(रिप्लाय /प्रतिसाद)

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
11 Nov 2009 - 11:50 pm
गाभा: 

कच्च्या मालाचे पुरवठादार
एक धागा काढायचा योग आला होता...धाग्यात लिहीले होते कि रिप्लाय /प्रतिसाद देवु नेये. स्मायली, +१ पण लिहु नये... हि पध्धत रुढ होत चालली आहे....आपणास काय वाटते? असे असावे कि नको..?..मला वाटते कि प्रतिसाद न घेणे व न देणे योग्य आहे....आपणास काय वाटते?
यावर असेहि एक मत आहे कि प्रतिसाद न देता धागावाचनास गेले कि लोक म्हणतात "आले फुकट वाचायला.."
काहि ठिकाणी तर किति प्रतिसाद आले हे वेगळा धागा काढून सांगीतले जाते..रिप्लाय च्या मालकावरून काय ठरते? सामाजिक मत? कि कंपुची परीस्थिति?..रिप्लाय न घेण्याची प्रथा पुरोगामी महराष्ट्रात रुढ व्हावि
आपले प्रतिसाद व्यक्त करुन धाग्यास पावन करावे

प्रतिक्रिया

Nile's picture

11 Nov 2009 - 11:52 pm | Nile

प्रतिसाद न देणे योग्य आहे.

शी सहमत आहे.

शार्दुल's picture

11 Nov 2009 - 11:54 pm | शार्दुल

8}

नेहा

शेखर's picture

12 Nov 2009 - 12:27 am | शेखर

मी कर भरत असल्याने त्रास न होता प्रतिसाद द्यायचा असल्याने स्मायली, +१ असे प्रतिसाद देतो.

मी आता एवढा मोठा वरील प्रतिसाद द्यायला कर भरतो? ;)

शेखर

प्रभो's picture

12 Nov 2009 - 12:19 am | प्रभो

रे दगडफोड्या, प्रतिसाद कमी कारायचेत तर मग पुचक्रमावर लिवावं ना.
साला हाय काय आन नाय काय?

आणी वाचनाचं म्हणशील तर लेखच लिहू नये. (आम्हाला) आयुष्यभर होणारा त्रास वाचेल...

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

चिरोटा's picture

12 Nov 2009 - 10:09 am | चिरोटा

प्रतिसाद आले की सर्वात आधी कंपुबाज कोणी किती प्रतिसाद दिले आहेत ते बघतात्.त्यात +१ असले की मग व्यक्तीचे नाव्/प्रतिसाद डायरीत लिहिले जाते. सहसा आपण लोकांना जेवढे प्रतिसाद दिलेले असतात साधारण तेवढाच आपल्याला परत मिळतात!!
आपले वाचन हाच आमचा प्रतिसाद हे मला योग्य वाटते.या,धागा वाचा आणि निघा.
भेंडी
P = NP

पर्नल नेने मराठे's picture

12 Nov 2009 - 10:58 am | पर्नल नेने मराठे

माझ्या मागच्या लेखावर वाईट प्रतिसाद देउ नये लिहिले होते...त्यामुळे ते खरडरुपात आले होते, ते ही लोक वाचतातच की. माझ्या दुसर्या लेखात चुक सुधारली गेली. प्रतिसाद देउ नये लिहिले गेले. नातेवाइक व जवळ्चे मित्र्-मैत्रीणीनी व्यनी केले त्यातच प्रतिसाद दिला. म्हणुन हल्ली ज्याना खरच प्रतिसाद द्यायचा असतो त्यानी गुपचुप व्यनी करुनच द्यावेत सो मीपावर इमेज छान राहिल. नाहितर ज्यानी दिलाय त्याना कम्पुबाज म्हणतात व ज्यानी नाहि दिलाय ते पश्चाताप करु पहातात.

चुचु
(व्यवहारी चतुर कोब्रा)
http://www.misalpav.com/node/10138#comment-162437

अवलिया's picture

12 Nov 2009 - 12:05 pm | अवलिया

विचार प्रवर्तक धागा.

तुम्हाला संकेत स्थळाचे संपादक व्हायचे असेल किंवा विचारवंत म्हणुन मान मिळवायचा असेल तर तुम्हाला अगदि मोजुनमापुन प्रतिसाद देणे गरजेचे आहे. आणि विचारवंत किंवा संपादक नसेल व्हायचे तर मनात येईल तसे टिनपाट आणि चिल्लर प्रतिसाद द्यावे.

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.