्टा" मध्ये इंन्स्टॉल करायला जातो, तेव्हा एक मॅसेज येतो की, धीस इज नॉट अ वॅलीड वीन ३२ ऍप्लिकेशन. त्यासाठी मी एक "डॉस बॉक्स" हा फ्री प्रोग्रॅम टाकून पाहिला, तरीही ते गेम रन करता येत नाही. पण, व्हिस्टा मध्ये "डॉस बॉक्स" च्या आधारे "डॉस गेम्स" चालतात (उद- डेव्ह, बायो-मेनॅस, लायन कींग वगैरे).

पण, विंडोज व्हिस्टा" मध्ये नीड फॉर स्पीड, तसेच व्ही कॉप वगैरे हे गेम्स चालत नाहीत. त्यासाठी काय करावे लागेल?

किंवा, मग व्हिस्टा असतांना आणखी एक जुने विंडोज चे व्हर्जन (एक्स पी किंवा ९८) वेगळया ड्राईव्ह वर मी ट्राय केले पण ते होत नाही.

मग जुने गेम्स टाकण्यासाठी काय करावे?

दोन्ही ओ. एस. (ऑपरेटींग सिस्टीम) हव्या असतील तर काय करावे?

प्रतिक्रिया

मि.इंडिया's picture

25 Jan 2010 - 10:39 am | मि.इंडिया

एकाच मशीनर दोन ओ.एस. चालतात का हे माहीत नाही. पण मी खूप पूर्वी दोन हार्ड डिस्क एका मशीनला लावल्या होत्या. दोन्हीवर वेगवेगळ्या ओ.एस. होत्या. मशीन बूट करताना हवी ती हार्ड डिस्क निवडून वापरता येते. मात्र चालू मशीनवर बदलता येत नाही.

प्रदीप

देवदत्त's picture

25 Jan 2010 - 10:55 am | देवदत्त

एक मशीनवर, एकाच हार्डडिस्क वर दोन ओएस चालतात. सविस्तर नंतर लिहितो.

चन्द्रशेखर सातव's picture

25 Jan 2010 - 11:29 am | चन्द्रशेखर सातव

सोबती साहेब,

दोन ओ.एस. एकाच मशीन वर निश्चित चालतात,पण आधी vista ओ.एस.टाकली असेल तर ती XP किवा ९८ सारख्या जुन्या ओ.एस install करून देत नाही.
थोडक्यात म्हणजे vista ओ.एस जुन्या ओ.एस वर दादागिरी करते.त्यावर उपाय म्हणजे vista काढून XP टाकणे आणि नंतर मग त्यातूनच दुसऱ्या drive वरती vista टाकणे.त्याहीपेक्षा जालीम उपाय म्हणजे vista टाकूच नका
भिक्कार ओ.एस आहे ती! Windows 7 हि ओ.एस vista पेक्षा कैक पटींनी चांगली आहे. त्यामध्ये सगळी applications बिनबोभाट चालतात,speed पण उत्तम आहे.

देवदत्त's picture

25 Jan 2010 - 8:55 pm | देवदत्त

सातव साहेब,
ती व्हिस्टाची दादागिरी नाही. सर्वच विंडोजमध्ये तसे आहे. एखादी आवृत्ती टाकताना ती आवृत्ती आधीच्या आवृत्तीचे विंडोज स्थापित आहे का ते पाहते. पण नंतरच्या आवृत्तीबद्दल त्याला माहीत नसते म्हणून ती अडचण येते. विंडोज स्थापित करताना, Win95-> Win98->XP-> Vista -> Window 7 अशा क्रमाने कराव्यात.
-------------------------------------------
दुपारनंतर पुन्हा प्रतिसाद लिहितोय. म्हणून प्रतिसादांची संख्या वाढवत नाही. इथेच अद्ययावत करतो.

व्हिस्टा नंतर मायक्रोसॉफ्टने संगणक सुरू करायच्या प्रक्रियेत थोडा बदल केला, त्याची मला पूर्ण माहिती नव्हती, जी त्यांच्या संकेतस्थळावर मिळाली. पण क्रम तोच राहील. जास्त माहिती मायक्रोसॉफ्टकडूनच येथे मिळेल.

दिपक's picture

25 Jan 2010 - 11:34 am | दिपक

वेगवेगळे पार्टिशन करुन तुम्ही वेगवेगळ्या ओ.एस. टाकु शकता. पण दुसरी ओ.एस. वापरण्यासाठी तुम्हाला पीसी रिस्टार्ट करावा लागेल. विस्टा मध्येच तुम्हाला विन्डोज एक्स्पी किंवा अन्य ओ.एस. वापरायची असेल तर विमवेयर वर्कस्टेशन चांगले टुल आहे.

नीड फ़ॉर स्पीड विस्टावर चालण्यासाठी इथे दिलेले सोल्युशन ट्राय करुन पहा.

विकास's picture

25 Jan 2010 - 11:06 pm | विकास

एकाच संगणकावर दोन ओएस टाकण्यासंबंधीचा अनुभव येथे विस्तृत आहे तसेच तिथली चर्चा देखील अधिक माहीती देईल. अर्थात, त्यामुळे तुम्हाला हवे असलेले गेम्स त्यावर चालतील का ते माहीत नाही.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

तो वापरून बघितला का?

XP चा एक virtual machine तयार केलं जातं आणि ते विस्टावर चालू शकतं.

हे मायक्रोसॉफ्ट नेच पुरवलं आहे त्यांच्या साईट वरून २ प्रोग्रॅम्स डाऊन्लोड करावे लागतील.

विम्वेयर तर उत्तम सोल्युशन आहे..कुठलिही os चालवू शकता.

टारझन's picture

26 Jan 2010 - 10:11 pm | टारझन

एकेक कमेंट्स वाचून हहपुवा झाली =))

देवदत्तची कमेंट मात्र तथ्य असणारी आहे :)

देवदत्त's picture

26 Jan 2010 - 10:31 pm | देवदत्त

आणखी एक..
व्हिस्टा मध्ये गेमच्या EXE च्या Properties मध्ये काँपॅटीबिलिटी मोड मध्ये Win XP निवडून प्रयत्न करा. XP मध्ये चालणारे काही सॉफ्टवेयर व्हिस्टा मध्ये चालत नव्हते, त्यांना ह्या प्रकारे मी वापरण्याजोगे केले.

VMWare, MS Virual PC मध्ये आपण आभासी संगणक तयार करू शकतो, जे पूर्णपणे खर्‍या संगणकाप्रमाणेच चालते. पण त्यात आपल्या संगणकाची मेमरी विभागली जाते. त्यामुळे नीड फॉर स्पीड किंवा तत्सम गेमकरीता चांगला वेग आणि कार्यक्षमता पाहिजे असेल खर्‍या संगणकावरच टाकावे असे मला वाटते.