लिहिण्यास कारण कि.....
गेल्या दोन महिन्यात बरीच धर्मक्षेत्रे बघायचा योग आला. त्यातले अनुभव मांडावे असे वाटले..
गेल्या नवरात्रीत जो विकांत आला होता त्यावेळी आपले मिपाकर स्वानंद यांनी सोलापुर आणी आसपासची तिर्थक्षेत्रे बघायची असा बेत केला. मी त्यात खुप ऊशीरा सामिल झालो पण नशिबाने सिध्देश्वर एक्स्प्रेस ची तिकिटे मिळाली., शुक्रवारी रात्री दादरहुन प्रवास सुरु झाला. दुसर्या दिवशी सकाळी ७.०० च्या सुमारास सोलापुरला पोहोचलो. एका मित्राच्या घरी जाऊन आन्हिके ऊरकुन प्रवासास निघालो...
पहिला ट्प्पा..
श्री क्षेत्र गाणगापुर...
सोलापुरहुन अक्कलकोट आणी अक्कलकोट ते गाणगापुर असा बस प्रवास होता. सोलापुर ते अक्कलकोट सुखाचा झाला पण अक्कलकोट बस थांब्यावर पोहोचलो आणी गाणगापुरला जाणार्या बसची वाट बघत उभे होतो. बराच वेळ बस नव्हती आणि तेथिल कर्मचारी नेहमी प्रमाणे काहिहि सांगावयास तयार नव्हते. अखेरिस एकदाची बस आली आणी आमचा प्रवास सुरु झाला. फारसे प्रवासी न्हवते त्यामुळे बसमध्ये मागच्या शिटा पुर्ण रिकाम्या होत्या. जो पर्यंत महाराष्ट्रात होतो तो पर्यंतचा प्रवास सुखाचा म्हणावा लागेल कारण जेव्हा कर्नाटकच्या हद्दीत शिरलो तेव्हा एकदम 'रोलर कोस्ट्ल राईड' चा अनुभव मिळाला.. रस्ता नाहिच फक्त खड्डे.... बाहेर कोणते गाव आले ते बघावे तर सगळी कडे जिलेब्याच जिलेब्या... बर्याच वेळाने पोहोचलो गाणगापुरात.. (तिथे मात्र मराटी पाट्या आहेत.) बस मध्ये मागे पाहिले तर सर्व शिटा बाकावरुन ऊडुन खाली पडल्या होत्या.
गाणगापुर बसथांब्यावरुन एक रिक्षा पकडली. २० रुपयात संगम, मुख्य देऊळ, भस्माचा डोंगर आणी परत बस थांबा असा करार झाला. ते सुद्धा फक्त एका तासात कारण एका तासानंतर परत अक्कलकोटला जाणारी त्यादिवशीची शेवटची बस होती. पाच मिनीटांतच पोहोचलो संगमावर... दोन्हि बाजुंना प्लास्टीकचा कचरा आणी मध्ये झोपलेले भिकारी चुकवत कसेबसे पात्रात पोहोचलो. तिथे एक दाक्षीणात्य जोडपे काहि धार्मिक विधि करत होते. सहज म्हुनुन त्यांना स्थळ महात्म्य विचारल तर त्यांनी माहित नाहि म्हणुन आमचा सरळ सर्ळ चिवडाच केला... त्यानंतर ओ॑दुंबराचे दर्शन घ्यायला गेलो आणी पाहुन धकाच बसला.. जे काहि पाहिले ते खालील चित्रात पहा...
त्या पवित्र स्थळी सर्वत्र कचरा, घाण पाणी, तेलसद्रुश्य काहि पदार्थ पसरलेला होता. सर्वत्र माश्यांचा घवघवाट होता. तिथुन मंदिरात गेलो. वास्तु बाहेरुन सुंदर वाट्ली.
आत जाऊन दर्शन घेतले आणी बघतो तर काय गाभारयाच्या सभोवती बायकांनी डेरा टाकला होता. मस्त पे॑कि अंथरुण पसरुन काहि जणी झोपल्या होत्या तर काहि जणी केस विंचरत होत्या. देऊळ आहे कि धर्मशाळा हेच समजत न्हवते. मुख्य गाभार्या बाहेर स्टीलचे कुंपण होते. त्या बाहेरुन दर्शन. श्रीची मुर्ती सुंदर दिसत होती. पण छायाचित्र काडू देत नहित. का कोण जाणे? र्तिर्थांसाठी पुजार्याच्या समोर ओंजळ धरली तेव्हा तिर्थांसोबत समोरुन प्रश्न आला 'काहि दक्षीणा वे॑गरे? अभिषेक करायचा आहे का'? आम्हाला काहिहि करायचे नव्हते पण मद्त म्हणुन ५० रुपये पेटीट टाकायला गेलो तेव्हा पुजार्यांनी सांगीतले कि १०० रु द्या अभिषेक करुन प्रसाद घरपोच करुन मिळेल. आम्हि सुद्दा तयार झालो आणी दिले १०० रुपये. पावती वे॑गरे काहि प्रकार न्हवता. एका वहित त्याने आम्हां सर्वांचे नाव व पत्ते लिहुन घेतले. आणि त्या स्टील्च्या कुंपणाच्या आत सोडले. दारा बाहेर ऊभे करुन आरती हि करऊन घेतली. हा त्या १०० रु चा प्रताप होता. पुन्हा आरतीत कहि टाका हि मागणी पण झाली. स्टीलच्या कठड्याबाहेर आलो तर एक सनईवाद्क ऊभा होता. बाहेर जाऊनच देईना, 'पुजारी जेव्हा तुमच्या नावे अभिषेक करतील तेव्हा मी सनई वाजवणार, १० रु. द्या' असे सांगु लागला. पुजारी काहि मदत करतील या आशेने आम्ही पुजार्यांकडे पाहिले तर ते आपण या गावचे नाहित असेच वागु लागले. प्रत्येकी १० रु. देऊन सुटका करुन घेतली.
मग पोहोचलो भस्म्याच्या डोंगरा कडे, तिथले भिकारी मात्र भलतेच शिस्तबद्ध वाटले. एका ओळीत बसलेले होते. मात्र त्या जागेला डोंगर का म्हणतात हे मात्र समजले नाहि. डोंगरच काय पण टेकडी किंवा मातीचा ऊंचवटा पण न्हवता. एका ठीकाणी पाणी साचले होते आणी त्यात एक मंदिर सद्रुश्य वास्तु होती. बाकि घाणीचे साम्रज्य मात्र होते. तिथली माती भस्म म्हणुन घेतली. बहुतेक सगळ्यांनी भस्म नेऊन डोंगराचा ऊंचवटा झाला असेल.... मग आमची स्वारी वळली ते मुख्य मंदिरा कडे. मंदिर छान पण सभोवती दुकांनांचा गराडा. त्यांनी ऊभार्लेल्या प्लास्टीक्च्या कमानी, ह्यातुन मुळ मंदिराची शोभा पार निघुन गेली होती.
तेथे दर्शन खिड्कीतुन मिळ्ते. खिडकीतुन का हा प्रश्न अनुत्तरितच....
शेवटी परत बसथांब्यावर येऊन अक्कलकोट्ला जाणारी बस पकडली.......
क्रमशः
प्रतिक्रिया
19 Nov 2009 - 9:54 pm | नि३
वाचतोय.....
---नि३.
19 Nov 2009 - 9:58 pm | विकास
छायाचित्रांमधे नवीन काहीच नसले तरी अस्वस्थता आली..
19 Nov 2009 - 10:02 pm | मुक्तसुनीत
वाचून खेद झाला. आश्चर्य वाटले नाही. एकूण परिस्थिती बदललेली नाही इतकेच दिसले.
19 Nov 2009 - 10:07 pm | प्रकाश घाटपांडे
वाचतो आहे. आपली तीर्थ क्षेत्रे गचाळ व घाणेरडी असतात याचे फार दु़:ख होते. तिथे गेल्यावर मन कसं प्रसन्न झाले पाहिजे. मंदिर अस असाव कि जिथे नास्तिकालाही प्रसन्न वाटेल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
19 Nov 2009 - 10:09 pm | विकास
मंदिर अस असाव कि जिथे नास्तिकालाही प्रसन्न वाटेल.
सहमत
20 Nov 2009 - 7:04 am | स्वप्निल..
>>मंदिर अस असाव कि जिथे नास्तिकालाही प्रसन्न वाटेल.
सहमत
20 Nov 2009 - 11:00 am | सुनील
आपली तीर्थ क्षेत्रे गचाळ व घाणेरडी असतात याचे फार दु़:ख होते
बहुतांशी सहमत.
ह्याला गोव्यातील देवळे हा सुखद अपवाद ठरावा. तिथे देवळातच नव्हे तर, आसपासच्या परिसरातदेखिल बर्यापैकी स्वच्छता असते आणि भिकारीही दिसत नाहीत.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
19 Nov 2009 - 10:51 pm | स्वाती२
वाचत आहे.
20 Nov 2009 - 12:00 am | चिरोटा
एवढी जुनी आणि प्रसिद्ध मंदिरे असताना त्यांची कोणीच काळजी का घेत नाही? मंदिराच्या आवारात आधी लोकांची रांग बघितली की जावेसेच वाटत नाही.त्यात अस्वच्छता असली की उगाच आलो की काय असे वाटून जाते.प्लास्टिक्,मंदिरात प्रमाणा बाहेर वापरलेल्या ट्युब लाईट्स,स्टीलची भांडी,मोठे स्पीकर्स ,हेकट भटजी हे वातावरण महाराष्ट्रातल्या बर्याच मंदीरांमध्ये दिसते.
भेंडी
P = NP
20 Nov 2009 - 6:51 am | हर्षद आनंदी
काय बोलावे?
हे असेच चालते म्हणुन सोडुन देणार, एक सुस्कारा सोडुन आपल्या मार्गाला लागणार.... 'आम्हाला काय त्याचे?'
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
20 Nov 2009 - 10:46 am | झकासराव
मंदिर अस असाव कि जिथे नास्तिकालाही प्रसन्न वाटेल.>>>>>
हम्म. शिरगावातील (पुण्याजवळील प्रतिशिर्डी) साई बाबा मंदिर अस आहे. जरी दर्शन जवळून घ्यायला खुप गर्दी असेल तरी मुख्य मंदिराच्या हॉल मधुन दर्शन होतच. तिथे भिकारी दिसलेच नाहित. बहुतेक भिकारी जमा होउ देतच नसतील.
हल्लीच तिकडे प्रचंड श्रीमंत लोकांचे लक्ष गेलय हे मंदीरात लावलेल्या सोन्याच्या पत्र्यावरुन दिसल. (माणिकचंद गुटखावाले रसिकलाल धारीवाल ह्यानी देणगी दिला आहे हा पत्रा)
बाहेर फारसे विक्रेते नाहियेत. जे मुख्य दरवाज्याजवळ फक्त दोन दुकान आहेत ती देखील संस्थानाने मान्यता दिलेली असावीत. आत प्रत्येकी एक प्रसादाचे पेढे आणि लाडु विकणारी टपरी आहे ती संस्थानाची असावी. तिथे जवळच संस्थानाने चहा, कॉफी, कोल्ड्रिन्क्स विकत मिळण्याची व्यवस्था केली आहे.
बास.
ह्याच्या पलिकडे एकही दुकान नाही. त्यामुळे मंदीरातच आल्याचा फील असतो.
अजुन तरी तिकडे बाजारिकरण झालेल नाहिये. भविष्यात होणारच नाही ह्याची खात्रीदेखील नाही.
गाणगापुरातील फोटो पाहुन वाइट्ट वाटल. तिथले ट्रस्ट हे सगळ मॅनॅज करु शकत. फक्त इच्छाशक्ती हवी.
20 Nov 2009 - 4:00 pm | स्वानन्द
गम्मत म्हणजे...मला अजूनही अभिषेकाचा प्रसाद व अंगारा मिळालेला नाही :)
20 Nov 2009 - 4:03 pm | स्वानन्द
आणि हो...जर १०० - १५० रुपये दिले तर पादुकांना हात वगैरे लावायला मिळतो!
20 Nov 2009 - 4:21 pm | सूहास (not verified)
प्रशु...चांगला विषय घेतलात ..जेजुरीला तर भिक्षेने आणी दक्षिणेने नको-नको होत...तोच अनुभव मोरगाव ला.....कनिफनाथ मात्र खुप आवडल ..त्याचप्रमाणे निळ्कंठेश्वर ही ...उत्तम व्यवस्था आहेत दोन्हीकडे ...कनिफनाथला जेवण मिळत ते एकदम झकास....
झकासराव ..प्रतिशिर्डीला गर्दी नसते म्हणुन तरी सध्या ठीक आहे ...बाकी मंदीराच्या मागे जो मठ(मठ कसला राजवाडाच तो!!) आहे ..तो एका बाबतीत अतिशय गचाळ आहे ...एका बाईला धंदा करताना पाहिले होत तिथे..मित्राने जाऊन रेट वगैरै विचारला होता...रात्रीचे नऊ वाजता..त्यानंतर परत शिरगावला गेला नाही रात्रीचा....घाण !!!
एकविराची तर वाट लागली आहे...खाली पायर्या सुरु व्हायच्या आधी लोक्स दारु आणतात मटन आणतात ..खातात पितात .नाचतात...वर मंदीरात दर्शन घ्यायला गेल की पुजारी सौता त्या दक्षीणेच्या थाळीकडे हात करुन दाखवितो...एक वेगळ्याच प्रकारची भीक मागतात साले !!
पण आश्चर्य वाटले ते " हारावड्याच्या म्हसोबा"ला ..एकदम क्लीन अॅन्ड नीट देवस्थान ...कोणी ही कोणाला लूटत नाही !!! मी नेहमी जातो..अजुन एकही वाईट अनुभव नाही...
सू हा स...
21 Nov 2009 - 8:47 pm | स्वानन्द
शेगावच्या गजानन महाराज संस्थानाचा देखील आवर्जून उल्लेख केला पाहिजे. अतिशय उत्तम व चोख व्यवस्था ठेवली आहे. शिवाय सर्व स्वयंसेवक 'हे महाराजंचे काम आहे' या भक्तीभावाने काम करतात!
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
20 Nov 2009 - 4:55 pm | प्रसन्न केसकर
तर्हेतर्हेचे भिकारी, ओंगळवाणे पुजारी अन हिणकस लोकांनी विटंबलेली तीर्थस्थानं बघितली की जीव अगदी विटुन जातो. देवानंच स्वतः सगळ्यांना वठणीवर लावावी अशी इच्छा होते. पण देवालापण बहुतेक अश्या लोकांतच रमायची सवय झालेली असावी.
उचित विषयावर चांगला लेख. मन खिन्न झालं तरी लेख आवडला एव्हढच म्हणतो.
22 Nov 2009 - 4:00 pm | लवंगी
म्हणूनच मला छोट्या खेड्यातली छोटी छोटी देवळं आवडतात.. सक्काळी किंवा निवांत दुपारी जाव.. थंडगार देवळात डोळे मिटून शांत ध्यान करत बसाव.. त्यात जे समाधान आहे ते अशा रांगा लावून धक्का-बुक्की करून घेतलेल्या दर्शनात अजिबात नाही..