ल्यापटाप घ्यायला सल्ला हवाय

साधामाणूस's picture
साधामाणूस in काथ्याकूट
26 Dec 2009 - 11:35 pm
गाभा: 

एक नवीन laptop घ्यायचा विचार आहे. जाणकार मदत करतील काय?
बजेट : रू. ३०,००० ते रू. ३५,०००.
सम्भाव्य वापर : कार्यालयीन काम (Presentations, लिखाण, आंतरजालावरून आवश्यक ती माहिती गोळा करणे)
इतर गोष्टी दुय्यम आहेत.
HCL, HP, DELL, SONY व SAMSUNG brands मधील योग्य पर्याय असावा.आन्तरजालावर HCL व HP विषयी काही नकारात्मक प्रतिसाद बघायला मिळाले. अन्यथा hp compaq core 2 duo (610 VB) आणि HCL ME 4110 मधील एक निवडायचा होता.
धन्यवाद!
-साधा माणूस

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

27 Dec 2009 - 12:49 am | अविनाशकुलकर्णी

बजेट वाढवा

सौरभ.बोंगाळे's picture

27 Dec 2009 - 3:06 am | सौरभ.बोंगाळे

I shall always recommend HP... (not HP Compaq)... here in US on hp.com you can configure laptop as you desire for online purchase... not sure if this facility is available in India...

being a student I found HP provides great configuration at very affordable price. They look good, nice designs, imprints, provides additional hardware facilities, like finger-print recognition, inbuilt webcam+mic, dual layer lightscribe (allows to print labels) DVD writer (now they provide Blu-Ray DVD players), high capacity hard drives, advanced RAM etc... these features are available in other machines also but comparatively expensive... (for Game lovers/Heavy users like Graphics Designers/Animators HP gives best configuration)

about DELL laptop (नाम बडे और लक्षण खोटे), they are box-type bulky and heavy... after some use you will find the hinges gets loose (flap shakes a lot due to that), pretty expensive when compared to the configuration they provide...

SONY is good but config to price ratio is low...

don't know about Samsung...

considering your use I would like to suggest one more brand name TOSHIBA... they are way cheaper than other brands, decent configuration.. (+1 for their sound output)

निनाद's picture

27 Dec 2009 - 3:41 am | निनाद

दोन गोष्टी पाहा
१. वजन - साडेतीन किलो वजन सदैव उचलून नेणे ही एक हमाली असते!
२. विजेरी - कितीवेळ बॅटरी चालते हे पाहून घ्या २ तास हा वेळ अनेकदा पुरेसा नसतो!

शक्य तोवर एच पी घ्या.
एकुणच बरा आहे. त्याची बांधणीपण वेगळी आहे हे नक्की.
सॅमसंग मला तरी बरा वाटला नाही.

नवीन आलेले छोटे दहा इंची लॅपटॉप पाहिलेत का?
एक ते सव्वा किलो वजन, सुमारे ६ तास बॅटरी
या निकषांवर उत्तम उतरतात.

शक्य असेल तर कुणाच्या सल्ल्यावर जाऊ नका. स्वतः किमान २ तास वापरून पाहा आणि म्गच घ्या!

-निनाद

II विकास II's picture

27 Dec 2009 - 8:43 am | II विकास II

मी Acer Timeline लॅपटॉप घेतला. ३५,००० ला मिळाला.
विस्ता होम प्रिमियमः आता विंडोस ७ मिळत असेल;
३ जीबी रॅम
३२० जीबी हार्डडिस्क
१५.६" स्क्रीन

साधारणतः ६-७ तास बॅटरी चालते.
घरगुती वापरासाठी चांगला आहे.

दशानन's picture

27 Dec 2009 - 12:38 pm | दशानन

साधारणतः ६-७ तास बॅटरी चालते.

गटण्या... अबे बॅटरी आहे की इनव्हर्टर तुझ्याक्डे =))
लाईफ मध्ये पहिल्यांदाच वाचतो आहे ६-७ तास बॅटरी बॅक-अप. नुस्ता चालू करु सोडून दिलेला टाईम ट्रॅक केला आहेस काय बे ???

एचपीच्या बेस्ट न बेस्ट मॉडेल देखील ३.५-४ च्यावर बॅक्-अप देत नाही सर्वात जास्त बॅक-अप साठी सोनी चांगला ४.- ४.५ त्यांचा पण लास्ट.

©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©

देवदत्त's picture

27 Dec 2009 - 1:04 pm | देवदत्त

मी ही पहिल्यांदाच ऐकले ६/७ तास. :) मस्तच आहे मग.

तुम्ही स्वतः तपासले आहे की कंपनीचे म्हणणे आहे? नाहीतर गाडीच्या कि.मी/लीटर प्रमाणे असायचे. मानक चाचणी परिस्थिती (standard test conditions) मध्ये १०० कि.मी/लीटर आणि प्रत्यक्षात वापरायला काढली तर ६० ते ७० कि.मी/लीटर. ;)

असो,
मी ऐकल्याप्रमाणे एच पी आणि डेल चे लॅपटॉप चांगले आहेत.

टारझन's picture

27 Dec 2009 - 10:45 pm | टारझन

हाहाहा !! ६ ते ७ तास ? अर्रे ये तो कुछ भी नही .. आपला काँपॅक प्रिसारियो सी७५१आयएनआर आहे :) झकास ... तो तर अनलिमिटेड चालतो !
इव्हन बॅटरी काढली तरी चालतो !

असो ! आपण कोणाला काय घ्यावं ह्याचे सल्ले देणंच टाळतो .. च्यायला घेणारा शेवटी आपल्याच मनातली वस्तु घेतो .. फक्त गावभर चर्चा करतो ... (असा अनुभव आहे :) )
त्यामुळे तुम्हाला जो आवडेल तो ल्यापटॉप घ्यावा :)

- || टॉपक्लास ||

विजुभाऊ's picture

29 Dec 2009 - 1:01 pm | विजुभाऊ

तो तर अनलिमिटेड चालतो !
इव्हन बॅटरी काढली तरी चालतो !

निव्वळ रेप्युटेशनवर इतका वेळ तरी कॉम्पॅक चाललाच पाहिजे

असो .
पम्वजनाचे मात्र नीट बघा. नुस्त्या ल्याप टॉप चे वजन कमी असून चालणार नाही पॉवर सप्लायचेही वजन कमी असावे. कारण ल्यापटॉप नेतो तेथे त्याचा अ‍ॅडाप्टर सुद्धा न्यावा लागतो. दोन्हीचे वजन म्हणजे खांदादुखी ही हमखास होते.

II विकास II's picture

28 Dec 2009 - 3:14 am | II विकास II

>>तुम्ही स्वतः तपासले आहे की कंपनीचे म्हणणे आहे?
मी स्वतः पाहीले आहे. माझा लॅपटॉपची बॅटरी एवढी चालते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Dec 2009 - 8:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>गटण्या... अबे बॅटरी आहे की इनव्हर्टर तुझ्याक्डे

-दिलीप बिरुटे

स्वानन्द's picture

27 Dec 2009 - 9:10 am | स्वानन्द

६ -७ तास !!! :O
आइला माझा HP laptop पहिल्यापासून दीड ते दोन तास बॅटरीवर चालतो.

६-७ तास आज प्रथमतःच ऐकतो आहे!!!

स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

नीलकांत's picture

27 Dec 2009 - 9:50 am | नीलकांत

मागे मी असाच प्रश्न विचारला होता. त्यावेळेसच्या काही प्रतिक्रिया कामास येतील म्हणून हा संदर्भ- येथे बघा

अविनाशकुलकर्णी's picture

27 Dec 2009 - 10:24 am | अविनाशकुलकर्णी

http://pune.quikr.com/Laptops-Desktops/w1235
इकडे चेक करा......

डेल चा १५४५ मॉडेल घ्या. त्यात तुम्हाला २ जीबी/३जीबी ह्या फरकात दोन मॉडेल मिळतील.१५४५ बरोबर विस्टा होमे मॉडेल तुम्हाला ३६७५० च्या आसपास मिळेल. एसर मध्ये अल्ट्रास्लिम मॉडेल चा बॅटरी बॅक अप छान मिळतो.तो साधारण ड्युअल कोअर, ४जीबी ३२० ,जीबी
चा ३३५०० ल मिळतो.
वेताळ

II विकास II's picture

28 Dec 2009 - 3:17 am | II विकास II

>>एसर चे नवे लॅपटॉप आले आहेत ते ८ तास बॅटरी बॅक अप देतात.
बरोबर

प्रभो's picture

27 Dec 2009 - 11:16 am | प्रभो

लेनोवो G सिरीज चे लॅपटॉप्स चांगले आहेत...

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

Pl. contact
www.emainframe.com/list

जागल्या

साधामाणूस's picture

27 Dec 2009 - 5:36 pm | साधामाणूस

आपणा सर्वाना सल्ल्याबद्दल धन्यवाद!
आशा आहे की या माहितीचा मला निश्चितच उपयोग होईल.
-साधा माणूस

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Dec 2009 - 12:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

टिकाऊ आणि उत्तम दर्जा हवा असेल तर पूर्वीचे आय.बी.एम. आता लेनोव्हो, किंवा डेलला पर्याय नाही. सोनीच्या लॅपटॉपबद्दल चांगलं ऐकलं आहे पण खूप महाग असल्यामुळे कधीच घेतला नाही आहे.
माझ्या अनेक मित्रांनी, ओळखीच्यांनी HCL, HP, Acer वगैरे विकत घेऊन नस्ता मनस्ताप विकत घेतल्याचं पाहिलं आहे.

अदिती

विशाल कुलकर्णी's picture

28 Dec 2009 - 12:52 pm | विशाल कुलकर्णी

<<<इतर गोष्टी दुय्यम आहेत.>>>>

इतर मध्ये नक्की काय काय मोडते? ..... ते पण स्पष्ट करणार का? >:) >:)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

अविनाशकुलकर्णी's picture

28 Dec 2009 - 5:59 pm | अविनाशकुलकर्णी

साधा माणुस..लॅपटॉप घेत्ल्यावर पार्टीच पण बघा जरा....मेनु साठी श्री गणपा यांचे जिफ बघा