खरडवही आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in काथ्याकूट
16 Dec 2009 - 11:44 am
गाभा: 
  1. इतरांच्या खरडवहीत खरडण्याचा हक्क मिळवण्यासाठी नक्की काय पराक्रम गाजवावा लागतो ते कुणी सांगेल का?
  2. वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांपैकी हा एक दिसतो. त्यामुळे वाविप्र मध्ये त्याविषयी माहिती टाकल्यास बरे होईल असे वाटते. तसे करता येईल का?
  3. वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांना कुणी उत्तरे देताना दिसत नाही. त्याची व्यवस्था होऊ शकेल का?

अग्रिम पण चिंताग्रस्त ( :S काय करणार? स्वभावाला औषध नाही) धन्यवाद.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

16 Dec 2009 - 1:05 pm | अवलिया

श्री रा रा चिंतातुरजंतुजीसाहेब

आपण उपस्थित केलेले प्रश्न वरवर पहाता सामान्य असले तरी आपल्या दृष्टीने त्यांचे महत्व आणि गांभीर्य अपार आहे याची मला जाणीव आहे. खरेतर सर्वसामान्य सदस्यांच्या अडीअडचणींना सोडवण्यासाठी काही ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांची मिपाच्या मालकांनी नेमणुक केली आहे, परंतु सध्या कार्यबाहुल्यामुळे त्यांना (पक्षी - मालकांना आणि अशा लोकांना) आपल्या धाग्याकडे पहाण्यास आणि आपल्या प्रलंबित मागण्यांना न्याय देण्यास विलंब होत असेल असे वाटते. तरी आपण शांत चित्ताने प्रतिक्षा करावी. असे म्हटले जाते की उसके घर देर है मगर अंधेर नही.. हेच इथेही लागु पडत असावे असे समजुन हरि हरि करत ईश्वरचिंतनात वेळ व्यतीत करावा. दुर्भाग्याने काही दिवस अथवा मास उलटुनही न्याय्य न मिळाल्यास पुन्हा धागा टाकावा.

धन्यवाद.

--अवलिया

प्रमोद देव's picture

16 Dec 2009 - 1:20 pm | प्रमोद देव

खरडवही आणि व्यनीची सुविधा देण्याचे सगळे अधिकार फक्त तात्याकडे आहेत.

टारझन's picture

16 Dec 2009 - 1:29 pm | टारझन

खरडवही आणि व्यनीची सुविधा देण्याचे सगळे अधिकार फक्त तात्याकडे आहेत.

खुलाश्याबद्दल धन्यवाद देव सर !

- खुलासावडी

अवलिया's picture

16 Dec 2009 - 1:38 pm | अवलिया

श्री रा रा प्रमोदजी देवजीसाहेब

आपल्या तत्परतेबद्दल आभार. परंतु आपण माहिती पुरवतांना केवळ तात्याकडे अधिकार आहेत असे म्हटले आहे. नवीन सदस्यांना तात्या कोण, काय हे माहित असण्याची शक्यता नसते. अशा वेळेस आपल्यासारख्या संपादकांनी तात्यांचा सदस्य क्रमांक, सदस्य नाव इत्यादींची नीट माहिती देवुन सदस्यांना मदत करायला हवी. त्याचप्रमाणे सदर सदस्याला काही अडचण आहे अशा अर्थाची खरड वा व्यनी तात्यांना लिहुन, अशा प्रकारे तात्यांना कळवले आहे असा दिलासा सदर सदस्यांना द्यायला हवा असे मला वाटते.

आपल्याला काय वाटते एक संपादक या नात्याने ?

धन्यवाद !

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

16 Dec 2009 - 1:54 pm | परिकथेतील राजकुमार

माननीय श्री. अवलिया-जी ह्यांच्याशी तहे-दिल सहमत आहे. अतिशय चिंतनिय व सुयोग्य असे विचार आपल्या प्रतिसादात दिसत आहेत.

नविन येणार्‍या सदस्यांसाठी कोण म्हणजे कोण हे समजणे थोडे अवघड असते. अशावेळी संस्थळावरील जेष्ठ व्यक्तींचे त्यांना मार्गदर्शन मिळाल्यास, त्यांची (पक्षी : नव सदस्य) पुढीच वाटचाल हि सुखसोयींनी समृद्ध व भरभराटीची होईल असे वाटते.

मिपा परिवार असा अभिमानाने आपण ह्या संस्थळाचा उल्लेख करतो. त्यामुळे नविन आलेल्या सदस्याला परिवारातील जेष्ठांकडून तत्परतेने सह्हाय पुरवण्यात आल्यास, त्याला ह्या संस्थळावर आपल्या पायावर उभे राहण्यासाठी मदत मिळाल्यास तो ह्या परिवाराशी सुखनैव तादात्म्य पावेल असे वाटते.

कनिष्ठ
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

प्रमोद देव's picture

16 Dec 2009 - 1:56 pm | प्रमोद देव

श्री. अवलियाजी साहेबजी, तात्या म्हणजे श्री. विसोबा खेचर हे मिपाचे मालच, चालक आणि सर्वेसर्वा आहेत हे आपल्यासारख्या ज्येष्ठ सदस्याला माहित असूनही आपण ते नव्या सभासदांना सांगत नाही आहात हे पाहून आम्हाला तीव्र दु:ख होत आहे. निदान आपल्याकडून तरी आम्ही अशी अपेक्षा करत नव्हतो.

असो. मर्जी आपली.

श्री रा रा प्रमोदजी देवजीसाहेब

आपल्या वयाचा, अनुभवाचा, ज्ञानाचा अधिक्षेप करुन आपल्याला दुखवावेसे आमच्या मनात नाही याच एकमेव कारणामुळे आम्ही आम्हास ज्ञात असलेल्या गोष्टी आमच्या लहान मुखाने (पक्षी - टंकुन) सांगण्याचा अपराध केला नाही. आम्ही आपल्यासारख्या ज्येष्टांचा मान राखण्याचा मनापासुन प्रयत्न केला असुन त्या प्रयत्नांचे कौतुक ऐकण्याची आमची अभिलाषा आपल्या प्रतिसादाने उध्वस्त झाली असुन "हेची फल काय मम तपाला " असा निराश झंकार आमच्या हृदयातुन प्रतित होत आहे. अपेक्षाभंगाचे दूःख सहन करण्याची आमची पात्रता दिवसेंदिवस वृद्धींगत होत असतांना आपल्यासारखे ज्येष्ठ त्या पात्रतेची परिक्षा पहात असतात असे समजुन आम्ही आनंदाने जगत आहोत हे निश्चितच.

--अवलिया

चिंतातुर जंतू's picture

16 Dec 2009 - 2:17 pm | चिंतातुर जंतू

प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद. आमची चिंता आपल्या प्रतिसादांमुळे किंचित हलकी झाली. आम्हाला व्यक्तिगत निरोप पाठवण्याचीही मुभा नाही, अशी त्यांमुळे आमच्या ज्ञानात भर देखील पडली. आताच आम्ही श्री. रा. रा. विसोबा खेचर यांना आमच्या मगदुरानुसार विनंती केली आहे. आता आम्ही (चिंताग्रस्तच पण थोरामोठ्यांच्या प्रतिसादांमुळे अंमळ आश्वस्त!) प्रतीक्षेत.
- चिंतातुर जंतू :S
"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||

चिंतातुर जंतू's picture

16 Dec 2009 - 6:11 pm | चिंतातुर जंतू

आमच्या व्यक्तिगत समस्येचे श्री. रा. रा. तात्यासाहेबांनी तातडीने निराकरण केले. त्यामुळे आम्हाला झालेला आनंद आणि त्यांचे मनःपूर्वक आभार आम्ही या सार्वजनिक स्थळी व्यक्त करतो. वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांमध्येही या प्रश्नाचा (आणि त्याच्या तपशीलवार उत्तराचा) समावेश झाला की आम्हांस झालेला आनंद द्विगुणित होईल आणि आम्ही आमची चिंता इतरत्र वळवू. कळावे.
- चिंतातुर जंतू :S
"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||

परिकथेतील राजकुमार's picture

16 Dec 2009 - 6:30 pm | परिकथेतील राजकुमार

माननीय श्री. चिंतातुरजंतू-जी,

वाह ! छान, बहोत बढीया.

मालकांबरोबरच आपण संस्थळावरील जेष्ठांचे देखील आभार मानले असतेत तर दुधात साखरच पडली असती. तसेच हे आभार प्रदर्शन बघुन माननीय श्री. अवलिया-जी ह्यांच्या पिंडाला देखील कावळा शिवला असता.

©º°¨¨°º© परालिया ©º°¨¨°º©
http://avaliyapremi.blogspot.com/

चिंतातुर जंतू's picture

16 Dec 2009 - 6:48 pm | चिंतातुर जंतू

मालकांबरोबरच आपण संस्थळावरील जेष्ठांचे देखील आभार मानले असतेत तर दुधात साखरच पडली असती.

ज्येष्ठांनी आमची करमणूक केली त्याबद्दल त्यांचे आभार मानावे असा आमचा मानस होता, पण त्यामुळे आमचा प्रतिसाद अवांतर ठरून त्याचे संपादन होईल की काय, अशी आम्हास भीती वाटली. म्हणून 'थोरामोठ्यांच्या प्रतिसादांमुळे अंमळ आश्वस्त' एवढ्यावरच थांबलो. असो.
- चिंतातुर जंतू :S
"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||

परिकथेतील राजकुमार's picture

16 Dec 2009 - 6:51 pm | परिकथेतील राजकुमार

आपल्या लेखनात 'पेशवे' दिसले.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

मी-सौरभ's picture

16 Dec 2009 - 11:57 pm | मी-सौरभ

खव आणि खफ वापरायला परवानगी पाहीजे .............

:W

-----
सौरभ :)

मी-सौरभ's picture

20 Dec 2009 - 5:31 pm | मी-सौरभ

मला खव आणि खफ वापरायला परवानगी पाहीजे .............
:W

-----
सौरभ :)

आकडा's picture

17 Dec 2009 - 9:49 am | आकडा

या बाबतीत मालकांना विनंतीवजा प्रश्न की नवीन सभासदांसाठी, ज्यांना खव, खफ, व्यनी वापरता येत नाहीत त्यांच्यासाठी शक्य असल्यास डाव्या बाजूला (जिथे खव, खफ इ.च्या लिंक्स आहेत) तिथे "मालकांशी संवाद" अशी काही सोय करता येईल का?