(काढदिवस)

टारझन's picture
टारझन in जे न देखे रवी...
16 Dec 2009 - 5:03 pm

काढ दिवस ... काढ दिवस (कोरस)

हे रोजचेच झुरणे, सोसण्यात वेळ गेला
फ्लॅट हर विकेंडला शोधण्यात वेळ गेला ||१||
(कोरस)

जमवु किती किती मी, वाचवू किती किती मी
दमडीस दमडी जोडण्यात वेळ गेला ||२||
(कोरस)

प्रेस नसता कपडे , संपला टुथपेस्ट ही
गार पाण्याने अंघोळ करण्यात वेळ गेला ||३||
(कोरस)

अजमावुनी मेसची चपाती चावताना
जबड्यास वात का आला? गिळण्यात वेळ गेला ||४||
(कोरस)

मासिक बजेट बसवताना, हळूच जॉब शोधताना
दहा तारखेलाच मंथ एंड कशी बघण्यात वेळ गेला ||५||

म्हणे काढ दिवस येतात तसे , जमव येक्स्पिरेंस पाठीशी ..
जय जय म्हाराष्ट्र म्हणे टारू बाळा ||शरदिनी||

बिभत्सनृत्य

प्रतिक्रिया

संजा's picture

16 Dec 2009 - 5:11 pm | संजा

खुपच छान विडंबन.
जातील जातील. दिवस जातील. शुभेच्छा.

jaypal's picture

16 Dec 2009 - 5:27 pm | jaypal

असा हताश होउ नकोस जंगलच्या राजा. अशी वेळ प्रत्येकावार कधी ना कधी येतेच.
ये दिन भी बदलेंगे/ तो पर्यंत कसेबसे दिवस घालवण्यासाठी माझ्या शुभेच्छा.

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

टारझन's picture

16 Dec 2009 - 5:33 pm | टारझन

=)) =)) =))
हताश कसला बॉ ? हे एक प्रातिनिधीक विडंबण आहे :)

घराभाईर र्‍हाऊन घरासाटी पैका मिळवणार्‍यांचे मनोगत (ऑब्जेक्शन?)

रेवती's picture

16 Dec 2009 - 8:57 pm | रेवती

आपला विडंबनाचा प्रयत्न पाहून बरं वाटलं.
जुने लोक जाणते आहेत. आपणहून आपल्यासारख्या, म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या नव्या दमाच्या विडंबकांना वाट करून देतील असा विश्वास वाटतो.
जमवु किती किती मी, वाचवू किती किती मी
दमडीस दमडी जोडण्यात वेळ गेला
या ओळींनी महागाईचे वर्णन थोडक्यात केले आहे.
आपल्याकडे असलेल्या शब्दसंपत्तीकडे दुर्लक्ष करू नका.;)
रेवती

प्रकाश घाटपांडे's picture

16 Dec 2009 - 10:12 pm | प्रकाश घाटपांडे

प्रेरना क्वाँची म्हनायची?

प्रेस नसता कपडे , संपला टुथपेस्ट ही
गार पाण्याने अंघोळ करण्यात वेळ गेला

हॅहॅहॅ! मी म्हंतो कापडं आन आंगुळ्या करायच्याच कशाला?फुकाट सर्दीला कहार! होष्टेल ची आठवन आली ब्वॉ!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

पाषाणभेद's picture

17 Dec 2009 - 5:20 am | पाषाणभेद

घाटपांडे काकांवानीच म्हंतो, होष्टेल ची आठवन आली ब्वॉ!
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

कानडाऊ योगेशु's picture

18 Dec 2009 - 5:40 pm | कानडाऊ योगेशु

नृत्य बिभत्स
कोरस चा वापर..

टारूभाऊ तुम्ही असे नर्तन करत आहात आणि पाठीमागुन कोरसचा कर्णकर्कश्य आवाज....!
विडंबनालाही कापरं भरेल.
उलट्या हातांनी बोंब मारत मिपाकर सैरावरा पळताना दिसताहेत.

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

टारझन's picture

18 Dec 2009 - 6:14 pm | टारझन

हॅहॅहॅ ... च्यामारी. .. हे मी टाकलं व्हतं व्हय ? मला तर अंमळ विसरही पडला होता. काय आहे ना .. आम्ही काय हळुवार कवी नाहीत काणडाऊ जी योगेश साहेबजी. त्यामुळे असले व्हर्चुअल रिमिक्स करावे लागतात ..

धागा वर आल्याने पुन्हा स्वानंदप्राप्ती झाली.

सर्व प्रतिसादकांचे आभार ;) वाचकांचे आभार.
नुसतंच डोकाउन जाणार्‍या रिकामटेकड्यांचे पण आभार =))

:B :B :B आभारवडी :B :B :B